Best 10 Chrome Extensions | प्रत्येक मराठी ब्लॉगरने वापरले पाहिजे!

प्रत्येक मराठी ब्लॉगरने हे 10 एक्स्टेन्शन वापरले पाहिजे! (Best 10 Chrome Extensions) ज्यामुळे त्याला कोणतेही काम करणे सोप्पे होईल आणि पटकन काम करता येईल.

गूगल क्रोम हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे व लोक्रप्रिय असे ब्राऊझर आहे. क्रोम ब्राऊझर वापरण्याचा फायदा असा आहे की ह्यात कोणतीही गोष्ट सरळ आणि पटकन मिळते. क्रोम ब्राऊझर मध्ये आपण क्रोम एक्स्टेन्शन इंस्टॉल करून अधिक चांगल्याप्रकारे क्रोम चा वापर करू शकतो.

सध्या अनेक कंपन्या त्यांचे स्वतःचे एक्स्टेन्शन आणत आहेत. तसेच वेब स्टोअर वर अनेक क्रोम एक्स्टेन्शन फ्री मध्ये उपलब्ध आहेत.

आजच्या लेखात आपण अश्याच 10 क्रोम एक्स्टेन्शन बद्दल (Best 10 Chrome Extensions) माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा वापर प्रत्येक मराठी ब्लॉगर ने केला पाहिजे.


क्रोम एक्सटेंशन म्हणजे काय? (What is Chrome Extension in Marathi)

एक्सटेंशन म्हणजे एक छोटा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्राऊजरचे फीचर्स वाढवू शकता. तसेच तुमचे काम अधिक सोप्पे करू शकता. तुम्ही क्रोम वेब स्टोअर वरून एक्स्टेन्शन इंस्टॉल करू शकता. HTML, JavaScript आणि CSS च्या मदतीने ब्राऊजर एक्सटेंशन काम करतात. हे एक्सक्टेन्शन .crx फॉरमॅटमध्ये असतात.


क्रोम वेब स्टोअर म्हणजे काय? (What is Chrome Web Store in Marathi)

Best 10 Chrome Extensions

वेब स्टोअर हे गूगल ची फ्री सेवा असून, ह्या मध्ये वेगवेगळे क्रोम एक्स्टेन्शन उपलब्ध असतात. हे वेब स्टोअर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वरून ओपन करू शकता. तसेच ह्यावर उपलब्ध असलेले सर्व क्रोम एक्स्टेन्शन मोफत असतात. त्यामुळे ह्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागत नाही. क्रोम वेब स्टोअर वर आत्तापर्यंत एकूण 190,000 क्रोम एक्स्टेन्शन आणि ऍप उपलब्ध आहेत.

खाली दिलेले 10 क्रोम एक्स्टेन्शन प्रत्येक मराठी ब्लॉगर ने वापरले पाहिजे. चला तर मग पाहूया..


Best 10 Chrome Extensions

1 .Google Input Tools

गूगल ने त्यांची मायक्रोसॉफ्ट विंडोज वरील ऑफलाईन गूगल इनपुट तो बंद केले, तेव्हापासून अनेक प्रादेशिक भाषांमध्ये टाईप करणाऱ्या व्यक्तींना अडचण निर्माण होत आहे. पण जर तुम्ही हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही गूगल इनपुट टूल ऑनलाईन मिळवू शकता. तिथे तुम्ही ऑनलाईन राहून आपल्या प्रादेशिक भाषेत टाईप करून नंतर आपल्याला हवं तिथे ते कॉपी पेस्ट करू शकता.

पण दरवेळी ऑनलाईन राहणे कठीण आहे. त्यामुळे गूगल इनपुट टूल चे एक्स्टेन्शन आहे. ते तुम्ही Apple Mac किंवा Linux वर वापरू शकता. तसेच जर तुम्ही विंडोज वापरत असाल तर मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व भारतीय प्रादेशिक भाषेत ऑफलाईन टाईप करण्याची सुविधा देतो.


2. Awesome Screenshot : Screen Video Recorder

आजकाल अनेक जण यूट्यूब वर व्हिडिओ बनवत आहेत. पण व्हिडिओ बनवताना त्यांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ची स्क्रीन रेकॉर्ड कशी करायची ते माहीत नसते. जर तुम्ही विंडोज वापरत असाल तर, Win +Alt + R ह्या शॉर्टकट key चा वापर करून स्क्रीन रेकॉर्ड करू शकता. तसेच Win + Alt + Prtscreen ही शॉर्टकट key वापरून स्क्रीनशॉट काढू शकता.

तसेच Awesome Screenshot चा वापर करून तुम्ही संपूर्ण वेब पेज चा स्क्रीन शॉट घेऊ शकता. तसेच व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करू शकता.

हे नक्की वाचा:

» SEO म्हणजे काय? वेबसाईट साठी SEO कसा करावा?

» वर्डप्रेस वेबसाईट वर पुश नोटिफिकेशन कसे सेट करावे?


3. Grammarly

अनेक मराठी ब्लॉगर्स ना इंग्रजी भाषेमध्ये काही ईमेल किंवा ब्लॉग लिहायचा असेल तर थोडी अडचण येते. ग्रामर व शब्दरचना कधी चुकीची वाटते. त्यामुळे ग्रामरली (Grammarly) हे एक्स्टेन्शन खूप फायद्याचे ठरते.

जेव्हा तुम्ही ब्राउझरमध्ये काही इंग्रजी वाक्ये टाईप करता तेव्हा कुठे काही चुकलं आहे, किंवा कोणता बदल आवश्यक आहे ते लाल रंगाने अंडरलाईनने हायलाईट होतात.

बदल करणे का गरजेचे आहे. याचे कारण देखील आपल्याला सविस्तर मिळते. त्यामुळे इंग्रजी लिहिणे खूप सोप्पे होते. तसेच Free व Premium अश्या दोन्ही व्हर्जनमध्ये Grammarly क्रोम स्टोअर वर उपलब्ध आहे.


4. Google Dictionary (by Google)

इंटरनेट वर अनेक असे इंग्रजी शब्द असतात. ज्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. त्यावेळी गूगल वर translate करत राहण्यापेक्षा Google Dictionary (by Google) ने तुम्ही लगेचच त्या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ शकता. त्या शब्दाचा उच्चार कसा करावा हे देखील ऐकू शकता. त्यामुळे तुमचा वेळही वाचू शकतो.


5. ColorZilla

आपल्याला एखाद्या पेजची डिझाइन किंवा एखाद्या वेबसाईट च्या लोगो चा कलर खूप आवडतो. पण कलर कोड आपल्याला माहीत नसतो. त्यामुळे आपल्याला तसाच हुबेहूब कलर आपल्याला मिळत नाही. परंतु ColorZilla ह्या क्रोम एक्स्टेन्शन च्या मदतीने तुम्ही Color Code जाणून घेऊ शकता.


6. Scan WP – Detect WordPress Themes and Plugins

प्रत्येक ब्लॉगर कोणत्या ना कोणत्या वेबसाईट ला भेट देतो. तेव्हा त्याला त्या वेबसाईट वरील आकर्षक थीम आवडते. पण थीम चे नाव दिलेले नसल्यामुळे त्या थीम बद्दल माहिती मिळत नाही. अश्या वेळी Scan WP ह्या एक्स्टेन्शन च्या मदतीने तुम्ही हे सहजपणे जाणून घेऊ शकता. ह्या एक्स्टेन्शन मधून त्या वेबसाईट वर असलेली थीम, प्लगिन्स कोणते आहेत हे जाणून घेता येते.


7. Buffer

ब्लॉगर्स ना ब्लॉगिंग करताना अनेक सोशल मीडिया अकाऊंट सांभाळावे लागतात. प्रत्येक सोशल मीडिया अकाऊंट वर वेळोवेळी पोस्ट करणे खूप कठीण होते. त्यामुळे Buffer चे हे एक्स्टेन्शन तुमच्या खूप फायद्याचे आहे.

Buffer च्या मदतीने तुम्ही तुमचे 3 सोशल मीडिया अकाउंट्स मोफत वापरू शकता व त्यावर पोस्ट करू शकता. तसेच तुम्हाला आजुन सोशल मीडिया अकाऊंट ना add करायचे असल्यास तुम्हाला Buffer चे उपलब्ध असलेले Plans विकत घ्यावे लागतील.


8. EverNote Web Clipper

अनेकदा इंटरनेट वर काही वाचत असताना आपल्याला महत्वाची माहिती हायलाईट करून ठेवायची असते. परंतु कशी करायची ते माहीत नसल्यामुळे आपण पूर्ण वेब पेज बुकमार्क करून ठेवतो. पण EverNote Web Clipper च्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवी असलेली माहिती हायलाईट करून ठेवू शकता. तसेच त्या माहितीचा स्क्रिनशॉट काढून ठेऊ शकता.

नंतर तुम्ही ती माहिती हवी तेव्हा तुमच्या EverNote अकाउंटच्या मदतीने कोणत्याही डिव्हाइसवरून सहजपणे वापरू शकता.


9. Unsplash

Unsplash ही एक रॉयल्टी फ्री आणि कॉपीराइट फ्री फोटोज् देणारी वेबसाइट आहे. हे ह्या वेबसाईट चे क्रोम एक्स्टेन्शन आहे. ह्या एक्स्टेन्शन चा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी इमेज शोधून लगेच इन्सर्ट करू शकता. तसेच हे Unsplash वेबसाईट चे अधिकृत क्रोम एक्स्टेन्शन आहे.


10. Google Keep

कोणत्याही वेबसाईट वरील माहिती आवडल्यावर आपण ती कॉपी करून ठेवतो किंवा त्या माहितीचा स्क्रीनशॉट काढतो. पण ह्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे हे गूगल कीप एक्स्टेन्शन तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तुम्ही एका क्लिक वर वेबसाईट ची माहिती, वेबसाईट URL सेव्ह करून ठेवू शकतो. तसेच सेव्ह केलेली माहिती तुम्ही ऑफलाईन सुद्धा वाचू शकता.

हे नक्की वाचा:

» Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!

» Marathi Keyboard Apps | मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी हे मराठी कीबोर्ड वापरा!


वरील दिलेली सर्व क्रोम एक्स्टेन्शन मोफत आहेत. तसेच हे गूगल क्रोम वेब स्टोअर वर उपलब्ध आहेत. Google Chrome Web Store वर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Tip : तीन किंवा त्यापेक्षा जास्त एक्सटेंशन इन्स्टॉल करू नका. तसे केल्याने तुमचे ब्राउझर स्लो होऊ शकते. तसेच लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असतील असेच एक्सटेंशन तुमच्या गुगल क्रोममध्ये इन्स्टॉल करा.

तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment