ईबुक म्हणजे काय? ईबुक चे फायदे व तोटे! (ebook meaning in marathi)

ebook meaning in marathi

मित्रांनो, जगात तंत्रज्ञान हे खूप पुढे गेले आहे. प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. मनोरंजनापासून ते शिक्षणापर्यंत सर्व काही तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. मित्रांनो, पुस्तके सुद्धा हल्ली ईबुक स्वरूपात उपलब्ध असतात.

पण ईबुक म्हणजे काय? (e-book meaning in marathi) आणि ईबुक चे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? आजच्या लेखात आपण त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ईबुक म्हणजे काय? (ebook meaning in marathi)

ईबुक म्हणजे सोप्प्या शब्दात इलेक्ट्रॉनिक बुक. ईबुक हे संगणकाच्या स्क्रीन किंवा मोबाइल डिव्हाइससारख्या कोणत्याही डिजिटल डिव्हाइसवर वाचण्यासाठी डिजिटल स्वरुपात तयार केले जातात. प्रिंट केलेल्या बुक च्या सुद्धा ईबुक बनवल्या जातात.

ईबुक ह्या लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट सारख्या डीवाईस वर वाचता येतात. ईबुक ह्या डॉक्युमेंट्स स्वरूपात तयार केल्या जातात. ज्या इंटरनेटच्या साहाय्याने डाऊनलोड करून वाचू शकतो. तसेच काही ईबुक ह्या मोफत असतात.

ebook meaning in marathi
ebook meaning in marathi

तर काही Paid (सशुल्क) असतात. पॉप्युलर ईबुक्स इ-कॉमर्स वेबसाईट किंवा गूगल उपलब्ध असतात. तिथून डाउनलोड करून आपण त्या ईबुक्स वाचू शकतो.

ईबुक चे फायदे !

◾ इ-रीडर वर आपण एकावेळी 900 पेक्षा जास्त पुस्तके साठवून ठेवू शकतो.

◾ ईबुक ची किंमत कमी असल्यामुळे कोणतीही व्यक्ती ebook खरेदी करू शकते.

◾ घराबाहेर असल्यावर जसे की, रेल्वेमध्ये, विमानात असल्यावर, आपण मोबाइल वर ईबुक डाऊनलोड करून ईबुक वाचू शकतो.

◾ अँपल मोबाईल वापरणारे अँपल ईबुक स्टोअर वरून ईबुक फ्री मध्ये व सशुल्क डाउनलोड करू शकतात.

◾ किंडल वेबसाईट वर तुम्हाला सर्व ईबुक फ्री मध्ये मिळतील. व त्या डाऊनलोड करू शकतो.

◾ तसेच ईबुक आपण स्मार्टफोन, लॅपटॉप, आयफोन, आईपॅड वरती वाचू शकतो.

◾ पेपर वाल्या books order केल्यावर आपल्याला 4 ते 5 दिवस डिलिव्हरी होई पर्यंत वाट पाहावी लागते. पण ईबुक बाबत तसे नाही आहे. आपण ईबुक डायरेक्ट इंटरनेटच्या सहाय्याने स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करू शकतो.

https://twitter.com/MarathiTechC/status/1534976825692241938?s=20&t=Hq5S9Qkjs4_BCB7uVBj9Lg

ईबुक चे तोटे !

◾ ईबुक मुळे लोकं पुस्तके वाचणे विसरली आहेत. तसेच ईबुक मध्ये तुम्हाला सर्व माहिती थोडक्यात दिलेली असते.

◾ e-book ही स्वस्त असते त्यामुळे मोठ मोठी पुस्तके प्रिंट करणाऱ्या कंपन्यांना नुकसान होत आहे.

◾ ebook वाचण्यासाठी तुमच्याजवळ एक स्मार्ट device असणे आवश्यक आहे.

◾ जर एखाद्या व्यक्तीने एखादी Paid ebook डाऊनलोड करून जर त्याच्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवली तर ईबुक बनवणाऱ्या फार नुकसान होते.

◾ebook डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट ची गरज लागते.

ईबुक्स डाऊनलोड करण्यासाठी ह्या वेबसाईट चा वापर करा.!

मित्रांनो, ह्या वेबसाईट वरून तुम्ही सर्व पुस्तकांच्या फ्री व Paid ebooks डाऊनलोड करू शकता. तसेच मित्रांनो, प्रत्येक प्रादेशिक भाषेतील ईबुक्स ह्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. तुम्ही इंग्रजी, मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, उर्दू, कन्नड सारख्या भाषेतील ईबुक्स डाऊनलोड करून वाचू शकता.

>> Google eBookstore
>> Project Gutenberg
>> Open Library
>> archive.org
>> eBooks.com
>> Amazon Kindle
>> esahity.com
>> BookBoon
>> ManyBooks.net
>> free-ebooks.net
>> LibriVox
>> bookhub.com
>> epustakalay.com
>> sahitya.marathi.gov.in

Faq
1. ईबुक्स म्हणजे काय?

ईबुक म्हणजे सोप्प्या शब्दात इलेक्ट्रॉनिक बुक होय. ईबुक्स ह्या डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतात.

2. ईबुक्स फ्री मध्ये कोणत्या वेबसाईट वरून बनवू शकतो?

मित्रांनो, तुम्ही Canva वेबसाईट वरून मोफत ईबुक बनवू शकता. तसेच तुम्ही ती ईबुक PDF फॉरमॅट मध्ये मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता.

3. मराठी ईबुक कुठून डाऊनलोड करू शकतो?

मराठी ईबुक sahitya.marathi.gov.in ह्या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता. व मोफत वाचू शकता.

मित्रांनो, तुम्हाला वरील माहिती वाचून समजले असेल, की ईबुक म्हणजे काय? (ebook meaning in marathi) आणि ईबुक चे फायदे व तोटे!. मित्रांनो, ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तसेच सोशल मीडिया वर देखील शेअर करा. आणि आपल्या प्रत्येक मराठी बांधवांना मराठी टेक कॉर्नर वेबसाईट ला भेट द्या सांगायला विसरू नका.

Leave a Comment