ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?

आज आपण ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा? (How to create blogger blog in Marathi) हे पाहणार आहोत. ह्याच्या साहाय्याने तुम्ही सुद्धा वर्डप्रेस वर ब्लॉग तयार करू शकता. ब्लॉग लिहिण्यासाठी अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Blogging Platforms) उपलब्ध आहेत. आजच्या काळात ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म मध्ये WordPress प्रथम क्रमांकावर येतो.

ब्लॉग हा मोफत किंवा पेड प्लॅटफॉर्म मार्फत लिहू शकतो. तुम्ही तुमचा ब्लॉग मोफत किंवा होस्टिंग सुविधा विकत घेऊन सुरू करु शकता. जर तुम्ही नवीनच ब्लॉग सुरू करणार असाल तर मी तुम्हाला मोफत ब्लॉग पासून सुरुवात करण्याचा सल्ला देईन. त्यांनतर हवं तर तुम्ही होस्टिंग व डोमेन विकत घेऊन वर्डप्रेस शिफ्ट होऊ शकता. Blogger वर तुम्ही Gmail अकाउंट च्या साहाय्याने मोफत Blog बनवू शकता. पण ब्लॉगर वर तयार केलेल्या ब्लॉग च्या डोमेन नेम च्या पुढे ब्लॉगर चे Blogspot.com हे Subdomain जोडलेले असते.
उदाहरणार्थ:- www.yourblog.blogspot.com

पण त्याअगोदर तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. ह्यावर मी एक सविस्तर ब्लॉग लिहिलेला आहे तो नक्की वाचा. जेणेकरून तुमच्या मनात येणार्‍या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.

जर तुम्हाला इंटरनेट आणि इंटरनेटचा वापर कसा करावा हे माहीत असेल तर फ्री मध्ये ब्लॉग तयार करणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल. तुम्ही स्मार्टफोन वरून सुद्धा ब्लॉगिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला Blogger वरून फ्री मध्ये blog कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. तुम्ही हे शिकून तुमच्या ब्लॉगिंग करिअरची सुरुवात करू शकता. Blogger हे free blog बनवण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. Blogger ही Google मार्फत दिली जाणारी सर्व्हिस आहे. तसेच ह्यावर तुम्ही ब्लॉग बनवून Google Adsense च्या सहाह्याने जाहिरात तुमच्या ब्लॉग वर लावून तुम्ही पैसे कमवू शकता. चला तर मग पाहूया Free मध्ये Blog कसा बनवायचा..

Blogger वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा? (How to create blogger blog in Marathi)

Step 1 – सर्वात अगोदर Google वर Blogger.com असे सर्च करा. त्यानंतर ब्लॉगर वेबसाईट ओपन करा.

Step 2 – तुम्हाला खालील प्रमाणे एक वेबसाईट दिसेल. तिथे दिलेल्या Create Your Blog बटन वर क्लिक करा.

blogger image

Step 3 – त्यानंतर तुमच्या समोर एक Pop-up पेज ओपन होईल. त्यामध्ये तुमच्या गूगल अकाउंट ने Sign in करा.

Step 4 – Sign in झाल्यावर तुमच्या समोर “choose a name for your blog” हे पेज येईल. तिथे तुमच्या ब्लॉग चे शीर्षक (Title) लिहून ‘Next’ वर Click करा.

Step 5 – आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यात तुमच्या ब्लॉग चा address लिहावा लागणार. तो address तुमच्या ब्लॉग चा पत्ता असतो. ज्याच्या मदतीने वाचक तुमच्या ब्लॉग ला भेट देतात.

Step 6 – blog address लिहून झाल्यावर Next वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर “Confirm your display name” हे पेज ओपन होईल. ह्यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमचे नाव किंवा ब्लॉग चे नाव सुद्धा देऊ शकता. तुमच्या आवडीनुसार नाव ठेवू शकता. हे नाव कोणी ब्लॉग लिहिला आहे ते दर्शवते. जसे की तुम्ही पाहिलं असेल Admin. तर हा ब्लॉग Admin ने लिहिला आहे असे दर्शविले जाते.

Step 7 – त्यानंतर Finish वर Click करा. आता तुमचा ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग तयार झाला.

तुम्ही ब्लॉगर वर नवीन ब्लॉग पोस्ट तयार करून ब्लॉग वर publish करू शकता. त्यानंतर वाचक तुमच्या ब्लॉग वर ती ब्लॉग पोस्ट वाचायला येतील. अश्यापप्रकारे तुम्ही blogger.com वर फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकता.

तुम्ही मराठी टेक कॉर्नर चा हा व्हिडिओ पाहून देखील Blogger वर फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकता.👇🏻

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तुम्ही सुद्धा हा ब्लॉग वाचून फ्री मध्ये ब्लॉग तयार कराल. आणि तुमच्या ब्लॉगिंग करिअर ला सुरुवात कराल. आणि नक्की यशस्वी व्हाल. तसेच जर ब्लॉग बनवताना काही अडचण आली तर मला इंस्टाग्राम वर नक्की संपर्क करा. तसेच हा ब्लॉग तुमच्या मित्रांना व ज्यांना ब्लॉग बनवायचा आहे त्यांना शेअर करा. म्हणजे तेही फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा ते शिकतील.

तसेच MarathiTechCorner हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.

» ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.

» घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग! पाहा हे १० उपयुक्त मार्ग!

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

धन्यवाद! जय महाराष्ट्र!

1 thought on “ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?”

Leave a Comment