तुम्ही अनेक ठिकाणी Affiliate Marketing बद्दल ऐकले असेल. पण Affiliate Marketing म्हणजे काय? आणि एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे? हे आपण आज जाणून घेऊया.
इंटरनेट चा वापर जास्त प्रमाणात होऊ लागल्यापासून Online Shopping करण्याला प्रत्येक जण प्राधान्य देत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपल्या कंपनीचे ऑनलाईन प्रॉडक्ट पोहोचावे ह्याचा प्रयत्न होऊ लागला. पण ते प्रॉडक्ट पोहोचवायचे कसे? तर त्यासाठी एफिलिएट मार्केटिंग चा प्रकार पुढे आला.
Affiliate Marketing मुळे ऑनलाईन प्रॉडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचू लागले. पण आजुन पर्यंत काही नवीन ब्लॉगर्स ना व ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना एफिलिएट मार्केटिंग मार्केटिंग म्हणजे काय? हे माहित नाही. म्हणून आज आपण Affiliate Marketing म्हणजे काय? ते जाणून घेणार आहोत.
आजकाल अनेक यूट्यूबर्स, ब्लॉगर्स किंवा डिजिटल इनफ्ल्यून्सर त्यांच्या ऑनलाईन अकाऊंट वरून एफिलिएट मार्केटिंग च्या लिंक शेअर करतात. अनेक ऑनलाईन कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट जास्त प्रमाणात ऑनलाईन विकावे ह्यासाठी Affiliate Marketing चा वापर करतात.
Affiliate Marketing म्हणजे काय? (What is Affiliate Marketing in Marathi)
जेव्हा तुम्ही एखाद्या ऑनलाईन कंपनीचे प्रॉडक्ट्स तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून ऑनलाईन विकता. तेव्हा त्या प्रॉडक्ट्स च्या विक्रिमधून जे काही टक्के कमिशन मिळते. त्याला एफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. तसेच ते कमिशन त्या प्रॉडक्ट च्या किमतीवर अवलंबून असते.
एफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्हाला Affiliate Link तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करायची असते. जेव्हा त्या शेअर केलेल्या लिंक वरून एखादी व्यक्ती कोणतेही प्रॉडक्ट्स खरेदी करते तेव्हा तुम्हाला त्या प्रॉडक्ट मधून काही टक्के कमिशन मिळतो. कमिशन हे कॅटेगरी वर अवलंबून असते. जसे की फॅशन, लाईफस्टाईल, इलेक्ट्रोनिक्स इत्यादी कॅटेगरी मधील प्रॉडक्ट्स वर वेगवेगळे कमिशन असते. इलेक्ट्रोनिक्स प्रॉडक्ट्स वर कमी कमिशन मिळते. तर फॅशन, बुक्स, लाईफस्टाईल ह्या कॅटेगरी मधील प्रॉडक्ट्स वर 5 ते 15% पर्यंत कमिशन मिळते.
▪️ Top 21 Online Shopping Sites in India
Affiliate Marketing साठी बेस्ट वेबसाइट्स कोणत्या आहेत?
इंटरनेट वर अनेक अश्या कंपन्या आहेत ज्या Affiliate Program ही सेवा पुरवतात. पण सर्वच कंपन्या सुरक्षित आहेत की नाही ह्याची खात्री नसते. त्यामुळे मी खाली काही विश्वासू आणि सुरक्षित वेबसाइट्स ची नावे सांगितली आहे.
एफिलिएट मार्केटिंग कसे काम करते?
एफिलिएट मार्केटिंग हे पूर्णपणे कमिशन वर अवलंबून असते. पण Affiliate Marketing मधून पैसे कमावण्यासाठी एफिलिएट प्रोग्राम मध्ये तुम्हाला तुमचे अकाऊंट तयार करावे लागेल. अकाऊंट तयार करण्यासाठी ज्या कंपनीचे तुम्हाला प्रॉडक्ट्स विकायचे असतील म्हणजेच ज्या कंपनीची तुम्हाला एफिलिएट मार्केटिंग करायची असेल. तर त्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन त्यांच्या Affiliate Program मध्ये लॉगिन करून दिलेली माहिती भरून अकाऊंट तयार करू शकता.
त्यानंतर त्या अकाऊंट वर तुम्हाला Affiliate Link मिळतील. त्या तुमच्या वेबसाईट, सोशल मीडिया अकाउंट्स वर किंवा यूट्यूब चॅनल वर शेअर करू शकता. लिंक शेअर करण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय दिलेले असतात. Banner, image आणि Link ह्या तीन दिलेल्या स्वरूपात तुम्ही लिंक शेअर करू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही शेअर केलेल्या Affiliate Link वर क्लिक करून एखादे प्रॉडक्ट्स खरेदी करेल. तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीने खरेदी केलेल्या प्रॉडक्ट्स मागील काही ठराविक टक्के कमिशन मिळते. कमिशन हे कॅटेगरी नुसार मिळते. जर बुक, फॅशन ह्या कॅटेगरी मधील प्रॉडक्ट्स विक्री झाले तर 5 ते 15 % पर्यंत कमिशन मिळते.
Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?
एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवणे काही कठीण गोष्ट नाहीय. पण इतकी सुद्धा सोप्पी ही नाहीय. कारण Affiliate Marketing Program मधून पैसे कमवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. अनेक ब्लॉगर्स आणि यूट्यूबर्स Affiliate Program च्या मदतीने खूप पैसे कमावतात.
जेव्हा तुमच्या वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनल वर जास्त प्रमाणात ऑनलाईन ट्रॅफिक येत असेल. तर तुम्ही कोणत्याही कंपनीच्या Affiliate Program मध्ये अकाऊंट बनवून त्यासाठी पैसे कमवू शकता. अकाऊंट बनवल्या नंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या वेबसाईट वरील टॉपिक नुसार प्रॉडक्ट्स शोधावे लागतील. त्यानंतर ते तुम्ही त्यांच्या वेबसाईट वर किंवा यूट्यूब चॅनल वर शेअर करून विकू शकता.
प्रॉडक्ट्स ची विक्री झाल्यानंतर तुम्हाला त्यातून काही टक्के कमिशन मिळते. अश्या प्रकारे तुमच्या affiliate link वरून जास्तीत जास्त प्रॉडक्ट विक्री होत गेल्यावर तुम्हाला जास्त टक्के कमिशन मिळत राहणार. तसेच तुम्ही Banner Ad लावून जास्तीत जास्त प्रॉडक्ट विक्री करू शकता.
▪️ मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हे ऍप वापरा!
एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम वेबसाईट वर रजिस्टर कसे करायचे?
एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम वेबसाईट वर रजिस्टर करणे खूप सोप्पे आहे. कोणीही एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये अकाऊंट तयार करून पैसे कमवू शकतो. फक्त तुमच्याकडे एखादी वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनल असणे गरजेचे आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट ह्यांच्या एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम खूप लोकप्रिय आहेत आणि ह्यातून खूप पैसे सुद्धा कमवू शकतो. त्यामुळे आज आपण अमेझॉन वेबसाईट वरील Affiliate Marketing Program मध्ये आपले अकाऊंट कसे तयार करावे? हे पाहणार आहोत.
1.सर्वात अगोदर Amazon च्या वेबसाईट ला भेट द्या. त्यानंतर वेबसाईट च्या खाली दिलेल्या quick links मधील Become an Affiliate ह्या लिंक वर क्लिक करा. खाली दिल्या प्रमाणे 👇🏻
2. त्यानंतर तुमच्या समोर Sign Up पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
3. आता तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन होईल. जर तुमचे अगोदर अकाऊंट असेल तर Sign in वर क्लिक करा. किंवा अकाऊंट नसेल तर नवीन अकाऊंट बनवा. अकाऊंट बनवण्यासाठी Create your Amazon account वर क्लिक करा.
4. नंतर तुमची माहिती भरून घ्या. आणि अकाऊंट तयार करा.
लक्षात ठेवा. Amazon Affiliate Program मध्ये अकाऊंट बनवण्यासाठी तुम्हाला अगोदर Amazon वर एक अकाऊंट बनवावे लागेल.
- अकाऊंट बनवल्या नंतर तुमच्या समोर Affiliate Program चा Form येईल. त्यात माहिती भरून घ्या.
अश्या प्रकारे तुम्ही फ्री मध्ये Amazon Affiliate Program मध्ये अकाऊंट बनवू शकता. आणि ऑनलाईन पैसे कमवू शकता.
एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये अकाऊंट बनवून झाल्यानंतर आपल्याला Affiliates, Affiliate Link आणि Affiliate ID म्हणजे काय? ह्याबद्दल माहिती नसते. म्हणून आपण खाली त्याबद्दल जाणून घेऊया.
Affiliates कोणाला म्हणतात?
जी व्यक्ती एखाद्या ऑनलाईन कंपनीच्या Affiliate Program मध्ये अकाऊंट तयार करून त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स त्याच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया वर विकतो. तेव्हा ते प्रॉडक्ट विकून ज्याला कमिशन मिळते त्याला Affiliates असे म्हणतात.
Affiliate ID आणि Affiliate Link म्हणजे काय?
एफिलिएट मार्केटिंग मध्ये अकाऊंट बनवल्यानंतर तुम्हाला एक युनिक आयडी दिला जातो. तो आयडी वापरून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये लॉगिन करू शकता. जर हा आयडी तुम्ही हरवलात तर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम अकाऊंट मध्ये लॉगिन करू शकत नाही.
तसेच एफिलिएट लिंक म्हणजे ती लिंक ज्याचा वापर करून आपण कमिशन मिळवू शकतो. ही Affiliate Link आपल्याला Affiliate Program Account मधून मिळते. तसेच ही लिंक शेअर करून आपण ह्यामार्फत कमिशन मिळवू शकतो. ही एफिलिएट लिंक वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनल वर शेअर करावी लागते.
एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये पैसे कसे मिळतात?
एफिलिएट मार्केटिंग करून त्यामधून मिळालेले पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी तुमच्याकडे एखादे बिझनेस अकाऊंट असणे गरजेचे आहे. PayPal, Skrill, Bank Transfer, इत्यादी ऑनलाईन पेमेंट चे पर्याय आहेत. ऑनलाईन पेमेंट चे बिझनेस अकाऊंट असले की तुम्ही इंटरनॅशनल पेमेंट तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करू शकता.
तसेच मिळालेले कमिशन खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी कंपनीच्या काही अटी असतात. जसे की कमिशन 100$ किंवा 150$ इतके झालेले हवे.
अश्या पद्धतीने तुम्ही अमेझॉन च्या एफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम मध्ये अकाऊंट बनवून त्यामार्फत ऑनलाईन प्रॉडक्ट्स विक्री करून त्यामधून कमिशन मिळवू शकता. आणि ऑनलाईन पैसे कमवू शकता. पैसे कमवायला थोडा वेळ लागेल. त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल.
तसेच Affiliate Marketing म्हणजे काय? एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे? ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.