क्रिप्टोकरन्सी काय आहे? आणि क्रिप्टोकरन्सी चे किती प्रकार आहेत?

आजच्या लेखात आपण क्रिप्टोकरन्सी काय आहे? (cryptocurrency meaning in Marathi) आणि क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती (Cryptocurrency information in Marathi) जाणून घेणार आहोत. cryptocurrency meaning in Marathi हा लेख संपूर्ण वाचा. जेणेकरून तुम्हाला cryptocurrency बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल.

आजकाल सर्व ठिकाणी डिजिटल व्यवहार होत असताना आपल्याला दिसत असतात. सर्व काही डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. अगोदर पैसे पाठवण्यासाठी पोस्ट, बँक इत्यादी गोष्टींचा वापर केला जायचा. पण आताच्या डिजिटल युगात पैसे पाठवण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन चा वापर केला जातो. ज्यात PhonePe, GooglePay इत्यादी ऍप्लिकेशन आहेत. पण आपण ह्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पैसे कमवू शकतो.

त्या नवीन तंत्रज्ञानाचे नाव आहे क्रिप्टोकरन्सी. जगातील कोणत्याही देशाच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी चलनाची आवश्यकता असते. जेणेकरून त्याचा वापर करून सहजतेने व्यवहार करता येईल. म्हणून प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगवेगळे चलन आहे. प्रत्येक देशाचे चलन वेगवेगळे असते. जसे की, भारत देशाचे चलन रुपया, अमेरिकेचे डॉलर, यूरोप चे यूरो, जपानचे जापानी येन, इत्यादी. हे चलन एक भौतिक चलन आहे, जे आपण ज्या-त्या देशाच्या नियमांनुसार कोणत्याही ठिकाणी किंवा देशात ते वापरू शकतो आणि पाहू शकतो.

परंतु क्रिप्टोकरन्सी म्हणजे क्रिप्टो चलन हे जरा वेगळे आहे. आपण त्या चलनाला पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. कारण क्रिप्टो चलन हे प्रत्यक्ष स्वरूपात छापलेले नसते. म्हणून त्याला आभासी चलन असे म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टो चलनात फार प्रमाणात वाढ होत आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (Cryptocurrency meaning in Marathi)

क्रिप्टोकरन्सीला म्हणजे आभासी चलन होय. क्रिप्टोकरन्सी म्हणजेच Virtual currency. क्रिप्टोकरन्सी हे एक स्वतंत्र चलन आहे व त्याचा कोणीही मालक नाहीय. क्रिप्टोकरन्सी हे चलन संगणकाचा वापर करून बनवलेले चलन आहे. पहिले बिटकॉइन २००९ मध्ये सातोशी नाकामोटो यांनी तयार केली होती. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो.

रुपये, डॉलर, युरो, जापानी येन किंवा इतर चलनांप्रमाणेच हे चलन कोणत्याही देशाचे किंवा कोणत्याही सरकारचे चलन नाही आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे ज्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. सामान्यत: याचा वापर वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

या चलनाच्या मदतीने पैसे खूप सहज लपविले जाऊ शकतात. ह्याच्या वापरासाठी कोणत्याही बँक किंवा इतर सरकारी संस्थेला भेट देण्याची गरज नसते. म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने आपले पैसे सहज लपविले जाऊ शकतात. हे डिजिटल चलनपिअर टू पिअर इलेक्ट्रॉनिक” (PEER TO PEER Electronic) पद्धतीने कार्य करते. याचा उपयोग इंटरनेटच्या मदतीने करता येतो.

क्रिप्टोकरन्सी चे किती प्रकार आहेत?

1. बिटकॉइन (Bitcoin)

बिटकॉइन ही जगामधली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. २००९ मध्ये सतोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीने श्वेतपत्रिका ऑनलाइन प्रकाशित केली. तथापि नंतर हे उघड झाले की सतोशी नाकामोटो हे त्या व्यक्तीचे खरे नाव नव्हते.

आजही कोणालाही बिटकॉइनच्या निर्मात्याचे खरे नाव माहित नाहीय. त्यावेळी कोणालाही माहित नव्हते की बिटकॉइन चा आज किती प्रमाणात वापर होणार आहे ते. बिटकॉइन ही एक डिजिटल करंसी आहे, त्याचा उपयोग ऑनलाइन वस्तु खरेदी करण्यासाठी केला जातो किंवा कोणालाही पैसे पाठवण्यासाठी केला जातो. ही एक विकेंद्रित करंसी आहे आणि सरकार किंवा कोणत्याही देशाचा ह्यावर हक्क नाही आहे.

हे सुध्दा नक्की वाचा:- बिटकॉईन काय आहे? बिटकॉईन चे फायदे आणि तोटे!

2. लिटकॉइन (Litecoin)

बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉइन लॉन्च करण्यात आले. बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉईन २०११ मध्ये लाँच केले होते. इतर क्रिप्टोकरन्सीं प्रमाणेच लिटकॉइन हे एक ओपेन स्त्रोत आहे, ग्लोबल पेमेंट नेटवर्क आहे जे पूर्णपणे विकेंद्रित आहे, म्हणजे सरकारचे कोणतेही केंद्रीय अधिकारी नाहीत. लिटकॉइन एक पीअर-टू-पीअर क्रिप्टोकरन्सी आणि मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. चार्ली ली (Charlie Lee) ह्याने लिटकॉइन ची निर्मिती केली आहे. चार्ली ली हा गूगल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी करणारा एक कर्मचारी आहे.

हे नक्की वाचा: Google बद्दल इंटरेस्टिंग मराठी फॅक्ट्स!

बिटकॉइन आणि लिटकॉइन मधला फरक:

1) असे मानले जाते की लिटकॉइन च्या साहाय्याने सर्वात वेगवान व्यवहार करू शकतो.

2) बिटकॉइनची नाणे (coin) मर्यादा २१ दशलक्ष (Million) आहे आणि लिटकॉइन ची ८४ दशलक्ष आहे.

3) हे वेगवेगळ्या अल्गोरिदमवर काम करते, लिटकॉइन “स्क्रिप्ट” वर आणि बिटकॉइन “SHA-२५६” वर काम करत आहे.

3. एथेरियम (Ethereum)

२०१५ मध्ये एथेरियम तयार करण्यात आले. एथेरियम हा एक प्रकारचा क्रिप्टोकर्न्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरियमचे एथेर (ETH) नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरियम मध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे आणि जगात कोणासही त्वरित पाठवले जाऊ शकते. एथेरियम पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक ETH चा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो.

4. रिपल (Ripple)

रिपल हे २०१२ मध्ये रिलीझ झाले होते. जी आर्थिक व्यवहारांसाठी क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल पेमेंट नेटवर्क दोन्ही म्हणून काम करते. हे एक जागतिक सेटलमेंट नेटवर्क आहे जे पैसे हस्तांतरित करण्यासाठी वेगवान, सुरक्षित आणि कमी किंमतीची पद्धत तयार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

रिपल कोणत्याही प्रकारच्या चलनाला एक्सचेंज करण्याची परवानगी देते. यूएसडी (USD) आणि बिटकॉइन पासून ते सोने व EUR पर्यंत आणि अन्य चलनांपेक्षा बँकांशी जोडते. रिपल इतर प्रकारच्या डिजिटल चलनांपेक्षा वेगळे देखील आहे कारण त्याचे प्राथमिक लक्ष मोठ्या प्रमाणात पैसे हलविण्याऐवजी व्यक्ती-ते-व्यक्तीच्या व्यवहारावर नाही.

5. बिटकॉइन कॅश (Bitcoin Cash)

बिटकॉइन कॅश हा डिजिटल करन्सीचा एक प्रकार आहे. जो बिटकॉइनची विशिष्ट वैशिष्ट्ये सुधारित करण्यासाठी तयार केला गेला आहे. बिटकॉइन कॅशने ब्लॉक्सचा आकार वाढविला, ज्यामुळे अधिक व्यवहारावर वेगवान प्रक्रियेणे होऊ शकतील.

हे नक्की वाचा:- एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?

6. झेकॅश (Zcash)

झेकॅश हे डिजिटल चलन आहे. जे मूळ बिटकॉइन कोडबेसवर तयार केले गेले होते. हे चलन एमआयटी जॉन्स हॉपकिन्स आणि इतर सन्मानित शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांनी मिळून तयार केले आहे. हे विकेंद्रित ब्लॉकचेनवर तयार केले गेले. झेकॅश मधील मुख्य वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे ह्यामध्ये गोपनीयतेवर खूप जोर दिला आहे. प्रेषक, प्राप्तकर्ता किंवा व्यवहार केलेल्या रकमेची माहिती न देता वापरकर्ते झेकॅश पाठवू आणि प्राप्त करू शकतात.

7. मोनेरो (Monero)

मोनेरो हे एक सुरक्षित, खाजगी आणि अप्रत्याशित चलन आहे. मोनेरो ही मुक्त स्रोत क्रिप्टोकरन्सी एप्रिल २०१४ मध्ये लाँच करण्यात आली होती. पण काहीच कालावधीत क्रिप्टोग्राफी समुदाय आणि उत्साही लोकांमध्ये याचा खूप रस निर्माण झाला.

या क्रिप्टोकरन्सीचा विकास पूर्णपणे देणगी-आधारित आणि समुदाय-आधारित आहे. विकेंद्रकरण आणि स्केलेबिलिटीवर जोरदार लक्ष केंद्रित करून मोनेरो ही करंसी सुरू करण्यात आली आहे आणि रिंग सिग्नेचर या विशेष तंत्राचा वापर करून संपूर्ण गोपनीयता सक्षम करण्यात आली आहे. त्यामुळे ही करन्सी जास्तीत जास्त लोकप्रिय झाली.

8. स्टेल्लर (Stellar)

जेड मॅककालेब (Jed McCaleb) यांनी मुक्त-स्त्रोत नेटवर्क स्टेल्लर स्थापना केली आणि २०१४ मध्ये स्टेल्लरचे मूळ चलन तयार केले. स्टेल्लर हे एक मध्यस्थ चलन आहे, जे चलन विनिमय सुलभ करते. Steller वापरकर्त्यास त्यांची स्वतःची कोणतीही चलन वेगळ्या चलनात असलेल्या कोणाकडे पाठविण्याची परवानगी दिली जाते.

हे नक्की वाचा:- ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.

क्रिप्टोकरन्सीचे फायदे

1) क्रिप्टोकरन्सी नॉर्मल डिजिटल पेमेंट पेक्षा सुरक्षित आहे.

2) यामधून व्यवहार करताना खूप कमी फी आकारली जाते.

3) यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूप प्रमाणात असते.

4) क्रिप्टोकरन्सी बनवताना वेगवेगळ्या अल्गॉरिथ्मचा उपयोग केला जातो, त्यामुळे अकाऊंट खूप सुरक्षित राहते.

5) यामध्ये सरकारचे कोणतेही कंट्रोल नसते, त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे मार्केट २४×७×३६५ चालू असते.

6) क्रिप्टोकरन्सी मधून तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्ती ला जलद गतीने पैसे पाठवू शकता.

क्रिप्टोकरन्सीचे तोटे

1) cryptocurrency यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम आणि कायदे नाही आहेत. प्रत्येक देशामध्ये क्रिप्टोकरन्सीचे वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूप प्रमाणात आहेत.

2) क्रिप्टोकरन्सी मधून एकदा व्यवहार (transaction) केल्यावर ते रिव्हर्स करने अशक्य आहे. कारण ह्यामध्ये पेमेंट रिव्हर्स करण्याचा कोणताही ऑप्शन उपलब्ध दिलेला नाहीय.

3) क्रिप्टोकरन्सी ही स्थिर नाहीय. कारण बिटकॉइन चा दर हा रोज वर खाली होत असतो. त्यामुळे कधी नफा तर कधी तोटा होतो.

4) यामध्ये रोज चोरी, फसवणूक, हॅक्स आणि पैशांच्या गैरव्यवहाराचा प्रकार खूप जोरात सुरू आहे.

5) क्रिप्टोकरन्सी मध्ये कोणत्याही सरकारचे किंवा बँकेचे कंट्रोल नसते, त्यामुळे जर आपली कधी फसवणूक झाली तर आपला कोणाशीही संपर्क साधू शकत नाही.

हे नक्की वाचा:

आजच्या लेखात आपण क्रिप्टोकरन्सी काय आहे?(cryptocurrency meaning in Marathi) आणि क्रिप्टोकरन्सी चे प्रकार ह्या बद्दल संपूर्ण माहिती मराठी भाषेत जाणून घेतली. तसेच वरील माहिती वाचून तुम्हाला जगातील क्रिप्टोकरन्सी ह्या आभासी चलना विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल व ती तुम्हाला समजली असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करायला विसरू नका. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तंत्रज्ञान विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

Leave a Comment