Instagram Post डिलीट झालेली अश्या पद्धतीने करा रिकव्हर!


आजच्या लेखामध्ये आपण Instagram वरून डिलीट झालेली Instagram Post कशी रिकव्हर (How to recover instagram post) करायची ते पाहणार आहोत.

इंस्टाग्राम वर तुम्ही रोज फोटोज्, व्हिडिओज पोस्ट करत असाल. तर कधीतरी चुकून तुमच्याकडून एखादी Instagram Post डिलीट झाली असेल. तर त्यात चिंता करण्यासारखी काही गरज नाही. कारण Instagram वरील भन्नाट फीचर मुळे तुम्ही डिलीट झालेली पोस्ट पुन्हा रिकव्हर (मिळवू) करू शकता.

Instagram हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग ऍप आहे. दिवसेंदिवस इंस्टाग्राम वर युजर्स ची संख्या वाढत आहे. 20 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये इंस्टाग्राम ची जास्त क्रेझ आहे. अनेक जण इंस्टाग्राम वर रोज फोटो आणि व्हिडिओज पोस्ट करत असतात व एकमेकांना सेंड सुद्धा करतात.

कधी कधी चुकून आपल्याकडून एखादी instagram post डिलीट होते. मग ती परत कधी मिळवायची ह्या चिंतेने आपण टेन्शन मध्ये येतो. पण तुम्ही ही खाली दिलेली पद्धत वापरली तर तुमच्या डिलीट झालेल्या सर्व इंस्टाग्राम पोस्ट तुम्हाला एकाच जागी मिळतील.


Instagram Post डिलीट झालेली अश्या पद्धतीने करा रिकव्हर!

त्या अगोदर तुम्ही हे जाणून घेणे गरजेचे आहे. की, इंस्टाग्राम वरून डिलीट केलेली पोस्ट फक्त 30 दिवसांपर्यंत तिथे स्टोअर राहते.

» टेक टिप्स आणि टेक माहितीसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.

– सर्वात अगोदर Instagram App ओपन करा. आता तुमच्या Profile सेक्शन मध्ये जावा.

– Profile सेक्शन मध्ये तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या दिशेला तीन लाइन्स चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

– तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील, त्यातील Account वर क्लिक करा. आणि खाली Scroll केल्यावर तुम्हाला “Recently Deleted” हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

Read Also–  इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा!

– तसेच तुम्ही Search Box मध्ये “Recently Deleted” सर्च करून शोधू शकता 

– Recently Deleted ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही डिलीट केलेल्या सर्व पोस्ट दिसतील.

– आता तुम्ही ज्या ज्या पोस्ट रिकव्हर करू इच्छिता. त्या सिलेक्ट करून Restore वर क्लिक करा.

– आता तुमची डिलीट झालेली Instagram Post परत तुम्ही तुमच्या Profile सेक्शन मध्ये पाहू शकता.

हे नक्की वाचा:-

» Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!

» Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?

तुम्हाला समजले असेल की, डिलीट झालेली Instagram Post कशी रिकव्हर (How to recover instagram post) करायची. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment