Google Images – गूगल वरून Copyright Free Images कसे डाऊनलोड करायचे?

तुम्हाला माहीत आहे का? Google वरून आपण Copyright Free Images Download करू शकतो. तसेच हे फोटोज् तुम्ही कुठेही फ्री मध्ये वापरू शकता. तसेच ब्लॉग, वेबसाईट, Youtube चॅनल आणि इंस्टाग्राम पेज साठी हे कॉपीराइट फ्री फोटोज् वापरू शकतो.

Google चे Copyright Free फोटोज् वापरल्यामुळे तुम्हाला कोणताही Copyright Issue होणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे फोटोज् वापरू शकता.

Blogging करताना अनेक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. वेबसाईट वर एखादी ब्लॉग पोस्ट लिहिताना त्यामध्ये 2-3 फोटोज् असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे त्या आर्टिकल ला एक आकर्षक लूक मिळते. आणि जास्तीत जास्त वाचक ती ब्लॉग पोस्ट वाचण्यासाठी आपल्या वेबसाईट ला भेट देतात.

त्यामुळे प्रत्येक ब्लॉग पोस्ट मध्ये 2-3 फोटोज् Add करणे गरजेचे आहे. पण Blog मध्ये फोटो add करण्यासाठी आपल्याला इंटरनेट वर अनेक वेबसाइट्स मिळतील. पण त्यातील असे फोटो शोधणे जे copyright free असतील. व ते वापरल्याने आपल्याला कोणताही copyright issue येणार नाही.

तर आज आपण ह्या लेखात त्या बद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. तसेच Copyright Free Images Download करण्यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची ते दाखवणार आहे. चला तर मग आजच्या नव्या लेखाला सुरुवात करुया.

Copyright Free Images म्हणजे काय?

कॉपीराइट फ्री इमेज म्हणजे ते फोटोज् जे कोणतीही व्यक्ती त्याच्या कोणत्याही कामासाठी वापरू शकते. जसे की बिझनेस साठी किंवा वेबसाईट साठी हे फोटोज् वापरू शकते. तसेच हे फोटोज् वापरायला कोणत्याही व्यक्तीची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते.

त्यासोबत copyright issue सारख्या तक्रारी अजिबात घडत नाहीत. कारण हे फोटोज् free-to-use असतात.


READ ALSO:

Google वरून Copyright Free Images कश्या प्रकारे डाऊनलोड करायचे?

Step 1 – सर्वात अगोदर मोबाईल मध्ये Chrome Browser ओपन करा. त्यानंतर Google Images असे सर्च करा.

Step 2 – आता तुम्हाला Google images लिहिलेले दिसेल. तिथे दिलेल्या Search Box मध्ये तुम्हाला जो फोटो हवा असेल त्याचे नाव सर्च करा. जसे की, Blogging

Step 3 – Search केल्यानंतर तुम्हाला खूप images दिसतील. पण हे सर्व images Copyright Free नाही आहेत. पुढील Setting करून तुम्ही Copyright free फोटोज् डाऊनलोड शकता.

Step 4 – आता तुम्हाला मोबाईलच्या डाव्या बाजूला थोड खाली Filter ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

Step 5 – आता तुम्हाला Latest, GIF, HD, Product, Colour, Usage Rights असे ऑप्शन दिसतील.

Step 6 – त्यातील Usage Rights ऑप्शन वर क्लिक करा. आता तुम्हाला दोन आणखी ऑप्शन्स दिसतील. हे ऑप्शन्स काही असे असतील.

1. Creative Common licenses (Free)

2. Commercial & other licenses (Paid)

ह्यामध्ये Creative Common Licenses (Free) हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. कारण हा ऑप्शन सिलेक्ट केल्याने आपण copyright free images वापरू शकतो.

तसेच Creative Commons License ह्या ऑप्शन मध्ये Photos हे Copyright License असतात. हे फोटोज् वापरायला परवानगी असते. पण आपल्याला त्या फोटोच्या owner ला Credit किंवा काही ठराविक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे हा ऑप्शन सिलेक्ट करू नका.

Step 7: Usage Rights वर क्लिक केल्यानंतर Creative Commons License सिलेक्ट करा. ह्या ऑप्शन ला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व Copyright Free images दिसतील. हे फोटोज् तुम्ही Download, Edit करू शकता. व कोणीही तुम्हाला कॉपीराइट इश्यू ची कंप्लेंट करणार नाही.

अश्या प्रकारे तुम्ही Google Images वरून तुमच्या वेबसाईट व यूट्यूब चॅनल साठी कॉपीराइट फ्री फोटोज् वापरू शकतात.


काही प्रश्न व उत्तरे.

Copyright images ब्लॉग किंवा वेबसाईट वर वापरणे योग्य आहे का?

– ह्याचे उत्तर आहे, नाही. तुम्ही कोणत्याही वेबसाईट वर किंवा सोशल मीडिया वर Copyright images वापरू शकत नाही. असे केल्याने तुम्हाला अनेक Copyright issue येऊ शकतात. तसेच तुम्ही ज्या व्यक्तीची image तुमच्या वेबसाईट वर वापरली आहे.

तो व्यक्ती तुमची Complaint करू शकतो. तसेच तुमच्याकडून दंड सुद्धा आकारू शकतो. त्यामुळे तुम्ही शक्य तेवढ्या प्रमाणात Copyright images वापरू नका.

अश्या कोणत्या वेबसाइट्स आहेत ज्यावरून Copyright free images डाऊनलोड करू शकतो?

– इंटरनेट वर अश्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून तुम्ही Stock free आणि Copyright Free फोटोज् डाऊनलोड करू शकता. गेल्या आर्टिकल मध्ये मी सविस्तर समजावून सांगितले आहे व सर्व वेबसाइट्स ची नावे अणि लिंक दिलेली आहेत. एकदा नक्की पहा..

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment