आधार कार्ड पॅन कार्ड ला अश्याप्रकारे लिंक करा!

How to link Aadhar Card to PAN Card in Marathi: आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्यासाठी भारत सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत मुदत दिली आहे.

31 मार्च 2022 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक केले नाही, तर ₹1000 पर्यंत दंड भरावा लागेल. तसेच जर लिंक केले नाही, तर तुमच्या सरकारी कामात तुम्हाला पॅन कार्ड चा वापर करता येणार नाही.

आजच्या लेखामध्ये आपण mobile वरून आधार कार्ड पॅन कार्ड ला कसे लिंक करायचे? (How to link Aadhar Card to PAN Card in Marathi) ह्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड पॅन कार्ड ला कसे लिंक करायचे? | How to link Aadhar Card to PAN Card in Marathi

Step 1 – त्यासाठी सर्वात अगोदर इन्कम टॅक्स e-Filing या वेबसाइटला भेट द्या.👇🏻
Link:- www.incometaxindiaefiling.gov.in

◾Step 2 – डाव्या बाजूला Quick Links दिलेले असेल. त्याच्या खालील “Link Aadhar” ह्या पर्यायावर क्लिक करा.

◾Step 3 –  नंतर एक पेज ओपन होईल. तिथे तुमच्या पॅन कार्ड चा नंबर, आधार कार्ड नंबर आणि तुमचे नाव (आधार कार्डवर असलेले), ही सर्व माहिती भरून घ्या.

Step 4 – तुमच्या आधार कार्ड वर जन्म तारखे ऐवजी फक्त जन्म वर्ष असेल, तर “I have only year of birth in Aadhar card” समोरच्या बॉक्स वर क्लिक करा. त्यानंतर ‘i agree to validate my Aadhaar details with UIDAI’ च्या समोरील बॉक्स वर टिक करा.

Step 5 – त्यानंतर तिथे दिलेला Captcha Code लिहून घ्या किंवा तुमचा नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाकून Request OTP वर क्लिक करून तो OTP तिथे भरून घ्या.

◾Step 6 – हे सर्व झाल्यावर खाली दिलेल्या Link Aadhaar वर क्लिक करा.

Step 7 – तुमच्या स्क्रीन वर “Successfully linked Aadhar with PAN Card” हा मेसेज येईल.

अश्याप्रकारे तुम्ही इन्कम टॅक्स च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Aadhaar Card हे PAN Card ला लिंक करू शकता.


आधार कार्ड पॅन कार्ड ला SMS द्वारे लिंक कसे करायचे?

आधार कार्ड पॅन कार्ड ला SMS द्वारे सुद्धा लिंक करू शकतो. त्यासाठी खालील पद्धत वापरा.

वरील पद्धत जर तुम्हाला जमत नसेल किंवा तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तरीही सुद्धा तुम्ही SMS द्वारे आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करू शकतो.

◾Step 1 – तुमच्या मोबाईल वर “UIDAIPAN <12 अंकी आधार नंबर > <10 अंकी पॅन नंबर >” असा मेसेज टाईप करून खाली दिलेल्या दोन नंबर पैकी एका नंबर वर पाठवा.

◾Step 2 – तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वरून वर दिलेला मेसेज 567678 किवा 56161 ह्या दोन नंबर वर पाठवू शकता.

अश्या प्रकारे तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ला घरबसल्या वरील दिलेल्या दोन पद्धतींचा वापर करून करू शकता.


पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे?

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केल्यानंतर ते व्यवस्थित Link झाले आहे का? हे एकदा नक्की चेक करून घ्या. ते कसे चेक करायचे  याविषयी आपण डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

◾Step 1 – पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇🏻
Link ➡️: https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status

◾Step 2 – त्यानंतर तुमचा पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर भरून घ्या.

◾Step 3 – आता “View Link Aadhaar status” वर क्लिक करा. अश्याप्रकारे तुम्हाला तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड स्टेटस लिंक केलेले आहे का ते दिसेल.


वरील माहिती वाचून तुम्हाला मोबाईल वरून आधार कार्ड पॅन कार्ड ला कसे लिंक करायचे? (How to link Aadhar Card to PAN Card in Marathi) ह्या बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना व तुमच्या सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

तंत्रज्ञाना विषयी संपूर्ण माहिती साठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा. तसेच आम्हाला Instagram वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment