आज आपण यूट्यूब ह्या लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Youtube in Marathi) ते जाणून घेणार आहोत.
यूट्यूब ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अनेक मुलं किंवा मुली यूट्यूब चॅनल बनवून ऑनलाईन पैसे कमावण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर काहींनी त्यातच पुढे करिअर केले आहे. यूट्यूब वरून ऑनलाईन व्हिडिओ अपलोड करून त्यामार्फत पैसे कमवू शकतो.
भारतात रिलायन्स जियो मुळे प्रत्येकाकडे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक जण रोज काहींना काही इंटरनेट वर अपलोड करत असतो किंवा काही माहिती शिकत असतो. पण जर तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती यूट्यूब च्या मदतीने दुसऱ्यांना शेअर करून त्यामार्फत ऑनलाईन पैसे कमवू शकता.
आज आपण यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Youtube in Marathi) त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावण्याचे मुख्य मार्ग! ( How To Earn Money From Youtube in Marathi )
यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी आपल्या कडे स्वतःचे यूट्यूब चॅनल ( YouTube Channel ) असणे गरजेचे आहे. यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी तुमच्याकडे एक Gmail अकाऊंट असणे गरजेचे आहे.
1 . Google Adsense
गूगल अॅडसेन्स हे सर्वात लोकप्रिय Ad monetization सेवा देणारे गूगल कंपनीचे प्रॉडक्ट आहे. तसेच Google AdSense हे मॉनीटायझेशन वर चालणारी सेवा आहे. यूट्यूब वरून पैसे कमावण्यासाठी सर्व यूट्यूबर Google AdSense लाच पसंती देतात. हा एक उत्तम पर्याय आहे.
आपल्या यूट्यूब चॅनल वर 1000 Subscribers आणि 4000 Watchtime पूर्ण झाल्यावर तुम्ही Google AdSense अकाऊंट तयार करून तेथे Apply करावे लागते. Google AdSense चे अॅप्रोवल मिळाल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनल वर Video स्वरूपात जाहिरात दिसू लागतात.
त्यानंतर जेव्हाही कोणी आपल्या यूट्यूब चॅनल वरील व्हिडिओ पाहतो. तेव्हा त्याला YouTube वरील Ads दिसतात. त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ठराविक पैसे मिळतात. ते पैसे डॉलर मध्ये तुमच्या अॅडसेन्स अकाऊंट मध्ये जमा होतात.
नंतर महिन्याच्या 21 तारखेला ते पैसे तुमच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होतात. तसेच तुम्ही ते बँकेत जाऊन काढू शकता.
» ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?
» वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा?
2. Collaboration
तुमच्या यूट्यूब चॅनल वर दररोज खूप लोक भेट देत असतील तर, तुम्ही दुसऱ्या यूट्यूब चॅनल सोबत collaboration करून त्यांचे काही व्हिडिओज तुमच्या यूट्यूब चॅनल वर अपलोड करू शकता. ह्याच्या मोबदल्यात तुम्ही त्या यूट्यूब चॅनल मालकाकडून प्रत्येक व्हिडिओ मागे ठराविक पैसे आकारू शकता.
3. Affiliate Marketing
Affiliate Marketing ला खूप मागणी वाढत आहे. प्रत्येक कंटेंट क्रिएटर आणि यूट्यूबर affiliate marketing हा पर्याय निवडत आहे. कारण ह्यातून कमी वेळात खूप पैसे कमवता येतात. तसेच ह्या साठी तुम्हाला कोणतीही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
Affiliate Marketing मधून पैसे कमाण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही वेबसाईट किंवा कंपनीचे Affiliate Program असणे गरजेचे आहे. Affiliate Program म्हणजे काय तर कोणत्याही कंपनीची लोकप्रिय सेवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेली सुविधा म्हणजे affiliate program होय.
इंटरनेट वर अश्या अनेक वेबसाइट्स आहेत ज्या ही सेवा उपलब्ध करून देतात. Bluehost, SiteGround, Amazon, Shopify सारख्या वेबसाइट्स आहेत. ह्या वेबसाईट वरून आपण affiliate program मध्ये अकाऊंट बनवून पैसे कमवू शकतो.
Affiliate Program मध्ये स्वतःचे अकाऊंट तयार करावे लागते. जेव्हा आपण affiliate program मध्ये अकाऊंट बनवतो, तेव्हा आपल्याला एक affiliate link मिळते. ती लिंक आपण यूट्यूब चॅनल च्या description मध्ये देऊ शकतो. जेव्हा कोणी त्या लिंक वरून काही खरेदी करतं, तेव्हा आपल्याला त्या प्रॉडक्ट मागील काही टक्के (%) कमिशन मिळते. जितकी जण खरेदी करणार तितकं तुम्हाला जास्त कमिशन मिळते.
हे नक्की वाचा:- Affiliate Marketing म्हणजे काय? एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवावे?
4. Paid Promotion
पेड प्रमोशन हा एक उत्तम पर्याय आहे यूट्यूब वरून ऑनलाईन पैसे कमावण्याचा. पण त्यासाठी तुमच्या यूट्यूब चॅनल वर जास्त subscribers असणे महत्त्वाचे आहे. पेड प्रमोशन साठी आपल्याला काही छोट्या मोठ्या कंपनीशी संपर्क साधून त्यांचे प्रॉडक्ट्स किंवा त्यांची जाहिरात आपल्या यूट्यूब चॅनल वर करावी लागेल. त्यानंतर त्या मोबदल्यात ते आपल्याला काही ठराविक रक्कम देऊ शकता.
फक्त तुमच्या यूट्यूब चॅनल वर जास्तीत जास्त 10,000 फॉलोवर्स किंवा त्यापेक्षा असणे गरजेचे आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकं ते प्रॉडक्ट्स पाहू शकतील व खरेदी करतील.
» E-Banking म्हणजे काय? आणि ई-बँकिंग चे प्रकार!
5. Guest Video
जर तुमचे इंटरव्ह्यू घेणारे किंवा माहिती देणारे यूट्यूब चॅनल असेल तर तुम्ही दुसऱ्या यूट्यूब चॅनल वरील लोकांचे व्हिडिओज तुमच्या यूट्यूब चॅनल वर As a Guest Video म्हणून अपलोड करून त्यांच्या कडून पैसे कमवू शकता.
6. Sell Books/Courses
तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल वर ईबुक, कोर्सेस विकू शकता.
जर तुमचे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल माहिती देणारे असेल. तर तुम्ही Udemy, Great Learning, Upgrade ह्या वेबसाईट वरील कोर्स यूट्यूब चॅनल वर विकून पैसे कमवू शकता. यूट्यूब चॅनल च्या description मध्ये लिंक देऊन तुम्ही कोर्सेस विकू शकता. तसेच जर तुम्ही तयार केलेले कोणते व्हिडिओ कोर्सेस असतील तर ते तुम्ही तुमच्या कस्टमर ना विकू शकता.
अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल वरून ऑनलाईन पैसे कमवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला रोज तुमच्या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओज अपलोड करत राहावे लागणार. तसेच व्हिडिओ कंटेंट सुद्धा महत्वाचा आहे.
हे नक्की वाचा:
» Google Lens म्हणजे काय? गूगल लेन्स चा वापर कसा करायचा?
» गूगल फॉर्म म्हणजे काय? गूगल फॉर्म कसा तयार करायचा?
यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Youtube in Marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच तंत्रज्ञान आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.
Great
Thank you 😊
thanks sir very very important information
Very nice information 👌👌