एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?

What is end to end encryption in Marathi:- आज प्रत्येक जण ऑनलाईन चॅटिंग करतो. ऑनलाईन व्यवहार करतो तसेच काही माहिती पाठवायची असेल तर ऑनलाईन मेसेजिंग अँप द्वारे आपण माहिती पाठवतो. पण ही माहिती पाठवताना ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचे पर्यंत ती सुरक्षित राहणे गरजेचे आहे. ही माहिती कशी सुरक्षित राहते. ह्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. ते आपण पाहूया.

आज आपण एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? (What is end to end encryption in marathi) आणि त्याचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा अर्थ | End to end encryption meaning in Marathi

एन्क्रिप्शन चा अर्थ असा आहे की एखादी सूचना किंवा एखादा मेसेज गुप्त पद्धतीने स्टोअर करणे. ही गुप्त माहिती स्टोअर करण्यासाठी एका विशिष्ट टेक्नॉलॉजी चा वापर केला जातो. तसेच ह्या मध्ये स्टोअर केलेला देता एका विशिष्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केला जातो. एका सामान्य माणसाला हा कन्व्हर्ट केलेला डेटा वाचणे खूप कठीण असते.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा अर्थ असा आहे की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती गुप्त पद्धतीने पोहोचवणे. ही माहिती किंवा सूचना इंटरनेट च्या माध्यमाने पोहोचवली जाते.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा वापर व्हॉट्सअँप मध्ये केला जातो. त्यामुळे व्हॉट्सअँप वापरणे खूप सुरक्षित आणि सोप्पे झाले आहे.


एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? | what is end to end encryption in Marathi

What is end to end encryption in Marathi

What is end to end encryption in Marathi:- आपण वर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चा अर्थ पाहिला, आता आपण एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? हे पाहूया.

एक अशी टेक्नॉलॉजी ज्याला सायबर क्रिमिनल्स आणि हैकर्स सुद्धा तोडू (crack) शकत नाही. ह्या मध्ये एक विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली आहे. ही टेक्नॉलॉजी सिस्टम देखरेख किंवा डेटाची चोरी रोखण्यासाठी डिझाइन केली आहे.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन ह्या शब्दाला क्लाइंट-साइड एन्क्रिप्शन असे सुद्धा म्हणतात.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन एक असा सुरक्षित माध्यम आहे. ज्याचा वापर करून आपण आपली गोपनीयता सुरक्षित ठेवू शकतो. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आपल्या पर्सनल गोष्टींना झेड सिक्युरिटी देतो. तसेच आपले बँकेचे नंबर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिडिओ कॉल इत्यादी गोष्टी गोष्टींची सुरक्षा घेतो.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मुळे ऑनलाईन व्यवहार करणे सुरक्षित आणि सोप्पे झाले आहे.


एन्क्रिप्शन म्हणजे काय? | What is encryption in Marathi

एन्क्रिप्ट किंवा एन्क्रिप्शन ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपला डेटा एक अश्या विशिष्ट प्रकारच्या फॉर्म मध्ये रुपांतरीत केला जातो. कोणतीही व्यक्ती आपला देता पाहू किंवा वाचू शकत नाही.

हैकर सुद्धा हा डेटा चोरू किंवा वाचू शकत नाही. जेव्हा आपला डेटा पूर्ण पणे एन्क्रिप्ट होतो तेव्हा तो पूर्ण सिक्योर होतो. ह्याच प्रोसेस ला एन्क्रिप्शन असे म्हणतात.

  • ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती साठी ब्लॉगिंग ह्या कॅटेगरी ला भेट द्या.

प्लेन एन्क्रिप्शन आणि एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन यामधील फरक

प्लेन एन्क्रिप्शन मध्ये आपण पाठवलेला संदेश, माहिती, ऑनलाईन व्यवहार कोणतीही व्यक्ती वाचू शकते. ही पाठवलेली माहिती किंवा संदेश ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे. त्या व्यक्तीसोबत इतर कोणीही ही माहिती किंवा संदेश वाचू शकतो. ह्यावर आपले थोडे सुद्धा नियत्रंण नसते.

पण, एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मध्ये असे नसते. इथे आपण पाठवलेला संदेश आपण पाठवलेल्या व्यक्तीकडेच पोहोचतो. आपण पाठवलेला संदेश कोड भाषे मध्ये कन्व्हर्ट होऊन नंतर तो त्या व्यक्तीकडे आपण पाठवलेल्या संदेशा मध्ये रुपांतरीत होऊन पोहोचतो.

उदाहरण द्यायचे झाले तर.. मी तुम्हाला “मराठी टेक कॉर्नर वर तुमचं स्वागत आहे.” असा संदेश तुम्हाला पाठवला तर तो तुमच्या पर्यंत पोहोचेपर्यंत एका विशिष्ट कोड भाषेत असतात. पण जेव्हा हा संदेश तुमच्या कडे पोहोचेल तेव्हा तो त्याच्या वास्तविक रुपात येतो. आपण ती कोड भाषा ओळखू किंवा वाचू शकत नाही. तसेच ह्या संपूर्ण प्रक्रियेला डी-क्रिप्शन असे म्हणतात.


एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन चे फायदे | benefits of end to end encryption in Marathi

  • आपला डेटा हैक होण्यापासून वाचतो.
  • आपल्या गोपनीयतेची काळजी घेतली जाते म्हणजेच सुरक्षित राहते.
  • आपला डेटा कोणतीही व्यक्ती हैक करू शकत नाही. तसेच आपला मेसेज कोणत्या व्यक्तीने वाचावा ह्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
  • एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन मुळे आपण आपली ऑनलाईन माहिती ज्या व्यक्तीला पाठवायची आहे. ती सुरक्षित व व्यवस्थित पाठवू शकतो.

हे नक्की वाचा:-

तर आजच्या लेखात आपण एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत? हे पाहिले. आपण प्रत्येक जण हल्ली ऑनलाईन चॅटिंग करतो त्यासाठी आपण व्हॉट्सअँप चा वापर करतो.

व्हॉट्सअँप वर चॅटिंग करताना आपल्याला चॅटिंग मध्ये End-to-end-encryption अशी एक माहिती दिसते. हे आपल्या माहितीला, मेसेजेस ना सुरक्षित ठेवते. पण आपल्याला ह्याचा अर्थ काय आहे ते माहीत नव्हता. पण हा लेख वाचून तुम्हाला त्याचा संपूर्ण अर्थ आणि फायदे समजले असतील.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

1 thought on “एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?”

Leave a Comment