Coding म्हणजे काय? आणि कोडिंग कशी केली जाते?


Coding बद्दल ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडत असेल की कोडिंग म्हणजे काय? आणि ही coding कशी केली जाते? तर आज आपण कोडिंग बद्दलच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Coding म्हणजे काय? (What is Coding in Marathi) आणि coding कशी केली जाते हे आपण आज पाहूया.

गेल्याच वर्षी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कोडिंग चा समावेश करण्यात आला. कोडिंग शिकणे हे गरजेचे आहे कारण आत्ताचे जग हे तंत्रज्ञानाचे आहे. अमेरिका सारखे देश तंत्रज्ञानाचा वापर करून खूप पुढे गेले. कोडिंग शिकणे तसे अवघड नाहीय. तुम्हाला फक्त कोडिंग बद्दल माहिती आणि कॉम्प्युटर कसा वापरायचा ह्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

कोडिंग शिकण्यासाठी ऑनलाईन अनेक पर्याय आहेत तसेच ऑफलाईन सुद्धा आहेत. तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइट्स वरून फ्री मध्ये किंवा पेड कोर्सेस घेऊन कोडिंग शिकू शकता. कोडिंग शिकून तुम्हाला अनेक प्रकारचे ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर किंवा गेम्स तयार करू शकता.

आज आपण कोडिंग म्हणजे काय? (What is Coding in Marathi) आणि कोडिंग कशी केली जाते ह्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून तुम्ही सुद्धा कोडिंग शिकायला सुरुवात कराल.


Coding म्हणजे काय? | What is coding in Marathi

What is Coding in Marathi

कोडिंग म्हणजे संगणकाला हवे तसे वागवण्यासाठी वापरली जाणारी संगणकीय भाषा. Code ची प्रत्येक ओळ संगणकासाठी निर्देशांचा एक संच आहे. कोडचा एक संच एक स्क्रिप्ट तयार करतो आणि एक प्रोग्राम बनवतो. ह्यालाच कोडिंग असे म्हणतात. जेव्हा युजर एखादा सॉफ्टवेअर ओपन करतो, तेव्हा त्या युजर ला त्या सॉफ्टवेअर चा इंटरफेस दिसतो. पण कोडिंग ही त्या सॉफ्टवेअर च्या मागे केलेली असते. ही कोडिंग फक्त सॉफ्टवेअर बनवणारा व्यक्ती किंवा कंपनी पाहू शकते. कोणताही सामान्य माणूस पाहू शकत नाही.

जसं आपण कोणताही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करतो. तसे एखादा ऍप किंवा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी कोडिंग चा वापर केला जातो. कोडिंग म्हणजेच प्रोग्रामिंग लँग्वेज. कोडिंग लाच प्रोग्रामिंग असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही गोधळून नका जाऊ. कोडिंग ही कॉम्प्युटर ची भाषा आहे, ज्याचा वापर करून आपण सॉफ्टवेअर किंवा इतर ऍप्लिकेशन बनवू शकतो.

▪️E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!


कोडिंग चा वापर करून सॉफ्टवेअर, वेबसाइट, मोबाइल ऍप्लिकेशन, गेम्स, इ-कॉमर्स स्टोअर ,ऑनलाईन कंपनी बनवू शकतो. कोडिंग चा वापर करून फेसबुक, गूगल, मायक्रोसॉफ्ट, इंस्टाग्राम, अमेझॉन, फ्लिपकार्ट, वर्डप्रेस, यूट्यूब सारख्या ऍप्लिकेशन आणि ऑनलाईन कंपन्या बनवल्या आहेत. उदा. वेबसाइट बनवण्यासाठी तुम्हाला चार कोडिंग लँग्वेज चा वापर करावा लागतो. वेबसाईट डिजाइन करण्यासाठी म्हणजेच वेबसाईट चा यूजर इंटरफेस (UI) तयार करण्यासाठी HTML & CSS भाषा वापरावी लागते. तर डेटा साठवण्यासाठी MySQL भाषा वापरावी लागते. तसेच डेटा ऑपरेशनसाठी PHP सर्वर साइड लॅंगवेज वापरावी लागते.

कोडिंग ही वेगवेगळ्या कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये केली जाते. जसे की Java, C++, Python, C#, HTML, ह्या सर्व कोडिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा आहेत. सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट बनवण्यासाठी खूप कोडिंग करावे लागते. हे बनवलेले कोडिंग फाईल्स मध्ये तयार केले जाते. कोडिंग फाइल लाच प्रोग्राम फाइल्स असे सुद्धा म्हणतात.


कोडिंग कशी केली जाते?

Coding kashi keli jate

कोडिंग ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. प्रत्येक जण त्याच्या गरजेनुसार कोडिंग शिकतो. तुम्हाला काय बनवायचे आहे त्यानुसार तुम्हाला कोडिंग शिकावे लागेल. जसे की कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, वेबसाईट, इ-कॉमर्स वेबसाईट. कोडिंग करण्यासाठी कोडिंग बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही परफेक्ट कोडिंग करू शकणार नाही.

कोडिंग बी कॉम्प्युटर वर केली जाते. कोडिंग साठी कॉम्प्युटर वर एक विशिष्ट सॉफ्टवेअर घ्यावे लागते. त्या सॉफ्टवेअर वर कोडिंग करून तुम्ही तुमचे सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट बनवू शकता. कोडिंग करताना Class, datatype, function, codes, conditional statement हे माहीत असणे आवश्यक आहे.


कोडिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंग भाषा

Coding madhye vaparlya janarya programing language
  1. Java

Java ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर सॉफ्टवेअर, Mobile App Development, Web-based Applications, Gaming Applications, Cloud-based Applications बनवण्यासाठी केला जातो.

Java ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज वर कोडिंग करून सॉफ्टवेअर किंवा ऍपलिकेशन बनवण्यासाठी Java Software डाऊनलोड करावे लागते. ह्या Java च्या ऑफिशियल वेबसाइट्स आहेत. जिथून तुम्ही Java Software डाऊनलोड करू शकता.

▪️https://www.oracle.com
▪️https://www.java.com


  1. C

ही प्रोग्रामिंग भाषा शिकण्यासाठी सरळ आणि सोपी आहे. जर नवीनच कोडिंग शिकत असाल तर प्रथम C ही कोडिंग भाषा शिकावी असेल सांगितले जाते. कारण ही भाषा लवकर समजून घेता येते. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज ला स्ट्रक्चर्स प्रोग्रामिंग किंवा मदर प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा म्हंटले जाते.

ही लॅंगवेज सिस्टम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी वापरली जाते. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज मुळे कोडिंग शिकणे सोपे होते.

ह्या वेबसाईट वरून तुम्ही C प्रोग्रामिंग चे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता.

▪️https://www.javatpoint.com


3. C++

C++ ही प्रोग्रामिंग लॅंगवेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे आपल्या मनात जे आहे, ते कोड स्वरूपात टाईप करून आपण सॉफ्टवेअर बनवू शकतो. या लँग्वेज चा वापर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवण्यासाठी केला जातो. या प्रोग्रामिंग लँग्वेज चे सॉफ्टवेअर ह्या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.

▪️https://www.javatpoint.com


4. Python

पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज ही सर्वात सोपी आहे. ही प्रोग्रामिंग लँग्वेज C, C++ आणि Java ह्यांच्या पेक्षा सर्वात सोपी आहे. ह्या लँग्वेज चा वापर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, वेबसाइट, मशीन लर्निग, Artificial Intelligence (AI) ह्यामध्ये केला जातो. 

खालील वेबसाईट वरुन तुम्ही Python सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता.

▪️https://www.python.org


  1. PHP

PHP प्रोग्रामिंग लँग्वेज वेबसाईट बनवल्यानंतर वेबसाईट च्या वेब सर्वर साठी वापरली जागे. जुनी भाषा म्हणून, php प्रोग्रामिंग भाषेचा वापर सुलभ करण्यासाठी फ्रेमवर्क, ग्रंथालये आणि ऑटोमेशन साधने तयार करणार्‍या वापरकर्त्यांच्या मोठ्या पर्यावरणातील पीएचपीचा फायदा होतो. पीएचपी कोड चा वापर करून डीबग करणे देखील सोपे आहे.


  1. C#

मायक्रोसॉफ्टने C# ही प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली. ही प्रोग्रामिंग लँग्वेज वेगवान आणि अधिक सुरक्षित रूप आहे असे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे. ही प्रोग्रामिंग लँग्वेज मायक्रोसॉफ्टच्या .NET नेटवर्क फ्रेमवर्कसह पूर्णपणे समाकलित आहे. जी विंडोज, ब्राउझर प्लगइन आणि मोबाइल डिव्हाइसला सपोर्ट करते. C# shared कोडबेसेस, एक मोठी कोड लायब्ररी आणि विविध प्रकारचे डेटा ऑफर करते.

तसे पाहायला गेलो तर प्रोग्रामिंग लँग्वेज चे अनेक प्रकार आहेत. परंतु वर दिलेले प्रोग्रामिंग लँग्वेज चे प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त वापरले जाणारे आहेत. म्हणून मी तुम्हाला हे 6 प्रोग्रामिंग लँग्वेज चे प्रकार सांगितले.


7 इतर प्रोग्रामिंग लँग्वेज ज्यांचा सुद्धा कोडिंग साठी वापर केला जातो.

वरील 6 प्रोग्रामिंग लँग्वेज खूप लोकप्रिय आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या लँग्वेज आहेत. परंतु आता आपण ज्या 7 प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या लँग्वेज लोकप्रिय नसल्या तरी त्यांचा वापर काही महत्वाच्या वेळी केला जातो.

  1. Dart

Windows आणि iOS सारख्या एकाधिक (Multiple) प्लॅटफॉर्मवर चालण्याची आवश्यकता असलेल्या प्रोग्रामिंग ऍप्लिकेशन साठी डार्ट चा वापर केला जातो.

  1. Kotlin

कोटलिनचा वापर अँड्रॉइड ओएस (Android OS) च्या ऍप्लिकेशन ना डेव्हलप करण्यासाठी केला जातो.

  1. MATLAB

मॅट्लॅब ही मॅथवर्क्स द्वारा विकसित केलेली मालकीची भाषा आहे. तसेच ही भाषा वैज्ञानिक संशोधन आणि संख्यात्मक संगणनासाठी वापरली जाते.

  1. Ruby

इतर भाषांच्या तुलनेत रुबी कर्षण गमावत आहे, परंतु रुबी ऑन रेल्स फ्रेमवर्क इतरांकरिता प्रभावी होते, नंतर पायथन, पीएचपी आणि जावास्क्रिप्टसाठी वेब अनुप्रयोग फ्रेमवर्क.

  1. Rust

Rust ही लँग्वेज हाय परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेवर जोर देते. तसेच एकाच वेळी बऱ्याच गोष्टी घडत असतात, अशा ऍप्लिकेशन साठी ही लँग्वेज उपयुक्त आहे.


कोडिंग कशी व कुठून शिकायची?
Coding kashi v kuthun shikaychi

कोडिंग मध्ये आवड आहे पण कोडिंग कशी व कुठून शिकायची? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर कोडिंग शिकण्याचे दोन पर्याय तुमच्यासमोर आहेत. एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन. पण त्याअगोदर तुम्ही हे ठरवले पाहिजे की तुम्हाला कोडिंग करून नक्की काय बनवायचे आहे.

तुम्ही कोडिंग शिकून मोबाईल ऍप डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डिझायनिंग, मोबाईल गेम्स इत्यादीपैकी नक्की काय बनवायचे आहे. ते ठरवा आणि त्यानंतर तुम्ही जे बनवणार आहात ते कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये येत ते बघून प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू शकता.


ऑनलाइन कोडिंग कशी शिकायची?
How to learn coding online

जर तुम्हाला घरात बसून कोडिंग शिकायची असेल, तर ऑनलाईन कोडिंग शिकणे तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. इंटरनेट वर अश्या अनेक वेबसाइट्स आहेत ज्यांच्यावर फ्री मध्ये किंवा पैसे देऊन आपण कोडिंग शिकू शकतो. मी तुम्हाला काही वेबसाईट ची नावे अणि लिंक खाली दिलेली आहेत. त्या वेबसाईट वरून तुम्ही कोडिंग शिकू शकता.

ऑनलाइन कोडिंग शिकण्यासाठी मी तुम्हाला काही चांगल्या वेबसाइट सांगेल त्यावरून तुम्ही ऑनलाइन बेस्ट कोडिंग शिकू शकाल.

▪️www.udemy.com
▪️www.codecademy.com
▪️www.whitehatjr.com
▪️www.w3schools.com
▪️www.codingninjas.com
▪️www.tutorialpoint.com
▪️www.javapoint.com
▪️www.developer.android.com


ऑफलाइन कोडिंग कशी शिकायची?
How to learn Coding offline

ऑफलाईन कोडिंग शिकण्यासाठी तुम्हाला कोडिंग चे ट्युशन लावावे लागतील. तसेच कोडिंग ची पुस्तके देखील असतात. ती खरेदी करून तुम्ही स्वतःहून कोडिंग शिकू शकता. तसेच यूट्यूब वरून देखील व्हिडिओज पाहून कोडिंग शिकू शकता.


वरील दिलेली संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला कोडिंग म्हणजे काय? (What is Coding in Marathi) ह्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल. तसेच तुम्ही सुद्धा आज पासून कोडिंग शिकू शकता. आणि सॉफ्टवेअर आणि अॅपलिकेशन बनवू शकता.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आजुन काही माहिती हवी असेल तर मराठी टेक कॉर्नर च्या इंस्टाग्राम पेज वर मेसेज करा. ही माहिती तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी अधिक माहितीसाठी मराठी टेक कॉर्नर ला जोडून रहा.

1 thought on “Coding म्हणजे काय? आणि कोडिंग कशी केली जाते?”

  1. Seriously khup important gosht tumhi tumchya lekh madhun sangitli aahe thank you so much sir/ madam..👍❤️

    Reply

Leave a Comment