ब्लॉग कसा सुरू करावा? (How to start blog in marathi)

आज आपण ब्लॉग कसा सुरु करावा? (How to start blog in marathi) ह्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून तुम्हाला ब्लॉग सुरु करण्याबाबत सर्व माहिती मिळेल. ते ही आपल्या मातृभाषेत! तुम्ही ब्लॉग सुरू करायचा विचार करत आहात? कशी करायची सुरुवात ते समजत नाहीय? ब्लॉग कसा सुरू करावा? ब्लॉग सुरु करण्याची पुरेशी माहिती नाहीय? तसेच तुम्ही ही माहिती वाचून ब्लॉगिंग सुरु करण्यासोबत त्यामध्ये यश सुद्धा मिळवाल. चला तर मग वेळ न वाया घालवता ब्लॉग कसा सुरू करावा? (How to start blog in marathi) हे पाहूया..


Table of Contents

ब्लॉगिंग म्हणजे काय?

ब्लॉगिंग म्हणजे काय कोणत्याही विषयावर आधारित माहिती व लेख स्वतः लिहून इंटरनेट द्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे ह्याला ब्लॉगिंग असे म्हणतात. ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला ब्लॉग वर कोणत्याही विषयाबद्दलची माहिती सविस्तर व सोप्प्या भाषेत लिहून इंटरनेट वर प्रसारित करायची असते. ही माहिती जगभरात कुठेही इंटरनेटच्या द्वारे वाचता येऊ शकते. जसे की ह्या ब्लॉग वर मी ब्लॉगिंग संबंधी माहिती सविस्तर मध्ये तुमच्या समोर मांडली आहे.

» 20+ रॉयल्टी आणि कॉपीराइट फ्री इमेज वेबसाइट्स!


ब्लॉग कसा सुरू करावा?

How to start new blog in marathi

ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच ब्लॉगिंग करताना धीर धरून काम करावे लागते. रोज नवनवीन गोष्टी शिकत रहाव्या लागतात. काही जणांना एका दिवसात ब्लॉगिंग मार्फत पैसे कमवायचे असतात. पण तसे न झाल्याने ते ब्लॉगिंग करणं सोडून देतात. पण ब्लॉगिंग ला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही नियमित रित्या काम करत, धीर धरून काम करावे लागेल तरच तुम्ही यश प्राप्त कराल. ब्लॉग कसा सुरू करावा हे मी खाली 8 सोप्प्या पद्धतींमध्ये समजावून सांगितले आहे. पण त्याअगोदर तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. त्यावर मी एक सविस्तर ब्लॉग लिहिला आहे तो एकदा नक्की वाचा.

Step 1 • ब्लॉग सुरु करण्याची महत्त्वाची कारणे.

blog suru karnyachi mahttvachi karne

ब्लॉग सुरु करण्यापूर्वी तुम्ही ब्लॉग कोणत्या हेतूने सुरु करत आहात. हे लक्षात घ्या. जर तुम्ही फक्त लोकांपर्यंत माहिती व ज्ञान पोहोचवण्यासाठी ब्लॉग सुरु करायचा विचार करत आहात किंवा एक व्यवसाय म्हणून ब्लॉग सुरु करायचा विचार करत आहात. ते अगोदर समजून घ्या. नंतर तुम्हाला विनामूल्य ब्लॉग सुरू करायचा असेल तर तुम्ही मोफत ब्लॉग बनवू शकता. किंवा जर तुम्हाला प्रोफेशनल ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्ही थोडा खर्च करून ब्लॉग सुरू करू शकता.

तसेच ज्या विषयाची माहिती लोकांना कमी प्रमाणात आहे पण तुम्हाला ती माहिती पूर्णपणे माहीत असेल तर तुम्ही त्या विषयावर ब्लॉग सुरु करू शकता. जर तुमच्या जवळ ब्लॉगिंग साठी पुरेसा वेळ आहे तर तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता व ब्लॉगिंग मार्फत पैसे सुद्धा कमवू शकता. ब्लॉग लिहिणे सुरुवातीला कठीण वाटते पण जस जसे आपल्याला त्याबद्दल माहिती मिळेल तस तसे ब्लॉग लिहिणे सोप्पे होते.

हे नक्की वाचा:- SSD म्हणजे काय? SSD की HDD नक्की कोणते आहे फायदेशीर?

Step 2. ब्लॉग साठी विषय निवडणे | Blogging Niche

blog saathi vishay nivdane

ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका विषयाची आवश्यकता असते. आपल्याला ज्या विषयाची संपूर्ण माहिती आहे आणि त्या विषयाचा ब्लॉग लिहिताना आपल्याला कंटाळा येणार नाहीना असा उपयोगी आणि आकर्षित विषय असावा.

तसेच ब्लॉग चा विषय निवडण्याच्या अगोदर स्वःताला हे दोन प्रश्न नक्की विचारा.

1. तुम्हाला ह्या विषयाबद्दल शिकायला आवडते का?
2. दुसऱ्या लोकांना सुद्धा हा विषय आवडतो का?

ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला पूर्णपणे मिळाली तर तुम्ही तो विषय निवडावा. तसे नसल्यास तुम्ही हे खालील दिलेले विषय निवडू शकता जसे की,

  • फूड ब्लॉग
  • ट्रॅव्हल ब्लॉग
  • फॅशन ब्लॉग
  • हेल्थ अँड फिटनेस ब्लॉग
  • टेक्नॉलॉजी ब्लॉग
  • मार्केटिंग ब्लॉग
  • शायरी, स्टेटस ब्लॉग
  • शेअर मार्केट ब्लॉग
  • शैक्षणिक ब्लॉग
  • जनरल नॉलेज ब्लॉग

वरील माहितीवरून आपल्याला हे समजले की ब्लॉग तयार करण्यासाठी विषयाची (Niche) किती गरज असते. तसेच ब्लॉग बनवण्यासाठी डोमेन आणि होस्टिंग ची सुद्धा आवश्यकता असते. पण डोमेन आणि होस्टिंग म्हणजे नक्की काय असते? चला तर मग जाणून घेऊया..

» प्रत्येक मराठी ब्लॉगरने वापरले पाहिजे! असे 10 Chrome Extensions

Step 3. ब्लॉग चे नाव निवडणे | Domain Name

blog che naav nivdane

ब्लॉग चे नाव निवडणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ह्या स्टेप मध्ये आपण Blog चे नाव निवडणार आहोत ज्याला Domain Name असही म्हणतात. डोमेन नेम हे एक Brand असते म्हणून डोमेन नेम निवडताना कोणते नाव लोकांच्या अगदी सहज लक्षात येईल असे असले पाहिजे. डोमेन नेम म्हणजे तुमच्या ब्लॉग चा इंटरनेटवरचा पत्ता (Domain Address) उदाहरणार्थ:- www.yourblog.com , डोमेन निवडताना ब्लॉग कशा संदर्भात आहे ते लक्षात घेऊन डोमेन नेम ची निवड करावी. तसेच डोमेन नेम जास्त ही लांब लचक नसावं व डोमेन नेम मध्ये अंक (digit) नसावे.

काही डोमेन नेमची नावे:-
www.facebook.com
www.instagram.com

Domain Name निवडताना ह्या तीन गोष्टींची काळजी घ्यावी.

  • वाचकांना वाचताना सोयीस्कर वाटेल असेच घ्यावे.
  • डोमेन नेम जास्त लांब असू नये.
  • ब्लॉग च्या विषया संबंधी डोमेन नेम असावे.
  • डोमेन नेम जास्तीत जास्त १२ अक्षरांएवढ असाव.

मी तुम्हाला हाच सल्ला देईन की Domain Name साठी .com एक्स्टेन्शन वापरावे. कारण .com हे जास्त लोकप्रिय आणि जास्त वापरले जाणारे एक्सटेंशन आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ह्याने का ह्या ब्लॉग साठी .com एक्स्टेन्शन घेतलं. तर मित्रांनो हा ब्लॉग तंत्रज्ञान व ब्लॉगिंग विषयक माहिती देण्यासाठी आहे म्हणून मी .in हे एक्स्टेन्शन घेतलं. जर तुम्ही निवडलेल्या Domain Name वर .com हे एक्स्टेन्शन उपलब्ध नसेल तर तुम्ही .in | .net | .org | .co.in हे डोमेन एक्स्टेन्शन सुद्धा विकत घेऊ शकता. खाली काही कंपन्यांची नावे दिली आहेत. तिथून तुम्ही एका वर्षासाठी तसेच दोन किंवा पाच वर्षांसाठी डोमेन विकत घेऊ शकता. डोमेन चा एका वर्षासाठी चा खर्च साधारणपणे 499 ते 1299 इतका येऊ शकतो.

• BigRock
• Hostinger
• BlueHost
• GoDaddy
• NameCheap

» वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे?

» Meta Tag म्हणजे काय? मेटा टॅग वेबसाईट मध्ये कसा ॲड करावा?

Step 4. ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ची निवड करणे | Blogging Platforms

blogging platform chi nivad karne

ब्लॉग लिहिण्यासाठी योग्य तो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणे फार महत्त्वाचे आहे. ब्लॉग लिहिण्यासाठी अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. जसे की WordPress, Wix, Squarespace, Weebly, Joomla इत्यादी. हे लोक्रपिय Blogging Platforms आहेत. पण तुम्ही ब्लॉगिंग साठी WordPress.org चा वापर करावा. कारण हा सर्वात चांगला आणि लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. तसेच जगातील ४०% वेबसाइट्स ह्या वर्डप्रेस वर बनवल्या आहेत.

How to start new blog in marathi

तर ब्लॉग सुरू करण्यासाठी WordPress.org प्लॅटफॉर्म सर्वात चांगला का आहे?

• वर्डप्रेस हे मोफत आहे. फक्त तुम्हाला Hosting आणि Domain खरेदी करावे लागते.
• वर्डप्रेस वर 6000+ Free Themes उपलब्ध आहेत. ज्यामुळे ब्लॉग ला आकर्षित डिझाइन मिळते.
• नवीन ब्लॉगर्स ना वापरण्यास अगदी सोप्पे.
• ब्लॉग लिहिण्यासाठी खूप सोयीस्कर.
• खूप फीचर्स मिळतात ते ही अगदी मोफत.
• Free Plugins वापरण्यास मिळतात.

नक्की वाचा: वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?

पण आम्ही फ्री मध्ये ब्लॉग नाही का बनवू शकत?

तर उत्तर आहे हो. तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकता. जसे की Blogger.com आणि WordPress.com ह्या Blogging Platforms वर तुम्ही Free Blog बनवू शकता. पण मी तुम्हाला Free मध्ये ब्लॉग बनवण्याचा सल्ला अजिबात देणार नाही. कारण ह्यामध्ये खूप समस्या आणि अडचण येतील.

Step 5. Free मध्ये ब्लॉग का बनवू नये? ह्याची काही कारणे

Free madhye blog ka banvu naye hyaachi kaarne

• ब्लॉगर वर तयार केलेल्या ब्लॉग चा Address www.yourblog.blogspot.com असा असतो. जर तुम्हाला www.yourblog.com असा address हवा असेल तर तुम्हाला Domain Name विकत घ्यावे लागेल.

• Blogger सारख्या साईट वर तुम्हाला जास्त Customization करायला मिळणार नाही. तसेच तुम्हाला त्यासाठी खर्च करावा लागेल.

• Blogger वर वर्डप्रेस सारखे Plugins Add करता येत नाही.

• Blogger वर लिहिलेल्या content वर तुम्ही पूर्णपणे Control नाही करू शकत. त्यामुळे चुकीचा कंटेंट असल्यास तुम्हाला पूर्व सूचना न देता तो ब्लॉक केला जातो.

• Blogger वर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते कारण कमी फीचर्स असल्यामुळे Blog व्यवस्थित लिहिणे कठीण होते.

• WordPress.com वर तुम्ही free blog बनवू शकता. पण त्या ब्लॉग चा Address www.yourblog.wordpress.com असा असतो. त्यामुळे वाचकांना लक्षात ठेवण्यासाठी त्रासदायक ठरते.

त्यामुळे WordPress.org वर तुम्ही ब्लॉग बनवला पाहिजे. ज्यामुळे तुमचा Blog सुद्धा फेमस होईल आणि तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता.

तरीसुद्धा जर तुम्हाला Blogger.com व WordPress.com वर Free Blog बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला blogger.com वर free blog बनवायचा असेल तर त्यावर मी एक सविस्तर ब्लॉग लिहिला आहे तो एकदा वाचा.

Step 6. वेब होस्टिंग कसे निवडावे?

web hosting kase nivadave

वेब होस्टिंग ब्लॉग सुरु करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ब्लॉग/वेबसाईट मधील फोटोज्, फाईल्स, व्हिडिओज, लेख इत्यादी गोष्टी Web Server मध्ये साठवून ठेवले जाते. कारण ते इंटरनेट च्या माध्यमाने ऑनलाईन पाहता यावे म्हणून. वेब सर्व्हर वर फाईल्स व फोटोज् साठवून ठेवल्या जाणाऱ्या जागेला Web Hosting असे म्हणतात.

जेव्हा ही होस्टिंग विकत घेणार असाल. तेव्हा ह्या चार गोष्टी आहेत की नाही ते नक्की चेक करा..

1 .Support:

जेव्हा एखादी वेब होस्टिंग विकत घ्याल तेव्हा तुम्ही त्यात चांगला सपोर्ट आहे की नाही हे नक्की चेक करा. कधी तुम्हाला होस्टिंग मध्ये Problem आला तर तुम्ही होस्टिंग पुरवणाऱ्या कंपनीच्या एक्सपर्ट शी बोलून प्रॉब्लेम ठीक करून घेऊ शकतात.

2. Price:

होस्टिंग विकत घेताना तुम्हाला खर्च करावा लागेल. पण खर्च करताना चांगली सुविधा पुरवणारी वेब होस्टिंग घेतली पाहिजे. तसेच कमी पैसे खर्च करण्याच्या नादात चुकीची वेब होस्टिंग घेऊ नये.

3. Uptime:

कोणताही ब्लॉग बनवल्यावर तो 24 तास ऑनलाईन असला पाहिजे म्हणजेच गूगल वर असला पाहिजे तरच वाचक तुमच्या ब्लॉग/वेबसाईट ला भेट देतील. म्हणून होस्टिंग विकत घेताना त्यात Uptime किती दिलेला आहे ते एकदा नक्की पाहून घ्या. काही काही कंपन्या 99.9% Uptime असल्याचा दावा करतात.

4. Offer:

काही वेब होस्टिंग कंपन्या ऑफर मध्ये Domain आणि SSL सर्टिफिकेट Free मध्ये देतात. तर हे नेहमी चेक करून घ्या. तसेच फ्री मध्ये Email अकाउंट सुद्धा दिलेले असतात.

तसेच वेब होस्टिंग विकत घेताना नेहमी स्टोरेज किती दिलेले आहे. आणि एका महिन्याला किती वाचक (Visitors) भेट देऊ शकतात. ते एकदा नक्की चेक करा. ह्या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला योग्य ती वेब होस्टिंग विकत घेऊ शकता. खाली काही होस्टिंग कंपन्यांची नावे दिली आहेत तुम्ही तिथून विकत घेऊ शकता.
BlueHost, Hostinger, HostGater, BigRock.

हे नक्की वाचा:- सर्वात बेस्ट आणि स्वस्त वेब होस्टिंग | Hostinger Web Hosting Review


Step 7. ब्लॉग सुरु करण्यासाठी कोणती उपकरणे वापरावी? | Devices

How to start new blog in marathi

वर दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही वाचली असाल. तर आता तुम्ही ब्लॉग सुरु करण्याचा विचार कराल पण ब्लॉग सुरू करण्यासाठी कोणत्या उपकरणांवर सुरु कराल ते एकदा समजून घ्या. तसं पाहायला गेलं तर ब्लॉग हा स्मार्टफोन्स वर सुद्धा तयार करू शकतो. पण तुम्हाला पूर्ण फीचर्स वापरता नाही येणार. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर ब्लॉगिंग ही लॅपटॉप वरून करावी किंवा जर तुमच्याकडे अगोदर पासून लॅपटॉप असेल तर मग खूप चांगलं. कारण लॅपटॉप वरून ब्लॉग हा व्यवस्थित लिहिता येईल तसेच तुम्हाला सर्व फीचर्स वापरता येतील व जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. तसेच तुम्ही इंटरनेट (Chrome) किंवा टॅबलेट वरून सुद्धा ब्लॉगिंग करू शकता.

» OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!


Step 8. महत्त्वपूर्ण पेज बनवणे | Privacy Pages

How to start new blog in marathi

कोणताही ब्लॉग बनवल्यावर त्यावर काही महत्त्वपूर्ण पेजेस बनवणे गरजेचे आहे. तसे नाही केले तर तुम्हाला ब्लॉग मार्फत पैसे कमविणे खूप कठीण होईल. प्रत्येक वेबसाईट/ब्लॉग च्या खालच्या बाजूला प्रायव्हसी पेज दिलेले असतात. तुम्हाला ते तुमच्या वेबसाईट वर add करणे गरजेचे आहे. About us, Privacy Policy, Disclaimer, Contact us, Terms & Conditions ही प्रायव्हसी पेजेस तुम्हाला बनवावी लागतील.


Pro Tip:- ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला रोज नवं शिकण्याची तसेच मेहनतीने काम करायची इच्छा असली पाहिजे. माझा हा ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एकच सल्ला देईन की रोज थोड थोड काम करा पण सतत काम करत रहा. तुम्हाला नक्की यश मिळेल. तसेच तुम्हाला ज्या विषयाची संपूर्ण माहिती आहे व तुम्ही न कंटाळता त्या विषयावर ब्लॉग लिहू शकता त्याच विषयावर ब्लॉग बनवा. तसेच ब्लॉग बनवताना काही अडचण आली तर मला संपर्क करा. मी नक्की तुमची मदत करेन.

ब्लॉग कसा सुरू करावा? आणि ब्लॉग लिहिण्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण वरील लेखात जाणून घेतली आहे. मला खात्री आहे की हा ब्लॉग वाचून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लॉगिंग च्या प्रवासाला सुरुवात कराल. व त्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल. तसेच तुम्हाला मराठी टेक कॉर्नर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

ब्लॉग कसा सुरु करायचा? (How to start blog in marathi) हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. हा लेख कसा वाटला. ते कमेंट्स करून नक्की सांगा. हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

8 thoughts on “ब्लॉग कसा सुरू करावा? (How to start blog in marathi)”

  1. मी तुमचा लेख वाचला मला तो खूप आवडला तरी मला काही शंका आहे त्या तुम्ही कशा सोडवणार.
    मला blogging सुरु करायचे आहे मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे
    धन्यवाद

    Reply
    • धन्यवाद! तुम्ही माझे ब्लॉग्स वाचून ब्लॉगिंग करण्याचा निर्णय घेतल्या बद्दल. तुम्हाला जर काही शक्का असतील तर आमच्या वेबसाईट च्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधा.

      Reply
  2. Me suruvatila free mdhe website suru krnyasthi blooger cha use kela hota. pn tithe aplyala hve tevdhe features milt nahi, prytek gost limited aste, nantr me wordpress vr website transfer keli, tyatthi new aslyamule problem yetay karn phile blogger shiknayt vel gela ani ata wodpress tyamule shaky aslyas wordpress ch vapra.

    Reply
  3. खूप छान लेख आहे मे वाचला. सविस्तर माहिती सांगितली आहे आवडला मला.

    Reply
  4. तुमचा ब्लॉग संपूर्ण वाचला मला अतिशय माहितीपूर्ण वाटला. मला पण ब्लॉगर होयचं आहे म्हणून तुमचे ब्लॉग वाचत आहे. धन्यवाद.

    Reply
  5. धन्यवाद भाऊ, समजेल अशी माहित दिल्याबद्दल. मी ब्लॉग लिहण्याचा प्रयत्न करत आहे. आपली मदत लागेल.

    Reply

Leave a Comment