फेसबुकच्या ‘NewsFeed’ चे नाव बदलून फक्त ‘Feed’ ठेवण्यात आले आहे!

Facebook renamed news feed feature to feed :- फेसबुक ही सर्वात जास्त वापरली जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 169.76 मिलियन आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म च्या यादी फेसबुक चे अव्वल नंबर आहे. फेसबुक ने थोड्याच दिवसांपूर्वी त्यांचे rebranding केले होते. फेसबुक ने Meta हे नवे नाव दिले होते. त्यामुळे अनेक वाद विवाद झाले. थोड्या दिवसाअगोदर फेसबुक म्हणजेच मेटा कंपनीच्या शेअर्स मध्ये खूप घसरण झाली होती. त्यामुळे फेसबुक कंपनीचे खूप नुकसान झाले आहे. त्यातच फेसबुक ने नुकतेच त्यांच्या ‘News Feed’ चे नाव बदलून फक्त ‘फीड’ असे ठेवले आहे. त्यामुळे फार काहीसा बदल होणार नाही.

हे नक्की वाचा : UPI Apps वरून ऑनलाईन पेमेंट करताना अश्या प्रकारे काळजी घ्या!

मार्क झुकेरबर्ग ह्यांनी सांगितले की, “आजपासून, आमचे “न्यूज फीड(news feed)” आता “फीड(feed)” म्हणून ओळखले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. 15 वर्षानंतर पहिल्यांदाच फेसबुक ने ‘न्यूज फीड’ चे नाव बदलले आहे. फेसबुकने एका निवेदाव्दारे सांगितले आहे की, फेसबुक वापरणाऱ्यांना सर्व कंटेंट Feed मध्ये चांगल्या पध्दतीने दाखवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Feed या नवीन नावामुळे अॅपमधील फीचरर्सवर कोणताही परिणाम किंवा बदल होणार नाही, ह्याबद्दल सांगितले आहे. मेटाकडून आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये असे काही बदल केले जाणार आहेत, की त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘अल्गोरिदम’ फेसबुक वर चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्ट शोधण्याचे आणि स्वतःहून काढून टाकण्याचे काम करु शकणार आहे. ह्यामुळे फेसबुक युजर्स अफवा आणि सत्य चांगल्या प्रकारे पडताळू शकतील.

हे नक्की वाचा: Instagram Post डिलीट झालेली अश्या पद्धतीने करा रिकव्हर!

गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक कंपनी ही तोट्यात चालत आहे. फेसबुक वर गोपनीयता आणि वारंवार होत राहणाऱ्या बदलावांमुळे अनेक युजर्स फेसबुक वरून दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कडे वळत आहे. त्यामुळे फेसबुकचे जागतिक स्तरावर अनेक युजर्स गमावले आहेत. त्यासोबत फेसबुक चे शेअरर्स साधारणत 20 टक्के घसरले आहेत. मोठ्या प्रमाणात शेअर्स घसरल्याने त्याचे बाजार मूल्य सुमारे 200 बिलियन डॉलरने कमी झाले आहे. मेटा-मालकीच्या फेसबुक प्लॅटफॉर्मने 2021 च्या चौथ्या तिमाहीत 1.929 अब्ज रोजच्या युजर्सची नोंद केली आहे.

हे सुद्धा वाचायला विसरू नका:

▪️ गूगल पे म्हणजे काय? आणि गुगल पे कसे वापरावे?

▪️ AR म्हणजे काय ? AR चा फुल फॉर्म आणि संपूर्ण माहिती!

तंत्रज्ञानाविषयी अशीच नवनवीन माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

Leave a Comment