गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?

Google Form म्हणजे काय? (What is Google Form in Marathi) आणि गूगल फॉर्म कसा तयार करायचा? (How to create google form in marathi) तसेच गूगल फॉर्म चे कोणते फायदे आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तसेच गूगल फॉर्म चा वापर कोण कोणत्या गोष्टींसाठी करतात हे आपण पाहूया.

Google Form मुळे आपण सोप्प्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म बनवू शकतो. तसेच गूगल ने दिलेली सेवा ही सर्वात सुरक्षित आणि व्यवस्थित आहे. बाकीच्या वेबसाईट वरून ऑनलाईन फॉर्म तयार केल्यावर त्यात आपल्याला खूप अडचणी येतात. पण गूगल फॉर्म मध्ये तुम्हाला सर्वात चांगला ऑनलाईन फॉर्म तयार करता येतो. आणि ह्याचा वापर तुम्ही कुठूनही करू शकता. तसेच जर तुम्हाला फॉर्म मध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही सहज करू शकता.


गूगल फॉर्म म्हणजे काय? | Google form information in Marathi

What is google form in marathi

What is google form in marathi:- Google Form ही गूगल कंपनी मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. गूगल फॉर्म ऑनलाईन तयार करू शकतो. तसेच गूगल फॉर्म चा वापर वापरकर्त्याची माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. गूगल फॉर्म मध्ये प्रश्न आणि पर्याय दिले जातात. हे सर्व ऑनलाईन तयार केलेले गूगल फॉर्म Google Drive मध्ये स्टोअर होतात.

गूगल ड्राईव्ह ही गूगल मार्फत दिलेली मोफत सेवा आहे. ह्यामध्ये क्लाऊड-आधारित स्टोरेज सेवा दिलेली असते. ज्यामध्ये कोणतीही फाईल ऑनलाईन साठवून ठेवता येतात.Google फॉर्म चा वापर ऑनलाइन सर्वेक्षण, संपर्क फॉर्म, डेटा संकलनासाठी केला जातो. जर आपल्याला आपल्या वापरकर्त्यांकडून काही माहिती किंवा डेटा मिळवायचा असेल, तर आपण गूगल फॉर्म तयार करून त्या मार्फत माहिती मिळवू शकतो. तसेच आपण वापरकर्त्याची माहिती सहज मिळवू शकतो.

हे नक्की वाचा: घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!


Google Form चा वापर करून कोण कोणत्या प्रकारचे ऑनलाईन फॉर्म बनवू शकतो?

 • कॉन्टॅक्ट फॉर्म (Contact Form)
 • फीडबॅक फॉर्म (Feedback Form)
 • बायो डाटा फॉर्म (Bio Data Form)
 • ऑनलाइन सर्वे फॉर्म (Online Survey Form)
 • ऑनलाइन क्विज फॉर्म (Online Quiz Form)
 • ऑनलाइन रिव्यु फॉर्म (Online Review Form)
 • ऑनलाइन जॉब फॉर्म (Online Job Form)
 • फाइल अपलोड फॉर्म (File Upload Form)
 • पार्टी इनविटेशन (Party Invitation)
 • स्कूल स्टूडेंट्स फॉर्म (School Student Form)
 • कॉलेज स्टूडेंट फॉर्म (College Student Form)

हे आहेत काही गूगल फॉर्म चे प्रकार. ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गूगल फॉर्म तयार करू शकता. तसेच गूगल फॉर्म हे फ्री असून ह्यासाठी फक्त तुमचं जीमेल अकाऊंट असणे आवश्यक आहे. आता आपण पाहूया गूगल फॉर्म चे फायदे.


गूगल फॉर्म चे फायदे | Benefits of Google Forms in Marathi

 • Google forms ही गूगल मार्फत दिली जाणारी सेवा आहे. तसेच ही सेवा अगदी मोफत आहे.
 • गूगल ड्राईव्ह वरून किंवा गूगल फॉर्म च्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन गूगल फॉर्म बनवू शकता.
 • तसेच तुम्हाला हवं तसं ह्यात customization करून शकता.
 • ह्यामध्ये वेगवेगळ्या थीम चा वापर करू शकतो.
 • वापरण्यास अगदी सोप्पे आणि सरळ आहे.
 • सर्व टूल्स फ्री आहेत तसेच चांगल्या इंटरफेस सह उपलब्ध आहेत.
 • फक्त gmail id चा वापर करून कोणतीही व्यक्ती गूगल फॉर्म बनवू शकतो.

हे नक्की वाचा: ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?


गूगल फॉर्म कसा तयार करायचा? | How to create google form in marathi

गूगल फॉर्म तयार करण्यासाठी दोन पद्धती आहेत. आपण www.google.com/forms ह्या लिंक वरून google form तयार करू शकतो. तसेच Google Drive वरून ऑनलाईन Google Form तयार करू शकतो. आपण Google Drive वरून गूगल फॉर्म कसा तयार करायचा ते पाहूया.

1. गूगल फॉर्म बनवण्यासाठी अगोदर तुमच्याकडे एक Gmail id असणे आवश्यक आहे. कारण तो जीमेल आयडी Google Drive ला कनेक्ट होतो.

2. आता गूगल ड्राईव्ह ओपन करा. त्यानंतर Gmail id ने लॉगिन करून घ्या. जर तुम्ही अगोदरच लॉगिन केलेले असेल तर पुन्हा लॉगिन करण्याची गरज नाही.

3. गूगल ड्राईव्ह ओपन केल्यावर डाव्या बाजूला NEW असा एक पर्याय येईल. त्यावर क्लिक करा आणि खाली काही पर्याय येतील त्यातील Google Forms ह्या पर्यायावर क्लिक करा.

How to create google form by google drive

4. त्यानंतर तुमच्यासमोर एक Blank Form ओपन होईल. तुमच्या समोर खाली दिल्या प्रमाणे एक interface ओपन होईल.

google form homescreen

आता तुमच्यासमोर गूगल फॉर्म बनवण्यासाठी खूप पर्याय येतील त्यामध्ये कुठे कोणती माहिती भरायची ते खाली सविस्तर जाणून घेऊया.

हे नक्की वाचा: UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे?

 • Form Description :- ह्या पर्याय मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा Google Form बनवायचा आहे. त्याबद्दल लिहायचं आहे, जसं की जर तुम्हाला Online Surveys साठी फॉर्म बनवायचा आहे तर तिथे “Online surveys” असे लिहा.

 • Untitled Question :- ह्यामध्ये तुम्ही एखादा प्रश्न लिहू शकता. जसं की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण नाव विचारायचे असेल, तर तिथे “Full Name” असे लिहू शकता. जर तुम्हाला एखाद्याचा पत्ता हवा असेल, तर “Address” असे लिहू शकता.

 • Add option or “ADD OTHER” :- जर तुम्ही एखादा प्रश्न लिहिला. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न लिहायचा असेल तर तुम्ही उजव्या बाजूला दिलेल्या + icon पर्यायावर क्लिक करून दुसरा प्रश्न add करू शकता.

 • Multiple Choice :- ह्या पर्यायमध्ये तुम्ही तुमच्या गूगल फॉर्म चा Type सिलेक्ट करू शकता. जसे की जर तुम्हाला multiple questions चा गूगल फॉर्म तयार करायचा असेल तर तिथे तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करू ते निवडू शकता. तुम्ही Multiple Choice ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातील तुम्हाला जो हवा असेल तो निवडून गूगल फॉर्म बनवा.

 • Add Title & Description :- ह्या ऑप्शन चा वापर करून तुम्ही गूगल फॉर्म मध्ये optional field बनवू शकता. तुम्ही अनेक गूगल फॉर्म मध्ये बघितल असेल, की optional field हा पर्याय उपलब्ध असतो. ह्याचे उत्तर देणे हे युजर वर अवलंबून असते. तुम्ही सुधा गूगल फॉर्म मध्ये हा पर्याय Add करू शकता. त्यासाठी उजव्या बाजूला दिलेल्या T आयकॉन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर optional field चा पर्याय ओपन होईल.

 • Add image :- जर तुम्हाला तुमच्या Google Form मध्ये एखादा फोटो add करायचा असेल तर तुम्ही ह्या पर्यायाचा वापर करू शकता. Add image वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक pop-up box ओपन होईल. त्यामध्ये इमेज अपलोड करण्यासाठी सांगितले जाते. व त्याचा उपयोग करून तुम्ही इमेज अपलोड करू शकता. पण जर तुम्हाला इमेज add करायची असेल तरच करा. कारण इमेज जास्त कोणी वापरत नाही.

हे नक्की वाचा: गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे? | Google Pay information in Marathi


 • Add video :- ह्या आयकॉन वर क्लिक करून तुम्ही गूगल फॉर्म मध्ये एखादा व्हिडिओ add करू शकता. ह्या व्हिडिओ मार्फत तुम्ही तुमच्या युजर ला फॉर्म कसा भरायचा हे व्हिडिओ रुपात दाखवू शकता.

 • Add Section :- ह्याचा वापर करून तुम्ही तुमचा गूगल फॉर्म वेगवेगळ्या सेक्शन मध्ये विभागू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या गूगल फॉर्म चे दोन किंवा तीन पेजेस मध्ये रुपांतर करू शकता.

 • Required :- ह्या पर्यायाचा वापर महत्वाच्या प्रश्नांसाठी करू शकतो. जसे आपण अनेक फॉर्म मध्ये पाहिले असेल, की Name, Contact Number, Address ह्या प्रश्नांना रेड स्टार केलेला असतो किंवा तिथे required असे दिलेले असते. कारण ही माहिती भरणे आवश्यक असते. याप्रमाणेच तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये हा पर्याय add करू शकता.

 • Duplicate :- प्रत्येक प्रश्नांच्या खाली तुम्हाला हा पर्याय दिसेल. ह्याचा वापर करून तुम्ही एखाद्या प्रश्नांची duplicate copy बनवू शकता.

 • Delete :- जर तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल तर तुम्ही Delete ह्या icon वर क्लिक करून तो प्रश्न delete करू शकता.

 • Theme Options :- हा पर्याय तुम्हाला वरच्या बाजूला उजवीकडे मिळेल. त्या icon वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व पर्याय दिसतील. ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गूगल फॉर्म चा color बदलू शकता. तसेच फॉर्म चे font सुद्धा बदलू शकता. तसेच तुम्ही Theme Color, background color बदलू शकता.

 • Preview :- हे सर्व झाल्यानंतर तुमचा गूगल फॉर्म तयार होईल. आता तो गूगल फॉर्म कसा दिसतो हे पाहण्यासाठी Theme color च्या बाजूला दिलेल्या icon वर क्लिक करा. त्यानंतर दुसऱ्या पेज वर तुम्ही तयार केलेला गूगल फॉर्म दिसेल.

 • Setting :- ह्यामध्ये तुम्हाला General, Presentation, Quizzes असे तीन पर्याय दिसतील. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या गूगल फॉर्म मधील additional setting करू शकता.

 • Send :- ह्या सर्व सेटिंग्ज तपासून झाल्यावर आता आपल्याला तयार केलेला गूगल फॉर्म send करायचा आहे. तर तिथे दिलेल्या Send पर्यायावर क्लिक करून तो फॉर्म send करा. Send वर क्लिक केल्यावर तुम्हाला फॉर्म कोणत्या माध्यमाने सेंड करायचा आहे ती विचारले जाते. तुम्ही Email id, Link किंवा Embed HTML ह्यांपैकी कोणत्याही माध्यमाचा वापर करून गूगल फॉर्म send करू शकता.

अश्या पद्धतीने तुम्ही गूगल ड्राईव्ह मधून ऑनलाईन गूगल फॉर्म बनवू शकता, ते ही अगदी मोफत. तसेच ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रश्न व स्टुडंट्स साठी क्विझ question अँड answer फॉर्म तयार करू शकता.


हे नक्की वाचा:

गूगल फॉर्म म्हणजे काय? (What is google form in marathi) आणि गूगल फॉर्म कसा तयार करायचा? हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच सोशल मीडिया वर देखील शेअर करा. हा लेख वाचून तुम्ही सुद्धा गूगल फॉर्म तयार करू शकता.

तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

1 thought on “गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?”

Leave a Comment