OnePlus Nord CE 2 5G भारतात लॉन्च! Specs, Price जाणून घ्या..

OnePlus Nord CE 2 5G भारतात लॉन्च झाला आहे. OnePlus चा हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक प्रकार 6GB+128GB आणि दुसरा प्रकार 8GB+128. तसेच ह्या नवीन स्मार्टफोन मध्ये 4500mAh बॅटरी क्षमता सुद्धा दिलेली आहे. काल पार पडलेल्या (१७ फेब्रुवारी) OnePlus च्या इव्हेंट मध्ये OnePlus Nord CE 2 5G लॉन्च करण्यात आला. त्यासोबत, कंपनीने दोन नवीन स्मार्टटीव्ही देखील लॉन्च केले. OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge हे दोन नवीन Y Series मधील smart TV लॉन्च केले आहेत.

OnePlus Nord CE 2 5G Specs

OnePlus Nord CE 2 5G हा मोबाईल MediaTek Dimensity 900 चिप द्वारे समर्थित आहे. ज्या मध्ये 8GB RAM पर्यंत आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज वाढवता येईल. स्मार्टफोनमध्ये 4500 mAh बॅटरी capacity आहे. तसेच फास्ट चार्जिंग 65W “SuperVOOC” जलद चार्जिंगला सपोर्ट करतो. OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंच 1080p AMOLED डिस्प्लेसह येतो. ह्या स्मार्टफोन वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. स्मार्टफोन Android 11 वर चालतो आणि वरच्या 11.3 आवृत्तीवर आधारित OxygenOS सॉफ्टवेअरसह चालतो.

ह्या स्मार्टफोन मध्ये triple rear कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 64MP चा तर 8MP ultrawide-angle, आणि 2MP macro camera देण्यात आला आहे. तसेच 16MP Selfie Camera दिलेला आहे. OnePlus Nord CE 2 5G ला दोन वर्षांचे प्रमुख OS आणि तीन वर्षांच्या सुरक्षा अद्यतनांसह प्राप्त होईल. OnePlus ने असेही घोषित केले आहे, की OxygenOS 12 2022 च्या उत्तरार्धात (second half) रिलीज होईल. OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन नव्या अपडेटसाठी पात्र आहे. त्यामुळे युजर्स ना एक चांगला अनुभव मिळणार आहे.

नक्की वाचा :- फेसबुकच्या ‘NewsFeed’ चे नाव बदलून फक्त ‘Feed’ ठेवण्यात आले आहे!

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन ची किंमत

OnePlus Nord CE 2 5G च्या 6GB+128GB मॉडेलची किंमत 23,999 रुपयांपासून सुरु होते. तर OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB+128 ची किंमत Rs 24,999 इतकी असणार आहे. हे दोन व्हेरिएंट लॉन्च इव्हेंट मध्ये ह्या price मध्ये लॉन्च झाले आहेत.

OnePlus Nord CE 2 5G Available On Amazon

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन Amazon वर ऑनलाईन खरेदी साठी उपलब्ध असेल. ह्या स्मार्टफोन ची पहिली विक्री 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

तंत्रज्ञानाविषयी अशीच नवनवीन माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी मराठी टेक कॉर्नर ला भेट द्या.

Leave a Comment