15+ Top Marathi OTT Platforms In India | ओटीटी प्लॅटफॉर्म ची मराठी यादी | OTT Apps List Marathi

आजच्या पोस्ट मध्ये आपण Top Marathi OTT Platforms List पाहणार आहोत. अनेक OTT Platforms आहेत, जिथे आपल्याला Marathi Movies, Marathi Web Shows, Marathi Content पाहायला मिळतो. Planet Marathi हे जगातील पहिले Marathi OTT Platform आहे. अक्षय बर्दापूरकर यांनी मराठी भाषिक लोकांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ (Marathi OTT Platform) बनवले आहे.

ऑनलाईन चित्रपट पाहण्याचा हल्ली सगळीकडे ट्रेंड सुरू आहे. टीव्ही वर चित्रपट पाहण्याला प्रेक्षक नापसंती देत आहेत. कारण टीव्ही वर येणाऱ्या जाहिराती व चित्रपटातील काही दृश्ये कापून दाखवणे, ह्या कारणांमुळे प्रेक्षक पूर्णपणे कंटाळून गेलेला आहे.

पण ऑनलाईन चित्रपट पाहताना कोणताही अडथळा किंवा कोणतीही जाहिरात येत नाही. म्हणून प्रेक्षकवर्ग हल्ली ऑनलाईन चित्रपट पाहण्याकडे वळत आहे. ऑनलाईन चित्रपट हा मोबाईल किंवा लॅपटॉप च्या मदतीने पाहता येतो. तसेच ह्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन ची गरज असते.

Planet Marathi व्यतिरिक्त असे अनेक OTT Platforma आहेत. ज्यांच्यावर Marathi Content दाखवला जातो. जसे की, Amazon Prime Video, Netflix, इत्यादी. आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच बोलली जात नाही. तर संपूर्ण जगात मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. त्यामुळे मराठी भाषेमध्ये ऑनलाईन चित्रपट व मालिका बघणारे अनेक लोक आहेत.

ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी फक्त OTT Platforms चा वापर करावा लागतो. एका ओटीटी अँप वर अनेक चित्रपट उपलब्ध असतात. जे आपण इंटरनेट च्या मदतीने कुठेही पाहू शकतो. मागील लेखात आपण OTT बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ती एकदा नक्की वाचा.

Top Marathi OTT Platforms In India

  1. Planet Marathi
  2. Amazon Prime Video
  3. Netflix
  4. Zee5
  5. Voot
  6. ALT Balaji
  7. Disney+ Hotstar
  8. SonyLIV
  9. Jio Cinema
  10. MX Player

Top Marathi OTT Platforms In India

OTt Platforms list in Marathi

Top Marathi OTT Platforms In India:- ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी तसेच वेब शोज, टीव्ही शोज पाहण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अँप चा वापर करू शकता. तसेच जर तुमच्याकडे हे अँप नसतील तर ह्यांच्या अधिकृत (official) वेबसाइट्स आहेत. त्यावरून सुद्धा तुम्ही ऑनलाईन चित्रपट पाहू शकता.

1. Planet Marathi

प्लॅनेट मराठी ग्रुप हा मराठी फिल्म इंडस्ट्रीत मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप आहे. याची सुरूवात सोशल मीडिया आणि मराठी सामग्रीच्या ऑनलाईन जाहिरातींपासून झाली होती. मग हळूहळू फिल्म प्रोडक्शन, सेलिब्रिटी मॅनेजमेन्टमध्ये विविधता आली. Planet Marathi हे लवकरच जगातील पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे.

ज्यामुळे मराठी चित्रपटांना, वेब शोज ना हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. प्लॅनेट मराठी हे 2017 साली स्थापन करण्यात आले होते. Mr. Akshay Bardapurkar यांनी प्लॅनेट मराठी ची सुरुवात केली व ते ह्याचे संस्थापक आहेत.

2. Amazon Prime Video

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ हे अ‍ॅमेझॉन कंपनीचे OTT प्लॅटफॉर्म आहे. अ‍ॅमेझॉन ही एक ई-कॉमर्स कंपनी आहे. ज्याचा मासिक व वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन आहे. ज्यात तुम्ही अ‍ॅमेझॉन वरून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. तसेच अ‍ॅमेझॉन वरून डिस्काउंट, फ्री डिलिव्हरी, प्राईम म्युझिक आणि ई-पुस्तके वाचू शकता.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपची किंमत महिन्याला 129 रुपये आणि वर्षाला 999 रुपये आहे. तसेच ह्यामध्ये तुम्ही मराठी, हिंदी व्यतिरिक्त भाषांमध्ये प्राइम व्हिडिओ पहा शकता. तसेच अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ अन्य सहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वर अनेक Marathi Web Shows, Marathi Movies ऑनलाईन पाहू शकतो. तसेच आता अ‍ॅॅमेझॉन प्राईम व्हिडिओ स्वतः चित्रपट आणि वेब शोज काढत आहेत. व Amazon Prime Video वर लॉन्च करत आहेत.

स्मार्टफोन, टॅबलेट सह कॉम्पुटर वर सुद्धा अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ पाहू शकतो. मासिक १२९/- तर वार्षिक ९९९/- रुपये खर्च येतो. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ मध्ये विकत घेतलेल्या सबस्क्रिप्शन मधून चित्रपट आणि वेब शोज सोबत अ‍ॅमेझॉन च्या वेबसाईट वरून ई-कॉमर्स वस्तू खरेदी करू शकतो.

3. Netflix

नेटफ्लिक्स ह्या ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म ला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. ही एक अमेरिकन ओव्हर-द-टॉप कंपनी आहे. नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मने बरीच अपवादात्मक आणि ओरिजनल शो आणि चित्रपट नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांसाठी आणले आहेत.

जसे की Sacred Games, The Queen’s Gambit, इत्यादी वेब शोज प्रेक्षकांसाठी आणले आहेत. नेटफ्लिक्स ने प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सबस्क्रिप्शन प्लॅन आणले आहेत. मोबाईल, बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम अशा नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्लॅनच्या अनेक प्लॅन आहेत.

ज्या महिन्यात फक्त 199/- रुपये पासून सुरू होतात. रिझोल्यूशन आणि एकाचवेळी पाहण्याच्या संख्येच्या बाबतीत नेटफ्लिक्सची योजना वेगवेगळी आहे, तर आशयाची यादी त्याचप्रमाणे आहे. नेटफ्लिक्स हे मोबाइल फोन, स्ट्रीमिंग डिव्हाइस, स्मार्ट टीव्ही, टॅब्लेट आणि पीसी वर कार्य करते. नेटफ्लिक्स हे पूर्णपणे जाहिरात-मुक्त आहे. नेटफ्लिक्स वर अनेक चित्रपट, वेब शोज आणि ओरिजनल कंटेंट पाहता येते. नेटफ्लिक्स मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषेत उपलब्ध आहे.

हे नक्की वाचा: YouTube बद्दल मराठी इंटरेस्टिंग फॅक्ट्स!

4. Zee5

Zee5 OTT App

Zee5 हे भारतातील एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हा ओटीटी प्लॅटफॉर्म एस्सेल ग्रुप च्या (Essel Group) मालकीचा आहे. ह्यावर ओरिजनल शोज, म्युझिक, चित्रपट तसेच टीव्ही शोज चे एपिसोड्स उपलब्ध असतात. Zee5 हे 12 भाषांमध्ये त्यांची सुविधा उपलब्ध करुन देते.

Zee5 सबस्क्राईब ना ALTbalaji चे शोज, चित्रपट फ्री मध्ये पाहता येतात. कारण Zee5 आणि ALTbalaji यांमध्ये भागीदारी आहे. ह्यावर Zee कंपनीच्या सर्व चॅनल्स चे एपिसोड्स पाहता येतात. एक दिवस जुना एपिसोड हा फ्री मध्ये पाहता येतो तर एक दिवस नंतरचा एपिसोड पाहण्यासाठी Zee5 Premium चे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. Zee5 हे सशुल्क आणि विनामूल्य ह्या दोन सुविधांमध्ये उपलब्ध आहे. मासिक सबस्क्रिप्शन 99/- रुपये आहे. Zee5 वर फ्री मध्ये टीव्ही शोज चे एपिसोड्स पाहता येतात.

हे नक्की वाचा: AR म्हणजे काय ? AR चा फुल फॉर्म आणि संपूर्ण माहिती!

5. Voot

Voot OTT App

Voot हे भारतातील प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म वियाकॉम 18 च्या मालकीचे आहे. ह्यावर देशातील अनेक टीव्ही चॅनेल जसे की कलर्स सारख्या टीव्ही चॅनल्स चे एपिसोड्स उपलब्ध असतात. Voot वर स्वतःच्या मालकीचे चित्रपट आणि ओरिजनल शोज उपलब्ध आहेत. तसेच Voot वरील Big Boss हा प्रोग्राम खूप लोकप्रिय आहे. Voot वरील शोज आणि चित्रपट प्लॅटफॉर्म आणि अँप वर कुठूनही पाहू शकतो.

सुरुवातीला Voot ही एक विनामूल्य ओटीटी स्ट्रीमिंग सेवा होती. परंतु आता कंपनीने दरमहा 99/- रुपये आणि वर्षाकाठी 999/- रुपये किंमतीचे सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. Voot ह्या OTT प्लॅटफॉर्म वर लहान मुलांसाठी Voot Kids ही सुविधा देण्यात आली आहे. ह्या वर फक्त लहान मुलांसाठी कार्टून, अनिमेशन व्हिडिओज, पोईम इत्यादी उपलब्ध असतात. ह्यावर तुम्ही colors टीव्ही वाहिन्यांचा एपिसोड्स पाहू शकता.

6. ALTbalaji

Alt Balaji OTT App

ओटीटी प्लॅटफॉर्म वर अनेक प्रकारच्या भारतीय भाषांमधील ओरिजनल शोज आणि चित्रपट उपलब्ध आहेत. अल्टबालाजी मुख्यतः 18+ वयांमधील प्रेक्षकांसाठी हिंदी, बंगाली, मराठी, तसेच अन्य भाषांमध्ये ओरिजनल शोज आणि वेब सीरिज उपलब्ध करून देतात.

अल्टबालाजी पंजाबी, तमिळ आणि बर्‍याच इतर प्रादेशिक भाषांमधून त्यांच्या वेब सीरिज आणि चित्रपट ऑफर करतात. अल्टबालाजी मधील सबस्क्रिप्शन हे, तीन महिन्यांसाठी 100/- रुपये, सहा महिन्यांसाठी 180/- रुपये आणि एका वर्षासाठी 300/- रुपये इतके आहे.

हे नक्की वाचा: Beta Version काय आहे? आणि Beta Program मध्ये सहभागी कसे व्हायचे?


7. Disney+ Hotstar

Disney+ Hotstar OTT Platform

डिस्नी+ हॉटस्टार हे भारतात सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. वॉल्ट डिस्नी ने हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घेतला. त्यानंतर तो Disney+ Hotstar म्हणून ओळखला जाऊ लागला. डिस्नी + हॉटस्टार ह्या स्ट्रीमिंग सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कंटेंट उपलब्ध आहे. ज्यात चित्रपट, टीव्ही शो, वेब मालिका, स्पोर्ट्स, किड्स कंटेंट आणि बातम्या उपलब्ध आहेत. डिस्नी ची मालकी असल्यामुळे ह्यात आपल्याला हॉलिवूड मधील चित्रपट सुद्धा पाहायला मिळतात.

ज्यात आपल्याला मार्वल, स्टार वॉर्स तसेच डिस्नी चेच अ‍ॅनिमेटेड चित्रपट आणि शो देखील पाहायला मिळतात. डिस्नी + हॉटस्टार आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) डिव्हाइस तसेच पीसी आणि स्मार्ट टीव्ही मध्ये पाहता येते. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट व ओरिजनल शोज पाहण्यासाठी, आपल्याला त्यांचा सबस्क्रिप्शन प्लॅन विकत घेणे आवश्यक आहे. डिस्नी + हॉटस्टार दोन योजनांसह उपलब्ध आहे. एक म्हणजे व्हीआयपी (VIP) आणि प्रीमियम (Premium).

Subscription Plans Price
• VIP :- 399/- Year
• Premium :- 1299/- Year
• Premium :- 299/- Month

8. SonyLIV

SonyLiv OTT Platform
Photo Credits – Sony Liv

SonyLIV हे Sony Pictures Networks India Pvt. Ltd कंपनी चे OTT प्लॅटफॉर्म आहे. ह्यावर सोनी चॅनल्स वरील टीव्ही शोज, लाईव्ह शोज, स्पोर्ट्स, कॉमेडी इत्यादी कार्यक्रम उपलब्ध आहेत. 18 वर्षाहून अधिक प्रेक्षकांसाठी खास वेब सीरिज आणि ओरिजनल शोज पाहण्यासाठी आहेत.

हे नक्की वाचा: e-Aaadhar Card डाऊनलोड करण्यासाठी ह्या ट्रिक चा वापर करा.

SonyLIV हा ओटीटी प्लॅटफॉर्म अँड्रॉइड, आयओएस, स्मार्ट टीव्ही आणि इतर डिव्हाइज वर उपलब्ध आहे. सोनी लिव्ह अँप देखील सबस्क्रिप्शन-आधारित सेवा उपलब्ध करून देते.

Subscription Plans Price
• SonyLiv Free plan
• SonyLiv Premium plan :- Rs 299/ month — Rs 699/ six months — Rs 999/ year
• SonyLiv WWE network plan :- Rs 299/ year

9. JioCinema

JioCinema OTT App

JioCinema हे भारतीय OTT प्लॅटफॉर्म असून ह्याची सुरुवात मुकेश अंबानी यांनी केली आहे. JioCinema ही एक व्हिडिओ-ऑन-डिमांड OTT सेवा आहे. हा प्लॅटफॉर्म कोणतेही शुल्क न घेता फक्त जिओ वापरकर्त्यांसाठीच आहे. JioCinema सामग्रीच्या कॅटलॉगमध्ये चित्रपट, टीव्ही शो, Jio Exclusive, डॉक्युमेंट्री आणि ट्रेलर समाविष्ट आहेत. नुकतीच जिओने टॉय स्टोरी 3, द जंगल बुक, द लायन किंग आणि इतर लोकप्रिय चित्रपटांसाठी डिस्नी सोबत भागीदारी देखील केली होती. नुकतेच Jio कंपनीने JioFiber ब्रोडबंड लॉन्च केले आहे. ज्यात सर्व OTT बेस अँप एकाच ठिकाणी पाहू शकतो.


10. MX Player

MX Player हे भारतातील सर्वोत्कृष्ट ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. MX Player ची सुरुवात ही फक्त एक व्हिडिओ प्लेयर पासून झाली होती, मात्र ते आता एक सर्वोत्तम ओटीटी प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. एमएक्स प्लेअर वर ओरिजनल शोज पाहायला मिळतात. MX Player हे वापरण्यासाठी अगदी फ्री आहे. ज्यावर ओरिजनल शोज, वेब सीरिज तसेच चित्रपट पाहायला मिळतात. Mx Player वापरण्यासाठी मोफत असले तरी त्यामध्ये जाहिराती दाखविल्या जातात. समांतर सारखी लोकप्रिय मराठी वेब सीरिज ही MX Player वर उपलब्ध आहे. असे अनेक मराठी वेब सिरीज आहेत, ज्या तुम्ही MX Player वर मोफत पाहू शकता. जसे Any Kay Hava (Season 1, 2) , समांतर (सीझन 1, 2), Idiot Box, असे अनेक मराठी दर्जेदार वेब सिरीज येथे पाहू शकता.


हे नक्की वाचा: स्मार्टवॉच म्हणजे काय? स्मार्टवॉच चे फीचर्स आणि फायदे!

OTT Platforms ना पुढच्या काळात किती मागणी वाढणार आहे?

प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या पसंतीमुळे तसेच जास्त प्रमाणात होणाऱ्या ओटीटी च्या वापरामुळे, थोड्याच वर्षांनी ओटीटी प्लॅटफॉर्म ना मागणी वाढणार आहे. Covid-19 मुळे जगभरात तसेच भारतात देखील लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे थिएटर्स बंद पडले होते. त्यामुळे ऑनलाईन चित्रपट पाहण्याची मागणी वाढू लागली. लोक घरात बसून फॅमिली सोबत, मित्रांसोबत ओटीटी प्लॅटफॉर्म वर चित्रपट, वेब शोज पाहू लागले.

तसेच ह्यामध्ये 200 रुपयांमध्ये पूर्ण महिनाभर ऑनलाईन चित्रपट व ओरिजनल शोज पाहता येतात. तसेच कोणत्याही ठिकाणाहून इंटरनेट च्या साहाय्याने ओटीटी वरून ऑनलाईन चित्रपट पाहता येतात. भारता मध्ये स्पोर्ट्स आणि चित्रपटांना खूप लोकप्रियता आहे. त्यामुळे डिस्नी + होटस्टार हे सर्वात उत्तम ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.

टॉप 10 मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्याचे ॲप!गूगल बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्समराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी हे मराठी कीबोर्ड वापरा!

ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा! (Top Marathi OTT Platforms In India) हा लेख तुम्हाला आवडला असेलच. तसेच हा लेख सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका. तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.

1 thought on “15+ Top Marathi OTT Platforms In India | ओटीटी प्लॅटफॉर्म ची मराठी यादी | OTT Apps List Marathi”

Leave a Comment