स्मार्टवॉच म्हणजे काय? स्मार्टवॉच चे फीचर्स आणि फायदे!


स्मार्टवॉच (Smartwatch) आजच्या आधुनिक युगात खूप लोकप्रिय आहे. स्मार्टवॉच हे एका घड्याळ्या सारखेच दिसते. फक्त त्यात आधुनिक फीचर्स आणि फायदे दिलेले आहेत. आजच्या काळात स्मार्टवॉचला खूप मागणी आहे. हे वॉच प्रत्येकाला उपयोगी पडत आहे. तसेच ह्या स्मार्टवॉच मधील नवनवीन फीचर्स लोकांना खूप आकर्षित करत आहेत. त्यामुळे स्मार्टवॉच हल्लीच्या काळात डिमांड वर आहे. स्मार्टवॉच चा वापर दैनंदिन जीवनात खूप प्रमाणात वाढत आहे.

पूर्वीच्या काळात मनगटावर बांधायचे घड्याळ, अलार्म घड्याळ, भिंतीवरील घड्याळ, अश्या अनेक प्रकारची घड्याळे असायची. आणि ह्याबद्दल सर्वांना माहिती असेलच. पण जस जसा काळ पुढे होत गेला, घड्याळ्यांना एक नवे रूप आले. नवीन तंत्रज्ञानाने सर्व बदलून टाकले. त्यात साध्या घड्याळ्याला एक स्मार्ट रूप आले.

वॉच हे फक्त वॉच नाही तर स्मार्टवॉच म्हणून ओळखू जाऊ लागले. पण स्मार्टवॉच म्हणजे काय? ह्याबद्दल कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण स्मार्टवॉच बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच स्मार्टवॉच मध्ये कोण कोणते फीचर्स असतात. त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया.


स्मार्टवॉच म्हणजे काय? | What Is smartwatch in Marathi

Smartwatch mhnje kay

स्मार्टवॉच एक डिजिटल पोर्टेबल डिवाइस आहे. स्मार्टवॉच कॉम्प्युटर सारखे स्मार्ट आणि इंटेलिजंट असते. हे वॉच आपल्या हाताच्या मनगटावर बांधण्यासाठी बनवण्यात आले आहे. हे वॉच स्मार्टफोन सारखेच काम करते.

स्मार्टफोन मध्ये जसे फीचर्स असतात, तसेच फीचर्स, डिझाइन, टचस्क्रीन डिस्प्ले आणि सेन्सॉर ह्या वॉच मध्ये दिलेले असतात, त्यामुळे ह्याला स्मार्टवॉच असे म्हणतात. स्मार्टवॉच एका मिनी कॉम्प्युटर सारखेच काम करते. कोणताही युजर हाताच्या मनगटावर हे वॉच बांधून हव्या त्या फीचर्स चा उपयोग करू शकतो.

युजर च्या सुविधेसाठी हे आधुनिक घड्याळ म्हणजेच स्मार्टवॉच तयार करण्यात आले आहे. स्मार्टवॉच मध्ये एक टचस्क्रीन डिस्प्ले इंटरफेस दिलेला असतो, तसेच स्मार्टवॉच वापरण्यासाठी मोबाईल मध्ये एक ऍप इंस्टॉल करावा लागतो.

त्या ऍप च्या मदतीने स्मार्टवॉच मोबाईल सोबत कनेक्ट करू शकतो. ब्लूटूथ किंवा वायफाय च्या मदतीने युजर स्मार्टवॉच ला स्मार्टफोन सोबत कनेक्ट करू शकतो. स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन एकत्र कनेक्ट केल्यावर युजर प्रत्येक अॅक्टिविटी मॉनिटर करू शकतो.

Smartwatch Information in Marathi
Smartwatch Information in Marathi

स्मार्टवॉच मध्ये एक टचस्क्रीन डिस्प्ले, ब्लूटूथ, wifi, ऍप्लिकेशन (Apps), GPS, एक्टिविटी ट्रैकर, कॅमेरा, म्युझिक, Emergency Call इत्यादी खूप सुविधा दिलेल्या असतात. ह्या सुविधा युजरसाठी खूप उपयोगी पडतात. स्मार्टफोन सारखेच स्मार्टवॉच वापरणे खूप सोप्पे असते.

तसेच स्मार्टवॉच मध्ये अनेक स्मार्ट फीचर्स दिलेले असतात. सगळे फीचर्स व्यवस्थित चालावे त्यासाठी एक प्रोग्राम सेट केलेला असतो. ह्या सर्व गोष्टी एका साध्या घड्याळ्यांमध्ये दिलेल्या नसतात. स्मार्ट वॉच ची एक खासियत ही आहे की तुम्ही बिना मोबाईल चा उपयोग करता स्मार्टवॉच चा वापर करू शकतो. स्मार्टवॉच मध्ये रेगुलर अपडेट्स मिळत असतात.


स्मार्टवॉच मध्ये मिळणारे फीचर्स | Smartwatch Features in Marathi

Smartwatch features

स्मार्टवॉच मध्ये दिवसेंदिवस अनेक फीचर्स मिळत आहेत. टेक टिप्स मुळे हे सर्व शक्य झाले आहे. Apple, Mi, Realme, Oppo, Vivo ह्यांसारख्या मोठ मोठ्या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या आता Smartwatch बनवण्यात एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

त्यामुळे वेगवेगळ्या स्मार्टवॉच मध्ये नवनवीन फीचर्स आणि सुविधा मिळत आहेत. त्याच कारणाने, युजर ला स्मार्टवॉच वापरताना आता खूप चांगले आणि सोयीचे वाटते.

स्मार्टवॉच चा वापर करून आपण दुसऱ्यांसोबत बोलू शकतो, एकमेकांना मेसेज करू शकतो, फोटोज् आणि फाईल्स शेअर करू शकतो, रोजच्या फिटनेस अॅक्टीविटी का ट्रॅक करने, फोटो काढणे इत्यादी गोष्टी करू शकतो.

स्मार्टवॉच मध्ये खूप खास फीचर्स आणि सुविधा देण्यात येतात. त्यामुळे त्याला एक आकर्षित रूप मिळते. खाली आपण काही स्मार्टवॉच (Smartwatch) चे फीचर्स पाहूया..

▪️ एक्टिविटी ट्रैकर (Activity Tracker)

स्मार्टवॉच मध्ये अॅक्टीविटी ट्रॅकर हे एक बेस्ट फीचर आहे. ज्यामुळे आपल्या फिजिकल एक्टिविटी ला आपण स्मार्ट वॉच च्या मदतीने ट्रॅक करू शकतो. आपण किती चाललो, आपण किती झोपलो ह्याबद्दल सर्व माहिती स्मार्टवॉच मधून करू शकतो.


हे सुद्धा वाचा:-

» E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!

▪️ टच स्क्रीन डिस्प्ले (Touch Screen Display)

मोबाईल मध्ये असणाऱ्या टचस्क्रीन डिस्प्ले सारखा डिस्प्ले आपल्याला स्मार्टवॉच मध्ये दिसून येतो. तसेच चांगले UI दिल्यामुळे स्मार्टवॉच वापरणे खूप सोप्पे होते.


▪️ एप्लीकेशन (Application)

ह्यामध्ये वेगवेगळे Apps उपलब्ध असतात. जसे स्मार्टफोन्स मध्ये असतात तसेच इथे सुध्दा Apps वापरू शकतो.


▪️ बैटरी लाइफ (Battery Life)

स्मार्टवॉच मध्ये खूप फीचर्स आणि फंक्शन्स असल्यामुळे त्याला बॅटरी बॅकअप असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे एकदा तुम्ही स्मार्टवॉच चार्ज केलात की 2 किंवा 3 दिवस आरामात चालू शकते.


▪️ रिमोट म्यूजिक कंट्रोल (Remote Music Control)

मोबाईल फोन ला कनेक्ट करून म्युझिक, व्हिडिओज खूप सोप्प्या पद्धतीने स्मार्टवॉच मध्ये पाहू शकतो.


▪️ रियल टाइम नोटिफिकेशन्स (Real Time Notifications)

रिअल टाइम नोटिफिकेशन्स म्हणजे एखादा मेसेज आल्यावर येणारी नोटिफिकेशन्स. ह्या फीचर चा उपयोग करून स्मार्टफोन वर येणाऱ्या नोटिफिकेशन ला स्मार्टवॉच वर पाहू शकतो. ह्यामुळे वेळेची खूप बचत होते. आणि वारंवार मोबाईल बाहेर काढायची गरज पडत नाही.


▪️ ब्लूटूथ (Bluetooth)

ब्लूटूथ च्या साहाय्याने वायरलेस हेडफोन्स कनेक्ट करून गाणी ऐकू शकतो. तसेच फाईल्स, फोटोज्, व्हिडिओज शेअर करू शकतो.


▪️ जीपीएस सिस्टम (GPS System)

ह्यामध्ये GPS सिस्टम सुद्धा उपलब्ध आहे. कोणतेही ठिकाण शोधण्यासाठी तुम्ही GPS सिस्टम चा वापर करू शकतो.


▪️ पर्सनल असिस्टंट (Personal Assistant)

स्मार्टवॉच मध्ये पर्सनल असिस्टंट ची सुविधा दिलेली आहे. ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोन ची माहिती आणि नोटीफिकेशन मिळवू शकता.


▪️ फिटनेस प्रोग्राम (Fitness Program)

जर फिटनेस च्या फीचर्स बद्दल बघितले तर, ह्यामध्ये वेग वेगळे फिटनेस मोड दिले आहेत. Walking Steps, Heart Rate, Oxygen Level, Blood Pressure ह्या सर्व मोड चा वापर करून तुम्ही तुमची फिटनेस व्यवस्थित करू शकता.


▪️ वाटरप्रूफ प्रोटेक्शन (Waterproof Protection)

पाऊस असो की पाण्याच्या खाली स्मार्ट वॉच दोन्ही ठिकाणी व्यवस्थित काम करते. स्मार्टवॉच बनवणारी कंपनी हे फीचर खास लक्षात ठेवून बनवते. ज्यामुळे पाण्यामध्ये सुद्धा स्मार्टवॉच वापरू शकतो.


▪️ कॉल आणि मॅसेजींग (Call & Messaging)

जस स्मार्टफोन्स वर कॉल व मेसेज करून आपण आपल्या नातेवाईकांशी बोलतो. तसेच स्मार्टवॉच च्या मदतीने आपण कॉल आणि मॅसेज करू शकतो. ह्यामध्ये मायक्रोफोन आणि लाऊडस्पिकर सुद्धा दिलेले असते.


▪️ वायफाय कनेक्टिविटी (Wi-Fi Connectivity)

Wifi चा वापर करून आपण इंटरनेट वापरू शकतो. त्यामुळे स्मार्टवॉच मध्ये देखील Wi-Fi देण्यात येते. ज्यामुळे इंटरनेट वरील कोणतीही माहिती, फोटोज्, व्हिडिओज आणि आपली इतर काम आरामात करू शकतो.

» FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?

» OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!

तुम्हाला सुद्धा जर ऑनलाईन smartwatch विकत घ्यायचे असेल. तर तुम्ही Amazon वरून शॉपिंग करू शकता. शॉपिंग करण्यासाठी खालील दिलेल्या बॅनर वर क्लिक करा.👇🏻

Shop On Amazon

स्मार्टवॉच वापरण्याचे फायदे | Advantages of using a smartwatch

  • ड्रायव्हिंग करत असताना कॉल आला, तर मोबाईल काढून कॉल उचलण्यापेक्षा तुम्ही स्मार्टवॉच वरून डायरेक्ट कॉल रिसिव्ह करू शकतो.
  • वारंवार मोबाईल फोन काढून इंटरनेट वर माहिती शोधण्यापेक्षा स्मार्टवॉच च्या मदतीने शोधून वेळ वाचवू शकतो.
  • स्मार्टवॉच चा वापर करून आपण आपल्या फिटनेस बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकतो.
  • स्मार्टवॉच मध्ये ऍप्लिकेशन असल्यामुळे पटकन कोणतीही माहिती इंटरनेट च्या मदतीने शोधू शकतो.
  • स्मार्टवॉच वापरणे सोप्पे असल्यामुळे कोणीही वापरू शकतो.
  • Bluetooth ऑन करून तुम्ही वायरलेस साँग्ज ऐकू शकता.

» घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!

» Affiliate Marketing म्हणजे काय? एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे?


अश्या प्रकारे एका स्मार्टवॉच मध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स मिळतात. ज्याचा वापर करून आपण आपले कोणतेही काम करू शकतो. दैनंदिन जीवनात ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. जसे की ड्रायव्हिंग करताना, ऑफिस मध्ये, अभ्यास करताना, स्विमिंग करताना अश्या अनेक ठिकाणी स्मार्टवॉच चा उपयोग करू शकतो.

तसेच स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड ह्यामध्ये खूप अंतर असते. स्मार्टबँड मध्ये जेवढे फीचर्स उपलब्ध नसतात, तेवढे फीचर्स एका स्मार्टवॉच मध्ये असतात. त्यामुळे स्मार्टवॉच विकत घेणे हा खूप चांगला पर्याय आहे.

मी आशा करतो की तुम्हाला स्मार्टवॉच म्हणजे काय? (What is Smartwatch in Marathi) आणि स्मार्टवॉच मध्ये किती व कोण कोणते फीचर्स असतात? ह्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

1 thought on “स्मार्टवॉच म्हणजे काय? स्मार्टवॉच चे फीचर्स आणि फायदे!”

Leave a Comment