यूट्यूब कडून भारतात यूट्यूब प्रीमियम चा वार्षिक प्लॅन जाहीर!

YouTube Premium New Yearly Plans: भारतात यूट्यूब प्लॅटफॉर्म चे अनेक वापरकर्ते आहेत. यूट्यूब हे फक्त व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म राहिले नसून कंटेंट क्रिएटर प्लॅटफॉर्म बनले आहे. यूट्यूब वर अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. यूट्यूब वर व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर Advertisement पहावी लागते. त्यामुळे कधी कधी कंटाळा येतो.

यूट्यूब ने YouTube Premium आणि YouTube Music साठी Ad-Free प्लॅन जाहीर केले आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या अगोदरच्या वार्षिक प्लॅन ची किंमत कमी करून एक नवीन किंमत जाहीर केली आहे. नवीन किंमत 1159/- इतकी आहे. ही ऑफर फक्त 23 जानेवारी पर्यंत असणार आहे. तसेच ही ऑफर (YouTube Premium New Yearly Plans) एका युजर साठी आहे. तसेच युजर पहिल्यांदाच यूट्यूब प्रीमियम खरेदी करणार असेल, त्या व्यक्तीसाठी ही ऑफर आहे. ऑनलाईन पेमेंट साठी तुम्हाला सर्व पेमेंट प्रकार उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये UPI सुद्धा आहे.

यूट्यूब प्रीमियम मध्ये तुम्हाला सर्व सुविधांचा फायदा मिळतो. जसे की, Ad-Free Music & Videos, यूट्यूब म्युसिक वरील सर्व गाणी, बॅकग्राऊंड व्हिडिओ प्ले करणे, इत्यादी गोष्टींचा लाभ मिळतो. यूट्यूब प्रीमियम मध्ये मासिक, 3 महिन्यांचे असे अनेक प्लॅन्स आहेत. पण हा वार्षिक प्लॅन सर्वात बेस्ट आणि फायदेमंद आहे.

Leave a Comment