AR म्हणजे काय ? AR चा फुल फॉर्म आणि संपूर्ण माहिती! (AR information in Marathi)

आजच्या लेखामध्ये आपण AR म्हणजे काय? (AR information in Marathi) हे जाणून घेणार आहोत. तसेच AR बद्दल संपूर्ण माहिती (What is AR in Marathi) सुद्धा जाणून घेणार आहोत.

AR तंत्रज्ञान हे आजच्या काळात सर्वात जास्त वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. जपान, अमेरिका सारख्या देशात AR तंत्रज्ञान हे रोजच्या वापरातील आहे. भारतात ह्याचा थोड्या थोड्या प्रमाणात वापर होत आहे. तसेच येणाऱ्या काही वर्षात भारतात AR तंत्रज्ञान खूप प्रमाणात वापरले जाईल.

तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन प्रयोग, शोध लागत असतात. तसेच ते जगभर प्रसिद्ध होतात. आज आपण त्याच एका नवीन तंत्रज्ञाना बाबत माहिती जाणून घेणार आहोत. ह्या बद्दल मराठी भाषेत क्वचितच माहिती तुम्हाला इंटरनेट वर मिळेल. त्यामुळे ह्या वेबसाईट वरील AR information in Marathi माहिती नक्की वाचा.

AR चा फुल फॉर्म काय आहे ? (AR Full Form in Marathi)

एआर (AR) चा फुल फॉर्म ऑगमेंटेड रियलिटी (Augmented Reality) असा आहे. Augmented Reality तंत्रज्ञान हे आधुनिक डिवाइस च्या मार्फत आपल्याला वास्तविक जगातील नवनवीन गोष्टींचा अनुभव देते.

जिथे वास्तविक जगात वास्तव्य असलेल्या वस्तू संगणकाने निर्माण केलेल्या आकलनशील माहितीद्वारे दाखवल्या जातात. कधीकधी दृश्य, श्रवण, हॅप्टिक, सोमाटोसेन्सरी आणि घाणेंद्रियासह अनेक संवेदनात्मक पद्धतींमध्ये.


AR म्हणजे काय? (Augmented Reality information in Marathi)

AR म्हणजे ऑग्मेंटेड रियलिटी. AR हे असे तंत्रज्ञान आहे, जे Virtual Reality पेक्षा खूप वेगळे आहे. AR म्हणजे असे तंत्रज्ञान जे VR तंत्रज्ञानापेक्षा खूप वेगळे आहे. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये तंत्रज्ञाना मध्ये मानवाला त्याच्या डोळ्यांवर एक यंत्र परिधान करावे लागते.

तसे की आपण डोळ्यांवर चष्मा लागतो त्याच प्रमाणे. त्यानंतर आपल्याला आपण त्या दुनियेत गेलेले दिसतो. पण खऱ्या मध्ये तो फक्त एक आभास असतो. आपल्या आजूबाजूला किंवा समोर असे काहीही दिसत नाही, फक्त ते आपल्याला त्या उपकरणाद्वारे दाखवले जाते.

What is AR in Marathi

परंतु जर आपण ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) उपकरण वापरले किंवा एआर हेडसेट घातला, तर याद्वारे आपण केवळ आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट पाहत नाही, तर त्याच वेळी आपल्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या वातावरणात एआर संगणकाद्वारे काही नवीन गोष्टी तयार केल्या आहेत हे देखील पाहू शकतो.

म्हणजेच वास्तविक जग आणि आभासी जग यांचे मिश्रण त्यात दाखवले जाते. एआर तंत्रज्ञानाद्वारे दर्शविलेल्या गोष्टी वास्तविक वातावरणाशी अशा प्रकारे जुळतात की त्या अगदी वास्तविक दिसतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य झाले आहे.

हे नक्की वाचा: Artificial Intelligence काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे कोण कोणते उपयोग आहेत?

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी जगातील काही माहिती किंवा गोष्टी दाखवते जी आपल्याला दिसते आणि आपण एका वेगळ्या जगात पोहोचतो, ज्यामध्ये वास्तविक आणि आभासी जग एकमेकांशी जोडलेले असतात.

खाली आपण काही AR म्हणजेच Augmented Reality चे उदाहरणे जाणून घेऊया. त्यामुळे तुम्हाला AR म्हणजे नक्की काय आहे व त्याचा कोण कोणत्या क्षेत्रात वापर केला जातो, हे सुद्धा समझेल.

मराठी मध्ये Blogging विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व शिकण्यासाठी आपल्या वेबसाईटच्या Blogging कॅटेगरी ला भेट द्या.

Augmented Reality ची काही उदाहरणे | (Examples of AR in Marathi)

एआर टेक्नॉलॉजी असलेले उपकरण आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींची माहिती, ही ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवू शकते. त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती देऊ शकते किंवा गोष्टी समजून घेण्यास मदत करू शकते.

याशिवाय AR तंत्रज्ञानाद्वारे खऱ्या गोष्टींसोबत अनेक नवीन गोष्टी दाखवल्या जाऊ शकतात. आज एआर तंत्रज्ञानावर आधारित अनेक उपकरणे आणि अॅप्स आले आहेत. पुढे येणाऱ्या काळात या तंत्रज्ञानावर आधारित अनेक क्षेत्रात बदल होऊ शकतात.

बिझनेस चे प्रेझेंटेशन, कंपनीचे प्रॉडक्ट ॲप, कंपनीचे लाईव्ह प्रॉडक्ट्स ह्याबद्दल माहिती देण्यासाठी AR तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.

›› गूगल लेंस ( Google Lens )

AR तंत्रज्ञानाचे एक ताजे उदाहरण द्यायचे झाले तर, मी तुम्हाला Google Lens चे उदाहरण देऊन. गूगल लेन्स हे गूगल कंपनीचे ॲप आहे. Google Lens च्या मदतीने मोबाईल मधील फोन कॅमेऱ्यातून आपण सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकतो.

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने समोरील वस्तू स्कॅन करून त्याबद्दलची सर्व माहिती स्मार्टफोन वर दाखवली जाते. तसेच दुसर्‍या भाषेत असलेले एखादे प्रॉडक्ट, पुस्तक किंवा एखाद्या रेल्वे स्टेशन वरील बॅनर वर लिहिलेली सूचना आपल्या प्रादेशिक भाषेत जाणून घेण्यासाठी सुद्धा ह्या Google Lens चा वापर करू शकतो.

हे नक्की वाचा: Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?

›› लेन्स कार्ट ( Lens Kart )

लेन्स कार्ट ही कंपनी चष्मा, सन ग्लासेस इत्यादी प्रॉडक्ट्स बनवतात. लेन्स कार्ट ह्या कंपनीने AR तंत्रज्ञान वापरून एक ॲप बनवले आहे. ह्या ॲप चा वापर करून कस्टमर त्यांच्या सोयीनुसार व आवडीनुसार चष्मा निवडून तो ट्राय करू शकतात.

AR टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्यांना आवडलेले चष्मे ते स्मार्टफोन वर वास्तविक चष्मा लावल्यासारखे पाहू शकतात. व व्यवस्थित आहे की नाही ह्याची खात्री करून घेऊ शकतात.

›› पोकेमोन गो ( Pokemon Go )

पोकेमोन गो हा मोबाईल गेम सुद्धा AR तंत्रज्ञानाचा वापर करूनच बनवला गेलेला आहे. जिथे वापरकर्ते त्यांच्या फोनवरून आवडते पोकेमॉन वास्तविक जगात पाहताना पकडू शकतात. त्यांना AR तंत्रज्ञानामुळे मोबाईल वर असलेले पोकेमोन वास्तविक जगात पाहता येतात.

›› स्मार्टफोन AR कैमरा फीचर्स ( Smartphone AR Camera Features )

हल्ली येणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोन कॅमेरा मध्ये AR फिचर देण्यात येते. जेव्हा आपण स्मार्टफोन चा कॅमेरा ओपन करतो, तेव्हा आपल्याला लाईव्ह स्टिकर्स असा एक ऑप्शन दिसतो. त्यातून आपण एखादा स्टिकर सिलेक्ट करून फोटो काढू शकतो.

फोटो काढत असताना आपल्याला त्या फोटो मध्ये आपण त्या स्टिकर मध्ये घातलेली गोष्ट वास्तविक रुपात घातली आहे, हे दाखविले जाते. त्यामुळे फोटो आजुन सुंदर येतो. तसेच AR वर आधारित आजुन अनेक ॲप्स Google Play Store वर उपलब्ध आहेत.

हे नक्की वाचा:

» एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?

» E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!

AR information in Marathi माहिती तुम्ही वरील लेखामध्ये संपूर्ण वाचली असेल. तर ही माहिती वाचून तुम्हाला माहित पडलेच असेल, की AR ह्या तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या जीवनात कश्या प्रकारे वापर केला जातो.

तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

Leave a Comment