आजच्या लेखात आपण Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची? (How to create add me to search profile in marathi) हे पाहणार आहोत.
सर्व क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीने काम वाढल्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऑनलाईन काम करावे लागते. ऑनलाईन काम करून आपण ऑनलाईन जगात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
पण ऑनलाईन काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपल्याशी संवाद साधायचा असतो तेव्हा आपल्याला एकतर मोबाईल नंबर द्यावा लागतो किंवा एखादा ईमेल आयडी. त्यामुळे Google ने एक नवीन सेवा सुरू केली आहे. त्या नाव आहे “People Cards”.
ह्याचा फायदा असा आहे की तुम्ही ह्यावर तुमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स ची लिंक, वेबसाईट लिंक, तुमचं प्रोफेशन इत्यादी माहिती देऊ शकता. तसेच ही माहिती गूगल वर सर्वत्र दिसते.
Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल कशी तयार करायची? (How to create Google add me to search profile in marathi)
Step 1. त्यासाठी सर्वात अगोदर Google वर Add me to search असे शोधा. त्यानंतर तुमच्या समोर काही असा रिझल्ट येईल. 👇🏻
Step 2. त्यानंतर खाली दिलेल्या Get Started वर क्लिक करा. आता तुमच्या समोर तुमची सर्व माहिती भरण्यासाठी एक फॉर्म येईल.
हे नक्की वाचा: कीबोर्ड मध्ये Qwerty फॉरमॅट का वापरला जातो? | (Qwerty Keyboard) जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Step 3. पण सर्वात अगोदर तुम्ही गूगल वर ज्या अकाऊंट ने Log in केले आहे. त्यात तुमचेच संपूर्ण नाव असले पाहिजे. कारण तिथे तुम्ही तुमचे नाव बदलू शकत नाही. तसेच ह्यामध्ये तुम्ही कोण कोणती माहिती भरू शकता ते खालील प्रमाणे:
• तुमचा प्रोफाइल फोटो
• तुमचे पूर्ण नाव
• ठिकाण
• तुमच्या कामाविषयी थोडक्यात माहिती
• तुम्ही जे काम करता त्याचे नाव (Example. blogger)
• वेबसाईट ची लिंक
• सोशल मीडिया प्रोफाइल
• फोन नंबर
• तुमचे शिक्षण
• ईमेल आयडी
Step 4. हे सर्व झाल्यावर तुम्ही खाली दिलेल्या Preview बटन वर क्लिक करा. आता तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल, ती एकदा तपासून घ्या. नंतर save वर क्लिक करा.
अश्या पद्धतीने तुम्ही Google मधल्या Add Me To Search मध्ये स्वतःची प्रोफाइल अगदी सहज तयार करू शकता. तसेच ही सेवा मोफत आणि अगदी सुरक्षित आहे.
हा लेख कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सोशल मीडिया शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा उपयोग करून तुमच्या नावाचे कार्ड बनवू शकता. जर तुमचे काही प्रश्न असतील, तर कमेंट्स करून आम्हाला नक्की विचारा.
हे सुद्धा वाचा:
- इंस्टाग्राम वरील स्टेटस, व्हिडिओज डाऊनलोड करण्यासाठी हे Apps वापरा?
- Top 8 Free फोटो एडिटिंग मोबाईल अँप! जे तुम्ही नक्की वापरले पाहिजे!
- कोणतीही URL Short कशी करायची? पाहा ह्या भन्नाट URL शॉर्टनर वेबसाइट्स!
तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. टेक टिप्स, टेक टिप्स, Apps आणि ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मराठी टेक कॉर्नर वेबसाईट शी जोडून रहा.