Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!

आज आपण Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप (Top 8 Free photo editing Apps) ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आजच्या काळात मोबाईल फोटोग्राफी ला जास्त महत्त्व आहे. म्हणून मोबाईल बनवणाऱ्या मोठ मोठ्या कंपन्या सुद्धा त्यांच्या मोबाईल मध्ये नवनवीन कॅमेरा फीचर्स देत आहेत. प्रत्येक जण मोबाईल वर फोटो काढून फोटो एडिटिंग अँप च्या मदतीने फोटो एडिट करून सोशल मीडिया किंवा स्वतःच्या कामासाठी उपयोग करतात.

लॅपटॉप, कॉम्प्युटर पेक्षा स्मार्टफोन्स वर फोटो एडिटिंग करणे खूप सोपे व फायदेशीर आहे. फ्री अँप किंवा पेड अँप च्या साहाय्याने फोटो एडिट करता येतात.

तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही ऑनलाईन केले जाते. ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, इत्यादी क्षेत्रात आजकाल खूप मागणी वाढत आहे. ब्लॉगर्स ना त्यांच्या ब्लॉग मधे फोटोज् ठेवायचे असतात. कारण मोबाईल हा कुठेही घेऊन जाता येतो व वापरण्यास सोयीस्कर असल्याने मोबाईलवर फोटो एडिट करण्याला प्राधान्य दिले जात आहे. पण ते फोटो कोणत्या अँप वरून एडिट करायचे?

म्हणून आजच्या लेखात आपण Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप (Top 8 Free photo editing Apps) ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

हे नक्की वाचा:

कोणतीही URL Short कशी करायची?

वेबसाईट गूगल सर्च कन्सोल मध्ये कशी सबमिट करायची?

तसे बघायला गेलो तर Google Play Store वर फोटो एडिटिंग साठी अनेक अँप उपलब्ध आहेत. पण सर्वच अँप मध्ये व्यवस्थित फोटो एडिट करता येत नाही. म्हणून मी काही फोटो एडिटिंग अँप निवडले आहेत. त्यावरून व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे फोटो एडिट करता येतात.

चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया..

फोटो एडिटिंग साठी मला हे 8 अँप व्यवस्थित व बेस्ट वाटतात. हे सर्व अँप Play Store वर उपलब्ध आहेत आणि वापरण्यासाठी अगदी मोफत आहे. तसेच ह्या अँप मध्ये खूप नवीन फीचर्स वापरता येतात.


टॉप ८ फ्री फोटो एडिटिंग मोबाईल अँप | Top 8 Free photo editing Apps

1. PicsArt Photo Studio

picsart photo editor images
Source :- Google Play Store

पिक्सआर्ट अँप मध्ये फोटो एडिटिंग साठी खूप फीचर्स उपलब्ध आहेत. हा अँप प्ले स्टोअर वर फ्री मध्ये उपलब्ध आहे. ह्या अँप ला जवळपास 500,000,000+ लोकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच ह्या अँप चा इंटरफेस सोप्पा असल्या कारणाने कोणीही ह्यात फोटो एडिट करू शकतो.

ह्या अँप मध्ये फोटो एडिटर, व्हिडिओ एडिटर, कॉलेज मेकर, स्टिकर मेकर, फ्री स्टिकर्स, वेगवेगळे फोटो इफेक्ट्स, इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.

PicsArt चा PICSART GOLD व्हर्जन उपलब्ध आहे. ज्यात प्रीमियम फॉन्ट, स्टिकर्स, प्रीमियम फीचर्स असे अनेक फीचर्स मिळतात. Subscription विकत घेण्यासाठी 1,199 इतका खर्च येतो.

App Features:-
▪️ Sticker Maker
▪️ Photo Editor
▪️ College Maker
▪️ Video Editor
▪️ Drawing Tool


2. PixelLab

PixelLab images
Source :- Google Play Store

हा अँप 50,000,000 वेळा प्ले स्टोअर वरून इंस्टॉल केला आहे. तसेच ह्या अँप वरून इंस्टाग्राम, फेसबुक पेज साठी क्वालिटी फोटो एडिट करता येतात. तसेच ह्या अँप मधील फीचर्स वापरण्यास सोप्पे असल्या कारणाने कोण्ही अगदी सहज फोटो एडिट करू शकतो.

प्ले स्टोअर वर फ्री मध्ये हा अँप उपलब्ध आहे. तसेच ह्या अँप ला नवनवीन update येत असतात.

App Features:-
▪️ 3D Text
▪️ Free Stickers
▪️ Change/remove the background
▪️ Text Effects
▪️ Import images
▪️ Image Effects

हे नक्की वाचा:

Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!

UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे?


3. InShot

inshot images
Source :- Google Play Store

InShot अँप मध्ये फोटो एडिटिंग सोबत व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करता येते. ह्या अँप मध्ये फोटो एडिटिंग साठी टेक्स्ट, इमेज फिल्टर्स, इम्पोर्ट इमेज, असे अनेक फीचर्स वापरता येतात.

हा अँप वापरण्यास खूप सोप्पा आहे. तसेच फ्री मध्ये प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ह्या अँप वर नवनवीन अपडेट येत असतात. ह्या अँप मध्ये व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करता येते.

App Features:-
▪️1000+ Stickers
▪️Stylishl College Layouts
▪️Unique Filters & Colorful Background
▪️ Multiple ratio Supported
▪️Blur Background

हे नक्की वाचा: मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हे ऍप वापरा!


4. Snapseed

Snapseed images
Source :- Google Play Store

Snapseed हा अँप Google ह्या कंपनी चा आहे. ह्या अँप वरून प्रोफेशनल व क्वालिटी फोटो एडिटिंग करू शकता.

हा अँप Playstore वर उपलब्ध आहे. हा अँप अँड्रॉइड तसेच ios मध्ये डाऊनलोड करून वापरता येतो. हा अँप प्रोफेशनल फोटो एडिटिंग साठी वापरता येतो. तसेच ह्या मध्ये खूप फोटो एडिटिंग टूल्स उपलब्ध आहेत.

App Features:-
▪️JPG आणि RAW फाईल्स चा वापर करता येतो.
▪️फोटो इफेक्ट्स, HDR
▪️आपले वैयक्तिक फोटो साठवून ठेवून नंतर त्यांना एडिट करता येते.
▪️29 टूल्स आणि फिल्टर्स (HDR, Healing, Brush, Structure)

हे नक्की वाचा: Google Images – गूगल वरून Copyright Free Images कसे डाऊनलोड करायचे?


5. Adobe Lightroom CC

adobe lightroom cc images
Source :- Google Play Store

ह्या अँप मध्ये तुम्ही फोटो काढू शकता व तसेच ते एडिट करू शकता. ह्यामध्ये प्रगत (Advanced) रंग तसेच नवनवीन इफेक्ट्स उपलब्ध आहेत.
प्रोफेशनल फोटो एडिटिंग करण्यासाठी हा अँप सर्वात चांगला आहे. ह्या अॅपवर हाय क्वालिटी रेसॉल्युशन, फोटो फिल्टर्स, फोटो मधील बॅकग्राऊंड बदलणे, वेगवेगळे बॅकग्राऊंड ठेवणे इत्यादी सुविधा आहेत.

Adobe लाईटरूम हा अँप अगदी फ्री आहे. तसेच ह्याचे Premium Paid version सुद्धा आहे. त्यामध्ये खूप नवनवीन इफेक्ट्स व फीचर्स वापरायला मिळतात. हा अँप Playstore वर फ्री मध्ये उपलब्ध आहे. हा अँप अँड्रॉइड तसेच ios मध्ये डाऊनलोड करून वापरता येतो.

App Features:-
▪️Pro लेव्हल कॅमेरा
▪️Advanced फोटो शेअरिंग ऑप्शन
▪️नवनवीन फोटो एडिटिंग इफेक्ट्स
▪️स्टायलिश फॉन्ट

हे नक्की वाचा: ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.


6. ToolWiz Photos

toolwiz images
Source :- Google Play Store

ToolWiz Photo Editor ह्या अँप द्वारे क्रिएटिव्ह व आकर्षित फोटो एडिट करता येतात. तसेच हा अँप Google PlayStore वर मोफत उपलब्ध आहे. 10,000,000+ अधिक लोकांनी हा अँप डाऊनलोड केला असून फोटो एडिट करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तसेच ह्या अँप ला PlayStore वर 4.5 Star रेटिंग आहे.

ह्यामध्ये 80+ परफेक्ट फिलिंग टोन फिल्टर्स, 10+ पेंटिंग फिल्टर्स, असे अनेक फीचर्स वापरता येतात.

App Features:-
▪️400+ लेआऊट
▪️200+ टेक्चर
▪️2000+ स्टिकर्स
▪️40+ स्टायलिश फिल्टर्स
▪️150+ PIP फ्रेम्स


7. Photo Editor Pro

photo Editor Pro images
Source :- Google Play Store

ह्या अँप मध्ये Pro लेव्हल टाईप फोटो एडिट करता येतात. तसेच खूप साऱ्या फीचर्स सोबत अनेक फोटो एडिटिंग करता येतात.

ह्या अँप ला प्ले स्टोअर वर 4.8 Star रेटिंग आहे. तसेच वापरण्यास खूप सोप्पा इंटरफेस असल्याने कोणीही ह्यात फोटो एडिट करून सोशल मीडिया वर शेअर करू शकतो. तसेच नवीन इफेक्ट्स आणि लाईट एफ्स, बॉडी रिटच इत्यादी फीचर्स वापरता येतात. मोबाईल फोटो एडिटिंग साठी सर्वात बेस्ट अँप आहे.

App Features:-
▪️DSLR ब्लर इफेक्ट्स
▪️60+ फिल्टर्स फोटो एडिटिंग साठी
▪️Glitch इफेक्ट्स आणि ब्लर बॅकग्राऊंड
▪️फोटो कॉलेज मेकर


8. ToonApp

toon app images
Source :- Google Play Store

ToonApp हे कार्टून फोटो एडिट आहे. ह्यावरून खास कार्टून फेस फिल्टर्स बनवता येतात. आणि ते ही अगदी मोफत. आजकाल सर्व सोशल मीडिया वर ह्याच अँप वरून एडिट केलेलं फोटोज् लोक ठेवतात.

सर्वात लोकप्रिय फोटो एडिटर अँप आहे. जवळपास 10,000,000+ लोकांनी हा अँप डाऊनलोड केला आहे. तसेच ह्या अँपवरून AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून कार्टून फेस बनवता येतो.

App Features:-
▪️ अमेझिंग फोटो फिल्टर्स
▪️ Ai कार्टून फोटो एडिटर
▪️ Magic ब्रश इफेक्ट्स
▪️ सेल्फी कॅमेरा इफेक्ट्स


तर हे होते Top 8 फोटो एडिटिंग अँप ज्याच्या मदतीने तुम्हीही प्रोफेशनल फोटो एडिट करू शकता. आणि तुम्हाला हवं तिथे फोटो शेअर करू शकता.

तुम्हाला Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप!(Top 8 Free photo editing Apps) लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळींना तसेच सोशल मीडिया वर शेअर करा. आणि तुम्ही ह्या अँप मधील कोणता अँप फोटो एडिटिंग साठी वापरता ते कमेंट्स करून नक्की सांगा.

तसेच टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

1 thought on “Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!”

Leave a Comment