टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर, या कंपनीकडून ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर्स!


रिलायन्स जिओ आल्यापासून इंटरनेट चा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला. रिलायन्स जिओ च्या येण्याने प्रत्येकाला त्याच्या बजेट मधील इंटरनेट पॅक विकत घेणे शक्य झाले. त्यामुळे ग्राहक रिलायन्स जिओ कडे वळू लागले व त्यांनी अन्य टेलिकॉम कंपन्यांना पाठ दाखवली. म्हणून देशातील एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (Vi) ह्या कंपनीनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त प्लॅन (Monthly Recharge Plans) देणे सुरू केले.

एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्याचा एक २४९ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये कोणती कंपनी जास्त बेनिफिट देते ते आपण पाहूया.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ह्या कंपन्यांकडे अनेक जबरदस्त आणि दमदार रिचार्ज प्लॅन आहेत. या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना अनेक फायदे आहेत. टेलिकॉम कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी असे जबरदस्त प्लॅन आणत असते. हा रिचार्ज प्लॅन ₹249 रुपयांचा आहे. ₹249 रुपयांच्या प्लॅन संबंधी आपण जाणून घेऊया.


Jio चा ₹249 चा रिचार्ज प्लॅन:-

जिओच्या 249 रुपयांच्या प्लॅन मध्ये रोज 2 GB डेटा मिळतो. तसेच ह्याची वैधता 28 दिवसांची आहे. ह्या प्लॅन मध्ये एकूण 56 GB डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. त्यासोबत 100 SMS ची सुविधा मिळते. तसेच ह्या प्लॅन मध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.


Airtel चा ₹249 चा रिचार्ज प्लॅन:-

एअरटेल च्या ₹249 च्या व्हॅल्यू प्लॅन मध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. ह्या प्लॅन ची वैधता 28 दिवसांची आहे. एकूण 42 GB डेटा दिला जातो. ह्या प्लॅन मध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. जिओच्या तुलनेत हा प्लान थोडा कमीच आहे.


Vodafone idea चा (Vi) ₹249 चा रिचार्ज प्लॅन:

वोडाफोन आणि आयडिया ह्या दोन वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी एका कंपनीत रूपांतर केले आहे. तेव्हा पासून ही कंपनी ग्राहकांसाठी विशिष्ट प्लॅन (Monthly Recharge Plans) आणत आहे. ह्यांचा सुद्धा एअरटेल, जिओ सारखा प्लॅन आहे. ₹249 चा 1.5 GB डेटा दररोज मिळतो. तसेच 28 दिवसांच्या वैधतेसोबत एकूण 42 GB डेटा मिळतो.

तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याचा फायदा मिळतो. बाकीच्या टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन थोडा कमी सुविधेचा आहे. वोडाफोन-आयडिया च्या प्लॅन मध्ये रोज रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड डेटा वापरता येतो.

ह्या ऑफर ला BINGE ALL NIGHT OFFER असे म्हंटले जाते. तसेच विकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. त्यासोबत 5 GB एक्स्ट्रा डेटा मिळतो. याशिवाय Vi Movies & TV चे क्लासिक access मिळते.


ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

Leave a Comment