How to earn money online in marathi | घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!

आजच्या लेखामध्ये आपण घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग (How to earn money online in marathi) पाहणार आहोत. ह्यात आपण ऑनलाईन पैसे कमावण्याचे १० मार्ग पाहणार आहोत. प्रत्येकाला जीवनात काहीना काही करून दाखवायचे असते. पण कधी कुणाकडे वेळ नसतो, तर कधी कुणाला संधी नसते. पण आपण घरबसल्या सुद्धा ऑनलाईन पैसे कमवू शकतो. पण लॉकडाऊन मुळे अनेकांना त्यांच्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या. सगळे घरातच बसून होते. त्यामुळे घरबसल्या पैसे कसे कमवायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेलच. आज आपण त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

घरबसल्या आपण ऑनलाईन खूप पैसे कमवू शकतो. चला तर मग आपण घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! (How to earn money online in marathi) जाणून घेऊया. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

How to earn money online in marathi

1. Freelancing

freelancing image

Freelancing हा घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचा उत्तम मार्ग आहे. Freelancing म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीने दिलेले छोटे मोठे काम करणे. हे काम करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला Freelancing वेबसाइट्स वर तुमचे स्वतःचे अकाऊंट बनवणे गरजेचे आहे. खाली काही मी Freelancing वेबसाइट्स ची नावे दिली आहेत. त्या वेबसाइट्स वरून तुम्ही Free मध्ये Sign Up करून, घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकता.

▪️ Fiverr
▪️ Upwork
▪️
PeoplePerHour
▪️
Guru

वर दिलेल्या वेबसाइट्स वरून तुम्ही घरून ऑनलाईन काम करून पैसे कमवू शकता. पण त्यासाठी तुम्ही ज्या विषयात उत्तम आहात, म्हणजेच Writing, Designing, Photo Editing इत्यादी. तुम्ही ज्या विषयात उत्तम आहात, तो जॉब त्या वेबसाइट्स वर शोधून पैसे कमवू शकता. हा मार्ग सुरक्षित आणि जास्त पैसे मिळवून देणारा आहे.

2. Blogging

blogging image

Blogging हा सर्वात लोकप्रिय आणि सरळ मार्ग आहे, घरबसल्या पैसे कमावण्याचा. Blogger किंवा WordPress वर स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर जाहिरात दाखवून ऑनलाईन पैसे कमवता येतात. वेबसाईट तयार करून तुम्हाला त्यावर वेगवेगळ्या विषयांवर किंवा एका कोणत्या विषयावर 25-30 आर्टिकल लिहावे लागतात. त्यानंतर 2 किंवा 3 महिन्यांनी Google AdSense ला वेबसाईट सबमिट करून, ती Verify झाल्यावर वेबसाईट वर Ads दिसायला सुरुवात होते. जेव्हा तुमच्या खात्यात 100 डॉलर जमा होतील, तेव्हा Google Adsense तुमच्या बँक अकाऊंट मध्ये महिन्याच्या 21 तारखेला तुमचं payment जमा करते.

इंटरनेट व अश्या अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या मार्फत आपण आपल्या वेबसाईट वर Ads दाखवू शकतो.
▪️ Google AdSense
▪️ InfoLinks
▪️ Media.net
▪️ PopAds
▪️ Amazon Native Shopping Ads
▪️ PropellerAds

» Blogging विषयी संपूर्ण माहिती मराठीतून जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट वरील ब्लॉगिंग कॅटेगरी मधील सर्व लेख वाचा.

3. YouTube

YouTube हा भारतात तसेच भारताबाहेर देखील खूप लोकप्रिय आहे. हा एक व्हिडिओज शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुम्ही एक यूट्यूब चॅनल तयार करून. तिथे तुम्ही व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता. यूट्यूब वर चॅनल तयार करण्यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागत नाही. एक अगदी मोफत आहे. यूट्यूब वर तुम्ही एक विषय निवडून त्यावर अनेक व्हिडिओज तयार करून ते अपलोड करू शकता.

आजकाल काहीही माहिती शोधायची असल्यास, लोक गूगल पेक्षा यूट्यूब वर शोधणे पसंद करतात. कारण इथे तुम्हाला व्हिडिओ रुपात ती माहिती उपलब्ध असते. तसेच ती माहिती पटकन लक्षात येते. तुम्ही अपलोड केलेले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांनी पाहिले की, मग तुम्ही Google AdSense च्या Ads लावून त्यामार्फत पैसे कमवू शकता.

» ऑनलाईन Medicines मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!

4. Mobile Apps

ह्यामध्ये तुम्हाला एक App बनवायचा असतो. जो Google Play Store आणि Apple App Store वर पब्लिश करायचा असतो. पण App बनवण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती इंटरनेट वर शोधावी लागेल. आपण ह्या अगोदर Freelancing बद्दल जाणून घेतले. त्यामध्ये तुम्ही एखाद्या चांगल्या App बनवणाऱ्या कडून तुमचे स्वतःचे App बनवून घेऊन शकता. जर तुम्हाला लगेच App बनवायचा असेल तर. जर स्वतःहून App बनवायचा असेल तर, तुम्हाला कोडिंग येणे गरजेचे आहे. ह्यामध्ये खर्च करावा लागतो, जसे 10,000 ते 15,000. पण जर तुम्ही App एकदम Unique आणि आकर्षक बनवलात. तर जास्तीत जास्त लोकं ते डाऊनलोड करतील. त्यानंतर तुम्ही Google AdMob वरून Ads तुमच्या App वर लावून त्यामार्फत पैसे कमवू शकता. हे थोडेफार Google AdSense सारखेच असते. तसेच जर तुमच्या App वर तुम्ही Paid Version देऊन सुद्धा त्यामार्फत पैसे कमवू शकता.

» टॉप 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल ॲप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!

5. Affiliate Marketing

Affiliate Marketing हा असा प्रकार आहे जिथे तुम्ही काहीही मेहनत न घेता पैसे कमवू शकता. आज आपण काही मागवायचे असेल तर Amazon, Flipkart सारख्या ऑनलाईन शॉपिंग Apps वरून ती वस्तू मागवतो. Affiliate Marketing मार्फत पैसे कमावण्यासाठी तुम्हाला त्या ऑनलाईन प्रॉडक्टची लिंक शेअर करावी लागते. त्या लिंक वरून कोणत्याही व्यक्तीने काही खरेदी केले तर तुम्हाला त्या वस्तू मागचे Commission मिळते.

आज ऑनलाईन शॉपिंग ला खूप डिमांड आहे. Affiliate Marketing मार्फत पैसे कमावण्यासाठी तुम्हाला Amazon किंवा Flipkart च्या Affiliate Program मध्ये तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. त्यानंतर तुमच्या वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनल वर त्या प्रोडक्टची लिंक शेअर करून त्यामार्फत कमाई करता येते. त्यासोबत आता अनेक Web Hosting कंपन्यांनी सुद्धा आता Affiliate Program सुरू केला आहे. तुम्ही शेअर केलेल्या लिंक वरून एखाद्याने Web Hosting खरेदी केली तर, तुम्हाला त्यामागे कमिशन मिळते. हा मार्ग सर्वात जास्त उत्तम आणि बिना काम करता पैसे कमावण्याचा आहे.

6. Online Tutoring

जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स किंवा व्हिडिओज अपलोड करून पैसे कमवू शकता. Vedantu सारख्या वेबसाइट्स वर तुम्ही ऑनलाईन शिकवून त्यामार्फत पैसे कमवू शकता. तसेच जर तुम्ही कोणते ऑनलाईन कोर्सेस तयार केले आहेत. तर ते ऑनलाईन वेबसाइट्स वर अपलोड करून पैसे कमवू शकता. तुम्ही अपलोड केलेले कोर्स लोकं विकत घेणार तेव्हा तुम्हाला त्यामागील कमिशन मिळते. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही affiliate program मार्फत पैसे कमवू शकता.

खाली काही वेबसाइट्स दिली आहेत त्यावरून तुम्ही तुमचे ऑनलाईन कोर्स विकू शकता.
▪️ Udemy
▪️ Coursera
▪️ Edureka

» Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?


7. Sell Your Photos online

Sell Your Photos online image

तुम्ही जर फोटोग्राफर असाल किंवा तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल. तर हा मार्ग तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही चांगले फोटोज् किंवा व्हिडिओज तुमच्या कॅमेऱ्याने काढून वेबसाइट्स वर विकू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फोटोज् आणि व्हिडिओज विकून काय फायदा होणार? जेव्हा एखादी व्यक्ती त्या वेबसाईट वर येऊन, तुम्ही विकलेला फोटो विकत घेतात, तेव्हा त्या फोटो मागे असलेले कमिशन तुम्हाला मिळते. तसेच काही ब्लॉगर्स किंवा युट्यूबर तुम्ही विकलेले फोटोज् डाऊनलोड करून त्यांच्या वेबसाईट किंवा यूट्यूब व्हिडिओज मध्ये वापरतात.

खाली काही वेबसाइट्स आहेत ज्यावर तुम्ही फोटोज्, व्हिडिओज विकू शकता.

▪️ Shutterstock
▪️ iStock
▪️ Getty Images
▪️ Adobe Stock

जर तुमच्याकडे फोटोग्राफी चे नॉलेज असेल तर तुम्ही वेगवेगळे फोटो काढून ह्या वेबसाइट्स वर विकून, खूप पैसे कमवू शकता.

8. Data Entry

Data Entry हे सुद्धा फ्रीलान्सर चाच भाग आहे. ह्यामध्ये तुम्ही काही लोकप्रिय वेबसाइट्स वरून Data Entry जॉब्स करून ऑनलाईन पैसे कमवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आणि लॅपटॉप ची आवश्यकता आहे. खाली काही वेबसाइट्स ची नावे दिली आहेत. त्यावरून तुम्ही Sign Up करून Data Entry जॉब करून पैसे कमवू शकता.

▪️ Truelancer
▪️ SmartCrowd
▪️ 2Captcha
▪️ OneSpace

ह्या काही वेबसाइट्स आहेत ज्या तुम्हाला डॉलर मध्ये पेमेंट करतात. तसेच तुम्ही Captcha चे सुद्धा जॉब करू शकता. हा जॉब आता जुना झाला तरी तुम्ही ह्यातून पैसे कमवू शकता.

9. Content Writing

Content Writing image

आजकाल अनेक मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या वेबसाईट किंवा ब्लॉग साठी कंटेंट राईटर शोधत असतात. ते त्यांच्याकडून ठराविक टॉपिक वर आर्टिकल लिहून घेतात. तसेच त्यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा दिले जातात. अश्या अनेक वेबसाइट्स इंटरनेट वर उपलब्ध आहेत. ज्यावरून तुम्ही देखील content writing करून घरात बसून पैसे कमवू शकता. फक्त त्यासाठी तुमच्या मध्ये लिखाण करण्याचे कौशल्य असले पाहिजे. कारण जर तुमचे लिखाण, विषय व्यवस्थित मांडण्याची कला असेल तर तुम्ही लिहिलेले आर्टिकल जास्तीत जास्त वाचले जाईल.


10. Social Media Page

हल्ली प्रत्येक जण सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतो. नवनवीन पेजेस तयार होत असतात. त्याद्वारे नवनवीन मराठी स्टेटस किंवा इतर भाषेतील स्टेटस, व्हिडिओज, कोट्स, माहिती सोशल मीडिया वर शेअर होत असते. मोठ मोठ्या कंपन्या त्यांच्या सोशल प्रोफाइल तयार करून त्यामार्फत जाहिरात दाखवून जास्तीत जास्त लोकांना आपल्यापर्यंत खेचून घेतात. तुम्ही सुद्धा सोशल मीडिया वर ऑनलाईन पैसे कमवू शकता तेही घरबसल्या आणि अगदी मोफत. Facebook, Instagram सारख्या सोशल मीडिया मार्फत पैसे कमवू शकता.

आज आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ते पाहूया.

इंस्टाग्राम ही फेसबुक नेच विकत घेतलेली कंपनी असून सोशल मीडिया मध्ये खूप लोकप्रिय आहे. काही माहिती असो, डेली अपडेट्स, फोटोज्, व्हिडिओज सर्व काही इंस्टाग्राम वरून तुम्ही करू शकता. पण ह्यामर्फत पैसे कसे कमवणार? तर त्यासाठी तुमचे एक Instagram Page असणे गरजेचे आहे. त्या पेज वर तुम्ही रोज पोस्ट टाकून तुमच्या पेज वर फॉलोवर्स आणू शकता. जेव्हा तुमच्या पेज वर 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त फॉलोवर्स पूर्ण होतील. तेव्हा कंपन्या तुमच्या पेज वर जाहिरात दाखवण्यासाठी तुम्हाला पैसे देतील. तुमच्या मनानुसार तुम्ही पैसे घेऊ शकता. आणि तुमच्या पेज वर त्या कंपनीची जाहिरात दाखवू शकता. तसेच तुम्ही फोटो, स्टोरी आणि igtv व्हिडिओज ची जाहिरात दाखवण्यासाठी वेगळे पैसे सुद्धा घेऊ शकता.

प्रत्येकामध्ये काहीना काही कला असते, प्रत्येकाचे छंद असतात. जे हा लेख वाचत असतील त्यांच्या अंगात सुद्धा कोणती ना कोणती कला नक्कीच असेल. तर मित्रांनो व मैत्रिणींनो तुमची कला व छंद लक्षात घ्या व घरात बसून तुम्ही पैसे कमवा. जर तुम्ही कोणती नोकरी करत असाल तर पार्ट टाईम हे काम करा. मी वर दिलेले 10 मार्ग नीट वाचून त्यातील एक कोणताही निवडून आत्ताच कामाला लागा. व यशस्वी व्हा.

तर हे होते 10 मार्ग ज्यांच्या मार्फत तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकता. मला आशा आहे की तुम्ही ह्यामधील एखादा मार्ग निवडून त्याच्या साहाय्याने ऑनलाईन पैसे कमवाल. तसेच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

हे नक्की वाचा:-

» वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?

» ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग! (How to earn money online in marathi) हा लेख सोशल मीडिया वर नक्की शेअर करा. तसेच ज्यांना घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत त्यांना सुद्धा पाठवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

3 thoughts on “How to earn money online in marathi | घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!”

Leave a Comment