Cloud Storage म्हणजे काय? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?


आजच्या लेखामध्ये मध्ये आपण Cloud Storage म्हणजे काय? (What is Cloud Storage in Marathi)? तसेच कोण कोणत्या मोफत क्लाउड स्टोरेज चा वापर करून आपण फोटोज् आणि व्हिडिओज स्टोअर करू शकतो. ह्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वीच्या काळात फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, फाईल्स इत्यादी गोष्टी स्टोअर करण्यासाठी CD आणि DVD चा वापर केला जायचा. पण जस जसे तंत्रज्ञान वाढत गेले तस तसे नवनवीन आविष्कार घडत गेले. त्यातच फोटो, फाईल्स इत्यादी स्टोअर करण्यासाठी Flash Drive, Pen Drive ह्या स्टोरेज चा उपयोग होऊ लागला. त्यानंतर हळू हळू जास्त जागेसाठी External Hard Drive इत्यादी गोष्टींचा वापर होऊ लागला.

पण ह्या सर्व Storage मध्ये portability नव्हती. तसेच जास्त फाईल्स आणि फोटोज् स्टोअर केल्यामुळे जागा कमी पडू लागली. त्यासोबत ह्यांधली डेटा एकदा डिलिट झाला की परत नाही मिळायचा. त्यामुळे एका नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आला आणि ते तंत्रज्ञान म्हणजे Cloud Storage technolgy. ही एक अशी सर्व्हिस आहे ज्यामध्ये आपला डेटा ऑनलाईन मॅनेज, मेन्टेन आणि बॅकअप केला जातो.

ह्या सर्व्हिस च्या मदतीने आपण आपल्या फाईल्स, फोटोज् इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन स्टोअर करू शकतो. ह्याचा फायदा असा होतो की, तुम्ही कुठूनही क्लाउड स्टोरेज मध्ये स्टोअर केलेले फोटोज् इंटरनेटच्या मदतीने पाहू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचे Cloud Storage मध्ये लॉग इन केलेले अकाऊंट लक्षात ठेवावे लागेल.

आपल्या कंपनीचे क्लाउड स्टोरेज जास्तीत जास्त वापरले जावे म्हणून प्रत्येक कंपनी त्यांच्या प्रतिस्पर्धी सोबत स्पर्धा करत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या स्टोरेज मध्ये मोफत 50 GB किंवा त्यापेक्षा जास्त स्टोरेज देत आहेत. त्यामुळे थोड्याच कालावधीत क्लाउड स्टोरेज चा वापर जास्त प्रमाणात होईल असे दिसून येते.

चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की Cloud Storage काय आहे? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?


क्लाउड स्टोरेज म्हणजे काय? (What is Cloud Storage in Marathi)

What is cloud storage in marathi

Cloud Storage म्हणजे काय? (What is cloud storage in marathi) तर आपला सर्व डेटा एका सर्व्हरमध्ये ऑनलाइन सुरक्षितपणे संग्रहित केला जातो. जो आपण कुठेही आणि कधीही आपल्याला पाहिजे तेथे वापरू शकतो. आपला डेटा आपण इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन क्लाउड स्टोरेज मध्ये साठवून ठेवू शकतो. क्लाउड स्टोरेज डेटा सुरक्षित स्टोअर करण्याचे virtual माध्यम आहे. ह्याच्या साहाय्याने फोन आणि कॉम्प्युटर मधील डेटा कोणत्याही कंपनीच्या क्लाउड स्टोरेज सर्व्हर मध्ये स्टोअर करू शकतो.

तसेच क्लाउड स्टोरेज मध्ये स्टोअर केलेला डेटा आपण Login id आणि Password च्या मदतीने कोणत्याही डीवाईस मध्ये access करू शकतो. Google Drive, Microsoft One हे क्लाउड स्टोरेज चेच प्रकार आहेत.


क्लाउड स्टोरेज चे प्रकार (Types of Cloud Storage)

क्लाउड स्टोरेज बद्दल आपण संपूर्ण माहिती वर जाणून घेतली. आता आपण क्लाउड स्टोरेज चे किती प्रकार आहेत आणि कोणकोणते प्रकार आहेत. ते जाणून घेऊया.

▪️Personal Cloud Storage

पर्सनल क्लाउड स्टोरेज ला ‘मोबाईल क्लाउड स्टोरेज’ ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. ह्यामध्ये Data Syncing ची सुविधा सुद्धा दिलेली आहे. ह्या क्लाउड स्टोरेज प्रकारामध्ये कोणत्याही व्यक्ती चा व्यक्तिगत डेटा स्टोअर केला जातो. तसेच तो डेटा कोणत्याही device वरून तो व्यक्ती Access करू शकतो. अशी सुविधा देण्यात येते. जर उदाहरण द्यायचं झाल तर Apple’s iCloud Storage च उदाहरण घेऊ शकता.


▪️Public Cloud Storage

हा स्टोरेज प्रकार कोणतीही व्यक्ती वापरू शकत नाही. कारण ह्या क्लाउड स्टोरेज चा उपयोग मोठ मोठ्या संस्था त्यांचा डेटा स्टोअर करण्यासाठी करतात. पण क्लाउड स्टोरेज सेवा देणारी कंपनी आणि त्याचा वापर करणारी संस्था एकत्र मिळून काम नाही करत. ह्या स्टोरेज ला कोणतीही संस्था सांभाळत नाही.

कारण संस्थेला डेटा स्टोअर करण्यासाठी जी कंपनी स्टोरेज सर्व्हिस पुरवते. तीच कंपनी त्या संस्थेचे क्लाउड स्टोरेज सांभाळते.


▪️Private Cloud Storage

ह्यामध्ये संस्था आणि क्लाउड स्टोरेज सेवा देणारी कंपनी एकत्र मिळून काम करतात. क्लाउड स्टोरेज सेवा देणारी कंपनी संस्थेमधील डेटा सेंटर मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लावतात.

Private Cloud Storage मध्ये कोणत्याही समस्येचा तसेच सुरक्षतेची काळजी घेतली जाते. तसेच कोणताही प्रोब्लेम असेल तर तो लगेच सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबत क्लाउड स्टोरेज मधील सर्व सुविधा दिल्या जातात. हे क्लाउड स्टोरेज थोडे महाग असले तरी हे खूप सुरक्षित आहे.


▪️Hybrid Cloud Storage

हायब्रीड क्लाउड स्टोरेज हे पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउड स्टोरेज चे एकत्रित (Combination) रूप आहे. ह्यामध्ये काही डेटा संस्था च्या डेटा सेंटर वर आणि पब्लिक क्लाउड स्टोरेज मध्ये स्टोअर केला जातो. कोणत्या क्लाउड स्टोरेज मध्ये कोणता डेटा संचयित करावा याची निवड करण्याची संधी संस्थांना देते.


Advantages of Cloud Storage

  1. क्लाउड स्टोरेज ची usability चांगली असल्यामुळे युजर ला फाईल्स .क्लाउड स्टोरेज आणि लोकल स्टोरेज मध्ये Drag-and-drop करने खूप सोप्पे आणि सरळ होते.
  2. क्लाउड स्टोरेज चा वापर करून तुम्ही ईमेल वरून एक Web Link तुमच्या प्राप्तकर्ता (Recipient’s) पाठवू शकता. ह्यामुळे तुमचा वेळ खूप वाचू शकतो.
  3. स्टोअर केलेल्या फाईल्स जगातील कोणत्याही ठिकाणावरून प्राप्त (access) करू शकतो.
  4. ह्या मध्ये तुम्ही एक Emergency Backup Plan तयार करू शकता. काही कारणाने जर तुमचे क्लाउड स्टोरेज चालू होत नसेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
  5. क्लाउड स्टोरेज चा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेस चे डॉक्युमेंट्स क्लाउड स्टोरेज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ज्यामुळे तुम्ही ते डॉक्युमेंट्स हवे तिथे आरामात वापरू शकता.
  6. कंपन्यांना डेटा स्टोअर करण्यासाठी इंटर्नल पॉवर ची गरज पडत नाही.
  7. तसेच जर वार्षिक प्लॅन विकत घेतल्यावर कमी पैशांमध्ये जास्त GB वापरायला मिळते. हे बिझनेसमन आणि कंपन्यांसाठी खूप चांगले आहे.

Disadvantages of Cloud Storage

  1. जर इंटरनेट कनेक्शन नसेल तर क्लाउड स्टोरेज मधील डेटा प्राप्त करता येणार नाही. त्यामुळे हा खूप मोठा तोटा असू शकतो. आपल्याला पुरेपूर इंटरनेट वर अवलंबून राहावे लागते.
  2. डेटा सुरक्षित असणे खूप गरजेचे आहे. डेटा सुरक्षित आहे की नाही ह्यासाठी आपण नेहमी चिंतेत असतो. त्यामुळे क्लाउड स्टोरेज मध्ये डेटा स्टोअर करायच्या अगोदर त्यांचे Terms & Conditions व्यवस्थित वाचून व्ह्या.
  3. ह्यामध्ये तुम्हाला थोड्याच प्रमाणात मोफत क्लाउड स्टोरेज वापरायला मिळते. जसे की 5GB, 10GB, 50GB इतक्याच प्रमाणात वापरायला मिळते. जर हे स्टोरेज भरले तर तुम्हाला त्यांचा महिन्याचा प्लॅन विकत घ्यावा लागतो.
  4. जर तुम्ही लॉगिन आयडी आणि पासवर्ड विसरलात तर तुम्ही स्टोअर केलेला डेटा परत मिळवू शकत नाही.

Free Cloud Storage ची नावे

  • IceDrive
  • Mega
  • pCloud
  • WorkDrive
  • OneDrive
  • Google Drive
  • Dropbox
  • Amazon Drive
  • iCloud
  • Degoo
  • Sync
  • Box

वर दिलेले सर्व ऍप Google Play Store आणि App Store वर उपलब्ध आहेत.


Cloud Storage उपयोग कसा करावा?

मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या OneDrive Cloud Storage मध्ये फोटोज् कसे स्टोअर करायचे हे सांगणार आहे.

त्यासाठी मराठी टेक कॉर्नर च्या यूट्यूब चॅनल वरील हा व्हिडिओ पहा.👇🏻


हे नक्की वाचा:

आजच्या लेखात आपण Cloud Storage म्हणजे काय? (what is cloud storage in marathi) आणि ह्याचा उपयोग कसा करायचा? ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच ही माहिती वाचून तुम्हाला ही क्लाउड स्टोरेज बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मिळाली असेल. त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रांना व सोशल मीडिया वर वर शेअर करा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

4 thoughts on “Cloud Storage म्हणजे काय? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?”

Leave a Comment