कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!

आज आपण भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स (Best URL Shortner Websites) बद्दल जाणून घेणार आहोत

मित्रांनो.. URL शॉर्टनर च्या मदतीने आपण कोणत्याही वेब पेज चा Address सोप्प्या पद्धतीने शॉर्ट करू शकतो. इंटरनेट वर तसेच मोठ मोठ्या शॉपिंग कंपन्याच्या वेबसाईट च्या लिंक तुम्हाला खूप छोट्या दिलेल्या दिसतील. तर त्या लिंक URL शॉर्टनर च्या मदतीने शॉर्ट केलेल्या असतात.

ह्याचा फायदा असा आहे की जर कोणत्याही वेब पेज चा पत्ता किंवा नाव वाचण्यासाठी कठीण व खूप मोठे असेल तर, URL शॉर्टनरने केलेल्या शॉर्ट लिंक मुळे युजरला वाचण्यासाठी सोप्पे व व्यवस्थित लक्षात राहतात.


URL शॉर्टनर काय आहे? (URL Shortner Information in marathi)

यूआरएल शॉर्टनर लांब URL लहान करण्यासाठी एक उत्तम साधन आहे. तसेच लहान URL लक्षात ठेवणे किंवा एकमेकांना शेअर करण्यासाठी सोपे होते. हे अगदी सोपे व फायदेशीर आहे. जेव्हा कोणी त्या लहान लिंकवर क्लिक करतो, तेव्हा ब्राउझर त्यास मोठ्या URL वर घेऊन जातो म्हणजेच redirect करतो. तसेच यूआरएल शॉर्टनर ने URL शॉर्ट केल्यामुळे आपल्या ओरिजनल लिंक ला काहीही नुकसान होत नाही.

तसेच तुम्हालाही तुमच्या वेब पेज ची URL शॉर्ट बनवायची असेल तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठी आहे. ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला काही यूआरएल शॉर्टनर वेबसाइट्स बद्दल सांगितले आहे, जेणेकरुन तुम्ही सुद्धा लांब URL कमी करू शकाल. तसेच आपण ह्या वेबसाइट्स अगदी मोफत वापरू शकता.

चला तर मग पाहूया URL शॉर्टनर ने शॉर्ट यूआरएल कशी बनवायची?


कोणतीही URL Short कशी करायची? | How to create URL short in marathi

1. Bitly.com

bitly homepage screen

bitly.com ही एक URL शॉर्टनर वेबसाइट आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कोणतीही URL शॉर्ट करू शकता. bitly.com ही एक फ्री वेबसाइट आहे. ज्यामधून तुम्ही Sign up किंवा बिना Sign up करता तुमची url शॉर्ट करू शकता. पण जर तुम्ही Sign Up करून अकाउंट बनवले तर तुम्ही बनवलेल्या शॉर्ट url ला ट्रैक करू शकता. म्हणजेच तुम्ही शेअर केलेल्या शॉर्ट लिंक वर किती जणांनी क्लिक केले हे बघता येते.

चला तर बघुया bitly.com च्या मदतीने URL शॉर्ट कशी करायची? –

• सर्वात अगोदर तुम्हाला ज्या URL ला शॉर्ट करायचे आहे, त्या URL ला कॉपी करून घ्या.

• त्यानंतर गूगल वर bitly.com किंवा bit.ly वेबसाइट शोधा व open करा.

• आता तुम्ही Create असे दिलेल्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर कॉपी केलेल्या URL ला तिथे Paste करा. आता तिथे दिलेल्या Shorten बटण वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही Short Url तयार होईल.

• आता तुम्ही ह्या Short url ला कॉपी करून तुम्हाला पाहिजे तिथे शेअर करा.

हे नक्की वाचा: Top 21 Online Shopping Sites in India (Marathi)


2. TinyURL.com

tinyurl homepage screen

tinyurl.com वेबसाइट वरून तुम्ही कोणतीही URL लिंक शॉर्ट करू शकता. तसेच ही वेबसाईट पूर्ण प्रकारे फ्री आहे. ह्या वेबसाईट वर URL शॉर्ट करण्यासाठी तुम्हाला Sign in करण्यासाठी गरज नाही.

हे नक्की वाचा: Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!

TinyURL वरून URL Short कशी करायची?–

• सर्वात अगोदर TinyURL.com वेबसाइट ओपन करा.

• त्यानंतर तुम्हाला ज्या URL ला शॉर्ट करायचे आहे, ती URL कॉपी करून घ्या.

• आता कॉपी केलेल्या url ला वेबसाईट वर शॉर्ट लिंक करण्यासाठी दिल्या गेलेल्या जागेवर Paste करा.

• आता तिथे Make TinyURL दिलेल्या बटन वर क्लिक करा.

• आता एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची शॉर्ट URL असेल. आता ती URL कॉपी करून तुम्हाला ज्या ठिकाणी शेअर करायची असेल तिथे करू शकता.

हे नक्की वाचा:

20+ रॉयल्टी आणि कॉपीराइट फ्री इमेज वेबसाइट्स!

गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?


अश्या प्रकारे तुम्ही कितीही मोठी url एका सेकंदात शॉर्ट करू शकता आणि तेही अगदी मोफत. तसेच आणखी काही URL शॉर्टनर वेबसाइट्स आहेत ज्यावरून तुम्ही url शॉर्ट करू शकता. पण मी ह्या दोन वेबसाईट चा URL शॉर्ट करण्यासाठी उपयोग करतो. ह्या वेबसाइट्स सुरक्षित व सोप्प्या आहेत वापरण्यासाठी म्हणून तुम्ही ह्यांचा वापर करू शकता.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तुम्ही ह्या URL वेबसाइट्स चा वापर तुमच्या ब्लॉगच्या लिंक किंवा YouTube चॅनल च्या लिंक शॉर्ट करण्यासाठी करू शकता. तसेच हा ब्लॉग तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.


2 thoughts on “कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!”

Leave a Comment