UPI Apps वरून ऑनलाईन पेमेंट करताना अश्या प्रकारे काळजी घ्या!

UPI Payment Tips in Marathi: भारतात ऑनलाईन पेमेंट चे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाइन पेमेंट करताना कश्या प्रकारे काळजी घ्यावी?(UPI Payment Tips in Marathi) त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतात अगोदरपासून ऑनलाईन पेमेंट केले जाते. नेट बँकिंग, RTGS, NEFT, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अश्या पद्धतीने ऑनलाईन पेमेंट केले जायचे. परंतु UPI प्रणाली आल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार अधिक वाढले आहेत. प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन मधून UPI सिस्टीम च्या आधारे ऑनलाईन व्यवहार करत आहेत.

NPCI द्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या UPI म्हणजेच Unified Payment Interface सिस्टीम वरून अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट केले जात आहे. PhonePe, Google Pay, Mobikwik, Paytm, Freecharge सारख्या UPI आधारित ऑनलाईन पेमेंट ॲप्स वरून प्रत्येक व्यवहार केले जात आहेत. भारतात UPI प्रणाली ने क्रांती घडवून आणली आहे.

UPI व्यवहारांमध्ये Phonepe आणि Google Pay ह्यांचे सर्वात जास्त मार्केट शेअर आहे. PhonePe चे 46.3% आणि Google Pay चे 36.4% इतके मार्केट शेअर आहे. ऑनलाइन पेमेंट करणे जेवढे सोपे आहे, तेवढेच त्यात सतर्क राहणे सुद्धा गरजेचे आहे. कारण तुम्ही थोडासा सुद्धा मूर्खपणा केलात, तर तुमच्या बँक खात्यातील रक्कम पूर्णपणे संपू शकते.

कारण तुमच्या मेसेज मध्ये तुम्हाला अनेक फ्रौड लिंक येतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग आजच्या लेखामध्ये आपण ऑनलाइन पेमेंट करताना कश्या प्रकारे काळजी घ्यावी? त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

UPI Apps वरून ऑनलाईन पेमेंट करताना अश्या प्रकारे काळजी घ्या! (UPI Payment Tips in Marathi)

1. स्वतःच्या स्मार्टफोन वरून ऑनलाईन पेमेंट करा.

सध्याच्या परिस्थितीत तुमचा मोबाईल फोन हा तुमचे वॉलेट आणि बँक खाते आहे. त्यामुळे व्यवहारादरम्यान थोडासा निष्काळजीपणा झाला तरी तुम्ही सहज सायबर फसवणूक होऊ शकते. त्यामुळे मोबाईल अॅप वापरताना सतर्क राहणे आणि सुरक्षेशी संबंधित उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण एखाद्या वेबसाईट वरून ऑनलाईन प्रॉडक्ट खरेदी करतो किंवा कोणतीही ऑनलाईन सर्व्हिस खरेदी करतो. जसे की, वेब होस्टींग, ऑनलाईन कोर्सेस सारख्या ऑनलाईन सर्व्हिसेस खरेदी करतो, तेव्हा आपल्याला वेबसाईट वरून ऑनलाईन पेमेंट करावे लागते. त्यावेळी तुम्ही स्वतःच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वरून ऑनलाईन पेमेंट करा. ज्यामुळे तुमचे पेमेंट डिटेल्स दुसऱ्या व्यक्तींना मिळणार नाही.

2. ऑनलाइन पेमेंट करून झाल्यावर मोबाईल मधील Browser History डिलीट करा.

प्रत्येक व्यक्ती Google वर काही गोष्ट सर्च करण्यासाठी Chrome किंवा Bing ब्राऊझर वापरतात. त्यामुळे जेव्हाही ऑनलाईन पेमेंट करून झाले की, ब्राऊझर मधील History डिलीट नक्की करा. ज्यामुळे तुम्ही ज्या वेबसाईट वर ऑनलाईन पेमेंट केले आहे. त्या वेबसाईटचे caches, url डिलीट होतील. ज्यामुळे सायबर हल्ल्याचा धोका राहणार नाही.

3. UPI Address कोणालाही शेअर करू नका.

जेव्हा तुम्ही UPI ॲप्स वरून जसे की, PhonePe, Paytm किंवा Google Pay वर अकाउंट बनवता. तेव्हा तुम्हाला एक UPI ID बनवावा लागतो. UPI Id चा उपयोग पेमेंट पाठवण्यासाठी किंवा रिसिव्ह करण्यासाठी केला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला UPI ID देऊ नका. Cyber फसवणूक टाळण्यासाठी तुमचा UPI ID कामाव्यतिरिक्त इतरांना देऊ नका.

तसेच कोणत्याही व्यक्तीला किंवा बँक ऑफिसर ला तुमचे UPI अकाउंट वापरायला देऊ नका. अनेक वेळा बँक किंवा पेमेंट App कंपनीकडून फोन येतात, आणि तुम्हाला तुमच्या डिजिटल व्यवहारांशी संबंधित माहिती विचारतात. मात्र, त्यांच्यासोबत अजिबात कोणतीही माहिती शेअर करू नका. कारण हे कॉल फसवे असतात.

4. UPI App नेहमी अपडेट ठेवा.

मोबाईल मध्ये असलेले प्रत्येक ॲप लेटेस्ट व्हर्जन मध्ये अपडेटेड असणे आवश्यक आहे. ज्यामुळे ॲप मधील काही प्रॉब्लेम्स किंवा bugs सुधारून ॲप चांगल्या प्रकारे काम करतो. त्यासोबत ॲप ची सुरक्षा अधिक मजबूत होते. तसेच काही नवीन फिचर्स सुद्धा वापरायला मिळतात. त्यामुळे कोणतेही पेमेंट करण्याअगोदर UPI App अपडेटेड आहे की नाही, ते एकदा नक्की चेक करा.

5. एकापेक्षा अधिक युपीआय अॅप्सचा वापर करू नका!

डिजिटल पेमेंट किंवा व्यवहारांसाठी एकपेक्षा अधिक अॅप्स वापरू नका. कारण अनेक अॅप वापरताना चूक होण्यास वाव असतो. अॅपमध्ये काही समस्या असल्यास हेल्प सेंटरची मदत घ्या. याबाबतीत बाहेरच्या कोणाचीही मदत घेऊ नका.

6. अनोळखी लिंक (Unknown Link) क्लिक करू नका.

तुमच्या Text मेसेज मध्ये किंवा व्हॉट्सॲप वर तुम्हाला कोणत्याही पेमेंट लिंक येतात. ह्या लिंक फसव्या असतात, त्यामुळे ह्या लिंक्स वर क्लिक केले तर तुमचे सर्व बँक डिटेल्स हॅकर्स ना मिळू शकतात.त्यामुळे Verified Link वरच क्लिक करून तुमचे पेमेंट करा. फसव्या लिंक वर तुम्ही कधीही क्लिक करू नका आणि तुमचा UPI Pin आणि Debit Card नंबर कोणाशीही शेअर करू नका. बँक कधीही पिन, ओटीपी किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाहीत.

हे नक्की वाचा:

▪️ ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.

▪️ Marathi Keyboard Apps | मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी हे मराठी कीबोर्ड वापरा!

वर दिल्या प्रमाणे तुम्ही UPI पेमेंट करताना काळजी घेऊ शकता. त्यामुळे तुमचे बँक खाते व UPI खाते सुरक्षित राहण्यास मदत होईल. हा लेख तुमच्या मित्र मैत्रिणींना व नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Leave a Comment