Marathi Keyboard Apps | मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी हे मराठी कीबोर्ड वापरा!

आज आपण मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी हे मराठी कीबोर्ड वापरा! (Marathi Keyboard Apps) चा वापर करू शकतो. ते जाणून घेऊया

आपण हल्ली सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात करतो. तेव्हा तिथे आपल्याला इंग्रजी मध्ये मेसेज टाईप करून पाठवावा लागायचा. त्यामुळे कधी कधी तो मेसेज समोरच्या व्यक्तीला समजायचा नाही. हल्ली आपण रोज व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर खूप प्रमाणात करत आहे.

त्यामुळे तिथे जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला मेसेज मराठी भाषेत टायपिंग करून पाठवता आला तर, किती बरं होईल असं आपल्याला नेहमी वाटतं. त्यामुळे आज आपण मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी कोणत्या मराठी कीबोर्ड ॲप्स (Marathi Keyboard Apps) चा वापर करू शकतो. ते जाणून घेऊया..


मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी हे मराठी कीबोर्ड वापरा! (Marathi Keyboard Apps)

खालील यादीत दिलेले सर्व ऍप्लिकेशन Google Play Store वर फ्री मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही हे ऍप (Marathi Keyboard Apps) तुमच्या मोबाईल मध्ये आरामात डाऊनलोड करून इंस्टॉल करू शकता.

1. स्पर्श कीबोर्ड (Sparsh Keyboard)

ह्या कीबोर्ड वरून तुम्ही मराठी भाषेत आरामात टायपिंग करू शकता. तसेच इथे तुम्हाला अ आ इ ई हे सर्व एकाच जागेवरून टाईप करायला मिळतील. ह्या मराठी स्पर्श कीबोर्ड ला 4.2 रेटिंग आहे. आणि ह्या ऍप ला एकूण 1 दशलक्ष लोकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच ह्याची ऍप साईज खूप कमी आहे. त्यामुळे हा ऍप व्यवस्थित चालू शकतो.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


2. लीपिकार मराठी कीबोर्ड (Lipikar Marathi Keyboard)

ह्या ऍप मधून तुम्ही इंग्लिश टू मराठी टायपिंग करू शकता. जसे की, Kasa aahes? – कसा आहेस? त्यामुळे जर तुम्हाला English भाषेत सुद्धा टायपिंग करायची असेल तर तुम्ही ह्या ऍप चा वापर करू शकता. हा ऍप वापरायला सोप्पा आणि सरळ आहे. त्यामुळे काही अडचण येणार नाही. तसेच तुम्ही मराठी व्हॉईस टायपिंग सुद्धा करू शकता.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


3. स्वरचक्र मराठी कीबोर्ड (Swarachakra Marathi Keyboard)

हा कीबोर्ड नवीन व्यक्तींसाठी खूप सोप्पा आहे. जे नुकतेच मराठी भाषेत टाईप करत आहे. त्यांनी ह्या ऍप चा वापर करावा. ह्यात तुम्हाला गोल (Pie) आकाराचा एक कीबोर्ड मिळतो. ज्यात जोडाक्षरे आणि सर्व मराठी अक्षरे टाईप करू शकतो.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


4. मराठी कीबोर्ड (Marathi Keyboard)

जर तुम्हाला एखाद्याला स्टिकर्स, gif, इमोजीस पाठवायचे असतील. तर तुम्ही ह्या ऍप चा म्हणजेच ह्या मराठी कीबोर्ड चा वापर करू शकता. ह्यामध्ये इंग्लिश टू मराठी टायपिंग करण्यासाठी दिले आहे. म्हणजेच Minglish Keyboard असतो. ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमची टायपिंग स्पीड वाढेल.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


5. गूगल इंडिक कीबोर्ड (Google Indic Keyboard)

हा मराठी कीबोर्ड गूगल ह्या कंपनीचा आहे. तसेच ह्या कीबोर्ड ची डिझाईन सरळ आणि सोपी आहे. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही English To Marathi टायपिंग करू शकता, म्हणजेच Minglish. ह्या कीबोर्ड मध्ये खास थीम्स आहेत. ज्याने तुम्ही कीबोर्ड ला एक नवीन लूक देऊ शकता. तसेच ह्या मध्ये emojis चा सपोर्ट सुद्धा आहे.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


6. मराठी कीबोर्ड आणि मराठी स्टिकर्स (Marathi Keyboard With Marathi Stickers)

ह्या मराठी भाषेतील कीबोर्ड मध्ये तुम्हाला एक धमाकेदार फीचर वापरायला मिळेल. ते म्हणजे इथे जर तुम्ही “कसं काय भावा” असे मराठी मध्ये टाईप केले, तर तुम्ही त्याचा स्टिकर एकमेकांना पाठवू शकता. तसेच अनेक Gifs, स्टिकर्स पाठवू शकता.

त्यासोबत तुम्ही तुमचा स्वतःचा सेल्फी काढून त्याचा स्टिकर बनवून सेंड करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मराठी टायपिंग मधून समोरच्याला खुश करायचे असेल तर तुम्ही हा कीबोर्ड ऍप वापरा.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


7. बॉबल इंडीक कीबोर्ड (Bobble Indic Keyboard)

हा कीबोर्ड ऍप सुद्धा इंग्लिश टू मराठी टायपिंग ला प्राधान्य देतो. इथे तुम्ही जे अक्षर टाईप करताय त्यावर आधारित स्टिकर्स पाठवू शकता. तसेच वेगवेगळ्या आकर्षक थीम कीबोर्ड मध्ये वापरू शकता. तसेच BigMoji ह्या फीचर मध्ये तुम्ही ईमोजी स्टिकर्स च्या रुपात सेंड करू शकता.

त्यासोबत तुम्ही स्वतःचा सेल्फी काढून स्टिकर्स आणि Gifs बनवु शकता आणि पाठवू शकता ते ही मोफत. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांचे किंवा मैत्रिणींचे फोटो एकत्र करून एक funny कार्टून स्टोरी बनवु शकता. तुम्ही टाईप केलेल्या फॉन्ट ची स्टाईल सुद्धा बदलू शकता. थोडक्यात हा कीबोर्ड ऍप वापरण्यासाठी सर्वात बेस्ट आहे.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻


8. G board – Google Keyboard

हा कीबोर्ड सुद्धा गूगल चाच आहे. जर तुम्हाला स्पीड, आणि चांगली टायपिंग हवी असेल. तर तुम्ही ह्या कीबोर्ड ऍप चा वापर करावा. ह्या कीबोर्ड ऍप मध्ये अनेक फिचर्स आहेत. फिचर्स बद्दल संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया..

• Glide Typing – तुम्ही कीबोर्ड वरून तुमचे बोट न उंचलता टायपिंग करू शकता.

• Voice Typing – तुम्ही ह्या कीबोर्ड वर दिलेल्या माईक वरून शब्द तोंडाने बोलून टाईप करू शकता.

• Emoji Search – जर तुम्हाला स्माइल करणार ईमोजी हवा असेल, तर तुम्ही तो ईमोजी search करू शकता.

• Handwriting – जर तुम्हाला टाईप करायला कंटाळा येत असेल, तर तुम्ही कीबोर्ड वर हॅण्ड राईटिंग करून शब्द लिहू शकता.

• Google Translate – एखाद्या कठीण इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या फिचर चा वापर करू शकता.

ऍप डाऊनलोड करा इथून 👇🏻

हे नक्की वाचा:

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मा

PAN CARD बद्दल संपूर्ण माहिती! पॅन कार्ड साठी ऑनलाईन apply कसे करायचे?


अश्या प्रकारे तुम्ही मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी ह्या मराठी कीबोर्ड ऍप ( Marathi Keyboard Apps ) चा वापर करू शकता. तसेच हे सर्व कीबोर्ड गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकता.

तसेच गूगल प्ले स्टोअरवर अनेक मराठी कीबोर्ड ऍप आहेत. पण वर दिलेले 8 मराठी कीबोर्ड ऍप हे सर्वात बेस्ट व वापरण्यासाठी सोप्पे आणि सरळ आहेत. म्हणून मी हे 8 कीबोर्ड ऍप तुम्हाला सांगितले आहेत.

तुम्हाला वर दिलेले 8 कीबोर्ड ऍप (Marathi language typing Keyboard Apps) पैकी कोणते ऍप आवडले किंवा ह्यांपैकी तुम्ही कोणते ऍप वापरता ते खाली कमेंट्स द्वारे नक्की कळवा. तसेच ज्यांना मराठी भाषेत टायपिंग करायला अडचण येते, त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment