Bot म्हणजे काय? Bot चा उपयोग कुठे केला जातो?


Bot म्हणजे काय? तसेच Bot चा उपयोग कुठे कुठे केला जातो? तसेच Bot चा अर्थ काय आहे? (What is Bot in Marathi) ह्याबद्दल संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत.

जगभरात इंटरनेट आणि तंत्रज्ञानामध्ये नवनवीन शोध लागताना दिसत आहेत. नवीन तंत्रज्ञान, नवीन गॅजेट्स, आधुनिक कॉम्प्युटर, स्मार्टफोन, कॅमेरा टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर ह्या गोष्टी आजच्या काळात खूप लोकप्रिय आहेत.

हल्ली वाढत असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर मोबाईल मधील व्हिडिओ गेम्स मध्ये केला जातो. पूर्वीच्या व्हिडिओ गेम्स मधील ग्राफिक्स आणि अनिमेशन मध्ये आणि आत्ताच्या ग्राफिक्स आणि अनिमेशन मध्ये खूप फरक आहे.

तसेच हल्ली व्हिडिओ गेम्स मध्ये नवं नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. त्यात तुम्ही बॉट (Bot) ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेले ऐकले असेलच. तुम्ही कॉल ऑफ ड्युटी, pubg किंवा Free fire सारखे गेम्स खेळताना Bot बद्दल ऐकलेच असेलच. पण हे नक्की आहे तरी काय? त्याबाबत आपण आजच्या लेखात जाणून घेऊया..


Bot म्हणजे काय? (Bot Meaning in Marathi)

बॉट म्हणजे एक स्वयंचलित संगणक प्रोग्राम होय. संगणकाच्या भाषेत बॉट ला एक स्वयंचलित संगणक प्रोग्राम असे म्हणतात. मानवाला जे काम एकाच वेळी की जास्त क्षमतेने करता येत नाही ते काम बॉट एकाच वेळेस किंवा वारंवार करू शकतो.

Bot चा फुल फॉर्म “Build Operate Transfer” असा होतो. बॉट चे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की, Internet Bot, Chat Bot, Social Bot, Video Game Bot असे अनेक बॉट चे प्रकार आहेत. ह्यांना इंटरनेट रोबोट, स्पाइडर्स, क्रॉलर, वेब बॉट अश्या नावांनी सुद्धा सुद्धा ओळखले जाते.

थोडक्यात, बॉट्स एखादी व्यक्ती जितकी वेगवान काम करतात, त्यापेक्षा जलद आणि सोपी कार्ये करतात. वेब क्रॉलिंगसाठी बॉट्सचा सर्वाधिक वापर केला जातो. सर्व वेब रहदारीपैकी निम्म्याहून अधिक रहदारी बॉट्सद्वारे नियंत्रित केली जाते.

आज इंटरनेट वर सगळीकडे बॉट्स असतात. काही बॉट्स उपयोगी असतात. जसे की गूगल सर्च इंजिन वर बॉट्स दर सेकंदाला किंवा मिनिटाला पोस्ट होणारे वेब पेजेस, कंटेंट, व्हिडिओज, माहिती इंडेक्स (index) करतात. त्यानंतर ते स्वतःच ते रंक करतात.

तसेच कोणत्याही कंपनीच्या वेबसाईट वरील Customer Support Chat Bot युजर्स च्या अडचणी चॅटिंग द्वारे QnA विचारून सोडवतात. ह्यांचा वापर दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

Bot Meaning in Marathi

त्यासोबत काही बॉट्स घातक आणि त्यांचा वापर नुकसान करण्यासाठी केला जातो. काही बॉट्स द्वारे कॉम्प्युटर हॅक करता येतो, पासवर्ड क्रॅक करता येतात. तसेच फोन कॉन्टॅक्ट, यूजर अकाऊंट पासवर्ड, स्पॅम्मिंग करण्यासाठी सुद्धा बॉट्स चा वापर केला जातो.

सर्वात मोठ्या सर्च इंजिन वर म्हणजेच Google Search Engine वर बॉट्स चा वापर केला जातो. त्या बॉट्स ना इंटरनेट बोट किंवा वेब बॉट असे म्हणतात. वेब कंटेंट, वेब पेजेस, यूट्यूब व्हिडिओज इंडेक्स करण्यासाठी किंवा रँक करण्यासाठी बॉट्स चा उपयोग केला जातो.


पब्जी मध्ये बॉट काय आहे? (Bot Meaning in Pubg Marathi)

व्हिडिओ गेम्स मध्ये सुद्धा बॉट्स चा वापर केला जातो. बॉट (Bot) चा उपयोग संगणका द्वारे व्हिडिओ गेम मधील एखाद्या Character ला नियंत्रित करण्यासाठी केला जातो. हे Bot जेव्हा एखादा प्लेअर नवीन गेम खेळण्यासाठी सुरुवात करतो. तेव्हा हे बॉट्स त्या प्लेअर सोबत विरूद्ध टीम मधून म्हणजेच कॉम्प्युटर कडून खेळतात.

तसेच कोणताही मल्टिप्लेयर गेम जसे की, Pubg Mobile किंवा Free fire. ह्यामध्ये तुमच्यासमोर कधी कधी काही प्लेअर्स खेळत असतात. ह्या प्लेअर्स ना किंवा Characters ना Bot Player असे म्हणतात. हे कॉम्प्युटर नियंत्रित प्लेअर असतात. ज्यांना व्हिडिओ गेम्स मध्ये खऱ्या प्लेअर्स सोबत खेळण्यासाठी प्रोग्राम केले जाते.

तसेच जेव्हा आपण एखादा ऑफलाईन गेम खेळतो. तेव्हा त्यामध्ये मल्टिप्लेयर मध्ये खेळताना समोरून खेळणारा Character किंवा Player एक बॉटच असतो.

हे सुद्धा नक्की वाचा:-

» Beta Version काय आहे? आणि Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे?

» Artificial Intelligence काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोण कोणते उपयोग आहेत?


Chat bot काय आहे? (What is Chat bot in Marathi)

चॅट बॉट हा पहिला स्वयंचलित प्रोग्राम आहे, जो ऑनलाइन चॅट रूममध्ये लोकप्रिय झाला. कोणताही यूजर बॉट किंवा चॅटबॉट ला प्रश्न विचारू शकतो किंवा चॅटबॉटला काही सूचना देऊ शकतो. चॅटबॉट हा कोणतेही काम किंवा विचारलेला प्रश्न जलदगतीने करू शकतो.

चॅटबॉटने दिलेली उत्तरे इन्स्टंट मेसेजिंग सारख्या स्वरूपात (format) असतात. चॅटबॉट हे मनुष्य आणि मशीन यांच्यात संप्रेषणाचे एक साधन बनते. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती चॅट बॉट ला काही प्रश्न विचारते, तेव्हा त्याचे उत्तर चॅटबॉट संदेश (Text) किंवा व्हॉईस मेसेज द्वारे देतो.

What is Chat bot in Marathi

एक चॅटबॉट एक सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन आहे. ज्यात एखादी व्यक्ती जेव्हा चॅटबॉट ला प्रश्न विचारते. तेव्हा तिला थेट संपर्क करण्याऐवजी त्या व्यक्तीला मजकूर किंवा मजकूर ते स्पीचद्वारे ऑनलाईन चॅटबॉट द्वारे मेसेज करून उत्तर दिले जाते.

चॅटबॉट हे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रियेच्या मिश्रणाद्वारे समर्थित आहे. चॅटबॉट चा अनेक प्लॅटफॉर्म वर उपयोग केला जातो. प्रत्येक प्रकारच्या बॉट चा वेगवेगळा वापर असतो.


ChatBot सपोर्ट करणाऱ्या ऑनलाईन वेबसाइट्स!

  • Videocon d2h
  • Swiggy
  • Zomato
  • PhonePe
  • Paytm
  • Hostinger
  • Facebook Messenger

बॉट्स कसे आणि काय काम करतात?

Bot चा उपयोग विविध प्रकारच्या कामांसाठी केला जातो. बॉट एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे. ज्याला एखादे कार्य करण्यासाठी प्रोग्राम केलेले आहे. Bot हे स्वतः कार्य करणारे असतात. म्हणजेच हे बॉट अगोदरपासून दिलेले निर्देशांचे पालन करून त्यानुसार कार्य करतात.

तसेच बॉट्स ना सुरू करण्यासाठी कोणत्याही मानवीय आधाराची आवश्यकता नसते. Internet Bot जास्त करून इंटरनेट नेटवर्क वर कार्य करतात. इंटरनेट बॉट सर्च इंजिन आधारित सर्व कामे करतात.

सर्च इंजिन द्वारा वेब क्रावलर्स (Web Crawlers) चा उपयोग रोजच्या रोज वेब पेजेस ना स्कॅन किंवा क्रॉल (Crawl) करण्यासाठी केला जातो. इंटरनेट बॉट वेब पेजेस स्कॅन करून स्वतः इंडेक्स करतात.

» स्मार्टवॉच म्हणजे काय? स्मार्टवॉच चे फीचर्स आणि फायदे!

जास्तीत जास्त बॉट (Bot) साधारपणे जो कामे वारंवार करायची असतात ती करतात. तसेच हे बॉट ती कामे कोणत्याही युजर पेक्षा अधिक वेगाने करू शकतात. हे बॉट स्क्रिप्ट प्रकारात असतात. म्हणजेच हे अगोदर प्रोग्राम करून ह्यामध्ये व्यवस्थित माहिती सेट केलेली असते.

त्यानुसार ती माहिती त्या-त्या वेळेस आपल्याला अचूक मिळते. जसे की, हवामानाची माहिती देणे, ऑनलाईन सर्च करणे, अलार्म सेट करणे, एखादी माहिती जाणून घेणे इत्यादी.

आपल्याकडे बर्‍याच मेसेजिंग अॅप्स आहेत, जसे की फेसबुक, व्हॉट्सअँप, इत्यादींमध्ये बॉट बघू शकता. तसेच काही ऍप मध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी बॉट मदत करतात.

Zomato, Swiggy सारखे ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप मध्ये कोणत्याही कस्टमर ला ऑनलाईन फूड बुकिंग करण्यासाठी Chat Bot दिलेले असतात. त्याच्या मदतीने कोणताही कस्टमर ऑनलाईन फूड बुक करू शकतो.

तसेच PhonePe, Paytm सारखे ऑनलाईन पेमेंट ऍप वर कोणताही अडथळा आल्यास कस्टमर सर्व्हिस सपोर्ट साठी ChatBot चा वापर केला जातो.

अनेक बॉट्स मनुष्यांसारखे काम करण्यासाठी प्रोग्राम केलेले असतात. जेव्हा तुम्ही बॉट सोबत चॅट करता तेव्हा तुम्हाला त्यांच्या हावभावावरून किंवा बोलण्यावरून असेच वाटते की समोरून एखादी व्यक्तीचं आपल्याला मदत करत आहे.

मी आशा करतो की तुम्हाला आजच्या लेखामध्ये Bot काय आहे? आणि Bot चा उपयोग कुठे कुठे केला जातो? ह्याबद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळाली असेल. तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा.

Leave a Comment