5G स्मार्टफोन घेताय? पाहा हे 5 पावरफूल 5G मोबाईल फोन्स!


5G हा तंत्रज्ञानाच्या विश्वात होणारा नवीन बदल आहे. 5G टेक्नॉलॉजी सोबत 5G स्मार्टफोन सुद्धा लॉन्च झाले आहेत

भारतात आजून तरी 5G तंत्रज्ञान उपलब्ध नसले तरी, स्मार्टफोन्स बनवणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजा लक्षात ठेवत 5G स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. 5G स्मार्टफोन्स थोडे महाग असले तरीही कमी किमतीत 5G फोनचे अनेक पर्याय मार्केट मध्ये किंवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. 20,000 ते 40,000 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन भारतात उपलब्ध आहेत. हे 5G स्मार्टफोन्स दमदार फीचर्स सोबत तसेच नव्या प्रोसेसर सोबत उपलब्ध आहेत. तर आज आपण 5G स्मार्टफोन्स पाहणार आहोत.


Table of Contents

Realme Narzo 30 Pro 5G

Realme Narzo 30 Pro 5G Mobile review in marathi
Realme Narzo 30 Pro 5G Mobile review in marathi

जर तुमचे बजेट 20,000 रुपये इतकेच असेल तर तुमच्यासाठी Realme Narzo 30 Pro 5G हा सर्वात उत्तम पर्याय आहे. ह्यामध्ये दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. एका व्हेरिएंट मध्ये 6GB रॅम सह 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. तर दुसऱ्या व्हेरिएंट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. 6GB/64GB व्हेरिएंट 16,999 रुपये तर 8GB / 128GB व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये 6.5 इंच फुल एचडी डिस्प्ले (FHD+) दिलेला आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये 48MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh दमदार बॅटरी दिलेली आहे. यामध्ये MediaTek Dimensity 800U हा प्रोसेसर दिलेला आहे. Realme Narzo 30 Pro 5G फोनमध्ये 5G सिम कार्ड चा वापर करू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 30W चा फास्ट चार्जर दिलेला आहे. साइड फिंगरप्रिंट चा पर्याय दिलेला आहे. तसेच 16MP चा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 10 दिलेले असून लवकरच अँड्रॉइड 11 चा अपडेट उपलब्ध होईल.
Realme Narzo 30 Pro 5G ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. http://bit.ly/38QzdjU


Vivo V20 Pro

vivo V20 Pro 5g mobile review in marathi
vivo V20 Pro 5g mobile review in marathi

Vivo V20 Pro हा स्मार्टफोन 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंट उपलब्ध आहे. यात 6.44 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर वर चालत असून Android 11 वर कार्य करतो. फोनमध्ये तब्बल 4000 mAh ची बॅटरी आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. यात 64MP + 8MP + 2MP कॅमेरे दिलेले आहेत. तसेच ह्यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. ज्यामध्ये 44MP आणि 8MP कॅमेरा दिलेला आहे. तसेच ह्या स्मार्टफोन मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे.
Vivo v20 Pro ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. https://bit.ly/2OCcpxH


Moto G 5G

Moto G 5G Mobile Review and unboxing in Marathi
Moto G 5G Mobile Review and unboxing in Marathi

जर तुमचं बजेट हे 20 हजारपर्यंत असेल, तर मोटोरोलाचा मोटो जी 5 जी (Moto G 5G) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या फोनमध्य 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. यासोबत ह्या फोन मधे आपण मायक्रोएसडी कार्डसह स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता. 6.67 इंचाचा फुल एचडी + एलसीडी आयपीएस एचडीआर 10 मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिलेला आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर दिलेला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर काम करते. फोनमध्ये दमदार 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ह्या फोन मधे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिलेला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 20,999 रुपयांमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपलब्ध आहे.
Moto G 5G ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. https://amzn.to/3vNc3VE


Oneplus Nord 5G

OnePlus Nord 5G mobile review in Marathi
OnePlus Nord 5G mobile review in Marathi

जर तुम्हाला दमदार प्रोसेसर आणि पावरफूल कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असेल आणि तुमचं बजेट जर 30 हजारापर्यंत असेल तर तुम्ही Oneplus Nord 5G सोबत जाऊ शकता. ह्या स्मार्टफोन मध्ये वनप्लस कंपनी चाच ऑक्सिजन OS दिलेला आहे. तसेच 4115mAh ची पावरफुल बॅटरी सुद्धा दिली आहे. इन डिस्प्ले fingerprint दिली आहे. तसेच ह्या फोन मधे क्वाड कॅमेरा सेटअप दिलेला आहे. 48MP + 8MP + 5MP + 2MP क्वाड कॅमेरा दिलेला आहे.तसेच फ्रंट साइड ला दोन कॅमेरे दिलेले आहेत. 32MP + 8MP कॅमेरा सेटअप दिलेला आहे. तसेच ह्या कॅमेऱ्याने 4K व्हिडिओ रेकर्डिंग करता येते. 6.44 इंच चा फ्लुईड अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. 12GB रॅम सोबत 256 GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा मोबाईल 29,999 रुपयांना फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.
जर तुम्हाला OnePlus Nord 5G विकत घ्यायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.. https://amzn.to/3tDxt5L


Realme X7 Pro

realme X7 Pro mobile review in marathi
realme X7 Pro mobile review in marathi

Realme X7 Pro स्मार्टफोन मध्ये पावरफूल Dimensity 1000+ प्रोसेसर आहे. तसेच ह्या स्मार्टफोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. 64 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे. ह्या फोन मध्ये 4500mAh दमदार बॅटरी आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच 65W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Realme कंपनीने 0-100% चार्जिंग फक्त 35 मिनिट्स मध्ये पूर्ण होईल ह्याचा दावा केलेला आहे. 120Hz सुपर अमोलेड डिस्प्ले असून 6.55″ इंच डिस्प्ले दिलेला आहे. तसेच इन डिस्प्ले फींगर-प्रिंट सुद्धा उपलब्ध आहे. Type-C चार्जिंग सपोर्ट आहे. तसेच 4k व्हिडिओ रेकर्डिंग चा सपोर्ट दिलेला आहे. ह्या स्मार्टफोन ची किंमत 29,999 रुपये आहे.
Realme X7 Pro स्मार्टफोन ऑनलाईन विकत घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. https://bit.ly/3bZPqFE


तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी तसेच लेटेस्ट टेक न्यूज साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. डेली अपडेट्स साठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा.

1 thought on “5G स्मार्टफोन घेताय? पाहा हे 5 पावरफूल 5G मोबाईल फोन्स!”

Leave a Comment