Google IO 2021: Android 12 बद्दल खास नवीन फीचर्स जाणून घ्या!


जगभरात गूगल चे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड खूप लोकप्रिय आहे. तसेच अँड्रॉइड मध्ये मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि चांगल्या फीचर्स मुळे युजर्सना हॅण्डल करणे खूप सोयीस्कर होते.

नुकत्याच पार पडलेल्या गुगलच्या गूगल डेव्हलपर कॉन्फरन्स I/O 2021 मध्ये गुगलने Android 12 आणि अनेक येणाऱ्या फिचर्स बाबत माहिती दिली आहे. ही कॉन्फरन्स 20 मे पर्यंत होती. ह्या मध्ये त्यांनी अनेक नवनवीन तंत्रज्ञाना संबंधी सूचना दिल्या आहेत. Google Maps मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच LamDa, MUM ह्या नवीन तंत्रज्ञानाबाबत सांगितले आहे.

नवीन Android 12 व्हर्जन मध्ये प्रायव्हसीवर जास्त लक्ष दिले आहे. गेल्या वर्षी गुगलने Android 11 मध्ये नवीन प्रायव्हसी सेटिंग लाँच केली होती. यामध्ये अॅप्सला बॅकग्राऊंडला युजरचे लोकेशन पाहण्यापासून रोखले जात होते. गूगल कंपनीने Android 12 मध्ये दोन मुख्य फिचरबाबत सांगितले आहे. या नवीन फीचर्स मध्ये युजरला Privacy Dashboard आणि Private Compute Core फीचर्स देण्यात येणार आहेत.

▪️How to make money online in marathi


Android Versions आणि त्यांची नावे

गूगल कंपनी ने आज पर्यंत त्यांच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या विविध वर्जन (version) ची ठेवलेली नावे खालील प्रमाणे आहेत.

  1. Android 1.5 – Cupcake
  2. Android 1.6 – Donut
  3. Android 2.0 – Eclair
  4. Android 2.2 – Froyo
  5. Android 2.3 – Gingerbread
  6. Android 3.0 – Honeycomb
  7. Android 4.0 – Ice Cream Sandwich
  8. Android 4.1 – Jelly Bean
  9. Android 4.4 – KitKat
  10. Android 5.0 – Lollipop
  11. Android 6.0 – Marshmallow
  12. Android 7.0 – Nougat
  13. Android 8.0 – Oreo
  14. Android 9.0 – Pie
  15. Android 10
  16. Android 11
  17. Android 12

▪️मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हे ऍप वापरा!


Android 12 बद्दल खास नवीन फीचर्स जाणून घ्या!

Android 12
CREDIT BY – GOOGLE

▪️Private Compute Core – या फिचरद्वारे तुमची माहिती खासगी ठेवली जाणार आहे. यामध्ये AI-driven फीचर्स, लाईव्ह कॅप्शन आणि स्मार्ट रिप्लाय देण्यात येणार आहे. हे फिचर खूप सुरक्षित असणार आहे.

▪️New UI Design – नवीन येणाऱ्या Android 12 मध्ये थोडाफार नवीन डिझाईन मिळणार आहे. यामध्ये कलर, ट्रासिक्शन इफेक्ट्स, न्यू विजेट्स, फॉन्ट इत्यादी अनेक डिझाईन्स मिळणार आहे. तसेच परफॉर्मन्स मध्ये सुद्धा खूप बदल दिसून येतील. कारण गूगल ने ह्यावर खूप काम केले आहे. त्यामुळे कोणतेही ऍप्लिकेशन किंवा फाईल काही सेकंदात ओपन होतील.

▪️Theme Color Customization – संपूर्ण फोन मधील सिस्टम चे कलर आपल्या आवडीने बदलू शकतो. जसे वॉलपेपर, ऍप मधील कलर इत्यादी. ह्यामुळे फोन का एक आकर्षित लूक मिळणार आहे.

▪️Privacy Dashboard – या फीचर मुळे युजरला गेल्या 24 तासांत किती वेळा कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनचा वापर केला आहे, ह्याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला क्विक ओव्हरव्ह्यू मिळणार आहे. तसेच कोणत्या अॅपकडे कोणती परवानगी आहे, हे देखील पाहता येईल.

त्यासोबत फोनचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरल्यानंतर नोटीफिकेशन मध्ये एक इंडिकेटर युजरला दाखविण्यात येणार आहे.

Android 12 चे नवीन फीचर्स व्हिडिओ रुपात पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.👇🏻

#Android12: Designed for you | Google

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

Leave a Comment