हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती | Health Insurance Information in Marathi

Health Insurance Information in Marathi

आजच्या लेखात आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती (Health Insurance Information in Marathi) जाणून घेणार आहोत. आरोग्य संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नुकत्याच आलेल्या कोरोना महामारी मुळे लोकांना स्वतःच्या आरोग्याची चांगलीच जाणीव झाली आहे. अश्या परिस्थितीत आपल्या आरोग्यास काही झाले, तर आपले घर कोण चालवणार ह्याने आपण त्रस्त होतो.

पण जर आपण अगोदरच health insurance काढले असेल, तर आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत योग्य ती भरपाई Insurance (विमा) कंपनी कडून मिळते. ज्यामुळे आपल्या परिवाराला योग्य ती मदत होते.

Health Insurance घेण्याचे आजुन एक उदाहरण म्हणजे, ज्या लोकांना कोरोना झाला त्यांनी अगोदरच विमा काढून ठेवला होता. त्यामुळे त्यांना एकही पैसा खर्च करावा लागला नाही. पण हे कसे झाले? तर फक्त आणि फक्त आरोग्य विम्या मुळे हे शक्य झाले आहे. आहे की नाही, आश्चर्यचकित करणारी गोष्ट.

मित्रांनो, आज आपण Health Insurance घेण्याचे महत्व जाणून घेणार आहोत. तसेच मी प्रत्येक व्यक्तीला Health Insurance काढण्याचे आवाहन करीन. कारण जर आरोग्य विमा आपल्याजवळ असेल तर आपल्याला आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत कोणतेही टेन्शन घ्यायची वेळ येणार नाही.

आजच्या पोस्ट मध्ये हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी कोण कोणते documents (कागदपत्रे) लागतात, इत्यादी बद्दल माहिती सविस्तर पणे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता, आजच्या पोस्ट ला सुरुवात करुया.

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? – What Is Health Insurance in Marathi

आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) म्हणजे एक असा विमा जो आपल्याला आपल्या आपत्कालिन परिस्थितीत, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खर्चापासून आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करतो. आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स होय. तसेच आरोग्य विमाला mediclaim सुद्धा म्हणतात.

अपघातावेळी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर विमाधारकाला पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णाला घरातून हॉस्पिटल मध्ये आणण्यापासून ते पूर्ण उपचार खर्च Health Insurance कंपनी करते. असे अनेक प्रकारचे फायदे आहेत. जे आरोग्य विमा कंपनी आपल्याला देते.

Health Insurance Information in Marathi
health insurance mahiti

हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे का?

आरोग्य हेच जीवन आहे. आपण आपल्या घराचे एकुलते एक कमावणारे व्यक्ती असाल तर तुम्हाला health insurance काढणे आवश्यक आहे. कारण संकटकाळी तुम्हाला हाच आरोग्य विमा उपयोगी पडू शकतो. तसेच, जर तुम्ही गाडी चालवत असाल किंवा कोणत्या लांबच्या ठिकाणी रोज प्रवास करत असाल. तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे.

आजच्या डिजिटल काळात सर्व वेगवान झाले आहे. कोणाला कोणासाठी थोडासा सुद्धा वेळ नाही आहे. सर्वजण एकत्र मिळून चार गोष्टी शेअर करतील असे आजकाल राहिले नाही आहे. परंतु आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी व खूप काळजी असते. त्यामुळे अश्या वेळी आपण घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर एकतरी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपण जरी त्यांच्या सोबत नसलो तरी, गरजेला Health Insurance उपयोगी येईल.

Read Thisईबुक म्हणजे काय? ईबुक चे फायदे व तोटे! (ebook meaning in marathi)

प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा (Health Insurance) घेणे आवश्यक आहे. कारण आजकाल जीवनावर विश्वास नाही. आजकाल एखादी चांगली व्यक्ती दुसऱ्याकडून दुखावली जाते, कधीकधी त्याला दुखापत होते. अपघात होतो. अशा परिस्थितीत, आयुष्यभर मिळणारी कमाई उपचार घेण्यामध्ये निघून जाते. अश्या वेळी Fixed Deposit सुद्धा कमी पडते. पण आपण आरोग्य विमा घेतला असेल, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही.

भारतातील आरोग्य विमा किंवा हेल्थ ईन्शुरन्स चे प्रकार ( Types of Health insurance in Marathi )

1. वैयक्तिक आरोग्य विमा ( Personal Health insurance )

भारतात मिळणाऱ्या आरोग्य विमांपैंकी हा विमा सर्वात जास्त फायद्याचा आहे. वैयक्तिक आरोग्य विमा ही एक पॉलिसी आहे. जी तुम्ही, तुमचा जोडीदार, मुले आणि पालक यांना कव्हर करण्यासाठी काढू शकता. Personal Health insurance विमा पॉलिसी मध्ये तुमच्या इजा आणि आजारांवरील वैद्यकीय खर्च, रुग्णालयात दाखल करणे, शस्त्रक्रिया खर्च, खोलीचे भाडे आणि बरेच काही समाविष्ट असते. ज्यामुळे परिवाराला खूप उपयोगी पडते. 18 ते 70 वर्षे वयोगटात येतात ते ही विमा पॉलिसी घेऊ शकतात.

2. फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा ( Family Floater Health Insurance )

जर तुम्ही तुमच्या फॅमिली मधील सर्व सदस्यांसाठी एकच विमा पॉलिसी घ्यायचे प्लॅनिंग करत असाल. तर मित्रांनो, फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स हा पर्याय तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, समाविष्ट सर्व सदस्यांसाठी सिंगल सम इन्शुरड फ्लोट्स लागू होते. फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना फायदेशीर आहे, कारण प्रीमियम हा वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीपेक्षा कमी असतो.

Health Insurance Information in Marathi

ही पॉलिसी स्वतःला, तुमच्या जोडीदाराला, मुलांना आणि पालकांना कव्हर करू शकते. पण तुमच्या फॅमिली मधील ज्या व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांना ह्या पॉलिसी मध्ये समाविष्ट करू शकत नाही. ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी ही विमा योजना सर्वात उत्तम आहे.

Read Thisव्हॉट्सअँप वरून बिझनेस लोन मिळवा काही सेकंदात! जाणून घ्या संपूर्ण माहिती

3. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ( Group Health Insurance Policy )

ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही एकत्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां साठी आहे. जर तुमची कोणती कंपनी असेल, तर तेथील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही पॉलिसी खरेदी नक्की करावी. कर्मचारी धारणा दर वाढवण्यासाठी कव्हर खरेदी करू शकता.

ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजना कमी किमतीच्या प्रीमियमसह येते. काही विमा कंपन्या विम्याची रक्कम पुन्हा भरण्याची परवानगी देतात, जर ती संपली असेल तर ती सुद्धा अमर्यादित वेळा. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला अपघात, आजारपण, गंभीर आजार, मानसिक आजार आणि प्रसूतीमुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी कव्हर करते.

Read Thisऑनलाईन औषधे मागवण्यासाठी ह्या Apps चा वापर करा!

4. ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा

ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा ही पॉलिसी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी खास आहे. जर तुमचे आईवडील किंवा आजी आजोबा ६० च्या वर असतील तर ही पॉलिसी घेणे चांगले आहे. ह्या ज्येष्ठ नागरिक धोरणात औषधांचा खर्च, अपघात किंवा आजारांमुळे होणाऱ्या हॉस्पिटलायझेशन, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या उपचारांसाठी कव्हरेज देण्यात येते. यासह, इतर काही फायदे जसे अधिवास हॉस्पिटलायझेशन आणि मानसोपचार फायदे देखील समाविष्ट आहेत.

5. मातृत्व आरोग्य विमा (Maternity Health Insurance)

ही पॉलिसी सर्व महिलांसाठी खूप उपयोगी आहे. मूलभूत आरोग्य विमा योजनेसह एक प्रसूती कव्हर म्हणून खरेदी करता येते. जन्मपूर्व अवस्थेत, प्रसूती आणि जन्मानंतरच्या टप्प्यात झालेले सर्व खर्च कव्हर केले जातात. नवीन विवाहित जोडपे किंवा कुटुंब जे येत्या काही वर्षांत बाळाची योजना करनार आहेत. त्यांनी ही पॉलिसी नक्कीच खरेदी करावी.

यात बाल-प्रसूती (वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक समाप्तींसह), वंध्यत्व खर्च आणि नवजात बाळाला त्याच्या पहिल्या ९० दिवसांपर्यंत कव्हरेज समाविष्ट आहे. मॅटर्निटी कव्हरमध्ये किमान २ वर्षे प्रतीक्षा कालावधी असतो.

6. गंभीर आजार विमा (Critical Illness Insurance)

आजकाल गंभीर रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक विमा कंपन्यांनी क्रिटिकल इलनेस पॉलिसी दिली आहे. जी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खास तयार केलेली आहे. ह्या आरोग्य योजना मध्ये खालील रोगांचा समावेश केलेला आहे. जसे की:

  • कर्करोग
  • स्ट्रोक
  • मूत्रपिंड निकामी
  • अर्धांगवायू
  • कोरोनरी धमनी बायपास शस्त्रक्रिया
  • पहिला हृदयविकाराचा झटका
  • फुफ्फुसीय धमनी उच्च रक्तदाब
  • मल्टीपल स्क्लेरोसिस
  • महाधमनी कलम शस्त्रक्रिया

आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आरोग्य विमा खरेदीची प्रक्रिया शक्य तितकी सुरळीत करण्यासाठी, संभाव्य गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रे आधीच संकलित करणे महत्वाचे आहे. या कागदपत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे –

वयाचा पुरावा (Age Proof) – आरोग्य विमा काढण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. ( मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा जन्म प्रमाणपत्र. )

ओळखीचा पुरावा ( Identity Proof) – खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करू शकता. ( मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ) पॅन कार्ड यापुढे ओळखीचा वैध पुरावा मानले जाणार नाही.

पत्त्याचा पुरावा (Address Proof) – पत्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. कारण विमा कंपनी आपल्याला नवनवीन आरोग्य विमा पॉलिसी, न्यूज, शुभेच्छा पाठवत असते.
खालीलपैकी कोणतेही एक दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. ( रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, लागू असल्यास भाडे करार, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा वीज बिल किंवा टेलिफोन बिल सारखे उपयोगिता बिल, पासपोर्ट size photo )

वैद्यकीय अहवाल (Medical Reports) – medical reports हे विमाधारक कोणत्या गरजेचे विमा घेत आहे. त्या गोष्टीवर अवलंबून असते.

प्रस्ताव फॉर्म (Proposal Form) – हा दस्तऐवज योग्यरित्या भरला गेला पाहिजे आणि योग्य भागात स्वाक्षरी केली पाहिजे.

मित्रांनो, आज आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती ( Health Insurance Information in Marathi ) जाणून घेतली. मला आशा आहे की, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बद्दल संपूर्ण मार्गदर्शन मिळाले असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शेअर करा.

Leave a Comment