बिटकॉईन काय आहे? बिटकॉईन चे फायदे आणि तोटे!

bitcoin meaning in marathi: तुम्ही प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ह्या विषयावरील एक तरी पोस्ट किंवा आर्टिकल पाहिले असेलच. कारण आताच्या डिजिटल युगात नवनवीन गोष्टी घडत असतात. तसेच त्या काही कालावधीतच त्यांचा जलवा दाखवतात. आताच्या काळात तंत्रज्ञान नसेल तर सर्व काही ठप्प आहे. तसेच बिटकॉइन हे सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा प्रकार आहे.

बिटकॉइन हे एक डिजिटल चलन (Currency) आहे.
बिटकॉइन आजच्या काळात खूप लोकप्रिय होत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा बिटकॉइनला जास्त किंमत नव्हती. पण आज प्रत्येक व्यक्ती बिटकॉइन खरेदी करण्यासाठी तयार आहे. पण बिटकॉइन कसा खरेदी करायचा? तसेच बिटकॉइन कसे काम करतो. त्यासोबत बिटकॉइन चे फायदे आणि तोटे काय आहेत, या बद्दल सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

बिटकॉइन काय आहे? bitcoin meaning in marathi

बिटकॉइन (Bitcoin) ही एक डिजिटल करंसी आहे. त्याला सोप्प्या भाषेत इंटरनेट करंसी असेही म्हटले जाते. या चलना द्वारे पैसे जगभरात कुठेही पाठवता येतात. बिटकॉइनला आपण आपल्या घरी किंवा वॉलेट मध्ये ठेव शकत नाही. कारण बिटकॉइन ही एक नोट किवा कॉइन नाहीय. बिटकॉइनचा वापर आपण फक्त ऑनलाइन करू शकतो.

बिटकॉइन एक विकेंद्रित करंसी आहे. कारण ह्या करंसीला कंट्रोल करण्यासाठी कोणतीही अथॉरिटी, गवर्नमेंट किंवा बँकेची गरज पडत नाही. बिटकॉइन ही करंसी पीयर टू पीयर (Peer To Peer) नेटवर्क वर काम करते.

म्हणजे कधी कोणत्या व्यक्तीला बिटकॉइन खरेदी करायचे असेल, तेव्हा तो व्यक्ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यांच्या माध्यमातून सरळ ट्रांसिक्शन करू शकतो. बिटकॉइन चा आविष्कार संतोषी नाकामोतो या
ने 2009 मध्ये केला होता. तसेच तेव्हा पासून लोकं बिटकॉइन चा वापर खूप प्रमाणात करत आहेत.

▪️ एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?


बिटकॉइनची किंमत किती आहे?

वरील माहिती मध्ये आपण बिटकॉइन काय आहे ह्याबद्दल माहिती जाणून घेतली. पण एका बिटकॉइनची किंमत किती आहे? हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. आजच्या काळात म्हणजे May 2021 पर्यंत एका बिटकॉइनची किंमत 35,54,901 INR आहे. ही किंमत फिक्स नसते. यामध्ये वरचढ होत असते.

बिटकॉइनची ची आजची किंमत जाणून घेण्यासाठी गूगल मध्ये “Bitcoin Current Price” असे सर्च करून बिटकॉइनची आजची किंमत जाणून घेऊ शकता.


बिटकॉइन वॉलेट काय आहे ?

आपण बिटकॉइनला आपल्या घरी किंवा कोणत्याही वॉलेट मध्ये साठवून ठेवू शकत नाही. कारण बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे. बिटकॉइनची स्टोअर करण्यासाठी बिटकॉइन वॉलेटची गरज लागते.

इंटरनेट व गूगल प्ले स्टोअरवर अनेक Apps, क्लाउड बेस वॉलेट आणि सॉफ्टवेअर आहेत. ज्यामध्ये ऑनलाईन अकाऊंट तयार करून त्यामध्ये बिटकॉइन स्टोअर करू शकतो.

▪️ FASTag म्हणजे काय? FASTag चा वापर कसा करावा?


बिटकॉइन वॉलेट कसे काम करते ?

बिटकॉइन विकत घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक बिटकॉइन खाते तयार करावे लागते. बिटकॉइन चे खाते उघडल्यानंतर आपल्याला एक युनिक address मिळतो. ह्या युनिक address वरून लॉग इन करून आपण बिटकॉइन विकत घेऊ शकतो.

विकत घेतलेले बिटकॉइन आपल्या वॉलेट मध्ये स्टोअर करू शकतो. जेव्हा आपल्याला बिटकॉइन विकल्यानंतर मिळालेलं पैसे बँकेत ट्रान्स्फर करण्यासाठी बिटकॉइन वॉलेट ची गरज लागते. तसेच बिटकॉइन वॉलेट वरून पैसे पाठवता येतात.

▪️ पॉडकास्ट म्हणजे काय?


बिटकॉइन कुठून विकत घ्यायचे?

बिटकॉइन विकत घेणे खूप सोप्पे आहे. आपण कपडे विकत घेण्यासाठी किंवा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जसे ऑनलाईन पेमेंट करतो, त्याच पद्धतीने तुम्ही बिटकॉइन विकत घेऊ शकता.

भारतामध्ये बिटकॉइन विकत घेण्यासाठी अनेक लोकप्रिय वेबसाइट्स आहेत. त्यावरून तुम्ही बिटकॉइन विकत घेऊ शकता. तसेच त्याच वेबसाईट वरून तुम्ही बिटकॉइन विकू सुद्धा शकता.

खाली काही वेबसाइट्स ची नावे दिली आहेत. ज्यावरून बिटकॉइन विकत घेऊ शकता.

  • Guarda Wallet
  • Zebpay
  • WazirX
  • Unocoin

तसेच वेबसाईट वर Sign Up करण्यासाठी तुम्हाला वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, बँक अकाऊंट डिटेल्स ह्या डॉक्युमेंट्स ची आवश्यकता लागेल.


बिटकॉइन चे फायदे

बिटकॉइन चे अनेक चांगले फायदे आहेत. बिटकॉइन वॉलेट मधून बिटकॉइन पाठवण्यासाठी खूप कमी फी लागते. बिटकॉइनला आपण जगामध्ये कुठेही खरेदी किंवा विक्री करू शकतो. यामध्ये Long Term Investment सुद्धा करू शकतो.

बिटकॉइन खरेदी करणे किंवा विक्री करण्यावर गवर्नमेंट लक्ष नाही ठेवू शकत. बिटकॉइन अकाऊंट कधीही ब्लॉक होत नाही, जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बँक काही कारणास्तव ब्लॉक करते.


बिटकॉइन चे तोटे

बिटकॉइन कंट्रोल करण्यासाठी कोणतीही बँक, गवर्नमेंट किवा कंट्रोल अथॉरिटी नसते. त्यामुळे याची किंमत कमी जास्त होत असते. जसे आपले बँकेचे खाते कंट्रोल करण्यासाठी बँक, हाय सिक्युरिटी असते. तसे इथे काहीही नसते.

जर तुमचे बिटकॉइन अकाऊंट हॅक झाले, तर तुमचे सगळे बिटकॉइन जाऊ शकतात आणि गवर्नमेंट तुमची काहीच मदत करू शकत नाही. त्यामुळे तुमचे सर्व बिटकॉइन वाया जाऊ शकतात.

हे नक्की वाचा:

▪️OTT म्हणजे काय? जाणून घ्या ओटीटी बद्दल संपूर्ण माहिती!

▪️आधार कार्ड पॅन कार्ड ला अश्याप्रकारे लिंक करा!


वरील लेखात आपण बिटकॉईन काय आहे? बिटकॉईन चे फायदे आणि तोटे! (bitcoin meaning in marathi) हे जाणून घेतले. तसेच ही माहिती वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञानाविषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

Leave a Comment