जबरदस्त! Netflix भारतातील युजर्ससाठी आणणार स्वस्त Mobile+ प्लॅन, किती असेल किंमत जाणून घ्या अगोदर!


Netflix Mobile+ Plan ची टेस्टिंग चालू आहे. काही ठराविक लोकांसोबत ही टेस्टिंग चालू आहे. ह्या प्लॅन चा यूज़र्स ना किती फायदा होतो, त्यानुसार Netflix Mobile+ Plan सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येईल असे Netflix ने सांगितले आहे.
तसेच Netflix Mobile+ प्लॅनचा उपयोग मोबाईल सोबत लॅपटॉप व कॉम्पुटर वर सुद्धा कंटेंट स्ट्रीम साठी करता येईल.

खास गोष्टी

  • भारता मध्ये आपला युजर बेस वाढवण्यासाठी नेटफ्लिक्स नवीन प्लॅन सुरू करण्याची तयारी करत आहे
  • Netflix Mobile+ Plan मध्ये HD स्ट्रीमींग सोबत मिळणार डेस्कटॉप चा सपोर्ट
  • हा नवीन प्लॅन २९९/- पर्यंत असू शकतो, Netflix ने टेस्टिंग केले आहे चालू

https://twitter.com/MarathiTechC/status/1371049972502732803

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ( OTT Platforms ) वाढत्या मागणीवरून Netflix ने भारतीय युजर्स साठी एक नवीन प्लॅन आणायची तयारी केली आहे. Netflix चा भारतामध्ये सर्वात मोठा युजर बेस असल्यामुळे अधिकाधिक युजर्संना आकर्षित करण्यासाठी एकदम नवीन आणि स्वस्त प्लॅन नेटफ्लिक्सने (Netflix) तयार केला आहे.

Netflix Mobile+ Plan हा नवा प्लॅन 299/- रुपयांचा असून ह्यामध्ये तुम्ही एचडी क्वालिटी मध्ये स्ट्रीमींग करू शकता. 299 रुपयांमध्ये तुम्ही महिन्याभराचा आनंद घेऊ शकता.
नेटफ्लिक्सच्या या नवीन प्लॅनद्वारे युजर्स एकावेळी फक्त एकाच स्क्रीनवर एचडी क्वालिटीमध्ये कंटेंट स्ट्रीम करू शकतील. तसेच, या प्लॅनद्वारे युजर्स मोबाइल, टॅब्लेट किंवा डेस्कटॉप / लॅपटॉपमध्ये सुद्धा कंटेंट स्ट्रीम करु शकतील.



युजर्सला कोणते मिळणार फायदे? जाणून घ्या खाली:-

पूर्वीच्या प्लॅनमध्ये केवळ एसडी क्लालिटीमध्ये (SD Quality) कंटेंट उपलब्ध होते. त्यामुळे ज्या युजर्सना एचडी क्वालिटी मध्ये स्ट्रीमींग चा आनंद घ्यायचा असतो त्यांना तो घेता येत नाही. त्यामुळे ह्या Netflix Mobile+ Plan मध्ये 299/- रुपयांमध्ये HD क्वालिटी मध्ये स्ट्रीमींग चा आनंद घेता येणार आहे.

नेटफ्लिक्स ने भारतात ह्या अगोदर सुद्धा एकदा प्लॅन ची टेस्टिंग केली होती। गेल्या वर्षी जुलै मध्ये कंपनीने 349 रुपयांचा प्लॅन टेस्ट केला होता। पण एवढा महाग प्लॅन फायद्याचा ठरला नाही म्हणून रद्द करण्यात आला होता। आता 299 रुपयांचा Netflix Mobile+ प्लॅन युजर्स ना किती आवडतो त्यावर अवलंबून आहे।


Leave a Comment