Top 21 Online Shopping Sites in India


Online Shopping करणे आजच्या काळात खूप लोकप्रिय झाले आहे. पूर्वी कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी मॉल मध्ये किंवा बाजारामध्ये जावे लागायचे. त्यासाठी खूप वेळ लागायचा. कधी कधी आपल्याला हवी ती वस्तू मिळायची सुद्धा नाही. पण जस जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले. सर्व ऑनलाईन होऊ लागले. त्यातच शॉपिंग करणे देखील ऑनलाईन झाले. लोकं मॉल मध्ये जाऊन किंवा मार्केट मध्ये जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा एका जागेवरून मोबाईल वरून ऑनलाईन शॉपिंग करत आहेत.

प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्यामुळे एका क्लिक वर कोणतेही प्रॉडक्ट ऑनलाईन मागवता येते. तसेच ऑनलाईन डिलिव्हरी फ्री असल्यामुळे आपले पैसे ही वाचतात आणि वेळ ही वाचतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदी कडे ग्राहक जास्त प्रमाणात वळत आहेत.

आजच्या लेखात आपण Online Shopping करण्यासाठी कोण कोणत्या Apps किंवा वेबसाइट्स चा वापर करू शकतो? (Top 21 Online Shopping Sites in India) ते जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया..

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय? (What is Online Shopping in Marathi)

What is Online Shopping in Marathi

एखाद्या डीवाईस वरून इंटरनेटच्या मदतीने कोणतीही गोष्ट ऑनलाईन खरेदी करणे म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग करणे. म्हणजेच एखाद्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप च्या मदतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट वरून आपल्याला हवे ते प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी करणे. ऑनलाईन शॉपिंग ही इ कॉमर्स वेबसाईट वरून केली जाते.

ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळतो. ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही घरातून कुठेही न जाता कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता. तसेच तुम्हाला जर ऑनलाईन पेमेंट करायचे नसेल तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ह्या पर्यायाचा वापर करू शकता.


बेस्ट ऑनलाईन शॉपिंग साइट्स (Best Online Shopping Sites)

इंटरनेट वर खूप अश्या वेबसाइट्स आहेत. ज्यावरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. तसेच ह्या वेबसाइट्स चे फ्री Apps सुद्धा आहेत. जे गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर वर उपलब्ध आहेत.

 1. Flipkart

फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय ई कॉमर्स कंपनी आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोक फ्लिपकार्ट वरून ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. फ्लिपकार्ट वर दर महिन्याला किंवा फेस्टिवल ला काहीना काहीना ऑफर मिळत असते. फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन सेल्स आणत असते. फ्लिपकार्ट कंपनीचे बिग सेविंग्ज डेज, इलेक्ट्रॉनिक्स सेल्स, सुपर सेव्हर डेज, इत्यादी सेल्स खूप लोकप्रिय आहेत.

तसेच ह्या डेज मध्ये खूप डिस्काउंट आणि ऑफर मिळते. फ्लिपकार्ट वर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू, ग्रोसेरी, ज्वेलरी, टॉईज, फ्लाईट तिकेट्स, इत्यादी वस्तू ऑनलाईन मिळतात. तसेच फ्लिपकार्ट वर ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या दोन पर्यायांचा वापर करू शकता.


 1. Tata CLIQ

Tata CLIQ ग्राहकांना एक सर्वव्यापी खरेदी अनुभव प्रदान करते. टाटा कंपनीची ही इ कॉमर्स साईट आहे. ह्या इ कॉमर्स साईट वर पुरुष, महिला आणि लहान मुलांसाठी सर्व फॅशन प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. Tata CLIQ स्मार्टफोन्स, टॅब्लेट, लॅपटॉप, स्टोरेज साधने, वैयक्तिक काळजी आणि बऱ्याच काही सुरक्षित सुविधांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे घरपोच पुरवते.

टाटा क्लिक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर आणि किराणा सामानावर खूप डिस्काउंट मिळते.


 1. AJIO

Ajio हे ऑनलाईन फॅशन पोर्टल रिलायन्स इंडस्ट्रीज मार्फत 2016 मध्ये सुरू करण्यात आले होते. ह्या शॉपिंग साइटवर महिलांसाठी खासगी लेबलचे सर्वात मोठे कलेक्शन आहे. व्यापारा मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इंडीयन पोशाख ह्यांचा समावेश आहे.

AJIO ह्या इ कॉमर्स स्टोअरमध्ये अ‍ॅपरेल्स, शूज, अ‍ॅक्सेसरीज आणि दागिन्यांमधील 200 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे कलेक्शन आहे. अजिओवर स्मार्टफोन आणि अँक्सेसरीजसह सुद्धा उपलब्ध आहेत.

▪️ URL Short कशी करायची?


 1. Paytm Mall

Paytm ही कंपनी डिजिटल पेमेंट आणि डिजिटल वॉलेट मध्ये लोकप्रिय आहे. तसेच, कंपनीने ई-कॉमर्स क्षेत्रात देखील पदार्पण केलेले आहे. Paytm कंपनीचे Paytm Mall नावाचे इ कॉमर्स ऑनलाईन स्टोअर आहे. ह्या ऑनलाईन स्टोअर मध्ये अनेक वस्तूंवर डिस्काउंट आणि ऑफर्स उपलब्ध असतात. Paytm Mall मधील सर्व प्रॉडक्ट्स वर कॅशबॅक मिळते. तसेच Paytm Mall मध्ये होम फर्निचर, फॅशन, इलेक्ट्रोनिक्स इत्यादी वस्तू खरेदी करता येतात.

कोणत्याही प्रॉडक्ट वर फ्री शिपिंग चार्जेस मिळतात. तसेच Paytm Mall वर Maha Cashback Sale, OMG Fashion Sale अश्या धमाकेदार सेल चालूच असतात.


 1. Nykaa

Nykaa ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फक्त सौंदर्य आणि निरोगी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. विविध कॅटेगरी मध्ये मेकअप, स्किनकेअर, हेअरकेअर, बाथ आणि बॉडी, सुगंध आणि मेन्स प्रॉडक्ट्स फक्त ह्या एका वेबसाईट वर तुम्हाला मिळतील.

Nykaa ह्या इ-कॉमर्स साइटवर 850 पेक्षा जास्त मेकअप ब्रँड उपलब्ध आहेत. युनीलिव्हर, P&G, लॉरियल, बीयर्सडॉर्फ, व्हीएलसीसी, खादी, पॅराशूट, हिमालय इत्यादी समावेश असलेल्या टॉप पर्सनल केअर ब्रॅन्ड्स खरेदीसाठी NYKAA हे One-Stop-Destination आहे. तसेच ह्या ऑनलाईन ब्युटी वेबसाईट वर तुम्हाला सर्व सेवा उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाईन चॅट द्वारे एक्स्पर्ट कडून सल्ले घेऊ शकता आणि काही प्रोब्लेम असेल तर तो सांगू शकता.


 1. Big Basket

हे ऑनलाइन सुपरमार्केट ग्राहकांना किराणा सामान खरेदी करण्यासाठी एक सरळ आणि सोप्पा मार्ग प्रदान करते. बिगबास्केटमध्ये 1,000+ ब्रँड आहेत. बिगबास्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तांदूळ, डाळी, फळे, भाज्या, मसाले, पॅक्ड उत्पादने, शीतपेये, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि बरेच काही. त्यामुळे ऑनलाईन किराणा सामानाची शॉपिंग करणे खूप सोपे होते.

Big basket चे ऑफलाईन स्टोअर देखील आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद, नोएडा सारख्या शहरांमध्ये बिग बास्केट ची ऑफलाईन स्टोअर आहेत.


 1. Myntra

Myntra ही इ-कॉमर्स वेबसाइट फॅशन प्रॉडक्ट्स विकते. Myntra ही साईट टॉप लेव्हल च्या फॅशन आणि लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स त्यांच्या वेबसाईट वर विकते. जसे की Nike, Reebok, Puma, Adidas, Lee, इत्यादी. ग्राहक वेबसाइट व मोबाइल अॅपवरून खरेदी करू शकतात.

मेन्स, लेडीज आणि लहान मुलांच्या कपड्यांव्यतिरिक्त मिंन्ट्रा वर फुट्वीअर, सनग्लासेस, वॉलेट्स, बेल्ट्स, फोन केस, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि बरेच काही उपलब्ध आहे. आपल्याला घराची सजावट, फर्निशिंग, हेडफोन आणि स्पीकर्स देखील तुम्ही इथून खरेदी करू शकता. Myntra शॉपिंग साईट वर हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. ज्यात बजेट प्रॉडक्ट्स आणि लक्झरी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.

महिलांसाठी ही वेबसाईट खूप फायद्याची आहे. तसेच Myntra वरून केलेल्या पहिल्या ऑर्डर वर Free Delivery मिळते. ह्या फॅशन साईट वर दर महिन्याला किंवा आठवड्याला ऑफर्स आणि सेल्स होत असतात. त्यामुळे इथून शॉपिंग करणे फायद्याचे ठरेल.

▪️ इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा?


 1. Amazon

Amazon ही भारतातील सर्वात जास्त लोक्रपिय अशी इ कॉमर्स वेबसाईट आहे. 2013 साली भारतात अमेझॉन ची कंपनी लॉन्च झाली. अमेझॉन वर सर्व प्रकारचे शॉपिंग प्रॉडक्ट्स आहेत. अमेझॉन वर बेबी केअर प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रोनिक्स, किराणा सामान, फॅशन, लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स, मोबाईल्स, कॉम्प्युटर्स, फर्निचर, वॉशिंग मशीन, कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत.

अमेझॉन वर A To Z प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. तसेच अमेझॉन चे Amazon Prime Video ही सेवा आहे. त्यावर ऑनलाईन मुव्हीज, वेब सीरिज, टीव्ही शोज इत्यादी ऑनलाईन शोज पाहता येतात. त्यासाठी सबस्क्रिप्शन सुविधा विकत घ्यावी लागते. Rs 999/- एका वर्षाला तर Rs 129/- एका महिन्याला असे अमेझॉन प्राईम व्हिडिओ चे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आहेत. जर तुमच्याकडे Amazon Prime चे सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही अमेझॉन शॉपिंग साईट वरून कोणतेही प्रॉडक्ट्स ऑर्डर केल्यावर त्यावर फ्री डिलिव्हरी मिळते.


 1. LimeRoad

ए. एम. मार्केटप्लेसस् प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची लाइमरोड ही एक भारतीय ऑनलाइन बाजारपेठ आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही कंपनी स्थापित आहे. ही भारतातील पहिली महिला सोशल शॉपिंग वेबसाइट आहे. तसेच ह्या ऑनलाईन शॉपिंग स्टोअर वर महिला, पुरुष आणि मुलांसाठी कपडे आणि इतर वस्तू उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी तुम्ही LimeRoad.com वेबसाईट ला भेट देऊ शकता.


ब्लॉगिंग बद्दल डेली अपडेट्स साठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला @marathitechcorner 👈🏻 फॉलो करा.

10. Bewakoof

Bewkoof हे लाईफस्टाईल फॅशन ब्रँड 2012 मध्ये लाँच केले गेले. Bewakoof.com हे टी-शर्टसाठी खूप लोकप्रिय आहे. तसेच मोबाईल कव्हर, स्लाइडर, बॅग, नोटबुक आणि बरेच काही ह्या ऑनलाईन साईट वर उपलब्ध आहे. इनोव्हेटिव्ह डिझाइन मुळे ऑनलाइन शॉपिंग मार्केट मध्ये bewkoof ने एक युनिक ब्रँड व्हॅल्यू तयार केला आहे. ही साईट युजर फ्रेंडली असल्यामुळे ग्राहक आरामात त्याला हवा तो प्रॉडक्ट शोधून ऑनलाईन खरेदी करू शकतो. 

नवीन लुक मधील टीशर्ट, पँट युवा जनरेशन ला पसंत पडत आहेत. त्यामुळे ही वेबसाईट खूप लोकप्रिय आहे. वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी महिन्याच्या कार्यक्रमाचा रंग आला आहे. जर तुम्हाला bewkoof वरील प्रॉडक्ट्स आवडत असतील तर तुम्ही खरेदीवर अधिक बचत करू शकता. त्यासाठी तुम्ही त्यांच्या Loyalty Program Tribe ची सदस्यता घेऊ शकतो.

▪️ Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!

जसे कपडे, इलेक्ट्रोनिक्स वस्तू ऑनलाईन भेटतात तसेच, Medicines, हेल्थ केअर प्रॉडक्ट्स सुद्धा ऑनलाईन भेटतात. त्यासाठी ऑनलाईन medicines मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा! हा लेख एकदा वाचा.


11. Brand Factory

ब्रँड फॅक्टरी ह्या एका ठिकाणावर मेन्स, लेडीज आणि मुलांसाठी फॅशन प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये कपडे, फूटविअर, बॅग्स अश्या अनेक वस्तू ब्रँड फॅक्टरी ऑनलाईन स्टोअर वर उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीचे ब्रँड तुम्ही brandfactoryonline.com वरून खरेदी करू शकता.

ऑनलाईन ब्रँडेड फॅशन खरेदीसाठी ही वेबसाईट सर्वात लोकप्रिय आहे. ब्रँड फॅक्टरी ग्राहकांसाठी बजेट मध्ये प्रॉडक्ट्स आणि आकर्षित डिस्काउंट देत असते. प्रत्येक सणाच्या दिवशी ह्या शॉपिंग साईट वर डिस्काउंट आणि ऑफर असतात.


 1. Vijay Sales

विजय सेल्स ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स रिटेल साखळी आहे. विजय सेल्स मध्ये तुम्हाला सर्व इलेक्ट्रोनिक्स वस्तू खरेदी करता येतात. 1967 मध्ये श्री. नानू गुप्ता यांनी माहीममध्ये विजय सेल्सची एक लहान टीव्ही शोरूम म्हणून सुरुवात केली. आता विजय सेल्स चे जवळपास 107 ऑफलाईन स्टोअर आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, हरयाणा मध्ये विजय सेल्स चे स्टोअर्स आहेत. Vijay Sales ची अधिकृत वेबसाईट आहे. ज्यावरून आपण इलेक्ट्रोनिक्स वस्तू खरेदी करू शकतो.

विजय सेल्स मध्ये 3500+ इलेक्ट्रोनिक्स प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. इलेक्ट्रोनिक्स मध्ये तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, टीव्ही आणि भरपूर प्रॉडक्ट्स विजय सेल्स मध्ये मिळतात. ह्यावर खूप डिस्काउंट सुद्धा मिळतो. तसेच फेस्टिवल डेज च्या दिवसात भरघोस ऑफर्स सुद्धा मिळतात.


 1. JioMart

JioMart ही भारतीय किराणा डिलिव्हरी शॉपिंग साईट आहे. जियो मार्ट ही इ कॉमर्स वेबसाईट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ह्यांच्या मालकीची असून, ही मुकेश अंबानी ह्यांची आहे. ह्या वेबसाईट वरून भारतात कुठेही किराणा सामान खरेदी करू शकतो ते ही ऑनलाईन. अधिक माहितीसाठी JioMart.com ला भेट द्या.

▪️ गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?


 1. Reliance Digital Store

रिलायन्स डिजिटल ही भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअर 24 एप्रिल 2007 रोजी दिल्ली येथे उघडण्यात आले होते. सध्या भारतात सुमारे 20+ शहरांमध्ये 400+ रिलायन्स डिजिटल आणि रिलायन्स डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोअर्स आहेत. रिलायन्स डिजिटल स्टोअर ची ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहे.

ह्या वेबसाईटवर इलेक्ट्रोनिक्स मध्ये लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, एअर कूलर, मोबाईल फोन्स, स्मार्ट वॉच, हेडफोन्स, इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत. तसेच ह्या वेबसाईट वर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळत असतात.


15. 2GUD.com

2GUD वर नूतनीकृत (refurbished) मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, उपसाधने, उपकरणे आणि इतर अनेक इलेक्ट्रोनिक्स प्रॉडक्ट्स ऑनलाईन खरेदी करता येतात. करण्यासाठी ऑनलाइन वेबसाइट. तसेच प्रत्येक खरेदी केलेल्या प्रॉडक्ट्स च्या खरेदीनंतर 3 किंवा 12 महिन्यांची वॉरन्टी मिळते.

फ्लिपकार्टच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Ebay.in ची जागा replacement 2GUD.com ने घेतली आहे. खूप स्वस्त दरात दर्जेदार प्रॉडक्ट्स खरेदी करता येतात. तसेच खूप मोठं मोठे ब्रँड्स वर सूट मिळते.

▪️ ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.


 1. BookMyShow

चित्रपट, नाटक, कार्यक्रम आणि क्रीडा तिकिटांच्या बुकिंगसाठी बुक माय शो ही वेबसाईट उपलब्ध आहे. BookMyShow ह्या वेबसाईट वर येणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती, कार्यक्रमांची वेळ, ठिकाणांची माहिती आणि बरेच काही उपलब्ध असते. ह्या वेबसाइट वरून, आपल्याला चित्रपटांची तिकीट आणि इव्हेंट तिकिट बुक करण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. एका मिनिट मध्ये ऑनलाईन तिकीट काढता येते.


 1. Lenskart

Lenskart ही एक भारतीय Eyewear ऑनलाईन वेबसाईट आहे. ह्या वेबसाईट वर प्रिस्क्रिप्शन चष्मा, सनग्लासेस आणि कॉन्टॅक्ट लेन्स पर्यंत प्रॉडक्ट्स ऑनलाईन खरेदी करू शकतो. लेन्स कार्ट वेबसाईट च्या ऑफिशियल App वरून तुम्ही घरबसल्या तुमच्या चष्म्याचे माप आणि कलर निवडून ऑनलाईन चष्मा ऑर्डर करू शकतो.


18. Grofers

2015 मध्ये ग्रॉफर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची स्थापना झाली. गुडगाव येथील कंपनी किराणा सामान, फळे, भाज्या, सौंदर्यप्रसाधने आणि इतर दैनंदिन गरजा ऑनलाइन शॉपिंगसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ह्यावर तुम्हाला कमी किमतीमध्ये ऑनलाइन सुपरमार्केट मिळते. तसेच ग्रोफर्स तुमच्या दारात उत्पादनांची डिलिव्हरी करते. सेवा आहे.

ग्रॉफर्स वर कमी दरात सर्व किराणा सामान, फळे भाज्या मिळतात. तसेच डिस्काउंट सुद्धा खूप प्रमाणात मिळतो. ही एक लोकप्रिय ऑनलाईन सुपरमार्केट वेबसाईट आहे.


 1. Pepperfry

ऑनलाइन फर्निचर खरेदीसाठी पेपरफ्राय ही भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसाइटपैकी एक आहे. तसेच, पेपरफ्राय वेबसाईट वर इतर प्रॉडक्ट्स सुद्धा उपलब्ध आहेत. जसे की, स्वयंपाक घरातील उपकरणे, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल्स, कुकवेअर इत्यादी वस्तू ऑनलाईन विकत घेऊ शकतो. पेपरफ्राय वर सर्व प्रॉडक्ट्स वर 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो.

ऑनलाइन फर्निचर स्टोअरमध्ये म्हणजेच पेपरफ्राय वर No Cost EMI सह विविध प्रकारच्या पेमेंट पद्धती उपलब्ध आहेत. पेपरफ्रायकडे निवडक शहरांमध्ये फर्निचर भाडे सेवा देखील उपलब्ध आहे.

▪️ Coding म्हणजे काय? आणि कोडिंग कशी केली जाते?


 1. Firstcry

जर तुमच्या घरात लहान मुले असतील, तर त्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ही वेबसाईट एकदम चांगली आहे. फर्स्ट-क्राय ही ऑनलाईन शॉपिंग साईट आहे. ज्यावर फक्त लहान मुलांचे कपडे आणि इतर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. वेबसाइटवर 2 हजाराहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रांड आहेत.

ह्या ऑनलाइन शॉपिंग साईट वर सर्वात स्वस्त किंमतीत सर्वोत्तम प्रॉडक्ट्स आणि ब्रँड आहेत. जसे की लहान मुलांचे कपडे, पादत्राणे, खेळणी, पुस्तके आणि बरेच काही.


 1. Shopclues

Shopclues ह्या ऑनलाईन मार्केटप्लेसची स्थापना २०११ साली झाली. शॉपक्लूज वर आपण इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, कपडे आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतो. या वेबसाइटची स्थापना भारतातील लोकांना उत्तम करार देण्यासाठी केली गेली.

ऑनलाईन वस्तूंवर मिळणाऱ्या डिस्काउंट वर शॉपक्लूज सर्वात लोकप्रिय आहे. शॉपक्लूज वर इलेक्ट्रोनिक्स सह फॅशन आणि किराणा सामान उपलब्ध आहे.

▪️ E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!


इंटरनेटवर Online Shopping च्या भरपूर वेबसाइट्स आहेत. पण वर दिलेल्या शॉपिंग वेबसाइट्स सर्वात लोकप्रिय आणि सोशल मीडिया वर लोकप्रिय असणाऱ्या वेबसाइट्स आहेत. तसे इंटरनेट वर आजूनही खूप शॉपिंग वेबसाइट्स आहेत. त्यांची नावे मी खाली दिली आहेत.

 1. Chroma
 2. Walmart
 3. Homeshop18
 4. Snapdeal
 5. Alibaba
 6. Big Bazaar
 7. shoppersstop

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सोडून ऑनलाइन खरेदीसाठी चांगल्या वेबसाइट कोणत्या आहेत?

तसं बघितलं तर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्या दोन Online Shopping वेबसाईट सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र यांमध्ये जाहिराती देऊन त्यांची ग्राहकांच्या मनात जागा निर्माण झालेली आहे. त्यामुळे इतर कंपन्या जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण ह्या दोन कंपन्या सोडून देखील इतर Online Shopping साईट्स आहेत. वरील लेखात आपण ज्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स ची नावे बघितली त्या साईट्स खूप चांगल्या आणि सुरक्षित आहेत. ह्या शॉपिंग साईट्स वरून देखील लोकं प्रॉडक्ट्स खरेदी करतात.


भारतात फॅशनसाठी सर्वोत्तम साइट कोणती आहे?

Myntra ही भारतातील ऑनलाइन फॅशनसाठी सर्वात बेस्ट आणि लोकप्रिय वेबसाइट आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि Tata CLiQ सारख्या इतर साइट्समध्ये सुद्धा मेन्स, लेडीज आणि लहान मुलांसाठी फॅशनेबल कपडे उपलब्ध आहे. ह्या वेबसाईट वरून तुम्ही तुम्हाला हवे ते कपडे खरेदी करू शकता.


हे नक्की वाचा:

आजच्या लेखात आपण भारतातील ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्स (Top 21 Online Shopping Sites in India) बद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला कदाचित अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्याच शॉपिंग वेबसाइट्स बद्दल माहिती असेल. पण ज्या वेबसाईट व्यतिरिक्त सुद्धा अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्स आहेत. ज्यांच्याबद्दल आपण माहिती वरील लेखात जाणून घेतली. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तसेच कमेंट्स करून सांगा की तुम्ही वरील पैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वरून खरेदी करता.

तसेच लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

Leave a Comment