SEO म्हणजे काय? वेबसाईट साठी SEO कसा करावा?

SEO म्हणजे काय? (Seo information in Marathi) सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशन कसे करतात? तसेच seo चे किती प्रकार आहेत? (Types of seo in marathi) असे अनेक प्रश्न एखाद्या नवख्या ब्लॉगर ला पडतात. ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी SEO काय आहे व तो कसे काम करतो हे सर्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.

ब्लॉग लिहिताना तो नेहमी SEO फ्रेंडली लिहिला पाहिजे. ज्यामुळे ती ब्लॉग पोस्ट गूगल च्या First Page वर येऊ शकते. जर तुमची वेबसाईट गूगल रिझल्ट्स मध्ये दिसत नसेल तर तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहून काही फायदा होणार नाही.

वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी अनेक पद्धती आहे. पण Organic Traffic आणणे हा एक उत्तम पर्याय आहे.

ऑरगॅनिक ट्रॅफिक म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही गूगल वर एखादी माहिती शोधता तेव्हा तुमच्या समोर अनेक वेबसाइट्स उपलब्ध होतात. तुम्ही त्यातील सर्वात पहिल्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला हवी असलेली माहिती पाहता व ती वाचता.

अश्या प्रकारे वेबसाईट वर गूगल कडून ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळते. म्हणजेच गूगल एखादी माहिती किंवा keyword शोधता तेव्हा तुमच्यासमोर जे पर्याय येतात त्यांच्यावर क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईट ला भेट देता. त्यालाच ऑरगॅनिक ट्रॅफिक म्हणतात.

वेबसाईट वर ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवण्यासाठी Google हे सर्वात उत्तम पर्याय आहे. कारण जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून गूगल चे नाव पाहिले येते. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण गूगल करतो म्हणजेच गूगल वर माहिती शोधतो.

पण आपली वेबसाईट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये दिसण्यासाठी आपल्याला आपली वेबसाईट गूगल च्या सर्च इंजिन मध्ये सबमिट करणे गरजेचे आहे. Google Search Console मध्ये वेबसाईट कशी सबमिट करायची हे आपण मागील लेखात पाहिले आहे.

प्रत्येक ब्लॉगर त्याच्या वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी फक्त गूगल वर वेबसाईट सबमिट करतो. पण गूगल सारखे आजुन सर्च इंजिन्स आहेत ज्यावरून देखील तुमच्या वेबसाईट ला ट्रॅफिक मिळू शकते. म्हणून Bing, Yahoo सारख्या सर्च इंजिन्स वर देखील वेबसाईट ला सबमिट करा.

▪️ नवीन वेबसाईट Bing Webmaster Tool मध्ये कशी सबमिट करायची?


आजच्या लेखात आपण SEO म्हणजे काय? आणि SEO कसा करायचा? हे जाणून घेणार आहोत.

सर्च इंजिन म्हणजे काय?

सर्च इंजिन म्हणजे ती जागा जिथे सर्व माहिती व आर्टिकल एकत्र जमा करून ठेवले जातात. त्यानंतर जेव्हा कोणी सर्च इंजिन्स वर एखादी माहिती शोधतो तेव्हा त्या माहितीशी संबंधित असलेल्या keywords ना शोधून ते सर्च इंजिन्स त्या वेबसाईट ना First Page वर दाखवतो.

Google, Bing, Yahoo हे काही लोकप्रिय सर्च इंजिन्स आहेत. सर्च इंजिन्स मध्ये वेबसाईट दिसण्यासाठी ती त्या त्या सर्च इंजिन्स च्या वेबमास्टर टूल मध्ये सबमिट करावे लागते.


SEO म्हणजे काय? (Seo information in Marathi)

seo mhanje kay

SEO चा फुल फॉर्म Search Engine Optimization असा आहे. SEO प्रत्येक वेबसाईट, प्रत्येक ब्लॉग साठी महत्वाचा आहे. SEO जर चांगला असेल तर वेबसाईट वर जास्तीत जास्त ट्रॅफिक येतं. SEO मुळे वेबसाईट सर्च इंजिन्स च्या टॉप ला येतात.

आपण गूगल वर एखादा कीवर्ड शोधला आणि त्याचे रिझल्ट्स गूगल च्या पहिल्या पानावर दिसले तर त्या वेबसाईट चा SEO चांगला आहे असे आपण म्हणू शकतो.

SEO चे तीन प्रकार आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित केले, तर तुमची वेबसाईट पटकन Google च्या पहिल्या Page वर दिसू शकते. व तुम्हाला खूप प्रमाणात ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळू शकते.

▪️ ब्लॉगिंग म्हणजे काय? आणि ब्लॉग आणि ब्लॉगर म्हणजे काय?
▪️ ब्लॉग कसा सुरू करावा? 8 सोप्प्या पद्धती!
▪️ ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?


3. SEO चे प्रकार कोणते?

वेबसाईट चा SEO चांगला करण्यासाठी हे दोन प्रकार खूप महत्त्वाचे ठरतात.

• On Page Seo

ऑन पेज एसइओ मध्ये वेबसाईट चे डिझाइन व त्यामध्ये लिहिला गेलेला कंटेंट व्यवस्थित असावा लागतो. त्यासाठी तुमची वेबसाईट SEO Friendly असणे गरजेचे आहे. तुम्ही लिहिलेल्या पोस्ट मध्ये Meta Description, Content, Post Title मध्ये तुमचा Main Keyword योग्यरीत्या वापरला गेला पाहिजे. त्यामुळे गूगल ला तुम्ही पोस्ट मध्ये काय लिहिला आहेत ते लगेच समजते व तुमची पोस्ट लगेच रँक होते.

On Page Seo कसा करायचा?

on page seo kasa karava

Keyword And Research

Keyword च्या साहाय्याने आपण आपली पोस्ट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये लगेच रँक करू शकतो. पण त्यासाठी पोस्ट लिहिताना योग्य तो Keyword निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गूगल वर तो keyword कितीवेळा सर्च केलेला आहे त्यानुसार आपण पोस्ट लिहिली पाहिजे.

तसेच पोस्ट मध्ये वापरला जाणारा keyword Bold करावा. ज्यामुळे गूगल ला तसेच पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला तो keyword दिसला पाहिजे.

Keyword शोधण्यासाठी Google Keyword Planner, Semrush इत्यादी टूल्स चा वापर करू शकतो.


• Focus Keyword

Focus Keyword मार्फत आपण आपल्या वेबसाईट चा Main Keyword रँक करू शकतो. Focus Keyword H1 आणि H2 हेडिंग मध्ये वापरला पाहिजे. तसेच पोस्ट च्या पहिल्या paragraph मध्ये देखील Focus Keyword चा वापर केला पाहिजे.

ज्यामुळे गूगल आपला Main Keyword रँक करू शकतो. हे SEO साठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच focus keyword हा 4-5 शब्दांचा असावा.


• Content

वर वाचल्याप्रमाने फोकस किवर्ड प्रमाणेच पोस्ट मधील कंटेंट सुद्धा महत्वाचा आहे. लिहिलेल्या कंटेंट मध्ये 3-4 वेळा तरी Focus Keyword असणे गरजेचे आहे. तसेच त्या keyword का हायलाईट किंवा बोल्ड करावे. जेणेकरून तो लगेच दिसण्यात येईल.

तसेच कंटेंट लिहिताना तो ओरिजनल असला पाहिजे. कोणत्याही वेबसाईट वरून कॉपी केलेला नसला पाहिजे. तसेच वेबसाईट वर युनिक कंटेंट लिहायला महत्व द्या. तरच लोकं वाचण्यासाठी येतील.


• ALT Tags

वेबसाईट वर कंटेंट तर लिहिलात पण पोस्ट मध्ये images चा वापर करणे सुद्धा महत्वाचे आहे. ज्यामुळे वाचक आजुन आकर्षित होतील. पण images पोस्ट मध्ये वापरताना त्याला ALT Tag देणे गरजेचे आहे. अल्ट टॅग मध्ये तुम्ही तुमचा main keyword / focus keyword वापरु शकता. पण प्रत्येक image मध्ये एकच keyword वापरु नये.


• Image Optimization

प्रत्येक पोस्ट मध्ये 2-3 image असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची पोस्ट आकर्षित बनते. पण image ठेवताना ती jpg किंवा png फॉरमॅट मध्ये असली पाहिजे. Image वापरताना त्याची साईज जास्त असता कामा नये. साईज जास्त असल्यावर त्याचा परिणाम तुमच्या वेबसाईट वर होतो व तुमची पोस्ट पटकन ओपन होत नाही.

तसेच image ची साईज नेहमी KB मध्ये असावी. जर तुमची इमेज MB मध्ये असेल तर तुम्ही ती image compress करून त्याचे रूपांतर KB मध्ये करू शकता. त्यासाठी तुम्ही ह्या दोन टूल्स चा वापर करू शकता.

▪️ compressjpeg.com
▪️ imagecompressor.com

image compress करून झाल्यावर ती इमेज पोस्ट मध्ये वापरायच्या अगोदर त्याला नाव देणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही focus keyword किंवा ती इमेज कशा संदर्भात आहे त्यावरचा एखादा keyword वापरावा.

लक्षात ठेवा पोस्ट मध्ये image वापरताना त्या इमेज चे योग्य असे image optimization करणे गरजेचे आहे.


• Internal And Outbound Links

हे दोन्ही SEO साठी महत्वाचे घटक आहे. Internal links म्हणजे आपण लिहिणाऱ्या पोस्ट मध्ये आपल्या वेबसाईट मधील इतर पोस्ट ची लिंक देणे. म्हणजेच एका पोस्ट वरून आपल्या वेबसाईट वरील दुसऱ्या पोस्ट कडे घेऊन जाणे.

Outbound links मध्ये आपल्या पोस्ट मध्ये दुसऱ्या एखाद्या वेबसाईट ची लिंक देणे. जसे की wikipedia ची लिंक ही दुसऱ्या वेबसाईट ची लिंक आहे. ह्याला Outbound links असे म्हणतात.


• URL And Title Tag

कोणत्याही पोस्ट ची url ही खूप महत्त्वाची आहे. कारण त्याच्याच मार्फत आपली वेबसाईट गूगल मध्ये रँक होते व लोकं वाचण्यासाठी वेबसाईट ला भेट देतात. पण url main keyword शी मिळती जुळती असली पाहिजे. त्यामुळे गूगल ला समजण्यास सोप्पे होते.

तसेच पोस्ट चे Title हे सिद्ध महत्वाचे आहे. कारण जेव्हा कोणी गूगल वर सर्च करत तेव्हा हेच Title त्याला दिसते. म्हणून Title हे आकर्षित आणि समजायला सोप्पे असले पाहिजे.

Title बरोबरच Meta Description सुद्धा महत्वाचे आहे. Meta Description मध्ये Focus Keyword यायला हवा. Meta Description जास्तीत जास्त 150 words चा असावा.

अश्या पद्धतीने आपण On Page Seo करू शकतो. व आपल्या वेबसाईट ला गूगल वर रँक करू शकतो. पण On Page Seo सोबत Off Page Seo सुद्धा महत्वाचा आहे.


 Off Page Seo

वरच्या पॉइंट मध्ये आपण On Page Seo बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. जस On Page Seo हा वेबसाईट साठी महत्वाचा आहे, तसच Off Page Seo सुद्धा वेबसाईट साठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.

Off Page Seo म्हणजेच backlink. आपल्या वेबसाईट च्या लिंक दुसऱ्या साईट्स वर किंवा सोशल मीडिया वर शेअर करणे म्हणजेच आपल्या वेबसाईट च्या bachlink बनवणे.

जसे On Page Seo मध्ये पाहिले की सर्व काही online करावे लागते. पण Off Page Seo मध्ये तसे नाहीय. इथे आपल्याला offline असल्यावर आपल्या वेबसाईट वर ट्रॅफिक यावे यासाठी काम करावे लागते. ह्या कामासाठी Backlink चा वापर केला जातो. Backlink चे दोन प्रकार आहेत. Do Follow & No Follow असे दोन प्रकार असतात.

आता आपण Off Page Seo साठी Backlink कश्या पद्धतीने तयार करायच्या ते पाहणार आहोत.

Off Page Seo कसा करायचा?

1. Social Media Platforms

हा सर्वात उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे backlink तयार करण्यासाठी. ह्यासाठी तुम्ही तुमच्या वेबसाईट च्या नावाने सोशल मीडिया अकाउंट्स बनवून घ्या. तुम्ही Facebook, Instagtam, Twitter सारख्या सोशल प्लॅटफॉर्म वर बनवू शकता. त्यानंतर अकाऊंट च्या profile मध्ये वेबसाईट ची लिंक Add करा. आणि शेअर करा.

जेव्हा जेव्हा Visitors तुमच्या सोशल अकाउंट्स ना भेट देतील, तेव्हा तेव्हा ते त्या लिंक वरून तुमच्या वेबसाईट ला भेट देतील. ह्याचा फायदा असा आहे की Google तुमच्या वेबसाईट ला पटकन रँकिंग करतो. म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स वर अकाऊंट बनवणे गरजेचे आहे.


2. Comment On Others Blog

ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या टॉपिक शी निगडित असलेल्या वेबसाइट्स वर जाऊन कमेंट्स करायची आहे. पण कमेंट्स करताना आपल्या वेबसाईट च्या Link व्यतिरिक्त इतर काहीही Add करू नये. असे केल्यास कमेंट्स Approve होण्याचे प्रमाण कमी होते. आणि ते स्पॅम धरण्यात येते.


3. Guest Post

गेस्ट पोस्ट म्हणजे दुसऱ्याच्या वेबसाईट वर आपली पोस्ट सबमिट करणे. म्हणजे आपल्या टॉपिक शी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या वेबसाईट वर पोस्ट केल्या पाहिजे. ह्यामुळे तुमच्या वेबसाईट वर 1000 पर्यंत ट्रॅफिक येऊ शकते.

तसेच तुम्हाला ही Do Follow backlink मिळेल. ज्यामुळे तुमच्या वेबसाईट ला रँकिंग साठी सोप्पे होईल.


4. Question & Answer Sites

ह्या साईट्स वर जाऊन तिथे विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन तिथे तुमच्या वेबसाईट ची Link द्या. अश्या प्रकारे ते उत्तर वाचून visitors तुमच्या वेबसाईट ला भेट देतील.

अश्या प्रकारे आपण SEO म्हणजे काय? आणि SEO कसा करायचा? हे पाहिले.


SEO आणि SEM मधील फरक

SEO म्हणजे काय? तो कसा करायचा? हे आपण पाहिलं. पण SEO आणि SEM म्हणजे काय? आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? हे सर्व आपण खालील लेखात पाहूया..

Search Engine Optimization (SEO)

SEO म्हणजे Search Engine Optimization. SEO चा उपयोग करून Blog/Website योग्य पद्धतीने Optimize करून फ्री मध्ये Google च्या सर्च रिझल्ट्स वेबसाईट मध्ये रँक करता येते.

त्यामुळे Google वरून Organic Traffic येते. तसेच तुम्हाला खूप फायदा सुद्धा होतो.

Search Engine Marketing (SEM)

Search Engine Marketing चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट ची पैसे देऊन जाहिरात करता येते. त्यासाठी तुम्हाला Google Ads चा वापर करावा लागतो. ह्यासाठी तुम्हाला SEO ची काहीच गरज नसते. जाहिरातींचा वापर करून तुम्ही तुमची वेबसाईट गूगल च्या first page वर दाखवू शकता. आणि खूप ट्रॅफिक मिळवू शकता.


SEO का करावा ?

जर तुम्हाला वेबसाईट बनवून त्यामार्फत ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत. तर तुम्हाला तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे. जेव्हा लोकं तुमच्या वेबसाईट ला भेट देतील, तेव्हाच तुमची वेबसाईट फेमस होईल. जेव्हा जास्त ट्रॅफिक यायला लागलं की Google Adsense कडून वेबसाईट वर Ads लावून त्यामार्फत पैसे कमवू शकतो.

पण हे सर्व करण्यासाठी तुमची वेबसाईट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये रँक होणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमची वेबसाईट first page वर येईल, तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला SEO करणे गरजेचे आहे. On Page Seo आणि Off Page Seo करून तुम्ही वेबसाईट रँक करू शकता.

हे नक्की वाचा:

▪️ इंस्टाग्राम स्टोरीज बनवण्यासाठी ह्या ऍप चा वापर करा!

▪️टॉप १५ बेस्ट वर्डप्रेस न्यूजपेपर थीम्स

SEO म्हणजे काय? (Seo information in Marathi) वेबसाईट साठी SEO कसा करावा? आणि SEO का करावा? ह्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेतली आहे. ही माहिती वाचून तुम्ही तुमच्या वेबसाईट चा SEO व्यवस्थित करू शकता. तसेच ही माहिती सोशल मीडिया वर शेअर करा.

तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट्स करून नक्की सांगा. ब्लॉगिंग बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर मधील Blogging कॅटेगरी मधील पोस्ट वाचा.


तंत्रज्ञानटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

धन्यवाद! जय महाराष्ट्र!

3 thoughts on “SEO म्हणजे काय? वेबसाईट साठी SEO कसा करावा?”

  1. सर आपण फारच उपयुक्त माहिती दिली आपले मनःपूर्वक धन्यवाद. अशी माहिती जी अनुभवाच्या ज्ञानातूनच मिळते. खरोखरच मराठी भाषेमधून आपण मराठी भाषिकांसाठी हा माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला. अशाच सुंदर पोस्ट साठी आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा. आपले खूप खूप आभार.

    Reply
    • धन्यवाद! तुम्हाला आमच्या वेबसाईट वरील माहिती आवडली हे वाचून खूप आनंद झाला. मराठी वाचकांसाठी आम्ही आजुन नवनवीन माहिती आपल्या मराठी भाषेतून आणण्याचा प्रयत्न नक्की करीन.

      Reply

Leave a Comment