Universal Pass ऑनलाईन कसा काढायचा? | Universal Pass Online Registration in Marathi

आज आपण युनिव्हर्सल पास ऑनलाईन कसा काढायचा? (How to download universal pass online in marathi) हे जाणून घेणार आहोत. तसेच युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास वापरण्यासाठी कोण कोणत्या ठिकाणी परवानगी आहे. व तुम्ही कुठे हा पास वापरू शकता. त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Universal Pass हा महाराष्ट्र सरकारने जारी केला आहे. तसेच हा पास ज्या व्यक्तींनी कोरोनाचे दोन डोस (vaccine) घेतले आहेत. त्यांच्यासाठी जारी करण्यात आला आहे. ह्या पास चा वापर करून महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा ठिकाणी बिना टेन्शन फिरू शकता. तसेच रेल्वे प्रवास, मॉल मध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो.

आता आपण जाणून घेऊया की, युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास काढण्यासाठी आपल्याकडे कोण कोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत.

हे नक्की वाचा: COVID-19 Vaccine सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी ह्या पद्धती वापरा!

युनिव्हर्सल पास साठी लागणारे डॉक्युमेंट्स (Documents required for Universal Pass)

  1. तुमचे पूर्ण नाव
  2. दोन्ही लसी घेताना दिलेला मोबाईल नंबर
  3. आणि तुमच्या मोबाईल वर पास काढताना एक OTP येईल तो.
  4. तुमचा एक पासपोर्ट साइज फोटो

युनिव्हर्सल पास ऑनलाईन कसा काढायचा? (Universal Pass Online Registration in Marathi)

स्टेप १ – सर्वात अगोदर महाराष्ट्र सरकारच्या ह्या वेबसाईटवर जावा. ➡️ Universal Pass

स्टेप २ – त्यानंतर तिथे दिलेल्या पर्याया पैकी *Universal Pass For Double Vaccinated Citizens* ह्या पर्यायावर क्लिक करा

स्टेप ३ – आता तुमचा मोबाईल नंबर तिथे टाईप करा आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी तिथे टाईप करुन Submit वर क्लिक करा.

स्टेप ४ – तुमच्यासमोर स्क्रीन वर आता तुमचे नाव येईल. त्याच्या बाजूला *Generate Pass* दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप ५ – तुमची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीन वर येईल. ती एकदा चेक करून घ्या. त्यानंतर तुमचा एक Passport Size फोटो तिथे अपलोड करा.

स्टेप ६ – नंतर सर्व अटी मान्य आहेत असा एक खाली मेसेज असेल तिथे Tick ☑️ करून *Apply* वर क्लिक करा.

स्टेप ७ – तुमच्या मोबाईल वर एक मेसेज येईल, की तुमचा युनिव्हर्सल पास 24 तासात तयार होईल. त्यानंतर थोडा वेळ वाट पाहून नंतर परत ह्याच वेबसाईट वर जाऊन पास डाऊनलोड करा..

Universal Pass कसा काढायचा हे मी youtube व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दाखविले आहे. एकदा बघा..👇🏻

Leave a Comment