ब्लॉगिंग म्हणजे काय? आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय?

आजच्या लेखामध्ये आपण ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blogging information in Marathi) आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन शोध लागत असतात. तसेच त्याविषयी इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती मिळत असते. ही माहिती ब्लॉग किंवा वेबसाईट मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जाते. ही माहिती आर्टिकल स्वरूपात ऑनलाईन पोस्ट केली जाते. अश्याच प्रकारे वेगवेगळ्या विषयांची माहिती आपल्या ब्लॉग मार्फत इंटरनेट वर प्रसारित केली जाते.

ब्लॉग म्हणजे काय? (What is blog in Marathi)

blog meaning in marathi

एखाद्या विषयाची माहिती सोप्या व सविस्तर भाषेत लिहून इंटरनेट च्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवणे ह्यालाच ब्लॉग असे म्हणतात. ब्लॉग हे एका डायरी प्रमाणे आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची माहिती व तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याबद्दल लिहू शकता.

ब्लॉग चे दोन प्रकार असतात. पर्सनल ब्लॉग (Personal Blog) आणि प्रोफेशनल ब्लॉग (Professional Blog).

Personal Blog: ह्या प्रकारच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या विचारांना, आपल्या भावनांना व जीवनात घडलेल्या अनुभवांना इंटरनेट च्या माध्यमाने ब्लॉग वर प्रसारित करू शकतो. तसेच ह्या मार्फत आपण लोकांना त्याविषयी माहिती देऊ शकतो. जसे उदाहरणासाठी आपण हा ब्लॉग बघूया https://www.guruthakur.in हा ब्लॉग एक Personal ब्लॉग आहे ज्यावर गुरु ठाकूर स्वतःचे लेख, कविता पोस्ट करतात.

Professional Blog: ह्या प्रकारच्या ब्लॉग मध्ये एखादा विषय निवडून त्याबद्दलची संपूर्ण माहिती इंटरनेट च्या माध्यमाने ब्लॉग मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली जाते. ह्या प्रकारच्या ब्लॉग मार्फत ऑनलाईन कमाई करता येते. तसेच एखाद्या ब्रँड ची जाहिरात करण्यासाठी सुद्धा प्रोफेशनल ब्लॉगिंग चा उपयोग केला जातो. तर उदाहरणासाठी आपण हा ब्लॉग बघूया जो Neil Patel www.neilpatel.com यांचा आहे. हा ब्लॉग एक Professional ब्लॉग आहे. ज्यावर ते आर्टिकल्स, टिप्स, प्रोफेशनल माहिती पोस्ट करतात. जी लाखो लोकं बघतात.

जर तुम्हाला ही नवीन ब्लॉग सुरू करायचा असेल तर ह्यावर मी अगोदरच एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. तो लेख एकदा नक्की वाचा.

ब्लॉगर कोणाला म्हणतात? (Blogger Meaning in Marathi)

इंटरनेट वर अनेक प्रकारचे ब्लॉग असतात. काही जण त्यांचा छंद म्हणून ब्लॉग लिहितात तर काहीजण व्यवसाय म्हणून ब्लॉग लिहितात. ब्लॉग लिहिताना तो वाचकाला आवडेल अश्या पद्धतीने लिहिला पाहिजे.

इंटरनेटद्वारे एखादी माहिती आपल्या ब्लॉग मार्फत लोकांपर्यंत जो पोहोचवतो त्याला ब्लॉगर म्हणतात.

blogger meaning in marathi

» ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?

ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blogging information in Marathi)

कोणत्याही विषयावर आधारित माहिती व लेख स्वतः लिहून इंटरनेट द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ह्याला ब्लॉगिंग असे म्हणतात.

ब्लॉगिंग मध्ये ब्लॉग वर कोणत्याही विषयाबद्दलची माहिती सोप्प्या भाषेत लिहून इंटरनेट वर प्रसारित केली जाते. ही माहिती जगभरात कुठेही इंटरनेटच्या द्वारे वाचता येते. काही काही जण ब्लॉगिंग चा उपयोग व्यवसायासाठी करतात तर काहीजण त्यांच्या मनातील विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतात.

तुम्ही लिहिलेले ब्लॉग हे Google व Bing यासारख्या सर्च इंजिन्स द्वारे लोकांपर्यंत पोहोचतात. जास्त वाचक तुमच्या ब्लॉग ला भेट द्यायला लागले की तुम्ही Ads द्वारे पैसे सुद्धा कमवू शकता.

» वेबसाईट गूगल सर्च कन्सोल मध्ये कशी सबमिट करायची?

» नवीन वेबसाईट बिंग वेबमास्टर टूल मध्ये कशी सबमिट करायची?

तसेच ब्लॉगिंग करण्यासाठी Blogging Platforms ची गरज असते. काही फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरून तुम्ही विनामूल्य ब्लॉगिंग करू शकता. तर काही सशुल्क (Paid) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत. ब्लॉगिंग विषयी काही प्रश्न असतील तर त्यासाठी मला इंस्टाग्राम वर मेसेज करा.

ब्लॉगर काय आहे?

Blogging information in Marathi

१९९९ साली Pyra Labs यांनी ब्लॉगर सुरु केले होते. पण २००३ साली गुगलने ब्लॉगर विकत घेतले. Blogger हे गुगलचे एक उत्पादन आहे.

ब्लॉगर हा पूर्णपणे मोफत ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. यात तुम्ही सबडोमेनवर (blogspot.com) तुमचा ब्लॉग तयार करू शकता. परंतु जर ब्लॉग चे नाव .com किंवा .in असे हवे असल्यास तुम्हाला ते डोमेन विकत घ्यावे लागेल.

नक्की वाचा: OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!

वर्डप्रेस काय आहे?

वर्डप्रेस काय आहे?

वर्डप्रेस हे एक मुक्त स्रोत (Open Source) आहे. WordPress हे विनामूल्य ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे ब्लॉग, वेबसाईट किंवा ई-कॉमर्स स्टोअर देखील तयार करू शकता. वर्डप्रेस वर कोडींग नॉलेज किंवा वेब डिझाईन शिकण्याची गरज नसते. जगातील ४०% वेबसाईट या वर्डप्रेसवर आहेत.

वर्डप्रेस हे मोफत असले तरी त्यावर ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग घेणे गरजेचे असते. वर्डप्रेस शिकण्यासाठी इंटरनेटवर अनेक माहिती उपलब्ध आहे. वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?

ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blogging information in Marathi) आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय? हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती सर्वांना शेअर करा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment