आज आपण युपीआय म्हणजे काय? (UPI information in Marathi) त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. UPI पद्धतीने आपण भारतात कुठेही ऑनलाईन पेमेंट करू शकतो. तसेच युपीआय ने पैसे कसे पाठवायचे? (UPI Meaning in Marathi) ते सुद्धा जाणून घेऊया.
आजच्या युगात सर्व काही ऑनलाईन पद्धतीने केले जाते. शॉपिंग असो किंवा अभ्यास सर्व काही ऑनलाईन पद्धतीने केले जाते. आपण सर्वांनी ऐकलेच असेल की UPI द्वारे जलद व सुरक्षित पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करता येते. ऑनलाईन पेमेंट करणे काही कठीण नाहीय.
फक्त इंटरनेट आणि मोबाईल द्वारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट किंवा दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात डिजिटल इंडिया मोहीम राबवली आहे. ह्याच्याच अंतर्गत UPI Payment System सुरू करण्यात आले होते.
तुम्ही जाहिरातींमध्ये पाहिले असेलच UPI द्वारे कोणतेही पेमेंट काही सेकंदात करता येते. तसेच Paytm, PhonePe ह्या ऑनलाईन पेमेंट ऍप्लिकेशन च्या द्वारे सुद्धा पेमेंट करता येते.
UPI म्हणजे काय? (UPI information in Marathi)
यूपीआय एक पेमेंट तंत्रज्ञान आहे. यूपीआय चा फुल फॉर्म युनिफाइड पेमेंट इंटरफेस असा आहे. युपीआय च्या द्वारे कॅशलेस पेमेंट करता येते. कॅशलेस पेमेंट करण्यासाठी यूपीआय हा सर्वात सुरक्षित आणि सोप्पा मार्ग आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि इंडियन बँक असोसिएशन (IBA) यांनी मिळून भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची म्हणजेच NPCI ची स्थापना केली. NPCI भारताची बँकिंग व्यवस्था मॅनेज करते.
NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया होय. NPCI नेच UPI ची स्थापना केली आहे. NPCI सर्व ऑनलाईन पेमेंट ना मॅनेज करते.
UPI च्या माध्यमाने कोणत्याही व्यक्तीला bank account मधून जलद पैसे पाठवता येतात. तसेच इतर कोणतेही payment करण्यासाठी UPI चा वापर करता येतो. E-commerce वेबसाईट वरून ऑनलाईन खरेदी करण्यासाठी, रिचार्ज भरण्यासाठी, रिक्षाचे भाडे देण्यासाठी, किराणा माल खरेदी करण्यासाठी इत्यादी गोष्टींसाठी UPI चा वापर करता येतो.
तसेच हे सर्व काही फक्त एका मोबाईल वरून करता येते. फक्त त्यासाठी तुमचे बँक खाते मोबाईल सोबत जोडलेले असले पाहिजे.
आपल्याला माहितीच आहे की पैसे पाठविण्यासाठी आणि दुसऱ्याकडून आपल्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या ओळख पत्रांची माहिती द्यावी लागते.
जसे की बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, आयएफएससी कोड इत्यादी. परंतु यूपीआयकडून पैसे पाठवण्यासाठी फक्त यूपीआय आयडीची (UPI ID) आवश्यकता असते. ज्याला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) असेही म्हणतात.
हे नक्की वाचा:
▪️ Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची?
▪️ गुगल ऍडसेन्स अकाउंट कसे बनवावे?
UPI Payment App वापरण्याचे काही फायदे
▪️ पैसे पाठवण्यासाठी फक्त UPI id ची आवश्यकता लागते.
▪️ पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सर्वात जलद आणि सुरक्षित पर्याय आहे.
▪️ UPI वरून पैसे पाठवल्यावर किंवा पेमेंट केल्यावर कोणताही एक्स्ट्रा चार्ज लावला जात नाही.
▪️ यूपीआय वरून पेमेंट करण्यासाठी कोणत्याही UPI Payment App चा वापर करता येतो.
▪️ UPI वरून सर्व प्रकारचे ऑनलाईन पेमेंट करतात येतात.(जसे की, बिल भरणे, मोबाईल रिचार्ज, टॅक्सी भाडे, इकॉमर्स पेमेंट, इत्यादी)
▪️ तसेच ही सेवा 24/7 आणि 365 दिवस उपलब्ध असते.
यूपीआय सेवा देणारे बँक खाते (UPI Payments Bank Accounts)
- Bank Of India
- Allahabad Bank
- HSBC Bank
- Axis Bank
- Bank Of Baroda
- Airtel Payments Bank
- Bank of Maharashtra
- Canara Bank
- Catholic Syrian Bank
- Central Bank of india
- City Union Bank
- DBS Digi Bank
- DCB Bank
- Dena Bank
- Equitas Small Finance
- Federal Bank
- FINO Payments Bank
- HDFC Bank
- Andhra Bank
- ICICI Bank
- IDBI Bank
- IDFC Bank
- Indian Bank
- Indian Overseas Bank
- IndusInd Bank
सेवा देणारे अन्य काही अँप (UPI Payments Apps)
▪️ Google Pay (Tez)
▪️ BHIM App
▪️ Amazon Pay
▪️ Paytm
▪️ PhonePe
हे नक्की वाचा:
▪️ कीबोर्ड मध्ये Qwerty फॉरमॅट का वापरला जातो? | (Qwerty Keyboard) जाणून घ्या संपूर्ण माहिती!
▪️ e-Aaadhar Card डाऊनलोड करण्यासाठी ह्या ट्रिक चा वापर करा.
UPI ने पैसे कसे पाठवायचे? (How to send money by UPI in Marathi)
UPI ने पैसे पाठवण्यासाठी आपण Google Pay चा वापर करणार आहोत. गूगल पे अॅप इंस्टॉल कसे करायचे व कसे सेट अप करायचे? ह्यासाठी यूट्यूब वरील हा व्हिडिओ पहा.
व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे Google Pay इंस्टॉल करून घ्या त्यानंतर खाली दिलेल्या पद्धत चा वापर करा..
- गूगल पे ओपन केल्यावर तुम्हाला विचारला ४ अंकी Pin विचारला जाईल. (गूगल पे सेटअप करताना जो तुम्ही PIN ठेवला असेल तो त्या जागी टाईप करा.)
- त्यानंतर पैसे पाठवण्यासाठी म्हणजेच Transfer करण्यासाठी खाली दिलेल्या New Payment पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर ४ पर्याय येतील ( Bank Transfer, Contact/Phone Number, UPI ID/QR, Self Transfer).
- तुम्हाला कोणत्या प्रकारे पैसे पाठवायचे आहेत तो पर्याय अगोदर निवडून घ्या. त्यानंतर त्या पर्यायावर क्लिक करा.
- मी तुम्हाला Phone Number वरून कसे पैसे पाठवायचे त्याबद्दल सांगणार आहे.
- सर्वात अगोदर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचा फोन नंबर (जो बँकेतील खात्याला जोडलेला आहे) मोबाईल मधे सेव्ह करून घ्या.
- त्यानंतर त्या phone number वर क्लिक करा. आता त्या व्यक्तीचा Separate फोन नंबर येईल. आता खाली तुम्हाला २ पर्याय दिसतील.
- Pay आणि Request ( तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करायचे असल्यास Pay वर क्लिक करा व दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे स्वीकारायचे असल्यास त्या व्यक्तीला Request पाठवा.)
- तर आता आपल्याला पैसे ट्रान्स्फर करायचे आहे म्हणून Pay पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला रक्कम टाकावी लागणार (उदाहरणार्थ:- 500₹). रक्कम टाकल्यावर खाली दिलेल्या Pay बटन क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला ६ अंकी PIN विचारला जाईल. तो अगोदर टाकून घ्या.
- त्यानंतर खाली दिलेल्या टिक बटन वर क्लिक करा.
अश्या प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीचा वापर करून पैसे पाठवू शकता ते ही काही मिनिटात व सुरक्षित रित्या.
पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी BHIM App किंवा PhonePe चा वापर सुद्धा केला जातो. ह्या अँप च्या मदतीने सुद्धा पैसे ट्रान्स्फर करता येतात. ते ही जलद व सुरक्षित.
हे नक्की वाचा:
▪️ Cloud Storage म्हणजे काय? आणि ह्याचा उपयोग कसा करायचा?
▪️ E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!
तुम्हाला UPI म्हणजे काय? UPI ने पैसे कसे पाठवायचे? (UPI information in Marathi) हे समजले असेल. तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा.
तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्स, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.