PhonePe म्हणजे काय? | फोन पे अकाउंट कसे बनवायचे?

PhonePe म्हणजे काय? (Phonepe information in Marathi) आणि फोन पे अकाउंट कसे बनवायचे? ह्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया. डिजिटल क्रांती मुळे भारतात ऑनलाईन ट्रांसॅक्शन चे प्रमाण वाढत आहे. इंटरनेट मुळे भारत हा देश विकसित होत आहे.

भारत सरकारने UPI सिस्टीम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. जर तुम्हाला UPI म्हणजे काय? ह्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास आपल्या वेबसाईट वरील ब्लॉग पोस्ट नक्की वाचा.

UPI आधारित अनेक Apps गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. हे ॲप्स सुद्धा phone pe ॲप सारखेच काम करतात. त्यामुळे ह्यांमध्ये कोणताही फरक नाही आहे.

आज आम्ही तुम्हाला फोन पे अॅपबद्दल माहिती सांगणार आहोत. तसेच फोन पे ॲप वर अकाउंट कसे बनवायचे? हे सुद्धा जाणून घेणार आहोत.

Phone Pe म्हणजे काय? | PhonePe information in Marathi

फोन पे अॅप ज्याला तुम्ही मोबाइल वॉलेट देखील म्हणू शकता. कारण या अॅपच्या मदतीने तुम्ही मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, मनी ट्रान्सफर, ऑनलाइन शॉपिंग, फास्टटॅग खरेदी करणे इत्यादी करू शकता.

फोन पे हे एक UPI आधारित अॅप आहे, UPI ही सेवा NPCI द्वारे ऑपरेट केली जाते. बँकिंग सेवेसाठी UPI System चा वापर केला जातो. UPI चा वापर करणे अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे आपण अनेक ऑनलाईन पेमेंट करू शकतो.

हे नक्की वाचा: एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?

तुम्ही PhonePe App चा वापर करून ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकता. आणि तुम्हाला कॅशबॅक देखील मिळेल. तसेच जर तुम्ही वेगवेगळ्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले, तर हे अॅप तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण तुम्ही फोन पे मध्ये एकापेक्षा जास्त बँक खाती जोडू शकता.

तुम्हाला जे PhonePe ॲप मधून Cashback मिळतो. ते पैसे तुम्ही फक्त खरेदी आणि रिचार्जसाठी वापरू शकता. परंतु ते बँक खात्यात जमा करू शकत नाही. PhonePe सह, तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय 24/7 सुरक्षित पेमेंट करू शकता.

PhonePe अकाउंट तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी!

  1. अँड्रॉइड स्मार्टफोन
  2. बँक खाते
  3. स्वतःचा ईमेल आयडी
  4. बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर
  5. बँक खात्याचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड
  6. इंटरनेट कनेक्शन

PhonePe वर अकाउंट कसे तयार करावे?

फोन पे ॲप वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सर्वात अगोदर फोन पे ॲप वर अकाउंट ओपन करणे आवश्यक आहे. खाली आपण त्या बाबतच माहिती जाणून घेणार आहोत.

Step 1PhonePe ॲप Google Play Store वरून डाउनलोड करून घ्या. App Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा.

Step 2 – ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला Bank Account add करण्यासाठी Mobile Number एंटर करावा लागेल. Mobile Number add केल्यानंतर तुम्हाला काही Permissions मागितल्या जातील. त्या Allow करा.

Step 3 – आता मोबाईल वर OTP येईल, तो एंटर करा. आणि Proceed वर क्लिक करा.

Step 4 – तुमच्या PhonePe अकाउंट च्या सुरक्षततेसाठी एक 6 digit पासवर्ड सेट करावा लागेल. किंवा जर तुमच्या मोबाईल ला fingerprint lock असेल तर तुम्ही fingerprint lock सुद्धा सेट करू शकता.

Step 5 – पासवर्ड सेट केल्यानंतर तुमचे PhonePe अकाउंट तयार होईल.

अशाप्रकारे तुम्ही PhonePe ॲप वर नवीन अकाउंट बनवू शकता.

हे नक्की वाचा: Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची?

PhonePe वर Bank Account कसे लिंक करावे?

Step 1 – PhonePe ॲप मोबाईल मध्ये ओपन करा. आता तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे Add Bank Account ऑप्शन दिसेल. (तुम्हाला जर असे दिसत नसेल तर PhonePe ॲप च्या डाव्या कोपऱ्यात एक Menu असेल तिथे Add Bank Account असा ऑप्शन दिसेल.)

Step 2 – त्यानंतर Add Bank Account वर क्लिक करा. नंतर तुम्ही तुमची Bank निवडा, आणि नंतर जो नंबर लिंक आहे तो सिलेक्ट करा.

Step 3 – त्यानंतर तुमच्या डेबिट कार्ड चे शेवटचे 6 digit एंटर करून एक UPI Pin सेट करा. (हा UPI Pin तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना खूप गरजेचा आहे, त्यामुळे लक्षात राहील असा एंटर करा)

Step 4 – अश्याप्रकरे तुम्ही PhonePe वरून अकाउंट बनवून ऑनलाईन पेमेंट करू शकता. व कॅशबॅक मिळवू शकता.

हे नक्की वाचा: PAN CARD बद्दल संपूर्ण माहिती! पॅन कार्ड साठी ऑनलाईन apply कसे करायचे?

PhonePe ॲप वर असलेल्या सर्व्हिसेस

 1 .Transfer Money

• To Contact – ह्या ऑप्शन द्वारे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मधील नंबर वर पैसे ट्रान्स्फर करू शकता.

• To Account – ह्या ऑप्शन च्या मदतीने तुम्ही बँकेतील डिटेल्स add करून पैसे डायरेक्ट समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करू शकता. ( बँक डिटेल्स म्हणजे Account Number, IFSC Number, Brand Code, इत्यादी )

• To Self – ह्या ऑप्शन च्या मदतीने आपण स्वतःच्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करू शकता.

• Bank Balance – ह्याच्या मदतीने तुम्ही बँकेतील जमा रक्कम पाहू शकता.

 2. Recharge & Pay Bill

• Mobile Recharge – तुम्ही कोणत्याही सिम कार्डचे ऑनलाईन रिचार्ज करू शकता.

• DTH – तुम्ही कोणत्याही d2h ऑपरेटर चे ऑनलाईन रिचार्ज करू शकता.

• Book Cylinder – तुम्ही HP, Bharat Gas सिलिंडर ऑनलाईन बुक करू शकता व पेमेंट करू शकता.

• Broadband – तुमच्या घरी जर Wifi असेल तर, Wifi रिचार्ज सुद्धा तुम्ही येथून करू शकता.

तसेच तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल, क्रेडिट कार्ड बिल, पोस्टकार्ड रिचार्ज, केबल रिचार्ज इत्यादी गोष्टी करू शकता.

हे नक्की वाचा: कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!

PhonePe App चे फायदे

  • ह्या ऍप वरून तुम्ही दर दिवशी 1 लाखापर्यंत ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करू शकता.
  • Phonepe ऍप वापरण्यासाठी अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला एक शुल्क सुद्धा भरावा लागणार नाही.
  • हा ऍप UPI आधारित आहे. त्यामुळे वापरण्यास खूप सुरक्षित आहे.
  • बाकी ऑनलाईन पेमेंट ऍप पेक्षा हा ऍप खूप सिंपल, फास्ट आणि सुरक्षित आहे.
  • भारतातील प्रत्येक भाषेत हा ऍप उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही English भाषा न वापरता मराठी भाषेत PhonePe ऍप वापरू शकता.
  • फोन पे ऍप वरून तुम्ही सर्व मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल, पोस्टपेड रिचार्ज, ब्रॉडबँड बिल, इत्यादी काही मिनिटात भरू शकता.
  • PhonePe ऍप ला गूगल प्ले स्टोअर वरून 100 मिलियन वेळा डाऊनलोड केले आहे. आणि 4.3 रेटिंग आहे.

हे नक्की वाचा: Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?

PhonePe ऍप शी संबंधित काही प्रश्न..

🔻 फोन पे ऍप वरून लाईट बिल भरू शकतो का?

हो तुम्ही ह्या ऍप वरून कोणत्याही कंपनीचे लाईट बिल काही मिनिटात भरू शकता.

🔻 PhonePe वरून किती लिमिट पर्यंत ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करू शकतो?

फोनपे वरून तुम्ही एका दिवसाला जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत पैसे पाठवू शकता.

🔻 फोन पे वर आपण स्वतःचे किती Bank अकाउंट्स जोडू शकतो?

ह्या ऍप वर तुम्ही तुमची सर्व बँक खाती लिंक करू शकता.

🔻 फोन पे वरून Online Shopping करू शकतो का?

हो, तुम्ही फोन पे ऍप वरून ऑनलाईन शॉपिंग करू शकता. जसे की, फ्लिपकार्ट, Amazon, Ajio, JioMart इत्यादी साईट्स वरून.

🔻PhonePe हे कोणत्या देशाचे ऍप आहे?

phone pe हे भारतीय ऍप आहे. ह्या ॲप ची स्थापना 2015 साली बेंगळूर येथे करण्यात आली होती.

🔻 फोन पे ऍप चे founder कोण आहेत?

समीर निगम, राहुल चारी, बर्झिन इंजिनिअर हे फोन पे चे संस्थापक आहेत.

हे नक्की वाचा:

▪️गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?

▪️मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी ह्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन चा वापर करा.

PhonePe म्हणजे काय? (Phonepe information in Marathi) आणि फोन पे अकाउंट कसे बनवायचे? ह्याबद्दल माहिती संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेतली. तसेच आपण इतर ऑनलाईन पेमेंट ऍप ची माहिती सुद्धा पुढील येणाऱ्या लेखात जाणून घेणार आहोत.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

1 thought on “PhonePe म्हणजे काय? | फोन पे अकाउंट कसे बनवायचे?”

Leave a Comment