मित्रांनो, तंत्रज्ञान हे आजच्या युगात खूप महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. पण तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान किती कामाचे आहे? व तंत्रज्ञानाचे कोण कोणते फायदे आहेत? हे आपण आज जाणून घेऊया. तसेच आपण माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? (Technology Meaning In Marathi) ह्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीत आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. तंत्रज्ञानामुळे आपले रोजचे जीवन खूप सोप्पे व जलद केले आहे. त्यामुळे आपली सर्व कामे काही मिनिटात पूर्ण होतात. चला तर मग आजच्या माहितीला सुरुवात करुया.
तंत्रज्ञानाचा मराठी अर्थ (Technology meaning in Marathi)
Technology Meaning in Marathi:- Technology म्हणजे तंत्रज्ञान होय. तंत्रज्ञान हे मानव निर्मित साधने बनवण्यासाठी वापरले जाते. टेक्नॉलॉजी ही मानवी जीवन सोप्पे व सुरक्षित बनवण्यासाठी वापरली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रात जलद व सुरक्षित काम करता येते.
तंत्रज्ञान म्हणजे काय? (Technology information in marathi)
टेक्नॉलॉजी म्हणजे मराठी मध्ये तंत्रज्ञान होय. तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या सुविधांसाठी त्याचा वापर केला जातो. भौतिक सुविधांसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. तंत्रज्ञान म्हणजे वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनासाठी किंवा वैज्ञानिक तपासणीसारख्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरल्या जाणार्या एकूण तंत्रे, कौशल्ये, पद्धती आणि प्रक्रियांची बेरीज होय. आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाले, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), 4G/5G तंत्रज्ञान, Virtual Reality, UPI, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज यासारखे अनेक तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहेत.
येणारे नवीन युग हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाणार आहे. मानवाने त्याच्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाला सामील केले आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान वापरले जात आहे. तंत्रज्ञान नाही तर सर्व कामे आता ठप्प पडतील, असे झाले आहे. खाली आपण वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञान कश्या प्रकारे वापरले जाते. ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि त्याचे होणारे फायदे (Types of Technology in different sectors in Marathi)
दैनंदिन कामात, वेगवेगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञान कश्या प्रकारे वापरले जाते. ह्याबद्दल माहिती जाणून घेऊया.
1. वैद्यकीय क्षेत्र (Medical Sector)
जगातील वैद्यकीय क्षेत्र खूप वेगाने क्रांती करत आहे. प्रत्येक आजारावरील औषधे व Vaccines आता उपलब्ध आहेत. हे सर्व फक्त तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानामुळे रोज नवनवीन औषधे तयार केली जातात. तंत्रज्ञान हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक वरदान आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून हाई टेक मेडिकल उपकरणे, Vaccines, औषधे, हेल्थ केअर प्रॉडक्ट्स तयार केले जातात. तसेच विविध प्रकारच्या चाचण्या व रोगांवरील निदान, अवयव प्रत्यारोपण, विविध जटिल व अवघड शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहेत. कोरोना (Covid -19) सारख्या महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प पडली होते. तेव्हा Covid-19 महामारीवर लस काढण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. कित्येक प्रयत्नानंतर, Covishield, Covaxin, Sputnik, सारख्या लस (vaccines) बनवण्यात आल्या. ज्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले. ह्यामुळे तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा मदत केली, असे म्हणता येईल.
नक्की वाचा: गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स
तसेच आता ऑनलाईन माध्यमांचा वापर करून डॉक्टर्स डायरेक्ट त्यांच्या घरातून रुग्णांशी व्हिडिओ कॉल द्वारे ट्रीटमेंट करू शकतात. त्यानंतर prescription लिहून, ते फोटो द्वारे रुग्णाच्या मोबाईलवर पाठवू शकतात. Netmeds, PharmEasy, Tata 1Mg, Practo सारख्या Apps वरून आपण घरातून ऑनलाईन औषधे मागवू शकतो व डॉक्टर्स सोबत व्हिडिओ कॉल द्वारे कॉन्टॅक्ट करू शकतो.
Google My Business वर ऑनलाईन बिझनेस खाते कसे उघडावे? ह्यासाठी हा लेख नक्की वाचा:
२. शिक्षण क्षेत्र (Education Sector)
शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहे. शिक्षणामुळे आपण सुशिक्षित नागरिक बनतो. तसेच आपल्याला चांगल्या पदाची व पगाराची नोकरी मिळते. भारतामध्ये शिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने जास्त प्रमाणात घेतले जाते. परंतु डिजिटल काळात भारतात व जगभरात शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. जसे की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ मीटिंग, ऑनलाईन लेक्चर्स, ऑडिओ फाईल्स व पीडीएफ फाईल्स स्वरूपात शिक्षण घेतले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या सर्व गोष्टी साध्य झाल्या आहेत. ज्याचा सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयोग होणार आहे.
हे नक्की वाचा: गूगल वरून Copyright Free Images कसे डाऊनलोड करायचे?
प्रत्येक क्लासरूम व शाळेत आता फळ्याचा वापर न करता स्मार्टटीव्ही चा किंवा प्रोजेक्टर चा वापर केला जातो. यामुळे शिक्षण अतिशय सोपे व सुलभ झाले आहे. विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवू शकतात. तंत्रज्ञानातील झालेल्या विकासामुळे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबसाइट्स वरील पीडीएफ (PDF) व ऑडिओ स्वरूपातील लाखो पुस्तके काही मिनिटात मोबाईल मध्ये डाऊनलोड करून वाचू शकतो. ह्यासाठी मोबाईल मध्ये इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असणे आवश्यक आहे. ह्यामुळे विद्यार्थी शाळेनंतर घरी सुद्धा स्वतः अभ्यास करू शकतात. हे सर्व फक्त तंत्रज्ञानातील विकासामुळे शक्य झाले आहे.
३. शेती क्षेत्र (Agriculture Sector)
शेती ही पुरातन काळापासून केली जाते. भारतात अजूनही शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. परंतु अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप सारख्या देशात शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते. शेती हा संपूर्ण मानव जातीच्या जीवनाचा कणा आहे. पूर्वीच्या कली पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. त्यामुळे अधिक वेळ आणि अधिक मनुष्यबळाचा वापर करूनही कमी उत्पादन मिळत होते. परंतु, आता शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. शेतीतील विविध घटकांमध्ये विविध प्रकारची उपकरणे व प्रणालींचा वापर करून कमी वेळात व कमी मनुष्यबळाचा वापर करून शेती केली जाते. खाली आपण शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो व कोणत्या पद्धतीने केला जातो, ते पाहूया.
नक्की वाचा: PhonePe म्हणजे काय? | फोन पे अकाउंट कसे बनवायचे?
ट्रॅक्टर – पूर्वी शेती करण्यासाठी दोन बैल व नांगराची आवश्यकता पडायची. पण आता ट्रॅक्टर चा वापर करून कमी वेळेत जास्त शेतात शेती केली जाते. त्यामुळे जास्त वेळेची बचत होते व कमी मेहनत करावी लागते.
मशागत – शेतीच्या मशागती स्वच्छतेसाठी ट्रॅक्टर ची विविध अवजारे, तसेच इतर यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होते.
सिंचन – पिकांना पाणी देण्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. सिंचनाचा वापर करून कमीत कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेता येते. ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक प्रणालींचा वापर केला जातो, तसेच मल्चिंगचा वापर केला जातो.
बियाणे – शेतात बियाणे पेरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यामुळे कमी वेळेत जास्त शेतात बियाणे परत येतात. तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिकांचे नवनवीन आणि अधिक उत्पादन देणारे बियाणे तयार केले जातात.
शेतीमालावरील प्रक्रिया व कृषी उद्योग – विविध प्रकारचे आधुनिक यंत्र व प्रक्रियांचा वापर करून अनेक कृषी उद्योग भरभराटीस आले आहेत. फळे तसेच भाज्यांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने बनवली जात आहेत. तसेच शीतगृहांची चा वापर करून शेतीमालाची दीर्घ काळासाठी साठवणूक करणे शक्य झाले आहे.
४. संरक्षण क्षेत्र
प्रत्येक देशाची स्वतःची सीमा आहे. ह्या सिमाच्या मदतीने वेगवेगळे देश जोडले जातात. प्रत्येक देशाच्या सीमेवर अनेक संरक्षण करणारे सैनिक असतात. संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या सैनिकांची चिंता व कामे कमी केली आहेत. देशाच्या सीमा रक्षण तसेच देशांतर्गत संरक्षणामध्ये विविध तांत्रिक प्रणालींचा वापर केला जात आहे. ज्यामुळे सीमेवर संरक्षण करणे सोप्पं झाले आहे. Drone, Mini हेलिकॉप्टर विरोधी देशाच्या सीमेवर ठेवून त्यांच्या प्रत्येक हालचालीवरून नियंत्रण ठेवू शकतो. तसेच सीमेवरील सैनिकांना थंडीपासून किंवा अतिउष्ण तापमानात राहण्यास मदत करणारे आधुनिक साहित्य, संभाषणाचे तसेच दळणवळणाच्या आधुनिक उपकरणे अशा तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा वापर संरक्षण क्षेत्रात केला जात आहे.
५. दळणवळण क्षेत्र
जगात प्रत्येक देशात मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट व एक्सपोर्ट म्हणजेच दळणवळण केले जाते. दळणवळण मोठ्या प्रमाणात आणि लवकर करण्यासाठी आजकाल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तंत्रज्ञानामुळे दळणवळण क्षेत्राला चालना मिळाली आहे. इंटरनॅशनल आणि नॅशनल व्यापार व देवाणघेवाण वाढली आहे. यामुळे राष्ट्रांच्या आर्थिक विकासात भर पडली आहे. तसेच प्रवासामध्ये वेळेची व पैशाची बचत होत आहे. ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या रेल्वेची किंवा विमानाची तिकिटे घेणे शक्य झाले आहे.
हे नक्की वाचा: गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?
६. Crypto Currency
तंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्रांती झाली आहे, हे कटू सत्य आहे. वेगवेगळे तंत्रज्ञान लोकांच्या उपयोगासाठी उपलब्ध होत आहे. Crypto Currency म्हणजेच आभासी चलन हे सुद्धा तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. आभासी चलन हे आपण विकत घेऊ शकतो व खरेदी करू शकतो. तसेच हे चलन आपण जागतिक कोणत्याही व्यक्तीला पाठवू शकतो. बिटकॉइन, dogcoin, etherium, इ. आभासी चलनाची उदाहरणे आहेत. Crypto Currency हे जगाचे एक आगळेवेगळे चलन आहे. तसेच ह्याला पुढे खूप मागणी वाढणार आहे.
७. Mobile Apps & सॉफ्टवेअर
आपल्या दैनंदिन जीवनात अनेक कामांसाठी आपण अनेक मोबाईल्स ॲप्स वापरतो. जसे की, Google Pay, M Indicator, Google Chrome, WhatsApp हे सर्व तंत्रज्ञानाने बनवलेले आहेत.ह्यामुळे आपले रोजचे जीवन सुखमय झाले आहे. Adobe कंपनीचे सॉफ्टवेअर जसे की, After Effects, Illustrator, Photoshop, Adobe Acrobat, Adobe Premiere Pro, इत्यादी सॉफ्टवेअर हे तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे. ज्यांच्यामुळे अनेक कठीण कामे सोप्प्या पद्धतीने पूर्ण होतात. फोटोग्राफी मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे सॉफ्टवेअर खूप उपयोगी आहेत.
८. इ कॉमर्स क्षेत्र
ऑनलाईन शॉपिंग चे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक जण मोबाईल मधून ऑनलाईन शॉपिंग करत आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन, क्रोमा, रिलायन्स डिजिटल स्टोअर, इत्यादी सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून आपण ऑनलाइन शॉपिंग करू शकतो. ह्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. ज्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट्स ऑनलाईन उपलब्ध करण्याची संधी प्रत्येक व्यापाऱ्यांना मिळत आहे. ज्यामुळे त्यांच्या खरेदी व विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
९. मनोरंजन क्षेत्र
प्रत्येक व्यक्तीला मनोरंजन हे प्रिय असते. आपले दैनंदिन जीवन हे मनोरंजनाशिवाय अपूर्ण आहे. आपण घरातून टीव्ही वर एखादा चित्रपट, मालिका, गाणी पाहतो. हे सर्व तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. टीव्ही वर पाहणारे दृश्य हे मोठ्या अँटीनाने सिग्नल पाठवले जातात, त्यानंतर ते आपल्याला दिसतात. तसेच स्मार्टफोन वर आपण OTT Apps वरून ऑनलाईन चित्रपट पाहतो. हे सुद्धा तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. तसेच आपण जेव्हा टीव्ही वर लाईव्ह क्रिकेट पाहतो. तेव्हा आपल्याला लाईव्ह स्कोअर दिसतो. तो लाईव्ह स्कोअर हा सॉफ्टवेअर चा वापर करून दाखवतात. तसेच आपल्यापेक्षा हजारो किलोमीटर दूर चालू असलेला क्रिकेट सामना आपण घरबसल्या टीव्ही वर किंवा मोबाईल वर पाहू शकतो. हे सर्व तंत्रज्ञानामुळे शक्य आहे.
नक्की वाचा: 15+ Top Marathi OTT Platforms In India
10. बँकिंग क्षेत्र
अगोदर आपण बँकेत जाऊन स्लिप्स भरून बँकेत पैसे भरायचो किंवा एखाद्या पैसे पाठवायचे असल्यास बँकेत जाऊन पाठवायचो. त्यानंतर नेट बँकिंग सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली. नेट बँकिंग च्या साहाय्याने आपण मोबाईल मधून ऑनलाइन व्यवहार करू शकतो. तसेच नातेवाईकांना ऑनलाईन पैसे पाठवू शकतो. RTPS, IMPS, UPI सारख्या सुविधा आपल्याला बँकेने उपलब्ध करून दिले. ज्याच्या साहाय्याने कमी वेळेत आपले काम पूर्ण होतात. हे सर्व काही तंत्रज्ञानाने शक्य केले आहे.
नक्की वाचा: E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!
11. अवकाश संशोधन
भारत, अमेरिका, जपान, चीन, रशिया सारखे देश अवकाश संशोधन क्षेत्रात खूप जोमाने काम करत आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळे संशोधन हे देश लावत असतात. मंगळ, चंद्र, प्लुटो, सारख्या ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व आहे की नाही. तसेच राहण्यासाठी दुसऱ्या ग्रहावर जागा आहे की नाही. त्याबद्दल संशोधन लावत असतात. तसेच अवकाशातील सर्व संशोधन हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानामुळे आपल्या मंगळावरील पाणी, तेथील जमिनीचे फोटोज्, तिकडचे वातावरण ह्या सर्वाची माहिती तंत्रज्ञानामुळे मिळते. इस्रो, नासा यांसारख्या अवकाश संशोधन करणाऱ्या संस्था पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. अश्या पद्धतीने अवकाश संशोधन हे करण्यासाठी तंत्रज्ञान किती उपयोगी पडते, हे आपल्याला समजते. तंत्रज्ञानामुळे मोठे मोठे रॉकेट पृथ्वीच्या बाहेर जातात.
12. ऑनलाईन व्यवहार
ऑनलाईन व्यवहारामध्ये तंत्रज्ञान मोलाचे योगदान देते. UPI प्रणालीच्या माध्यमातून आपण मोबाईल मधून बँक खात्यातील पैसे दुसऱ्या व्यक्तीला काही सेकंदात पाठवू शकतो. तसेच ह्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरजही लागत नाही. PhonePe, Google Pay, MobiKwik सारखे UPI Payment Apps आपल्याला मोबाईल मधून ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते. तसेच ऑनलाईन शॉपिंग करणे, पैसे पाठवणे, मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट आपण मोबाईल मधून काही मिनिटात करू शकतो. तंत्रज्ञानामुळे आपण आपले पैसे पाठवू शकतो व ऑनलाईन व्यवहार करू शकतो.
नक्की वाचा: UPI म्हणजे काय? यूपीआय ने पैसे कसे पाठवायचे?
तंत्रज्ञानामुळे होणारे फायदे (Advantages of technology in marathi)
◼️ तंत्रज्ञानामुळे सोपे, जलद आणि अधिक प्रभावीपणाने काम होते. त्यामुळे वेळेची फार बचत होते.
◼️ चांगले, अधिक कार्यक्षम उत्पादन मिळते. ज्यामुळे जास्त सेल होते.
◼️ नवीन व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करण्याची क्षमता तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिले आहे.
◼️ कमी वेळेत जास्तीत जास्त कामे व योग्य पद्धतीने कामे पूर्ण होत आहेत.
◼️ तंत्रज्ञानामुळे जगाच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरील व्यक्तीशी काही सेकंदात व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधता येतो.
◼️ शैक्षणिक, मेडिकल, डिजिटल, बँकिंग, अग्रिकल्चर, import-export, औद्योगिक, व्यवहार क्षेत्रात खूप प्रगती होत आहे. व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून कामे पटकन होत आहेत.
नक्की वाचा: Artificial Intelligence काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोण कोणते उपयोग आहेत?
तंत्रज्ञानामुळे होणारे तोटे (Disadvantages of technology in marathi)
◼️ तंत्रज्ञानावर आपण जास्त अवलंबून राहिले आहोत. ज्यामुळे ह्याचा आपल्याला जीवनात खूप तोटा होणार आहे.
◼️ तंत्रज्ञानामुळे प्राण्यांवर खूप प्रमाणात परिणाम होत आहे. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.
◼️ तंत्रज्ञानामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका वाढतो.
◼️ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी (विशेषत: लहान व्यवसायांसाठी) मोठया प्रमाणात खर्च होतो.
◼️ जर ऑनलाईन बिझनेस असेल, तर एक दिवस इंटरनेट सर्व्हिस बंद पडल्याने खूप मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान होते.
◼️ सर्व्हर डाऊन असेल किंवा त्यात काही फॉल्ट असला तर कंपनीच्या सर्व्हिस मध्ये व प्रॉडक्ट्स वर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो.
◼️ आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत.
◼️ कोणतेही काम करण्यासाठी तंत्रज्ञान वापरल्याने आपल्याला त्या कामाचा विसर पडत आहे.
हे सुद्धा वाचायला विसरू नका:-
▪️ एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?
▪️ कीबोर्ड मध्ये Qwerty फॉरमॅट का वापरला जातो? | (Qwerty Keyboard) जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मित्रांनो, मी आशा करतो की, तुम्हाला तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञानाचे फायदे, तोटे (Technology Meaning In Marathi) हा लेख आवडला असेल. तसेच तंत्रज्ञानाचे कोण कोणत्या क्षेत्रात किती उपयोग आहेत. हे सुद्धा आपण वरील माहितीमध्ये जाणून घेतले. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.