ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!

आज आपण ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी कोणत्या Apps चा वापर करू शकतो? (Best online medicines delivery apps in marathi) त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हल्ली प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करण्याचा काळ आहे. मग ते असो ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन चित्रपट पाहणे, किंवा ऑनलाईन अभ्यास. प्रत्येक गोष्ट आता ऑनलाईन होत आहे. ह्या डिजिटल युगात आपल्याला हे सर्व शिकून त्यासोबत जगावं लागतं.

लॉकडाऊन मुळे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली. बिल पेमेंट, रिचार्ज, ऑनलाईन ट्युशन, इत्यादी सर्व ऑनलाईन झालं. पूर्वी औषधे घ्यायची असतील, तर आपल्याला मेडिकल स्टोअर मध्ये जावं लागायचं. पण आता ह्या डिजिटल युगात तुम्ही घरात बसून सुद्धा तुमची औषधे ऑनलाईन मागवू शकता.

तसेच ऑनलाईन औषधे मागवणे काही कठीण नाहीय, फक्त डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन त्या App वर सबमिट करून तुमच्या घरचा पत्ता देऊन तुम्ही औषधे मागवू शकता. तसेच ह्या App वर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळतो. तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता.

आज आपण ऑनलाईन Medicines मागवण्यासाठी कोणकोणत्या App (Best Online Medicines Delivery Apps in Marathi) चा वापर करू शकता हे पाहणार आहोत.

Best Online Medicines Delivery Apps


1 .NetMeds

NetMeds App Pharmacy App

NetMeds कंपनी फार्मा व्यवसायात 100 वर्षांहून अधिक काळ कार्य करीत आहे. NetMeds ही भारतातील ऑनलाईन फार्मसी आहे. ही कंपनी प्रत्येक राज्यात जीवनावश्यक औषधांचे वितरण करते.

नेटमेड्स हे सर्वात सुरक्षित आहे, ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी. इथे तुम्ही महिन्याच सबस्क्रिप्शन सेट करून ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला न चुकता औषधे घरी डिलीव्हर होतील.

तसेच तुम्हाला इथे डिस्काउंट सुद्धा मिळतो. त्यामुळे तुमचे थोडे पैसे वाचतील व तुम्हाला वेळेवर औषधे घरपोच मिळतील.

तुम्हाला फक्त तुमच्या औषधांची यादी (prescription) त्या App वर सबमिट करावी लागतात. त्यानंतर तुम्ही घरपोच ती औषधे मागवू शकता.

▪️इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा?


2. Practo

Practo App

प्रॅक्टो हे भारतातील सर्वात चांगले आणि विश्वासार्ह ऑनलाइन मेडिकल स्टोअर पैकी एक आहे. ह्या App वर तुम्हाला 24/7 ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला, ऑनलाइन औषध वितरण व कौटुंबिक आरोग्य योजना ह्या सुविधा मिळतात.

प्रॅक्टो App वरून तुम्ही डॉक्टरांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून तुमचे प्रॉब्लेम्स विचारू शकता. तसेच तुम्हाला आरोग्यविषयक माहिती व टिप्स वाचायला मिळतात. तुम्ही तुमच्या बजेट मधील कौटुंबिक आरोग्य योजना खरेदी करू शकता. तसेच इथे तुम्ही सर्व प्रकारच्या आजारांवर डॉक्टरांचा सल्ला व त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता ते ही मोफत.

▪️टॉप 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल ॲप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!


3. TATA 1mg

Tata 1mg Pharmacy App

1mg भारतातील सर्वात आघाडीचे आणि सर्वाधिक विश्वासार्ह ऑनलाईन फार्मसी आणि आरोग्य सेवा देणारे App आहे. इथे आपण ऑनलाइन औषधे खरेदी करू शकतो. 1mg च्या मुंबई, पुणे, दिल्ली, गुडगाव, नोएडा, अहमदाबाद, लखनऊ, कोलकाता आणि बऱ्याच शहरांमध्ये सेवा उपलब्ध आहेत.

तसेच तुम्ही जर कोणती औषधे ऑनलाईन मागवली तर त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवसाच्या आत तुमच्या घरी औषधे डिलिव्हर केले जातात.

तसेच इथे तुम्ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे सुद्धा ऑर्डर करू शकता. औषधे मग्वण्यासाठी 1mg App ओपन करा. त्यानंतर तुमच्याकडे असलेली यादी (प्रिस्क्रिप्शन) अपलोड करा आणि त्यानंतर वेळेवर तुमच्या घरी औषधे डिलिव्हर होतील.

त्यासोबत तुम्ही प्रख्यात डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ले किंवा मार्गदर्शन घेऊ शकतात. तसेच तुम्ही लॅब टेस्ट ऑनलाईन बुक करू शकता व औषधांची माहिती सुद्धा ह्या App वर वाचू शकता.

▪️कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!


4. PharmEasy

PharmEasy App

PharmEasy ह्या App वरून तुम्ही ऑनलाईन औषधे मागवली असता, ती 24-48 तासात तुमच्या घरी डिलिव्हर होतील असे त्यांनी सांगितले आहे.

PharmEasy App वर आपण आरोग्य सेवा, ओटीसी उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणे ऑनलाइन खरेदी करू शकता. तसेच आपण ब्लड चाचण्या, प्रयोगशाळेच्या चाचण्या, संपूर्ण शरीर तपासणी आणि इतर प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसह निदान चाचण्या ऑनलाईन बुक करू शकता.

ऑनलाइन औषध खरेदीवर आणि आरोग्य सेवा उत्पादने यांवर 60% पर्यंत सूट मिळते.

जर तुम्ही PharmEasy Plus सबस्क्रिप्शन विकत घेतले तर तुम्ही प्रत्येक ऑर्डर वर 5% एक्स्ट्रा कॅशबॅक मिळवू शकता, लॅब टेस्ट बुकिंग वर 10% एक्स्ट्रा कॅशबॅक, फ्री होम डिलिव्हरी, डॉक्टरांचे फ्री मार्गदर्शन, इत्यादी सुविधांचा फायदा मिळवू शकता.

▪️Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची?


5. Medlife

Medlife Pharmacy App

आपल्या सर्व औषधांसाठी मेडीलाइफ हे One-Stop-Shop App आहे. इथे तुम्ही हे एक फार्मसी App आहे, जेथे आपण आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी ऑनलाइन औषधे, निरोगीपणाची उत्पादने आणि बुक लॅब चाचण्या मिळवू शकता.

ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला फक्त प्रिस्क्रिप्शन अपलोड करणे आवश्यक आहे. जर ग्राहकाकडे प्रिस्क्रिप्शन नसेल तर ते ‘मेडलाइफ डॉक्टर’चा सल्लादेखील घेऊ शकतात. diabetic footwear आणि बीपी मॉनिटर यासारख्या आरोग्यसेवा उत्पादनांसह आयुर्वेदिक, हर्बल, युनानी आणि होमिओपॅथिक प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

त्याचबरोबर लॅब टेस्टही बुक करता येते. Medlife 465 शहरांमध्ये लॅब टेस्ट ची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच जर तुम्ही पहिल्यांदा ह्या App वरून ऑनलाईन औषधे मागवली तर तुम्हाला 20% डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो.


6. Apollo 24/7

Apollo 247 Pharmacy App

तुमचे आरोग्य, डिजिटायझेशन: ऑनलाइन आणि शारीरिक डॉक्टरांच्या भेटी, औषध डिलिव्हर इत्यादी! ह्या app वर उपलब्ध आहेत. Apollo 24/7 हा एक वैयक्तिकृत एक चांगला आरोग्य अनुभव आहे. जो तुम्हाला मोफत प्रवेश, प्रॉडक्ट्सच्या किंमती ह्यांची ऑफर देतो.

अपोलो ग्रुप हा भारतातील जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचा प्रणेता आहे. त्यांनी 35 वर्षांहून अधिक काळ लोकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. आता त्यांनी डिजिटल क्षेत्रात पाऊल ठेवून Apollo 24/7 हा App लॉन्च केला आहे. ह्या App मधून त्यांनी सर्व हेल्थकेअर प्रॉडक्ट्स, औषधे, ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


7. Amazon

Amazon Pharmacy App

Amazon ह्या eCommerce कंपनीने आता ऑनलाईन मेडिसिन क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. ते आता त्यांच्या वेबसाईट वर Healthcare Products, Medicine, First-aid प्रॉडक्ट्स, nutritions इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध केले आहेत.

ह्यामुळे इतर कंपन्यांना चांगले कम्पेटिशन मिळणार आहे. कारण अमेझॉन ही जगातील लोकप्रिय इकॉमर्से कंपनी आहे.


8. MediBuddy

MediBuddy Pharmacy App

डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी, लॅब चाचण्या बुक करण्यासाठी आणि ऑनलाइन औषधे ऑर्डर करण्यासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन आहे. MediBuddy हे भारतातील सर्वात मोठे डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या सर्व आरोग्यसेवा गरजांसाठी तुम्ही MediBuddy डाउनलोड करू शकता.

MediBuddy App मध्ये ह्या सेवा दिल्या जातात:

  • Medicines
  • Lab Test
  • Online Doctor Consultantaion
  • Insurance
  • MediBuddy Gold Subscription

9. MedPlus Mart

MedPlus Mart Pharmacy App

MedPlus ही भारतातील सर्वात विश्वासार्ह फार्मसी आहे, ज्यात दररोज 3,50,000 ग्राहक ऑनलाईन औषधे खरेदी करतात. MedPlus Mart App वापरून अस्सल औषधे, baby products, nutritions, हेल्थ केअर, पर्सनल केअर, डायबेटिज आणि इतर विशेष प्रॉडक्ट्स सर्वोत्तम किमतीत खरेदी करू शकतो.


10. My Medical Shop

MyMedicalShop Pharmacy App

MyMedicalShop ही एक ऑनलाइन फार्मसी आहे. जी लोकांना ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट उपलब्ध करून देते.

MyMedicalShop ही झपाट्याने वाढणारी ऑनलाइन फार्मसी आहे. जी लोकांना वर्षातील 24/7 आणि 365 दिवस घरातून ऑनलाईन औषधे आणि इतर आरोग्य सेवा उत्पादने खरेदी करण्यास सक्षम करते.

चेन्नई येथे ह्या कंपनीचे मुख्यालय आहे. MyMedicalShop संपूर्ण भारतातील 26,000 पिन कोडवर औषधे आणि वैद्यकीय उत्पादने डिलिव्हर करते.


11. Dhani Pharmacy

Dhani Pharmacy App

Dhani आपल्या ग्राहकांना डॉक्टरांसोबत झटपट व्हिडिओ कॉलद्वारे उच्च श्रेणीतील आरोग्य सेवा पुरवते. Dhani App वर ग्राहकांना प्रीमियम सबस्क्रिप्शन मध्ये डॉक्टर सोबत ऑनलाईन सल्ला मसलत करण्याची सोय उपलब्ध करून देतो.

Dhani App वरून डॉक्टरांची शी अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ते तुम्हाला ऑनलाईन औषधे देतात. ती मग तुमच्या घरपोच डिलिव्हर होतात. तसेच जर तुमच्या जवळ अगोदरच औषधे असतील तर त्यांची नावे किंवा prescription फोटोज् तिथे सबमिट करून तुम्ही कमी दरात दर्जेदार औषधे घरपोच मागवू शकता.


ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा! (Best online medicines delivery apps in marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट्स द्वारे नक्की सांगा. तसेच ह्या Apps पैकी तुम्ही कोणता ॲप वापरता ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा.

तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

1 thought on “ऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!”

Leave a Comment