COVID-19 वैक्सिनेशन सर्टिफिकेट ला Aarogya Setu ऍप किंवा CoWIN वेबसाइट वरून (How to download COVID-19 vaccine certificate in Marathi) डाऊनलोड करू शकतो. हे दोन्हीही प्लॅटफॉर्म भारत सरकार द्वारे नियंत्रित केले जातात. तसेच ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म वरून कोविड-१९ सर्टिफिकेट ऑनलाईन डाऊनलोड करणे खूप सोपे आहे.
COVAXIN ही Bharat Biotech द्वारा बनवण्यात आली आहे. तर COVISHIELD ला AstraZeneca/ Oxford मार्फत बनवण्यात आली आहे.
COVID-19 वैक्सिनेशन सर्टिफिकेट वैक्सिन घेतलेल्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. दोन्ही वैक्सिन घेतल्यावर तुम्हाला वैक्सिनेशन सर्टिफिकेट मिळते. 18 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी भारत सरकारने वैक्सिन घेण्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे भारतात जास्तीत जास्त वैक्सिनेट नागरिक होणार आहेत. दोन डोस घेतल्यानंतर आपण ते सर्टिफिकेट ऑनलाईन डाऊनलोड करू शकतो.
हे सर्टिफिकेट Aarogya Setu ऍप किंवा CoWIN वेबसाइट वरून डाऊनलोड करू शकतो.
COVID-19 वैक्सिनेशन सर्टिफिकेट COWIN वेबसाईट वरून कसे डाऊनलोड करायचे? (How to download COVID-19 vaccine certificate in Marathi)
त्या अगोदर हे जाणून घ्या की, COVID-19 वैक्सीन सर्टिफिकेट फक्त दोन डोस घेतलेली लोकच डाऊनलोड करू शकतात. त्यामुळे तुम्ही एकतर Covaxin किंवा Covishield चे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे.
– सर्वात अगोदर Google वरून CoWIN वेबसाईट ओपन करा.
– आता उजव्या बाजूला दिलेल्या Register/Sign in वर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर (वैक्सिन घेताना रजिस्टर केलेला मोबाईल नंबर) तिथे एंटर करा.
– नंतर तुमच्या मोबाईल वर OTP येईल तो तिथे टाईप करा.
– आता तुम्हाला सर्व रजिस्टर मेंबर्स ची लिस्ट दिसेल. त्यातील तुम्हाला ज्या व्यक्तीचे वैक्सिनेशन सर्टिफिकेट डाऊनलोड करायचे आहे. त्याच्या नावा खाली तुम्हाला Certificate असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमच्या वैक्सिनेशन सर्टिफिकेट ची PDF फाईल डाऊनलोड होईल. ती मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा.
See Also:-
» Google My Business वर बिझनेस अकाऊंट कसे बनवायचे?
» डेबिट कार्ड शिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? पाहा ही सोप्पी पद्धत..
Aarogya Setu ऍप वरून वैक्सिनेशन सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करायचे?
– Google Play Store वरून Aarogya Setu ऍप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या.
– नंतर CoWIN टॅब वर जाऊन Vaccination Certificate वर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला Reference ID एंटर करावा लागेल. ( जेव्हा आपण पहिले वैक्सिन घेतो तेव्हा आपल्याला पहिल्या वैक्सिनेशन सर्टिफिकेट वर Reference ID मिळतो.)
– आता Get Certificate वर क्लिक करून PDF फाईल डाऊनलोड करून घ्या.
हे नक्की वाचा:
» Bot म्हणजे काय? Bot चा उपयोग कुठे केला जातो?
» स्मार्टवॉच म्हणजे काय? स्मार्टवॉच चे फीचर्स आणि फायदे!
Umang ऍप वरून वैक्सिनेशन सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करायचे?
– सर्वात अगोदर गूगल प्ले स्टोअर वरून UMANG ऍप डाऊनलोड करा.
– त्यानंतर वर दिलेल्या search आयकॉन वर क्लिक करून. COWIN असे सर्च करा.
– नंतर COWIN टॅब वर क्लिक करून Download Vaccination Certificate वर क्लिक करा.
– आता तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि नंतर OTP एंटर करा.
– त्यानंतर Beneficiary Name टाईप करा. आणि Download वर क्लिक करा. अश्या प्रकारे तुमचे सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
» Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?
Digi Locker ऍप वरून वैक्सिनेशन सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करायचे?
– Digi Locker ऍप डाऊनलोड करा. जरा मोबाईल मध्ये ऍप नसेल तर प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करा.
– ऍप ओपन केल्यानंतर तुमची जन्म तारीफ, आधार कार्ड नंबर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून Digi Locker ऍप ओपन करा.
– आता Central Government टॅब मधील Ministry of Health and Family Welfare (MoHFW) ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
– नंतर तुम्हाला Covid Vaccine Certificate ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तिथे 13 अंकी Beneficiary ID/ Reference ID एंटर करा. आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
» ऑनलाईन चित्रपट पाहण्यासाठी ह्या OTT Platforms चा वापर करा.
WhatsApp वरून वैक्सिनेशन सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करायचे?
– हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा +91-9013151515.
– नंतर WhatsApp वरून ह्या नंबर वर “Download Certificate” मेसेज टाईप करून सेंड करा.
– नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर 6 अंकी OTP येईल तो एंटर करा.
– त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव दिसेल. तसेच नंबर ही दिसेल. आता 1 असा नंबर टाईप करून सेंड करा.
– आता तुम्हाला Covid Certificate PDF स्वरूपात मिळेल तो डाउनलोड करून पाहा.
View this post on Instagram
हे नक्की वाचा:-
» मराठी भाषेत ऑनलाईन बातम्या वाचण्यासाठी हे ऍप वापरा!
» ऑनलाईन Medicines मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!
अश्या प्रकारे तुम्ही वैक्सिनेशन सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. ते ही अगदी सोप्प्या पद्धतीने. वर दिलेल्या 5 पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही COVID-19 Vaccine Certificate डाऊनलोड करू शकता.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्स, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.