Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?


आजकाल प्रत्येक स्मार्टफोन मध्ये Google Lens दिसून येते. गूगल लेन्स ही सेवा गूगल कंपनी मार्फत मोफत दिली जाते. ह्यासाठी कोणताही शुल्क द्यावा लागत नाही. गूगल लेन्स ही सेवा प्रत्येक स्मार्टफोन मध्ये दिली जाते. पण तुम्हाला Google Lens म्हणजे काय? (What is Google Lens in Marathi) आणि गूगल लेन्स चा वापर कसा करायचा? ह्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून तुम्हाला गूगल लेन्स बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया गूगल लेन्स म्हणजे काय? (What is Google Lens in Marathi)

जग जसजसं पुढे जात आहे तस तस नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ह्यामुळे मनुष्याला कोणतेही काम करणे सोप्पे झाले आहे. गूगल हे एक आजच्या काळातील महत्वाचे सर्च इंजिन आहे. ह्याच कंपनीने एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च केली, ती म्हणजे Google Lens. गूगल लेन्स ला 4 ऑक्टोंबर 2017 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. पण जास्त लोकांना ह्याबद्दल माहिती नाही आहे. त्यामुळे आज आपण गूगल लेन्स म्हणजे काय? हे पाहणार आहोत.

Google Lens ला 2017 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्याची सुरुवात गूगल पिक्सेल स्मार्टफोन मधून झाली होती. Google Pixel स्मार्टफोन गूगल चेच प्रॉडक्ट आहे. त्या स्मार्टफोन मध्ये मिळालेल्या यशामुळे गूगल लेन्स का अँड्रॉइड स्मार्टफोन्स मध्ये सर्वांसाठी लॉन्च करण्यात आले.

गूगल लेन्स म्हणजे काय? (What is Google Lens in Marathi)

Google Lens Mhanje Kay

Google Lens mhanje Kay? हे गूगल चे एक फीचर आहे, ज्याचा वापर करून आपण कोणत्याही फोटो मधील वस्तू, ठिकाण ओळखू शकतो. म्हणजे ती वस्तू किंवा ठिकाण नक्की काय आहे, कुठे आहे आणि त्या संबंधी परिणाम आपण वेब पेज च्या आधारे जाणून घेऊ शकतो.

गूगल लेन्स हे प्रतिमा ओळख तंत्रज्ञान आहे. ह्याचा वापर करून आपण एखाद्या फोटो संबंधी माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकतो. गूगल लेन्स चा वापर तुम्ही Google Photos किंवा Google Assistant वरून करू शकतो.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरून एखाद्या वस्तूचा फोटो काढा. त्यानंतर गूगल फोटोज् मध्ये जाऊन तुम्ही हो नुकताच फोटो काढलाय तो ओपन करा. नंतर त्या फोटोखालील Google Lens पर्यायावर क्लिक करा. तुम्ही इंटरनेट चालू ठेवायला विसरू नका. गूगल लेन्स वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर त्या फोटो संबंधी रिझल्ट्स दिसतील. त्यावर क्लिक करून तुम्ही गूगल वरून संपूर्ण माहिती जाणून घेऊन शकता.

किंवा गूगल लेन्स चा अधिकृत ऍप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर ऍप ओपन करून त्याच्यातील कॅमेऱ्याने कोणत्याही वस्तूचा फोटो काढा आणि नंतर तुमच्यासमोर रिझल्ट्स येतील.


गूगल लेन्स चे सर्वात बेस्ट फीचर्स

▪️Scan & Translate Text

जर तुम्हाला एखाद्या ठिकाणावरील जाहिरातीत असलेल्या दुसऱ्या भाषेचे भाष्णत्र करायचे असेल तर, तुम्ही गूगल लेन्स च्या मदतीने ऑनलाईन त्या Text चे भाषांतर करू शकता. त्यासोबत तुम्ही एखाद्या इंग्लिश पुस्तकांशी paragraph स्कॅन करून त्याचे मराठी भाषेत भाषांतर करू शकता.

▪️Search Near You

गूगल लेन्स च्या मदतीने तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू जसे की फुल, झाडे इत्यादींची माहिती जाणून घेऊ शकता. त्यासोबत तुम्ही तुमच्या जवळच्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स बद्दल माहिती जाणून घेऊन शकता ते ही एका क्लिक वर.

▪️Online Shopping

तुम्हाला एखाद्या हॉटेल मध्ये जायचे असेल तर तुम्ही गूगल लेन्स वरून त्या हॉटेल चा पत्ता शोधून शकता. तसेच त्या हॉटेल बद्दलचे मत (review) ऑनलाईन जाणून घेऊ शकता. तसेच तुम्ही गूगल लेन्स चा वापर करून ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता.

▪️Scan Codes

Google Lens चा उपयोग करून QR Codes आणि Barcodes खूप सोप्प्या पद्धतीने स्कॅन करू शकतो


Google Lens कोणत्या डिवाइस मध्ये सपोर्ट करतो?

गूगल कंपनी चे गूगल लेन्स हे स्वतंत्र असे अँड्रॉइड ऍप आहे. हे ऍप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. हा ऍप सर्व अँड्रॉइड डिवाइस मध्ये सपोर्ट करतो. जर तुमच्या डिवाइस मध्ये इंस्टॉल होत नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन् मध्ये “Your Device Isn’t Compatible With This Version” असा एक मेसेज येईल. जर तुमचे डिवाइस मार्शमेलो OS वर अपडेट असेल तर तुमच्या डिवाइस वर ऍप इंस्टॉल होईल.


Google Lens चा वापर कसा करायचा?

वरील दिलेल्या माहिती मध्ये आपण गूगल लेन्स म्हणजे काय? (What is google lens in marathi) आणि गूगल लेन्स चे फीचर्स इत्यादी माहिती जाणून घेतली. Google Lens चा वापर Android, iPhone किंवा iPad मध्ये सुद्धा करता येतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. कारण त्यांचे ऑपरेटिंग सिस्टिम वेगवेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊया की Google Lens चा वापर कसा करायचा?( How To Use Google Lens In Marathi? )

गूगल लेन्स चा वापर अँड्रॉइड स्मार्टफोन्स मध्ये कसा करायचा? ते अगोदर आपण जाणून घेऊया. खालील दिलेल्या तीन पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये गूगल लेन्स चा वापर करू शकता.

Google Photos च्या मदतीने:-

Step 1- सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोन मध्ये प्ले स्टोअर वरून Google Photos App डाऊनलोड करून घ्या. आणि तो ऍप ओपन करा.

Step 2 – त्यानंतर तुम्हाला ज्या फोटो ची माहिती हवी आहे त्या फोटो वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खालील दिलेल्या गूगल लेन्स च्या लोगो वर क्लिक करा.

Step 3 – गुगल लेन्स च्या लोगो वर क्लिक केल्या नंतर तो फोटो स्कॅन केला जाईल. स्कॅन झाल्यावर तुमच्या समोर त्या फोटो संबंधी वेब रिझल्ट्स दिसतील.

अश्याप्रकारे तुम्ही गूगल फोटोज् च्या मदतीने गूगल लेन्स चा वापर करू शकता.

▪️मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हे ऍप वापरा!


Google Assistant च्या मदतीने:-

Step 1 – गूगल प्ले स्टोअर वरून Google Assistant App इंस्टॉल करून घ्या. त्यानंतर ऍप ओपन करा.

Step 2 – App ओपन केल्यावर खालच्या बाजूला एक बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करा.

Step 3 – क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला Google Lens चा icon दिसेल. त्यावर क्लिक करा.

Step 4 – क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कॅमेरा ओपन होईल. तुम्ही खाली दिलेल्या सर्च आयकॉन वर करा. त्यानंतर तुम्हाला ज्या वस्तूची माहिती जाणून घ्यायची आहे. त्यावर कॅमेरा नेऊन क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर वेब रिझल्ट्स आणि इन्फॉर्मेशन दिसेल.

अश्या प्रकारे तुम्ही Google Assistant App वरून गूगल लेन्स चा वापर करू शकता.

▪️Cloud Storage म्हणजे काय? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?


Google Lens च्या मदतीने:-

Step 1 – गूगल प्ले स्टोअर वर जाऊन गूगल लेन्स सर्च करा. तो ऍप इंस्टॉल करून घ्या. त्यानंतर ओपन करा.

Step 2 – ओपन केल्यावर Get Started वर क्लिक करा. त्यानंतर तुमचे गूगल अकाऊंट निवडा आणि OK वर क्लिक करा.

Step 3 – आता तुमच्यासमोर Google Lens चे इंटरफेस दिसेल. तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. जसे की Search, products or barcodes इत्यादी.

Step 4 – तर सर्च पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर कॅमेरा कोणत्याही वस्तूवर नेऊन फोटो काढा. नंतर तुमच्यासमोर related results दिसतील.

अश्या प्रकारे तुम्ही गूगल कंपनीच्या Google Lens App ने माहिती शोधू शकता.

▪️ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी Blogging ह्या कॅटेगरी ला भेट द्या.


Google Lens चा वापर iPhone आणि iPad मध्ये करू शकतो का?

तर हो गूगल लेन्स हे अँड्रॉइड फोन्स साठी आणि आयफोन्स साठी उपलब्ध आहे. गूगल लेन्स चा वापर iPhone आणि iPad मध्ये गूगल फोटो किंवा गूगल लेन्स ह्या ऍप द्वारे करू शकतो. फक्त तुम्हाला Google Assistant च्या मदतीने गूगल लेन्स चा वापर करता येणार नाही.


Google Lens वापर करणे सुरक्षित आहे का?

गूगल लेन्स चा वापर करणे खूप चांगले आहे. ह्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही वस्तू, ठिकाण, पक्षी, प्राणी इत्यादींची माहिती एका क्लिक वर ऑनलाईन पाहू शकता. तसेच हे Google कंपनीचे प्रॉडक्ट असल्याने तुम्हाला उत्कृष्ट अशी सर्व्हिस आणि सुरक्षितता मिळेल. तसेच गूगल लेन्स चा वापर करणे अगदी सोप्पे आहे आणि हे मोफत गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.


आज तुम्ही गूगल च्या नवीन प्रॉडक्ट बद्दल माहिती जाणून घेतली. Google Lens बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच गूगल लेन्स चा वापर कसा करायचा? ह्याबद्दल जास्तीत जास्त माहिती आपण जाणून घेतली.

ही माहिती वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही माहिती तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर Share करा. ज्यामुळे त्यांना सुद्धा Google Lens बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

1 thought on “Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?”

Leave a Comment