कीबोर्ड मध्ये Qwerty फॉरमॅट का वापरला जातो? | (Qwerty Keyboard) जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Keyboard मध्ये Qwerty format का वापरला जातो?(Why Qwerty format is used in Keyboard?) ह्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच हा कीबोर्ड फॉरमॅट वापरण्यामागे कोणते कारण असेल ते सुद्धा जाणून घेऊया.

संगणक वापरताना आपण कीबोर्ड चा वापर आवर्जून करतो. शाळेत असल्यापासून ते नोकरीवर काम करेपर्यंत आपण एकदा तरी कीबोर्ड वापरला असेल. कीबोर्ड चा वापर करताना आपल्याला A to Z अक्षरे शोधायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आपले काम रखडले जाते.

कीबोर्ड वर A to Z अक्षरे उलटी सुलटी दिलेली असतात. त्यामुळे खूप वेळ अक्षरे शोधण्यातच निघून जातो.

तुम्ही कधी विचार केला आहे का? की कीबोर्ड बनवणारा अक्षरे एबीसीडी फॉरमॅट मध्ये देण्या ऐवजी उलटी-सुलटी का दिली असतील. ABCD फॉरमॅट मध्ये कीबोर्ड दिले असते, तर आज टायपिंग किती सोपे झाले असते!

चला तर मग ह्या मागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.

Keyboard मध्ये Qwerty format का वापरला जातो? (Why QWERTY format is used in Keyboard?)

Also Read: गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?

QWERTY फॉरमॅट चा वापर पूर्वीपासून केला जात आहे. संगणक कीबोर्ड येण्याच्या अगोदर टाइपरायटरचा (Typewriter) वापर केला जायचा. सरकारी कामांपासून ते प्रायव्हेट जॉब्स पर्यंत टाइपरायटरचा वापर करण्यात यायचा.

टाइपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शोल्सने 1868 मध्ये सर्वप्रथम ABCD ह्या फॉरमॅट मध्ये Keyboard बनवला. पण थोड्याच दिवसात त्यांना त्या कीबोर्ड वरून व्यवस्थित व जास्त वेगाने टायपिंग होत नसल्याचे आढळून आले.

Qwerty keyboard
Qwerty Keyboard [image credits – Pixabay]

संगणक किंवा कीबोर्ड येण्या अगोदरच QWERTY फॉरमॅट वापरला जात आहे. 1868 मध्ये, टाइपरायटरचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर लॅथम शोल्सने प्रथम एबीसीडीई… फॉरमॅटवर कीबोर्ड बनवला. पण त्याला अपेक्षित गतीने आणि सोयीस्कर टायपिंग होत नसल्याचे दिसून आले. यासोबतच की बाबत इतरही अनेक समस्या समोर येत होत्या.

Also Read: UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे?

कीबोर्डसाठी QWERTY फॉर्मेट का निवडण्यात आले?

ABCD मध्ये असलेल्या कीबोर्डच्या रचणेमुळे टाईपरायटर वरून वेगाने टाईप करणे अवघड होत होते. ए-बी-सी-डी फॉरमॅट मध्ये टाईप करताना कीबोर्ड ची बटणे एकमेकांच्या खूप जवळ होती. त्यामुळे टाईप करताना हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतायची. त्यामुळे टायपिंग करणे कठीण होते.

तसेच, इंग्रजीमध्ये टाईप करताना. काही अक्षरांचा वापर जास्त प्रमाणात होतो, जसे की ( M,E,I,S ). तर काही अक्षरांचा वापर कमी केला जातो, जसे की (X, Z).

अनेक अयशस्वी प्रयोगांनंतर 1870 मध्ये कीबोर्ड ला QWERTY स्वरूप देण्यात आले. ह्या प्रयोगांच्या दरम्यान कीबोर्ड चे आणखीन एक स्वरूप लॉन्च करण्यात आले. त्या कीबोर्ड फॉरमॅट चे नाव – Dvorak Model.

Also Read: व्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन मिळवा काही सेकंदात! जाणून घ्या संपूर्ण माहिती

पण काही कारणांमुळे हा कीबोर्ड फॉरमॅट जास्त काळ प्रसिद्ध राहिला नाही. त्यामुळे लोकांना QWERTY Keyboard ला वापरणे सोयीस्कर वाटले. त्यामुळे आता संगणक कीबोर्ड ते स्मार्टफोन मधील कीबोर्ड सर्व ठिकाणी QWERTY Keyboard फॉरमॅट वापरण्यात येते.

Qwerty Keyboard Layout

Qwerty Keyboard
Qwerty keyboard Layout [image credits – Wikipedia]

तर तुम्हाला Keyboard मध्ये Qwerty format का वापरला जातो? (Why Qwerty format is used in Keyboard?) ह्याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. तसेच तुम्हाला QWERTY कीबोर्ड फॉरमॅट वापरण्यास कसा वाटतो. ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Also Read: Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!


तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment