FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?

Fastag information in marathi: नॅशनल हायवेने सर्व वाहनांसाठी फास्टॅग सेवा सुरू केली आहे. ही सेवा 1 डिसेंबर 2019 पासून सुरु करण्यात आली होती. कोणत्याही वाहन चालकाकडे फास्टॅग नसेल तर त्याला टोल दुप्पट भरावा लागू शकतो.

त्यामुळे फास्टॅग हे अनिवार्य करण्यात आले. हा नियम पूर्ण देशभरातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाच्या टोल प्लाझावर लागू करण्यात आला आहे. तसेच सर्व वाहनांवर FASTag लावणे देखील बंधनकारक आहे.

आजच्या लेखात आपण फास्टॅग म्हणजे काय? (What is FASTag in Marathi) तसेच फास्टॅग चा वापर कसा करावा? ते समजावून सांगणार आहे. त्यासोबत फास्टॅग चा रिचार्ज कसा करावा? ह्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.


FASTag म्हणजे काय? | Fastag information in Marathi

फास्टॅग म्हणजे असा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्याच्या मदतीने चार चाकी, ट्रक किंवा दोन चाकी वाहनाचे टोल ऑनलाईन भरले जाते. Fastag वाहनावरील वरच्या बाजूस लावलेला असतो, त्यामुळे जेव्हा एखादी गाडी टोल नाक्यावरील पास होते तेव्हा fastag च्या मदतीने टोल स्वतःहून भरला जातो.

फास्टॅग एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याचा आकार क्रेडिट कार्डपेक्षा थोडासा लहान असतो, तो वाहनाच्या पुढच्या बाजूला लावलेला असतो. फास्टॅग कार्डाच्या आत एक चिप लावलेली असते, ज्यामध्ये आपल्या वाहनाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती संग्रहित केलेली असते.

आपले वाहन कोणत्याही टोल प्लाझावर जाताना, आपल्या वाहनावरील कार्ड फास्टॅगच्या संपर्कात येताच टोल पॉईंटवर आपोआप कर भरते. या लावलेल्या फास्टॅग मध्ये Radio Frequency Identification लागलेलं असते.

वाहनावरील फास्टॅग प्रीपेड खात्याशी कनेक्ट होताच तो Activate होतो. तसेच फास्टॅग त्वरित त्याचे कार्य करणे सुरू करतो. आपल्या वाहनावरील फास्टॅग ची वैधता 5 वर्षांपर्यंत असते. वैधता संपल्यानंतर, फास्टॅग आपल्याला पुन्हा आपल्या वाहनावर लावावा लागतो.

फास्टॅग कसे काम करते?

फास्टॅग ला वाहनांच्या समोरच्या काचेवर लावण्यात येतो. फास्टॅग मध्ये रेडिओ फ्रीक्विन्सी आईडेंटीफिकेशन लागलेले असते. जेव्हा कोणतेही वाहन टोल नाक्यावर येते तेव्हा टोल नाक्यावर असलेले सेन्सर वाहनांवरील फास्टॅग स्कॅन करून येते.

तेव्हा टोल वरील लागलेले सेंसर आपल्या वाहनांवर लागलेले फास्टटॅग च्या संपर्कात येताच आपल्या फास्टॅग खात्यातून त्या टोल नाक्यावर लागणारा शुल्क कापण्यात येतो. कोणत्याही प्रकारचा थांबा न घेता आणि कोणत्याही प्रकारच्या रांगेत न लागता.

तसेच जेव्हा ही फास्टॅग मधून टोल भरला जातो, तेव्हा किती पैसे भरले गेले ह्याचा SMS द्वारे वाहन चालकाला मेसेज येतो. वाहनावर लावलेले फास्टॅग प्रिपेड अकाऊंट Activate होताच ते काम करणे सुरू होते.

जेव्हाही आपल्या फास्टॅग अकाऊंट मधील रक्कम संपते, तेव्हा आपल्याला रिचार्ज करावा लागतो. फास्टॅग चे रिचार्ज करणे हे मोबाईल रिचार्ज करण्यासारखं सोप्पे आणि सरळ आहे.

हे नक्की वाचा: Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!

FASTag कुठून खरेदी करावे?

फास्टॅग खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारच्या बँका उपलब्ध आहेत. आपण जवळजवळ सर्व प्रकारच्या टोल प्लाझासाठी आणि बँकांनमधून फास्टॅग काढू शकता. फास्टॅग काढण्यासाठी तुम्ही ह्या बँकांशी संपर्क साधू शकता:, एसबीआय (SBI), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) आणि इतर बँकांशी संपर्क साधून खरेदी करू शकता.

तसेच तुम्ही Paytm, Amazon, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोल पंप इत्यादींकडूनही खरेदी करू शकता. अशा काही बँका देखील आहेत ज्या यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची परवानगी देतात. या सर्व बँकांकडून सर्व प्रकारच्या औपचारिकता तपासल्यानंतर, फास्टॅग अकाऊंट नंबर दिले जाते.

हे नक्की वाचा: ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.

FASTag वाहनावर लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

आपल्या वाहनावर फास्टॅग लागू करण्यासाठी आपल्याला पुढील कागदपत्रांची गरज लागेल.

▪️ ग्राहकांचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र
▪️ वाहन मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
▪️ वाहन मालकाचा बँक केवायसी (KYC) कागद
▪️ वाहनाचा मूळ मालक असल्याचे प्रमाणपत्र

Paytm वरून FASTag खरेदी कसे करायचे?

जर तुम्हाला फास्टॅग ऑनलाईन खरेदी करायचा असेल किंवा नोंदणी करायचा असेल तर, तुम्ही पेटीएम अँप वरून खरेदी करू शकता. Paytm App वरून तुम्ही सरळ आणि सोप्प्या पद्धतीने FASTag खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला यावर तुमचे कागदपत्रं (Documents) अपलोड करावे लागेल. पेटीएमद्वारे कागदपत्र verify झाल्यानंतर तुमचे फास्टॅग अकाऊंट कन्फर्म होईल.

कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही सबमिट केलेल्या पत्त्यावर FASTag डिलिव्हर केले जाईल. ते तुम्ही तुमच्या वाहनासाठी वापरू शकता.

🔸एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?

🔸गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?

फास्टॅग चे रिचार्ज कसे करावे?

फास्टॅग च्या अकाऊंट वर आपण अनेक पध्दतीने रिचार्ज करू शकतो. आपण आपल्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट-बँकिंग द्वारे फास्टॅगचे रिचार्ज करू शकतो. फास्टॅग चे रिचार्ज करणे काही कठीण नाहीय.

आपल्या मोबाईल चे रिचार्ज आपण करतो त्याचप्रमाणे फास्टॅग चे रिचार्ज आपण करू शकतो. फास्टॅग अकाऊंट मध्ये आपण कमीत कमी ₹100 ते जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकतो.

आपण बँक मध्ये जाऊन सुध्दा फास्टॅग चे रिचार्ज करू शकतो. उदा. एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, अक्सिस बँक, इत्यादी. रिचार्ज करण्यासाठी आपल्याला ह्या वर दिलेल्या बँकांमध्ये जाऊन आपले फास्टॅग अकाऊंट उघडावे लागेल.

पेटीएमवर FASTag चे ऑनलाईन रिचार्ज करणे हे मोबाईल चे रिचार्ज करण्याएवढे सोप्पे आहे. फास्टॅग आयडी टाकून रिचार्ज करू शकता. आपण आपल्या पेटीएम वॉलेट, BHIM UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून FASTag रिचार्ज करू शकतो.

हे नक्की वाचा:

▪️ ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!

▪️ गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?

मित्रांनो, वरील माहिती वाचून तुम्हाला FASTag विषयी संपूर्ण माहिती (Fastag information in marathi) मिळाली असेल. तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या वाहनासाठी FASTag काढू शकता. ही माहिती तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

2 thoughts on “FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?”

Leave a Comment