E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!

तुम्ही इंटरनेट वर किंवा घरातल्या मोठ्या माणसांकडून तसेच बँकेमध्ये E-Banking बद्दल नक्की ऐकले असेल. पण इ- बँकिंग म्हणजे काय? (What is E-banking in Marathi) तसेच इ- बँकिंग चा वापर कसा करायचा? ह्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मराठी भाषेत जाणून घेणार आहोत.

इंटरनेट आल्यापासून सर्व गोष्टी ऑनलाईन आणि जलद होते आहेत. त्यामुळे कोणतेही काम एका जागेवरून होत आहे. त्यामुळे भारत सरकारने 1 जुलै 2015 ला डिजिटल इंडिया मोहिमेच्या अंतर्गत संपूर्ण भारतात सगळं डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरू केली. ह्या डिजिटल इंडिया मोहिमेमध्ये 9 मुख्य pillers आहेत. Broadband Highways, Public Internet Access इत्यादी. ह्यांच्या मार्फत भारत देशात संपूर्ण ठिकाणी सर्व डिजिटल आणि ऑनलाईन होणार आहे.

त्याचंच निमित्त साधून बँकेतील सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या. माणूस एका जागेवरून फक्त एका क्लिक वर बँकेतील सर्व सेवा ऑनलाईन वापरू शकतो. त्यामुळे बँकेत न जाता घरबसल्या इंटरनेट बँकिंगचा वापर आपण करू शकतो.

इ- बँकिंग म्हणजे काय? (E-Banking Information in Marathi)

What is E-banking in Marathi

इ- बँकिंग म्हणजे “इलेक्ट्रॉनिक बँकिंग” होय. बँकेमध्ये न जाता इंटरनेट च्या मदतीने ज्या बँकिंग सेवांचा वापर केला जातो, त्या सेवांना इ- बँकिंग असे म्हणतात. ई बँकिंग मध्ये तुमची बँक तुम्हाला असे अधिकार देते, ज्यात तुम्ही घरी बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतात. जसे बँक खातची तपशील करणे, किती रक्कम आहे ते जाणून घेणे. तसेच मागील काही व्यवहार बघू शकता, ऑनलाईन पैशांचे देवाण घेवाण करू शकता आणि इतर अनेक कामे जलद गतीने आणि कमी वेळेत करू शकतात.


इ-बँकिंग मुळे सर्व व्यवहार ऑनलाईन करता येतात. त्यामुळे डिजिटल व्यवहारात खूप प्रमाणात वाढ होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक बँकिंग मध्ये खूप सुरक्षित ऑनलाईन फीचर्स आहेत.

इलेक्ट्रॉनिक बँकिंग ला इतर काही नावांनी सुद्धा ओळखले जाते. जसे की इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, इ-बँकिंग, वेब बँकिंग किंवा आभासी बँकिंग अश्या नावांनी सुद्धा ओळखले जाते. इ बँकिंग च्या मदतीने ग्राहक त्याचे बँकेतील खाते आणि ऑनलाईन व्यवहार कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोन च्या मार्फत करू शकतो. इलेक्ट्रॉनिक बँकिंग चा वापर करण्यासाठी बँकेत खाते असणे आणि फक्त इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

इ-बँकिंग मध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, टेलीबॅकिंग, एटीएम, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विविध प्रकारचे बँकिंग सेवा आणि व्यवहार समाविष्ट असतात. त्यामुळे आपण बँकेत न जाता ह्या सेवांचा फायदा घेऊ शकतो.

इ-बँकिंगद्वारे पुढील व्यवहार केले जातात.

 1. पैसे स्वतःच्या खात्यामध्ये जमा करणे व पैसे काढणे किंवा पाठवणे.
 2. खाते उताऱ्याची प्रिंट मिळवणे.
 3. खात्याची अद्ययावत माहिती मिळवणे.
 4. धनादेश पुस्तिका, धनाकर्ष इत्यादी मिळवणे.
 5. ठेवी व कर्जावरील व्याजदर व इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती मिळवणे.
 6. लाईटबिल, मोबाईल रिचार्ज, इत्यादी इंटरनेट वरील कामे आरामात भरी शकता.
 7. नवीन खाते तयार करू शकतो.

ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याचे प्रकार

Neft, rtgs, imps आणि upi चा वापर करून तुम्ही एका बँक अकाउंट मधून दुसऱ्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर करू शकता.

1. NEFT (National Electronic Fund Transfer)

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर किंवा एनईएफटी ह्या सेवेचा वापर करून एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे पाठवू शकतो. पैसे पाठवण्याचा हा सर्वात सोपा आणि जास्त प्रमाणात वापरला जाणारा प्रकार आहे.

एनईएफटी चा वापर करून कोणताही व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे ह्या दोन माहिती असली पाहिजे. एक म्हणजे अकाऊंट नंबर आणि दुसरे म्हणजे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे, त्या व्यक्तीच्या बँक अकाउंट मधील IFSC Code.

2. RTGS (Real Time Gross Settlement)

रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट ही सेवा जवळपास एनईएफटी सारखीच असते. परंतु किमान पेमेंट आणि पैसे पाठवलेल्या व्यक्तीच्या खात्यात कसे जमा होते ही पद्धत वेगळी आहे. तुम्हाला 2 पेक्षा जास्त पैसे ट्रान्स्फर करायचे असल्यास आपण ह्याचा वापर करू शकतो. RTGS मध्ये रकमेवर कोणतीही अप्पर कॅप लावली जात नाही.

आरटीजीएस मनी ट्रान्सफर रिअल-टाइम तत्त्वावर होते. ज्या व्यक्तीकडे पैसे ट्रान्स्फर केले जातात, त्याच्या बँकेस त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी 30 मिनिटे मिळतात.

3. IMPS (Immediate Payment Service)

IMPS ही सेवा त्वरित निधी ट्रान्स्फर सेवा आहे. ज्याचा वापर करून आपण कधीही पैसे पाठवू शकतो. ही सेवा कधीही वापरली जाऊ शकते. ह्या सेवा अंतर्गत लगेच पैसे ट्रान्स्फर करता येतात.

फसवणूकीच्या तक्रारी टाळण्यासाठी, व्यवहाराच्या मर्यादेवरील लिमिट खूपच कमी सेट केली जाते. आयएमपीएस सेवेचा वापर करून पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी आपल्याला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या खातेधारकाचा IMPS ID (एमएमआयडी) आणि त्याचा किंवा तिचा मोबाइल नंबर माहित असणे आवश्यक आहे.

आयएमपीएसद्वारे, आपण 24/7 पैसे ट्रान्स्फर करू शकतो. परंतु RTGS आणि NEFT ने पैसे केवळ आठवड्याच्या दिवसात कामकाजाच्या तासांमध्ये पाठवले जाऊ शकतात. तसेच शनिवारी काही तास काम करते. NEFT, RTGS आणि IMPS व्यतिरिक्त आपण आपले पैसे यूपीआयमार्फत सुद्धा ट्रान्स्फर करू शकतो आणि चेक द्वारे सुद्धा पाठवू शकतो.

4. UPI (Unified Payments Interface)

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी VPA (व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस) वापरून कोणत्याही स्मार्टफोनद्वारे व्यवहार करण्यास अनुमती देते.

यूपीआयमार्फत पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी कोणत्याही बँक अकाउंटची गरज लागत नाही. फक्त मोबाइल नंबर किंवा नाव पुरेसे आहे. तसेच व्यवहार 24/7 केले जाऊ शकतात. यूपीआय वरून तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्स्फर करू शकता किंवा पाठवू शकता.

हे नक्की वाचा: UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे?

5. Cheque

आपण चेकद्वारे सुद्धा पैसे ट्रान्स्फर करू शकतो. आपण एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे ट्रान्स्फर करू शकतो. आपल्याला आपल्या नावासह एक स्टेटिंग पेअर काढावा लागेल, ज्यामध्ये आपण आपली स्वाक्षरी करून पैसे ट्रान्स्फर करू शकतो. ह्यासाठी तुमच्या जवळ चेकबुक असणे खूप गरजेचे आहे. हे काम अत्यंत त्वरित होते.

आपल्याला खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे पाठवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे. परंतु आपल्याला काही रक्कम काढायची असल्यास काही निर्बंध आहेत.

हे नक्की वाचा:

आधार कार्ड पॅन कार्ड ला अश्याप्रकारे लिंक करा!

नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे? 12 बेस्ट ट्रिक्स!

इ बँकिंग चा वापर कसा करायचा? | How To Use E Banking In Marathi

E Banking चा वापर करण्यासाठी आपल्या जवळ एक बँक खाते असणे गरजेचे आहे. तसेच इंटरनेट सेवा वापरण्यासाठी तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले हवे. बँकेत जाऊन तुम्ही बँकेत तुमचे खाते उघडून त्यानंतर नेट बँकिंग सेवा सुरू करू शकता.

नेट बँकिंग मध्ये लॉगिंग होण्यासाठी तुम्हाला बॅंकेतून एक Username आणि Password दिला जातो. त्याचा वापर करून तुम्ही नेट बँकिंग चा वापर करू शकता.

मी तुम्हाला State Bank Of India ह्या बँकेतील खात्यामधून नेट बँकिंग चा वापर कसा करायचा? हे सांगणार आहे. त्यासाठी State Bank Of India च्या ऑफिशियल वेबसाईट वरून किंवा बँकेत जाऊन तुम्ही नेट बँकिंग सेवा सुरू करू शकता. त्यानंतर तुम्हाला Username आणि Password मिळेल त्याने लॉगिन करा.

आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. ज्यामध्ये बँक धारकाचे नाव, बँक बॅलन्स, बँक व्यवहार, बँक स्टेटमेंट आणि इतर अनेक काही सुविधा दिलेल्या असतील. तसेच त्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचीही सुविधा असते.


इ बँकिंगचे फायदे | Advantages Of E Banking In Marathi

 1. इ बँकिंग चा वापर 24×7×365 करू शकतो.
 2. बँकेत न जाता घरबसल्या आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या मदतीने इ बँकिंग चा वापर करू शकतो.
 3. इ बँकिंग च्या मदतीने आपण बिल पेमेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, पैसे ट्रान्स्फर करणे इत्यादी गोष्टी घरात बसून किंवा कुठूनही करू शकतो.
 4. सुट्टीच्या दिवशीही आपण बँकेचा कारभार पाहू शकतो, आणि जर आपल्याला पैसे पाठवायचे असतील किंवा प्राप्त करायचे असतील तर तेही करू शकतात.
 5. आपण आपला बँक बॅलन्स ऑनलाईन चेक करू शकतो.
 6. इंटरनेट बँकिंग च्या मदतीने आपण बँकेत न जाता ऑनलाईन पासबुक, चेकबुक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ऑनलाईन Apply करू शकतो. तसेच इ स्टेटमेंट इत्यादी गोष्टी सहजतेने करू शकतो.
 7. त्यासोबत आपण केलेले इंटरनेट चे व्यवहार तसेच ATM मधून काढलेले पैसे किंवा ट्रान्स्फर केलेलं पैसे ह्यांचे सर्व Transactions आपण तपासू शकतो. आणि त्यांचे इ स्टेटमेंट PDF फाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो.
 8. इंटरनेट बँकिंग च्या साहाय्याने आपण FD, RD सारखे खाते उघडू शकतो आणि त्यामध्ये आपण पैसे जमवू शकतो.
 9. जर पेमेंट करताना आपल्याला काही अडचण आली, तर ती आपण ऑनलाईन तक्रार करून सोडवू शकतो.

हे नक्की वाचा: Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?

बँकिंगचे तोटे | Disadvantages Of E Banking In Marathi

 1. इ बँकिंग चा वापर करणे सुरक्षित आहे. परंतु जर आपले नेट बँकिंग डिटेल्स आपल्याला सुरक्षित ठेवायचे असतील तर आपल्याला स्वतःच्याच मोबाईल किंवा कॉम्प्युटर मधून लॉगिन केले पाहिजे.
 2. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही Device मधून लॉगिन केले तर त्या device मध्ये तुमच्या नेट बँकिंग चे लॉगिन इन्फॉर्मेशन राहील. त्यामुळे त्याचा कोणीही फायदा घेऊ शकतो.
 3. नेट बँकिंग कोणत्याही device वरून केल्यास आपले खाते हॅक होण्याचे प्रमाण वाढते.
 4. काही काही वेळा नेट बँकिंग मधून transaction फेल होते. त्यामुळे आपल्या कामात अडचण निर्माण होऊ शकते.
 5. तसेच इंटरनेट कनेक्शन नसेल तर आपण इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करू शकत नाही.
 6. इ बँकिंग चा वापर सायबर कॅफे, पब्लिक प्लेस आणि Public WIFI मध्ये कधीही करू नये. कारण येथे आपली माहिती लीक होण्याचे प्रमाण अधिक असते.
 7. आपल्या नेट बँकिंग अकाऊंटचा पासवर्ड आपल्या नावावर, जन्म तारीख, शहर, कुटुंबातील कोणाच्या जन्म तारीख ह्यावर कधीही ठेऊ नये. कारण ह्याने आपले अकाउंट हॅक होऊ शकते.
 8. जर खात्यात जास्त रक्कम असेल किंवा रोज मोठ मोठे ऑनलाईन व्यवहार होत असतील. तर आपला इंटरनेट बँकिंग चा पासवर्ड रोज बदलत राहायला हवा. नाहीतर बँक खाते हॅक होऊ शकते.
 9. मोबाईल किंवा कॉम्प्युटर मधून अँटीव्हायरस नसेल तर आपल्या खात्याची माहिती लीक होऊ शकते.

हे नक्की वाचा: कीबोर्ड मध्ये Qwerty फॉरमॅट का वापरला जातो?

इ बँकिंग करताना घ्यायची काळजी
 1. इ बँकिंग नेहमी स्वतःच्या मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटर वरून करावी.
 2. ज्या वेबसाईट वरून इंटरनेट बँकिंग करणार आहे ती वेबसाईट Secure असली पाहिजे.
 3. कोणत्याही Wifi वर किंवा Public कॉम्प्युटर मध्ये आपल्या इ बँकिंग ने लॉगिन करू नये.
 4. आपल्या इंटरनेट बँकिंग चा Username आणि पासवर्ड कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करू नका.

वरील माहिती वाचून तुम्हाला E-banking बद्दल संपूर्ण माहिती (What is E-banking in Marathi) आपल्या मातृभाषेत मिळाली असेल. तसेच ही माहिती वाचून तुम्हाला E-banking काय असते तसेच E-banking चा वापर कसा करायचा ह्याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.

तसेच लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्सटेक टिप्सApps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

7 thoughts on “E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!”

 1. मराठी मध्ये माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. असेच नवनवीन लेख लिहित रहा.

  Reply

Leave a Comment