Google Meet ग्रुप व्हिडिओ कॉलवर गुगलची मर्यादा लागू: ह्या गोष्टी माहित असणे तुमच्यासाठी गरजेचे!


Google Meet हे लोकप्रिय व्हिडिओ कॉलिंग ऍप/सॉफ्टवेअर अगोदर फ्री होते. मात्र त्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. Google Meet चे वापरकर्ते आता केवळ 60 मिनिटांसाठी एक गट व्हिडिओ होस्ट करू शकतील. जे लोक गूगल मीट ही सेवा विनामूल्य वापरत आहेत, त्यांच्या कॉलवर Google ने 60 मिनिटांची मुदत लागू केली आहे.

मागील वर्षी, गूगलने घोषित केले होते, की ते सप्टेंबर 2020 पर्यंत व्हिडिओ कॉलवर कोणतीही मर्यादा लागू करणार नाही. झूम, स्काइप आणि इतर सर्व लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर जोरदार स्पर्धा करण्यासाठी कंपनीने नंतर ही ऑफर जून 2021 पर्यंत वाढविली. परंतु, आता ही ऑफर यापुढे वाढविण्यात येणार नाही. असे गूगल ने म्हंटले आहे.

सर्व “3 किंवा अधिक सहभागींसह कॉल” 60 मिनिटांपुरते मर्यादित असतील. “55 मिनिटांनी, प्रत्येकास एक सूचना मिळेल की कॉल समाप्त होणार आहे. कॉल वाढविण्यासाठी, होस्ट त्यांचे Google खाते अपग्रेड करू शकतो. नाहीतर, कॉल 60 मिनिटांनंतर स्वतःहून संपेल, असे गुगलने म्हटले आहे.

मात्र गूगल त्यासोबत हे एक सेवा विनामूल्य सुरू ठेवली आहे. ती म्हणजे Google Meet वरून वन-ऑन-वन ​​कॉल केल्यास आपण 60 मिनिटांपेक्षा अधिक बोलू शकतो. ह्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा नाही आहे. गूगल नुसार, सर्व वन-ऑन-वन-कॉल 24 तासांपर्यंत वापरू शकतात. जे विनामूल्य आणि एंटरप्राइझ दोन्ही खात्यांसाठी लागू आहे.

गुगलने नमूद केलेले अपग्रेड वर्कस्पेस प्लॅन्स वैयक्तिक स्तरासाठी दरमहा $7.99 (सुमारे 740 रुपये) आहे. जे सध्या अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील आणि जपानसह केवळ पाच देशांमध्ये उपलब्ध आहे. प्लॅन अपग्रेड केल्यानंतर 3 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती google meet वर 60 मिनिटांपेक्षा अधिक वेळ व्हिडिओ कॉन्फरन्स करू शकतात. त्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.


Google मीट फ्री खाते कसे वापरावे?

1. गूगल मीटिंग वर मीटिंग सुरू करण्यासाठी फक्त आपले Google खाते वापरा. 

2. त्यासाठी https://accounts.google.com ह्या वेबसाईट वर जाऊन Sign Up करून घ्या.

3. त्यानंतर तुम्ही तयार केलेल्या नवीन Gmail ID ने meet.google.com ह्या वेबसाईट वर लॉगिन करा.

4.  अश्या प्रकारे तुम्ही गूगल मीट चे फ्री अकाउंट वापरू शकता.

Leave a Comment