व्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन मिळवा काही सेकंदात! जाणून घ्या संपूर्ण माहिती


Get a business loan from WhatsApp in seconds! (Marathi) : व्हॉट्सअँप हे भारतातील सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया ऍप आहे. व्हॉट्सअँप वरून आपण अनेक सरकारी तसेच प्रायव्हेट कंपन्यांशी संपर्क साधू शकतो. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर आता बिझनेस लोन मिळणार आहे तेही काही सेकंदात!

अनेकदा काही ठराविक कामांसाठी, नोकरीसाठी किंवा एखाद्या छोट्याश्या बिझनेस साठी आपल्या लोन ची गरज पडते. बँकेत जाऊन लोन घेण्यासाठी अनेक महिने लागतात. त्यात योग्यता असेल तर लोन मिळतो नाहीतर रखडते आपले संपूर्ण काम. परंतु आता तुमचं हे टेन्शन जवळ-जवळ संपलं कारण तुम्ही आता कर्ज पटकन घेऊ शकणार आहात.

तुम्हाला काही मिनिटात कर्ज मिळू शकते. तसेच त्यासाठी तुम्हाला फक्त एक Android phone आणि WhatsApp ची गरज आहे. तुम्हाला व्हॉट्सअँप वरून 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

बिझनेस करू इच्छिणाऱ्यांसाठी NBFC IIFL या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. आवश्यक कागदपत्रे (documents) उपलब्ध करून दिल्यानंतर, अवघ्या काही मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंतचं लोन ही कंपनी ग्राहकांना देणार आहे.

व्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन घेण्यासाठी काय करावे लागेल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

» तुमच्या मोबाईल मधील WhatsApp ओपन करा. जर update केले नसेल, तर Update करून घ्या.

» त्यानंतर मोबाईल च्या Contacts मध्ये +91-9019702184 हा नंबर सेव्ह करून घ्या.

» त्यानंतर सेव्ह केलेल्या नंबर वर व्हॉट्सअ‍ॅप वरून “Hii” असा मेसेज करा.

» त्यानंतर तुमच्या बिझनेस संबंधित किंवा तुम्हाला कशा संदर्भात लोन हवे आहे त्याची माहिती द्या. नंतर तुमच्याकडे सरकारी कागदपत्रे मागितली जातील.

» कागदपत्रे चेक करून झाल्यानंतर तुमचा सीबिल स्कोअर तपासला जाईल. त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल.

टीप: तुम्हाला लोन मिळवण्यासाठी तुमचे बँक डिटेल्स द्यावे लागतील.

हे नक्की वाचा:

अश्या प्रकारे तुम्ही काही मिनिटात व्हॉट्सअ‍ॅपवरून बिझेनस लोन मिळवू शकता. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ही सुविधा सर्वांना आपल्या स्वप्नांना पुढे नेण्यासाठी बळ देईल. व्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन मिळवताना सर्व माहिती व्यवस्थितरीत्या द्या. त्यामुळे पुढे काही अडचण येणार नाही.

Leave a Comment