65W चार्जिंग सपोर्ट सह Oppo Reno 6 5G सीरिज झाली लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स


Oppo च्या लोकप्रिय सीरिज Reno मधील Oppo Reno 6 5G आणि Oppo Reno 6 Pro 5G हे दोन फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच झाले आहेत. ह्यामध्ये 65W चार्जिंग सपोर्ट असून ह्या दोन उत्तम कलर मध्ये ऑनलाईन उपलब्ध आहेत.

Oppo Reno 6 सीरिज मधील खास गोष्टी:

  • Oppo Reno 6 5G मध्ये ट्रीपल कॅमेरा सेट अप दिलेला आहे.
  • Oppo Reno 6 Pro 5G मध्ये है क्वाड रिअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन मध्ये 90Hz डिस्प्ले लेन्स दिलेली आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन दोन आकर्षित कलर मध्ये उपलब्ध आहेत.

Oppo Reno 6 5G आणि Oppo Reno 6 Pro 5G स्मार्टफोन्स भारतात ओप्पो रेनो सीरिज च्या लेटेस्ट एडिशन मध्ये लॉन्च केला आहे. नुकताच मे महिन्यात चायना मध्ये Oppo Reno 6 5G, Oppo Reno 6 Pro 5G आणि Oppo Reno 6 Pro+ 5G हे तीन स्मार्टफोन लाँच झाले होते. पण भारतात फक्त दोन स्मार्टफोन लाँच केले गेले. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 65W फास्ट चार्जिंग आणि दोन आकर्षक कलर ऑप्शन आहे.


भारतातील Oppo Reno 6 5G, Oppo Reno 6 Pro 5G ची किंमत (Oppo Reno 6 Series SmartPhones Price)

Oppo Reno 6 5G फोन च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडल ची किंमत 29,990 रुपये आहे. तसेच हा फोन 29 जुलै ला ऑनलाईन खरेदी साठी उपलब्ध होणार आहे.

Oppo Reno 6 Pro 5G फोन च्या 12GB RAM + 256GB STORAGE मॉडल ची किंमत 39,990 रुपये आहे. आणि ह्याची सेल 20 जुलै पासून सुरु होणार आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये ऑरोरा (Aurora) और स्टैलर ब्लॅक (Stellar Black) कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. ऑप्पो रेनो 6 सीरीज़ चे स्मार्टफोन्स तुम्ही Oppo online store, Flipkart, Reliance Digital, Vijay Sales, Croma, तसेच ऑफलाईन मार्केट मधून सुद्धा खरेदी करू शकता.

जर तुमच्याकडे HDFC Bank किंवा Bajaj Finserv चे कार्ड असेल तर त्यावरून जर तुम्ही Oppo Reno 6 सीरिज मधील फोन खरेदी केला तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

ओप्पो रेनो 6 सीरीज़ सोबत ओप्पो कंपनी ने नवीन ब्लू कलर चे Oppo Enco X true wireless stereo (TWS) ईयरबड्स सुद्धा लॉन्च केले आहेत.

ह्या फोन मध्ये 8GB Ram सोबत अधिक 5GB Ram Exapansion दिलेले आहे. हे खास oppo चे exclusive expansion आहे. ज्याने तुम्ही ह्या फोन मध्ये आजुन Ram वाढवू शकता.

Oppo Reno 6 5G specifications

Oppo Reno 6 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 11.3 वर काम करतो. फोन मध्ये 6.43 इंच FHD+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लैट एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. तसेच 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सैम्पलिंग रेट उपलब्ध आहे. ज्यामुळे फोन एकदम स्मूथ चालू शकतो.

तसेच स्मार्टफोन्स मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्या फोन मध्ये 8GB Ram आणि 128GB Storage दिलेली आहे. ट्रीपल कॅमेरा सेट अप सहा ह्यामध्ये 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP सेकंडरी सेन्सर आणि 2MP मायक्रो सेन्सर दिलेला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ह्यात फ्रंट साईड ला 32MP कॅमेरा दिला आहे. सेल्फी कॅमेरा पंच होल कटाऊट (Punch-Hole) सह लिफ्ट साईड ला आहे. ज्यामुळे फोन आजुनच आकर्षक दिसतो. कनेक्टिविटी बोलायचो झाल्यास, ह्या फोन मध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS आणि 1 USB Type-C Port दिलेला आहे.

एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर, एंबियंट लाइट सेंसर, जेड-एक्सिस लीनियर मोटर, कलर टेम्परेचर सेंसर और जायरोस्कोप ह्या प्रकारचे सर्व सेन्सर ह्यात दिलेले आहे. फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कैनर दिलेला आहे. मोबाईल मध्ये बॅटरी 4,300mAh इतकी दिलेली असून 65W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे. ज्यामुळे बॅटरी फक्त 30-35 मिनिटांनी चार्ज होऊ शकते.


Oppo Reno 6 Pro 5G specifications

Oppo Reno 6 Pro 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 11.3 वर काम करतो. फोन मध्ये 6.55 इंच FHD+ (1,080×2,400 पिक्सल) कर्व्ड एमोलेड डिस्प्ले (Curved AMOLED Display) दिलेला आहे. तसेच 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सैम्पलिंग रेट उपलब्ध आहे.

तसेच फोन मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1200 प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्या फोन चे स्टोरेज 12GB Ram आणि 256GB Storage इतके आहे.

फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी ह्यामध्ये क्वाड कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. ज्यात 64MP +8MP + 2MP + 2MP हा क्वाड कॅमेरा सेट अप दिला आहे. त्यासोबत 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. ह्या फोन चा डिस्प्ले कर्व्ड असल्यामुळे फोन ला आजुन चांगले लूक मिळते.

कनेक्टिविटी मध्ये ह्या फोन मध्ये Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS आणि 1 USB Type-C Port दिलेला आहे. ह्या फोन मध्ये 12GB Ram सोबत अधिक 7GB Ram Exapansion दिलेले आहे. हे खास oppo चे exclusive expansion आहे. ज्याने तुम्ही ह्या फोन मध्ये आजुन Ram वाढवू शकता.

तसेच ह्या फोन मध्ये 4,500 mAh बॅटरी आहे आणि 65W Super VOOC 2.0 चार्जिंग सपोर्ट आहे. ज्यामुळे फक्त 31 मिनिटांत 100% चार्जिंग पूर्ण होऊ शकते. 3D बॉर्डरलेस स्क्रीन असून HDR 10+ सपोर्ट दिलेला आहे.


Leave a Comment