आजच्या ब्लॉग मध्ये आपण नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे? (How to get traffic on blog in marathi) हे पाहणार आहोत. तसेच मी तुम्हाला काही १२ ट्रिक्स सांगणार आहे, ह्या टिप्स वापरून तुम्ही वेबसाईट वर जास्तीत जास्त ट्रॅफिक आणू शकता.
ब्लॉगिंग करताना प्रत्येक जण वेबसाईट वर नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. इंटरनेट वर त्या विषयाबद्दल माहिती शोधून वाचक त्या विषयाबद्दल माहिती वाचण्यासाठी त्या वेबसाईट ला भेट देतात.
पण तुम्हाला माहीत आहे का? वाचकांनी वेबसाईट ला भेट देण्यासाठी तुमच्या पोस्ट आणि तुमची वेबसाईट गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये रँक होणे गरजेचे आहे.
पण त्यासाठी सर्वात अगोदर तुमची वेबसाईट गूगल व बिंग च्या सर्च इंजिन्स मध्ये सबमिट करणे गरजेचा आहे. नवीन वेबसाईट Google Search Console मध्ये कशी सबमिट करायची ह्यावर मी एक लेख लिहिला आहे.
तसेच बिंग च्या Bing Webmaster Tools मध्ये वेबसाईट कशी सबमिट करायची हे सुद्धा सविस्तर समजावून सांगितले आहे. ते वाचून तुम्ही वेबसाईट सर्च इंजिन्स मध्ये सबमिट करून घ्या.
वेबसाईट जर सर्च इंजिन्स मध्ये सबमिट केलीच नाही तर तुम्ही तयार केलेल्या पोस्ट चा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून अगोदर हे करून घ्या.
नवीन वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक कसे आणायचे?
मित्रांनो, नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक आणणे हे सर्वात कठीण काम आहे. पण जर तुम्ही रोज नवनवीन विषयावरच्या पोस्ट लिहून तुमच्या ब्लॉग/वेबसाईट वर सबमिट केलात तर लोक तुमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात. तसेच ब्लॉग लिहिताना मनात हे लक्षात ठेवून लिहा की.
तुमच्या ब्लॉग मधून तुम्ही नवं काही देण्याचा प्रयत्न करत आहात ना. कारण जर तुम्ही लोकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला नाही तर ते दुसऱ्या ब्लॉग वर जाऊ शकतात. म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा.
तसेच स्वतः सुद्धा नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करा. व तुमच्या वेबसाईट वर पोस्ट करत रहा. आजच्या लेखात आपण नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी 12 ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमच्या वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक आणू शकता. आणि तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे? 12 बेस्ट ट्रिक्स!
1. Search Engine Optimization (SEO)
वेबसाईट वर ट्रॅफिक आणण्यासाठी SEO खूप महत्त्वाचा भाग आहे. वेबसाईट वर जास्तीत जास्त रहदारी गूगल व बिंग सारख्या सर्च इंजिन्स वरून येते. काही काही जण त्यांची वेबसाईट फक्त गूगल च्याच सर्च इंजिन्स मध्ये सबमिट करतात. पण बिंग च्या सर्च इंजिन मध्ये सुद्धा वेबसाईट सबमिट करणे गरजेचे आहे.
कारण Google हा जगातील लोकप्रिय सर्च इंजिन असला तरी Bing सर्च इंजिन चा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे तुम्ही तुमची वेबसाईट बिंग सर्च इंजिन च्या Bing Webmaster Tool मध्ये सबमिट केली पाहिजे.
जर वेबसाईट सर्च इंजिनसाठी ऑप्टिमाइझ केली नाही तर वेबसाईट वर ऑरगॅनिक ट्रॅफिक येणार नाही. त्यामुळे जरी तुम्ही रहदारी वाढवण्यासाठी दुसऱ्या मार्गांचा उपयोग केला तरी त्याचा थोडा सुद्धा उपयोग होणार नाही.
एसईओमध्ये बरेच अल्गोरिदम आहेत, आपल्याला ते सर्व लक्षात ठेवून वेबसाईट वर सतत काम करत राहिले पाहिजे. तसेच तुमची वेबसाईट SEO फ्रेंडली बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही रोज नवनवीन seo फ्रेंडली पोस्ट लिहिल्या पाहिजे.
SEO चे दोन प्रकार असतात.
1. On Page SEO
2. Off Page SEO
SEO बद्दल संपूर्ण माहिती मी मागील लेखात समजावून सांगितली आहे.
2. Guest Post
हा एक सोप्पा आणि उपयोगी पर्याय आहे. Guest Post च्या आधारे आपण दुसऱ्या वेबसाईट वरून आपल्या वेबसाईट वर रहदारी आणू शकतो.
त्यासाठी फक्त आपल्या वेबसाईट च्या विषया संबंधी असलेल्या टॉप वेबसाईट वर एक किंवा दोन पोस्ट केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या वेबसाईट वर रोज 1000 पेक्षा जास्त ट्रॅफिक येण्यास सुरुवात होईल.
गेस्ट पोस्ट करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा:-
▪️ तुमचा जो विषय आहे त्याच विषयाच्या वेबसाईट वर गेस्ट पोस्ट करा.
▪️ ज्या वेबसाईट वर जास्तीत जास्त ट्रॅफिक येते त्याच वेबसाईट वर गेस्ट पोस्ट करा.
3. Push Notifications
पुष नोटिफिकेशन्स चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट ला भेट देणाऱ्या लोकांना त्यांनी तुमच्या ब्लॉग ला भेट न देता सुद्धा तुम्ही त्यांना पोस्ट पाठवू शकता. ह्यासाठी तुम्हाला Push Notifications चा वापर करावा लागेल.
पुष नोटिफिकेशन्स ठेवण्यासाठी One Signal ही एक उत्तम वेबसाईट आहे. तुम्ही त्या वेबसाईट वर जाऊन तुमच्या वेबसाईट चे नाव, URL टाकून सबमिट करा नंतर त्यांनी दिलेला HTML कोड तुमच्या वेबसाईट मध्ये पेस्ट करून सबमिट करा. त्यानंतर तुमच्या वेबसाईट वर पुष नोटिफिकेशन्स सर्व्हिस सुरू होईल.
ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट वर येणाऱ्या लोकांना तुमच्या वेबसाईट ला सबस्क्राईब करण्यासाठी पर्याय देऊ शकता. जस जसे लोक वेबसाईट ला सबस्क्राईब करतील. तस तसे तुम्ही त्या पुष नोटिफिकेशन्स च्या साहाय्याने त्यांच्या मोबाईल वर तुमच्या नवीन ब्लॉग चे नोटिफिकेशन्स पाठवू शकता. व त्याच्या मार्फत लोकं परत तुमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकतात.
वर्डप्रेस वेबसाईट वर Push Notifications कसे सेट करावे? ह्याबद्दल आपण मागच्या लेखात जाणून घेतले आहे.
4. Social Media Platforms
सोशल मीडिया आजच्या युगात कोण नाही वापरत. प्रत्येक जण दिवसातील जास्तीत वेळ सोशल मीडिया वरच घालवत असतो. ह्याच गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजेच तुमच्या वेबसाईट चे सोशल मीडिया अकाउंट्स बनवून त्यावर पोस्ट शेअर करा. आणि तुमच्या Profile मध्ये वेबसाईट ची लिंक Add करा.
ह्याचा तुमच्या वेबसाईट ला खूप फायदा होईल. तसेच ऑफ पेज ऑप्टिमाइझेशन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण पोस्ट शेअर करताना टप्या टप्प्याने पोस्ट शेअर केल्या पाहिजे. पोस्ट शेअर करण्यासाठी तुम्ही Facebook, Twitter, Instagram, Pinterest ह्या प्लॅटफॉर्म चा वापर करू शकता.
Quora सारख्या प्लॅटफॉर्म वर अकाऊंट तयार करून. तुमच्या वेबसाईट विषयी माहिती देऊन त्यामार्फत वेबसाईट वर ट्रॅफिक आणता येते. तसेच तिथे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन देखील वेबसाईट वर रहदारी आणता येते. हे एक प्रकारे बॅकलिंक चेच काम करते.
5. Unique Content
मित्रांनो, ब्लॉगिंग मध्ये कंटेंट इज किंग आहे. कारण जर तुमच्या पोस्ट मधला कंटेंट युनिक असेल तर जास्तीत जास्त लोक ती पोस्ट वाचण्यासाठी वेबसाईट ला भेट देऊ शकतात. तसेच जर तुमची पोस्ट युनिक असेल तर गूगल लगेचच ती पोस्ट रँक करतो.
तसेच युनिक कंटेंट सोबत पोस्ट ची length म्हणजेच Article Length सुद्धा महत्वाची आहे. कारण जर पोस्ट मध्ये जास्तीत जास्त शब्द (words) असतील, तर ती पोस्ट लोकप्रिय होऊ शकते. पोस्ट मध्ये जास्तीत जास्त 1,000 ते 3,000 शब्द असतील तर ती पोस्ट फेमस होऊ शकते.
तसेच क्वालिटी कंटेंट लिहिण्यासाठी अगोदर ज्या विषयावर पोस्ट लिहिणार आहे त्याची संपूर्ण माहिती जमा करून नंतर पोस्ट लिहिली पाहिजे. तसेच पोस्ट मध्ये आकर्षित Headings चा वापर केला पाहिजे.
6. Advertisement
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर तुमच्या वेबसाईट ची जाहिरात देऊन नवीन ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Google Ads चा वापर करून तुम्ही तुमची नवीन वेबसाईट गूगल च्या सर्च रिझल्ट्स मध्ये पहिल्या पानावर आणू शकता. तसेच फेसबुक सारख्या सोशल मीडिया वरच सुद्धा तुम्ही Advertise करू शकता.
नवीन वर्ष सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.
7. Theme
तुम्ही तुमच्या वेबसाईट वर कोणती व कशी थीम ठेवली आहे त्यावरून सुद्धा तुमच्या वेबसाईट चे इम्प्रेशन पडते. ब्लॉगर व वर्डप्रेस वर मिळणाऱ्या फ्री थीम चा वापर करून वेबसाईट ला आकर्षित व चांगले लूक देऊ शकता.
तसेच तुमची वेबसाईट ओपन केल्यावर किती सेकंदात ती ओपन होतो, ह्यावर सुद्धा तुमच्या ब्लॉग चे ट्रॅफिक अवलंबून असते. म्हणून वेबसाईट ची थीम ही युजर फ्रेंडली आणि लाईट वेट असेल अशी ठेवा. जर तुम्ही वर्डप्रेस वापरत असाल तर, Generate Press थीम वापरु शकता.
थीम निवडून झाल्यानंतर त्या थीम वर लोकांना हवी असलेली पोस्ट योग्य रित्या शोधता आली पाहिजे. म्हणून थीम ही सुटसुटीत आणि युजर फ्रेंडली असली पाहिजे.
हे नक्कीच वाचा: टॉप १५ बेस्ट वर्डप्रेस न्यूजपेपर थीम्स
8. Comment On Others Blog
तुम्ही ज्या टॉपिक बद्दल तुमच्या वेबसाईट वर ब्लॉग्स लिहिता. त्यामध्ये ज्या लोकप्रिय वेबसाईट असतील त्यांच्या कमेंट्स सेक्शन मध्ये कमेंट्स करून तिथे तुमच्या ब्लॉग ची लिंक देऊ शकता.
पण कमेंट्स करताना कधीही तुमचा Email id कमेंट मध्ये Add करू नका. असे केल्यास ती कमेंट स्पॅम धरण्यात येते. त्यामुळे तिथे दिलेल्या पर्यायांमध्ये माहिती भरून कमेंट्स सबमिट करा.
अश्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक आणू शकता.
9. SMS Marketing
प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये महिन्याभराचा अनलिमिटेड रिचार्ज असतो. त्यात दर दिवसाला 100 किंवा 300 SMS उपलब्ध असतात. त्या सुविधेचा फायदा आपण आपल्या नवीन वेबसाईट च्या मार्केटिंग साठी करू शकतो.
तुमच्या Contact मधील लोकांना, नातेवाईकांना SMS द्वारे तुमच्या वेबसाईट ची लिंक पाठवून तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक शकता. तसेच हा पर्याय खूप सोप्पा असल्याने ह्यात जास्त वेळही वाया जात नाही.
हे नक्की वाचा: प्रत्येक मराठी ब्लॉगरने वापरले पाहिजे! असे 10 Chrome Extensions
10. Mobile Optimization
आजच्या काळात जास्तीत जास्त लोकं मोबाईल वरूनच इंटरनेटचा वापर करत आहेत. काही शोधण्यासाठी मोबाईलच्या साहाय्याने गूगल वर माहिती शोधतात. त्यामुळे वेबसाईट वर लिहिलेली प्रत्येक ब्लॉग पोस्ट ही Mobile Friendly असणे गरजेचे आहे. ज्यामुळे लोकांना मोबाईल वरून पोस्ट वाचताना कोणता त्रास होणार नाही. व ते आरामात तुम्ही लिहिलेली पोस्ट वाचू शकतात.
Google सुद्धा मोबाईल फ्रेंडली वेबसाईट ना अधिक महत्व देत आहे. त्यामुळे तुमचा ब्लॉग Mobile Friendly करणे गरजेचे आहे.
11. Create YouTube Channel
यूट्यूब हे जास्त प्रमाणात वापरले जाते. यूट्यूब वरून व्हिडिओ टाईप मध्ये कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवता येते. त्यामुळे कोणालाही ते अगदी सहज व चांगले लक्षात राहते.
यूट्यूब वरून वेबसाईट वर ट्रॅफिक आणता येते. तसेच ह्यामुळे वेबसाईट रँक होण्यास मदत मिळते. त्यामुळे यूट्यूब वर ब्लॉग संदर्भात व्हिडिओ टाकून त्यामार्फत वेबसाईट वर ट्रॅफिक आणता येते.
आमच्या YouTube चॅनल ला Subscribe नक्की करा.
त्यासाठी तुमच्या वेबसाईट चे एक यूट्यूब चॅनल तयार करा. आणि त्यामार्फत वेबसाईट वर पोस्ट केलेल्या ब्लॉग विषयी चे व्हिडिओ अपलोड करा.
यूट्यूब वर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओ मधील Description मध्ये वेबसाईट ची लिंक देऊन ती व्हिडिओ शेअर करून वेबसाईट वर ट्रॅफिक आणू शकता.
हे नक्की वाचा: Affiliate Marketing मधून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी ह्या वेबसाइट्स चा वापर करा!
12. Trending Topics
वेबसाईट पोस्ट साठी जास्तीत जास्त trending ला असणारे टॉपिक निवडा आणि त्यावर seo फ्रेंडली पोस्ट लिहा. त्यामुळे तुमची पोस्ट पटकन गूगल सर्च रिझल्ट्स मध्ये First Page वर रँक होऊ शकते. त्यामुळे जास्त ट्रॅफिक वाढू शकते.
Trending topics म्हणजे दिवाळी, होळी, किंवा तुमच्या विषया संबंधी ट्रेडिंग टॉपिक लिहून तुम्ही पोस्ट करू शकता. ट्रेडिंग टॉपिक शोधण्यासाठी Google Trends किंवा Quora चा वापर सुद्धा करू शकता.
मला आशा आहे की नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे? हा लेख तुम्हाला आवडला असेल. तसेच ह्या 12 ट्रिक्स चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक वाढवू शकाल.
हे सुद्धा वाचा:
- इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा?
- Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!
- कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!
नवीन वेबसाईट वर ट्रॅफिक कसे आणायचे? ह्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट्स करून नक्की विचारा. तसेच हा लेख सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की सांगा.तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तंत्रज्ञान, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.